‘हिंदू राष्ट्रवादा’चे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारे पुस्तक
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
सतीश बेंडीगिरी
  • ‘THE RSS : A View to the Inside’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 12 August 2021
  • ग्रंथनामा दखलपात्र THE RSS : A View to the Inside राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS वॉल्टर अँडरसन Walter Andersen श्रीधर दामले Shridhar Damle माधव सदाशिव गोलवलकर M. S. Golwalkar केशव बळीराम हेडगेवार Keshav Baliram Hedgewar

‘THE RSS : A View to the Inside’ या वॉल्टर अँडरसन आणि श्रीधर डी. दामले यांनी लिहिलेल्या पुस्तकात मोदी सरकारच्या धोरणांवर भाष्य करतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ‘हिंदू राष्ट्रवादा’चे पुनरुत्थान करण्याचे कसे प्रयत्न करत आहे, याचा एक व्यापक आढावा घेतला आहे. हिंदुत्वाच्या राजकारणावर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. अँडरसन-दामले या लेखकद्वयींनी या आधीही या विषयावर लेखन केले आहे. परंतु या पुस्तकात चर्चा केलेल्या अनेक विषयांपैकी प्रथमच घेण्यात आलेला विषय म्हणजे मोदी सरकारच्या धोरणाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर केलेले भाषण. 

या पुस्तकाची सुरुवात ‘A Growing Involvement in the Policy Process’ या प्रकरणाने होते. संघाचा मोदी सरकारच्या धोरण प्रक्रियेतल्या सहभागाला सुरुवात कशा प्रकारे झाली, हे सांगताना  लेखकांनी ३० सप्टेंबर २०१७ रोजी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मोहन भागवत यांनी केलेले भाषण उदधृत केले आहे. त्यामध्ये भागवत मोदींच्या धोरणांबद्दल आणि भारताच्या विकासात्मक प्राधान्यांबद्दल गंभीरपणे बोलले आहेत. भागवत यांनी जीएसटी करप्रणालीबाबत आपली मते व्यक्त केल्यानंतर जीएसटी परिषदेने नोव्हेंबर २०१७मध्ये करप्रणालीत सुधारणा केली. भागवत यांनी शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत, पीक विमा, माती परीक्षण आणि ई-विपणन यांसारख्या विद्यमान योजनांच्या अंमलबजावणीवर प्रकाश टाकत असतानाच त्यात सुधारणा सुचवल्या.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या पुस्तकात लेखकांनी १९व्या शतकातील हिंदुत्वाची पाळेमुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील व्यक्ती, या संघटनेवर दोन वेळा घातलेली बंदी आणि आता संघाने मिळवलेली राजकारण आणि समाजावरील पकड याचाही इतिहास सांगितला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसह पूर्व आशियाई देशांवर परिणाम करणाऱ्या भारतातील परिवर्तनाचाही मागोवा घेतला आहे.

या पुस्तकात दोन महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती मिळते. एक, हेडगेवार आणि दुसरे, गोलवलकर. १९२५मध्ये केशव बळिराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. १९४०पर्यंत ते संघाचे सरसंघचालक होते. देशाचे विभाजन, महात्मा गांधींची हत्या आणि १९४७मध्ये संघावर घातलेली बंदी हे सर्व माधवराव सदाशिवराव गोलवलकर यांच्या ३३ वर्षांच्या (१९४० ते १९७३) कारकिर्दीदरम्यान घडले. मधुकर दत्तात्रय देवरस यांनी संघाला राजकारणात ढकलले, त्याला हेडगेवार यांनी जोरदार विरोध केला होता.

‘The RSS Overseas’ या तिसऱ्या प्रकरणात संघाच्या परदेशातील उपस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी लेखक २८ सप्टेंबर २०१४ रोजी अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या मोदींच्या भाषणाचा संदर्भ देतात- “Ushering the audience into the huge hall were volunteers from the Hindu Swayamsevak Sangh (HSS) the overseas counterpart of the RSS in the US.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांचे मूळ उद्दिष्ट चारित्र्य विकासावर भर देण्याचे होते. त्या अनुषंगाने चारित्र्य विकासावर लक्ष केंद्रित केले गेले. जसजसा काळ पुढे सरकत गेला आणि नवीन आव्हाने येत केली, तसतसे संघात नवे नेतृत्व उदयास आले.

‘Indianizing Education’ या चौथ्या प्रकरणात संघाच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती मिळते. संघात शिक्षणाच्या ‘भारतीयीकरणा’वर भर देण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात हिंदू धर्माची चिन्हे असण्याबरोबरच हिंदू श्रद्धा, पौराणिक कथा, हिंदूंचे उत्सव व विधी, योग आणि संस्कृत वर्गांना प्रोत्साहन दिले पाहिजे, यावर संघाचा भर होता\असतो. शालेय अभ्यासक्रमाबाबत संघ आणि राज्य सरकार यांच्यात करार न झाल्यामुळे संघाने स्वत:च्या शाळा सुरू केल्या आणि काही राज्य सरकारांनीही नंतर तशा शाळा चालवायला सुरुवात केली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लीम समुदायाबद्दल लवचीक दृष्टिकोन ठेवला आहे. संघातल्या काही बुद्धिजीवींचा ‘घरवापसी’वर विश्वास आहे. ज्यांचे वंशज हिंदू होते, असे भारतात आलेले सर्व मुस्लीम आणि ख्रिश्चन ‘हिंदू’ झाले पाहिजेत, कारण त्यांचा वंश ‘हिंदू’च आहे, असे त्यांना वाटते. या तत्त्वज्ञानाला विरोध करणाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंडोनेशियाचे अनुकरण केले पाहिजे, जिथे मुस्लिमांनी स्वत:च्या धर्माशी तडजोड न करता हिंदू संस्कृतीतल्या अनेक पैलूंचा आपल्या जीवनात समावेश केला आहे.

संघाच्या अनेक कार्यक्रमांपैकी ‘मुस्लीम राष्ट्रीय मंचा’ (एमआरएम)ची स्थापना हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही वरिष्ठ नेते असल्याचे नंतर स्पष्ट झाले. बहुसंख्य मुस्लीम नेत्यांचा असा विश्वास आहे की, हिंदू समाजाशी संघर्ष करण्यापेक्षा त्याच्याशी मित्रता ठेवल्यास फायदा होऊ शकतो. २००३मध्ये मंजूर झालेल्या ‘मुस्लीम राष्ट्रीय मंचा’च्या ठरावात गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती आणि २००४मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावात राष्ट्रीय एकात्मतेला पुढे नेण्यासाठी काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

‘A Debate on Economic Self-Sufficiency’ हे आठवे प्रकरण संघपरिवाराच्या ‘आर्थिक स्वयंपूर्णते’बद्दलच्या विचारांचा मागोवा घेते. जागतिक भांडवलशाहीबद्दल भाजपचे विचार आणि संघाचे समाजवादी व भारतकेंद्रित विचार, यांमधील तडजोडींची अनेक उदाहरणे या प्रकरणात दिली  आहेत.

मुस्लीम आणि पाकिस्तानबाबत संघाची विचारधारा चीनपेक्षा वेगळी आहे. या पुस्तकात चीन भारताचा शत्रू असल्याचे नमूद केले आहे. त्यातून मोदी सरकारची भूमिका स्पष्ट होते. या पुस्तकातून जो अर्थ निघतो, त्यानुसार चीनशी लढा देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे मोदी सतत म्हणत राहतील, परंतु प्रत्यक्षात तसे काहीही करणार नाहीत. 

या सर्व बाबींचा आढावा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जुन्या विचारांची आणि हळूहळू बदलत जाणारी संघटना आहे. आपण संपूर्ण भारताबद्दलदेखील असेच म्हणू शकतो. संघ कधीही क्रांतिकारक संघटना होण्याची शक्यता नाही. जातीय गट एकत्र आणणे आणि त्यांना सामावून घेणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट. त्यामुळे संघाचा वेळोवेळी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून अभ्यास करावा लागतो, असे लेखकांचे मत आहे.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......