टोकियो ऑलिम्पिक २०२१मधील नीरज चोप्राचं सुवर्णपदक नव चैतन्य निर्माण करणारं ठरलं, ठरवलं तर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ अजून फलदायी ठरेल…
पडघम - क्रीडानामा
अनिकेत वाणी
  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करणारे भारतीय खेळाडू आणि २०२१ व २४च्या ऑलिम्पिकची बोधचिन्हे
  • Wed , 11 August 2021
  • पडघम क्रीडानामा ऑलिम्पिक Olympic

२०१८मधील २१वी राष्ट्रकुल स्पर्धा (क्वीन्सलँड गोल्ड-कोस्ट) आणि १८वी एशियाड स्पर्धा (जकार्ता पालेमबंग) पाहत असतानाच भारताला टोकियो ऑलिम्पिक २०२१मध्ये नक्कीच उत्तम प्रकारे यश मिळेल, याची खात्री होती. ते काही प्रमाणात मिळाले असे म्हणावे लागेल. जवळपास गेल्या दीड वर्षांपूर्वी आलेल्या करोना महामारीमुळे सगळे जग ठप्प झाले होते. लॉकडाउन सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांना घराबाहेर पडणे अवघड होते. खेळाडूंना त्यांचा सराव करणेदेखील कठीण होऊन बसले. जगभर उद्भवलेल्या या अभूतपूर्व परिस्थितीमुळे ऑलिम्पिकचे आयोजन होणे शक्यच नव्हते. त्यामुळे २०२०चे टोकियो ऑलिम्पिक होऊ शकले नाही. त्यात ऑलिम्पिकला सर्व खेळांचा ‘कुंभमेळा’ म्हटले जाते. मात्र जपानने हिंमत न हरता या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन केले.

या ऑलिम्पिकसाठी भारताचे आजवरचे सर्वांत मोठे म्हणजे तब्बल १२७ खेळाडूंचे पथक टोकियो येथे पोहोचले. अनेक खेळाडूंना लॉकडाऊनमुळे पात्रता फेरीत सहभागी होता आले नाही, तर काही खेळाडू अगदी शेवटच्या क्षणी सहभागी होऊन पात्र ठरले. उदाहरण द्यायचे झाल्यास महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या राही सरनोबतला करोना काळात सरावासाठी वेळच मिळाला नाही. महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची टाळेबंदी होती. त्यामुळे अ‍ॅकॅडमी पूर्णपणे बंद होत्या. तिने महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली, पण तिला कुठलाच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तिचे पथ्यपाणी, सरावासाठी तिने कोल्हापूरचे शाहू राजे यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी त्यांच्या परीने काही प्रमाणात मदत केली. शेवटी स्वत:च्या बळावर ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या ऑलिम्पिकमधली भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही हॉकी संघाची कामगिरी हॉकीला फिनिक्स भरारी देणारी ठरली आहे. या ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या तक्त्यावर पहिली नावे ‘सावित्रीच्या लेकीं’नी उमटवली. मीराबाई चानु हे नाव दुर्लक्षित पूर्वोत्तर राज्यातलं. याच भागातल्या लवलिनानेदेखील ‘आम्ही दुर्लक्षित असून खेळात पुढे आहोत’ हे दाखवून दिलं. मेरी कोमने सर्व पूर्वोत्तर राज्यांना दिशा दाखवली. आजवर बायचुंग भूतीया, कुंजुराणी देवी या पूर्वात्तर खेळाडूंनी जागतिक पातळीवर आपलं नाव कोरलं आहे.

केंद्र सरकारची सातपैकी तीन स्पोर्टस् सेंटर पूर्वोत्तर राज्यांमध्ये आहेत. यावरूनच कळतं की, खेळातील पदके तिथून का येतात ते... तिथं उद्योगक्षेत्र अगदीच अत्यल्प. त्यामुळे नोकऱ्या फार कमी. परिणामी खेळातल्या करिअरचं आकर्षण वाढलं. अलीकडच्या काळात खेळातली अधिकतर गुंतवणूक या भागातूनच येताना दिसत आहे. थोडक्यात काय तर, संकटातून मार्ग काढत पूर्वोत्तर भागातल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या खेळात भारताचे सामने होते. हेच मोठे यश आहे. भारत या वेळेस प्रथमच तलवारबाजी या खेळात सहभागी झाला. भवानी देवीने पहिली पात्रता फेरी जिंकलीसुद्धा होती. दुसऱ्या फेरीत मात्र तिचा पराभव झाला. २०००नंतर भारताला घोडेस्वारी या प्रकारात ‘फवाद मिर्झा’च्या रूपाने हिरा मिळाला आहे. त्याने आपला झेंडा शेवटच्या फेरीपर्यंत फडकावत ठेवला. मात्र त्याला २४व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी टीमने मिळवलेले कांस्य पदक, पहिल्यांदाच विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासारख्या संघाला हरवत महिला संघाने उपांत्य फेरीत मारलेली धडक, माना पटेलच्या रूपात मिळालेली महिला जलतरणपटू, जलतरणपटू साजन प्रकाश, थाळीफेकमधील सर्वोत्तम कामगिरी करणारी कमलप्रीत कौर आणि गोल्फ या खेळाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी देणारी अदिती अशोक हे खेळाडू भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले.

खेळाडूला मिळणारा पुरस्कार कौतुकास्पद असला तरी या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळणे अतिशय गरजेचे आहे. मुळात एखाद्या खेळाडूने पदक मिळवल्यानंतरच त्याला सोयीसुविधा मिळणे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या साताऱ्याच्या पी.आर. जाधवला सोयीसुविधांअभावी त्याचे गाव सोडून जावे लागत असेल तर ही बाब खूप दुर्दैवी आहे, असेच म्हणावे लागेल.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तमिळनाडूमधील ज्या मोजक्या तरुण खेळाडूंकडे भविष्यातल्या चांगल्या कामगिरीसाठी पाहिलं जातं, त्यामध्ये धनलक्ष्मीचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणं हे अधिक महत्त्वाचं असल्याने आईने तिला तिच्या बहिणीच्या मृत्यूची माहिती दिली नाही. धनलक्ष्मी गरीब घरातील असून वयाच्या १५व्या वर्षीच तिचं पितृछत्र हरवलं. अशा परिस्थितीतदेखील तिने १०० मीटर ट्रॅक प्रकारात पाचव्या क्रमांकाचं यश मिळवलं.

राष्ट्रीय बॉक्सिंगपटू रितूची कहाणीही फार वेगळी नाही. वडिलांच्या उपचारासाठी तिला बॉक्सिंग सोडून पार्किंग सहाय्यक म्हणून काम करावं लागलं. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हॉकी टीमला दिलेलं प्रायोजकत्व सोडल्यास कोणत्याही राज्यानं फारसे प्रयत्न केल्याचं दिसत नाही. पुरस्कारांची, वास्तूंची नावं बदलून काही होतं का? खेळाडूंना खराखुरा पाठिंबा, मदत हवी.

आपल्याकडे क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांना मिळणारं महत्त्व अगदीच नगण्य आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने इतर खेळाडूंना पुढे आणण्यासाठी आपल्या बजेटमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. मात्र ती वाढ करण्याऐवजी २३० कोटी रुपयांची कपातच केली गेली. पण करोना काळात घसरलेल्या अर्थव्यवस्थेमुळे या वेळी ते क्षम्य मानलं,  तरी इतर वेळेचं काय?

नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’, ‘क्रीडा विद्यापीठ’ उभं करताना जातीपातीचं राजकारण आड येणार नाही, याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. प्रत्येक आदिवासी पाड्यावर, गाव-खेड्यात पात्रता सामने आयोजित केले गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी खेळाकडे फक्त जास्तीचे गुण म्हणून न बघता करिअर म्हणून बघणं गरजेचं आहे.

प्रत्येक क्रीडा स्पर्धेत उत्तर, इशान्ये आणि दक्षिणेकडील खेळाडू सर्वांत जास्त का असतात? इतर राज्यं खेळाकडे गांभीर्यानं का पाहत नाहीत? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि काही प्रमाणात महाराष्ट्रासुद्धा खेळांबाबत इतके उदासीन का आहेत?

उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी पुढाकार घ्यावा, धोरण ठरवावं, विविध खेळांत क्रीडापटू तयार करावेत. कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग वगळता उर्वरित महाराष्ट्र खेळाच्या बाबतीत फार अनभिज्ञ आहे.

असो.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ‘मीराबाई रचिला पाया, नीरज झालासे कळस’, असे म्हणत रुपेरी सुरुवातीची सोनेरी सांगता झाली! भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी या वेळी केली. १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य असे एकूण ७ पदके मिळवली. लंडन ऑलिम्पिकचा ६ पदकांचा विक्रम मोडला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंना पदकानं हुलकावणी दिल्यामुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

मात्र हीच एक नवी सुरुवात समजत खऱ्या अर्थानं प्रयत्न केल्यास पुढील ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी चमकदार होऊ शकते! मोठी स्वप्नं न पाहणं हा दोष नाही. छोटी स्वप्न पाहणं आणि अल्पसंतुष्ट राहणे, हा खरं तर दोष आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

सॅन मॅरिनोसारखा केवळ ३५००० लोकसंख्या असणारा देश टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५ खेळाडूंचा सहभाग नोंदवत ३ पदके मिळवू शकतो, तर भारतासारख्या बलाढ्य देशाला काय कठीण आहे? सॅन मॅरिनोकडून आपण शिकण्यासारखं आहे. ‘स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ आणि क्रीडा मंत्रालयाने सर्व फेडरेशनसोबत अधिक जोमानं काम करणं गरजेचं आहे.

टोकियो ऑलिम्पिक २०२१मधील नीरज चोप्राचं सुवर्णपदक नव चैतन्य निर्माण करणारं ठरलं आहे. येत्या राष्ट्रकुल आणि एशियाड स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करण्यावर अधिक भर दिला, तर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ अजून फलदायी ठरेल, यात शंका नाही!  

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

ऑलिम्पिक स्पर्धा, चिमुकले देश आणि आपला बलाढ्य भारत… एक चमत्कारिक वास्तवसत्य!

२०२१चे टोकियो ऑलिम्पिक झाले; महाराष्ट्रासाठी पुढे काय?

..................................................................................................................................................................

लेखक अनिकेत वाणी स्पोर्टस पीआर आणि एमआर कन्सल्टंट आहेत.

anumyself01@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......