कॉम्रेड विलास सोनवणे : मातीशी नाळ असलेला कृतिशील विचारवंत
संकीर्ण - श्रद्धांजली
उद्धव धुमाळे
  • कॉम्रेड विलास सोनवणे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Mon , 09 August 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली कॉम्रेड विलास सोनवणे Vilas Sonawane लढता लढता केलेल्या चिंतनातील काही मुस्लीम प्रश्नाची गुंतागुंत बहुजन स्त्रीवादाच्या दिशेने

१.

प्रत्येकाकडून काही ना काही सतत शिकणारा, दिलदारपणे त्याचा स्वीकार करणारा, कायम आपल्या मातीशी नाते सांगत जमिनीवर पाय रोऊन उभा असलेला, विश्वाचे ज्ञान आत्मसात करणारा आणि इतरांना दिशा देणारा, सच्चा कॉम्रेड म्हणजे विलास सोनवणे. चिकित्सक असणे हा त्याचा गुणधर्म. कधीही एकटा पडण्याची भीती न बाळगता आपले म्हणणे ठामपणे मांडण्याचं काम कॉम्रेड विलास यांनी सातत्याने केले. म्हणूनच अनेक वेळा त्यांना ‘एकला चलो रे’प्रमाणे कार्य करत राहावे लागले.

प्रत्येक आव्हानामध्ये नवीन संधी शोधण्याचे दिव्य कॉ. विलास यांनी कृतीतून साकारले आहे. हे त्यांनी दिलेले लढे आणि वैचारिक क्षेत्रात केलेले हस्तक्षेप यातून दिसून येते. परिस्थितीचं ठोस विश्लेषण करता आले, तरच समाजपरिवर्तन करता येते, असे ते कायम ठासून सांगत. त्याच भूमिकेतून ते परिस्थितीचे विश्लेषण करून समतामूलक समाज निर्माणासाठीचा अजेंडा ठरवत असत. समकालीन आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती विचारात घेऊन त्या त्या टप्प्यावर कृती कार्यक्रम निश्चित करून चळवळ पुढे नेण्याचं काम कॉ. सोनवणे यांनी केले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पोथीनिष्ठ मार्क्सवाद, अस्मितावादी आंबेडकरवाद, जातिवाद, धर्मांधता, विध्वंसकता नाकारत सम्यक समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने कॉम्रेड विलास सोनवणे कार्य करत राहिले. एकीकडे कशाचीच पर्वा न करता, चिंता न बाळगता कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष ग्राउंडवर दिवस-रात्र काम करत राहणे. दुसरीकडे चिंतन-मनन करून त्यातून ज्ञाननिर्मिती करत पुस्तकी पंडितांची सांस्कृतिक मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम कॉम्रेड विलास सोनवणे यांनी केले. म्हणूनच कृतिशील विचारवंत अशी त्यांची ओळख बनली.

भारताचा इतिहास, भौगोलिक परिस्थिती, समाजरचना, निसर्ग, मानवी जीवनपद्धती, येथील भूमीत निर्माण झालेले ज्ञान आदींचे समग्र भान त्यांच्या चिंतनातून दिसून येते. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध ते बसवेश्वर, नामदेव, जनाबाई, कबीर, चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकाराम, बहिणाबाई, छत्रपती शिवाजीमहाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आणि कार्ल मार्क्स, लेनिन, माओ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे आदींचा विचार कॉ. सोनवणे यांच्या मांडणीत प्रकर्षाने येतो.

आधुनिकता, पुरोगामित्वाचे ओझे बाळगून पाश्चात्य सेक्युलर या संकल्पनेला कुरवाळत न बसता सेक्युलर असण्याची भारतीय संकल्पना विकसित करण्यात कॉ. सोनवणे यांचे मोठे योगदान आहे. कारण भारतातील धर्मसंघर्ष हाच मुळात विषमता विरुद्ध समता असा राहिला आहे, हे कॉ. विलास ठासून सांगतात.

कॉम्रेड शरद् पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतात क्रांती घडवायची असेल तर येथील नेणिवेत गेलेली बहुजन जाणीव जाणिवेत आणणे आणि जाणिवेत असलेली ब्राह्मणी नेणीव नेणिवेत ढकलणे आवश्यक आहे. याच सिद्धान्ताला कृतिकार्यक्रम देण्याचं मूर्त काम कॉ. विलास सोनवणे यांनी जल, जंगल, जमीन, पर्यावरण रक्षणासाठी सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषद भरून केले आहे.

महात्मा फुले, गांधी, आंबेडकर यांच्या विचाराला, कार्याला सैद्धान्तिक आणि कृती कार्यक्रमाच्या  पातळीवर पुढे नेण्याचं काम त्यांनी केले आहे. जात, धर्म, भाषा, प्रदेश आदींबाबत त्यांची मांडणी इतरांपेक्षा निश्‍चितच वेगळी आणि समाजाला पुढे घेऊन जाणारी आहे. ‘मोड ऑफ प्रोडक्शन’नुसार निर्माण झालेली समाज व आर्थिकरचना याचे अचूक विश्लेषण करण्याचे काम त्यांनी केले आहे. लिंगभावाचा प्रश्नदेखील त्यांच्या चिंतनातून सुटलेला नाही. देशातील पुरुषप्रधान व्यवस्था आणि स्त्रियांचे स्थान, जातधर्मनिहाय परिस्थिती ते चिकित्सकपणे मांडतात. त्यांच्याच मांडणीचा आधार घेऊन अनेक विद्वानांनी विपुल लेखन केले आहे, हे जाणकारांना माहीत आहे. काहींनी ते उघडपणे मान्य केले आहे.

याच चिकित्सक वृत्तीमुळे कॉ. सोनवणे अनेकांपासून दूर गेलेले दिसतात. यातच त्यांचे बलस्थान आणि काहींनी उणिवा दिसून येतात. प्रचंड विद्वत्ता असूनही विनम्रता त्यांच्या नसानसांत होती. म्हणूनच ते तरुण पिढीला आपलेसे वाटत होते. कोणताही संकुचित स्वार्थ ठेवून ते कधीच वागले नाहीत. काहींचा त्यांच्याशी मतभेदही झाला, तो व्यापक स्वार्थाच्या न समजलेल्या गोष्टीतून. त्यामुळेच कॉ. सोनवणे हे कधी काहींना जातीवादी, धार्मिक, कर्मठ, अहंकारी वाटले. तात्त्विक भूमिकेत तडजोड न करता, तथागत गौतम बुद्धांच्या सम्यक मार्गानुसार जो जिथे आहे तेथून पुढे कसा जाईल, याचा विचार घेऊन कॉ. विलास कार्य करत राहिले.

कोणीही अहंगंड बाळगता कामा नये, त्याच वेळी कोणी न्यूनगंडही बाळगू नये, यासाठी मार्गदर्शन करत पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. परंतु हे त्यांचं काम अनेकांना कळलं नाही. ज्यांना कळलं त्यांना परवडणार नसल्याने मान्य केलं नाही, हेच सत्य दिसते. कॉ. विलास यांची विचार करण्याची ताकद एवढी पुढची होती की, ती त्यांच्या सहकाऱ्यांनाही कळायला दहा वर्षं गेली, हे वास्तव आहे.

मुस्लीम ओबीसी संघटना, मुस्लीम मराठी साहित्य संमेलन, सर्वधर्म सर्वपंथ सामाजिक परिषद, सकल मराठी साहित्य संमेलन, डाऊ आंदोलन या टिपिकल पुरोगामी संकल्पना, समजांना धक्का देणारे होते. त्या त्या वेळी अनेक सहकाऱ्यांना कॉ. विलास यांच्या या भूमिका समजू न शकल्याने त्यांनी विरोध केला होता. एका टप्प्यानंतर हे हस्तक्षेप आणि त्याची ताकद समजली. असेच कॉ. विलासबाबत वारंवार झाल्याचे दिसते. त्यांनी हाताळलेले विषय हेच त्यांच्या विचार व कार्याची व्यापकता अधोरेखित करते. अनेकदा अनेकांशी मतभेद झाले, परंतु त्यांचं विलासवरील प्रेम कधी कमी होऊ शकले नाही. त्याचं कारण कॉ. विलास यांची कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकता हे आहे.

२.

कॉम्रेड विलास सोनवणे यांची आणि आमची पहिली भेट माणगाव येथील विचारवेध साहित्य संमेलनात झाली. डॉ. यशवंत सुमंत हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी आणि सुमंतसरांना मानणारे पंधरा-वीस जण या संमेलनाला आवर्जून उपस्थित होते. वंचितांचे प्रश्न ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन हे संमेलन भरवले होते. कॉम्रेड विलास हेदेखील या संमेलनाला उपस्थित होते. त्यांनी एका सत्रामध्ये वंचित या शब्दाचे राजकारण अधोरेखित करत मेधा पाटकर आणि टीमच्या मर्यादा मांडल्या. ते काहींना सहन न झाल्याने मधेच भाषण थांबवण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला. कॉम्रेड विलास मुळीच विचलित न होता आपले म्हणणे जोरकसपणे मांडले. मित्र म्हणून मुलाहिजा बाळगला नाही. याच त्यांच्या धैर्याने, स्पष्टवक्तेपणाने आम्ही त्यांच्याकडे आकर्षित झालो. त्यानंतर स्त्री अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कॉम्रेड विलास यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संत ज्ञानेश्वर सभागृह गाजवले. येथून पुढे त्यांच्यात आणि आमच्यात संवादाची प्रक्रिया सुरू झाली.

अचानक एके दिवशी ते थेट वसतिगृहाच्या रूमवर येऊन धडकले. विद्यापीठातील आमची रूम म्हणजे कार्यकर्त्यांचा अड्डाच बनला होता. कमवा आणि शिकाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी एकत्र जमल्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असू. भोजनालय, विद्यापीठाची हिरवळ सुद्धा चर्चेचा अड्डा बनला होता.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

पुढे विलास आणि आमची भेट वारंवार होऊ लागली. त्यांच्याच घरी प्राच्यविद्याविद कॉम्रेड शरद् पाटील यांची भेट झाली. त्यानंतर विद्यापीठाच्या चार भिंतीत जे शिकायला मिळाले नाही ते शिकता यावे, यासाठी विलास यांच्या पुढाकाराने न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या घरी अभ्यासवर्ग सुरू केले. यात न्या. पी. बी. सावंत, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. विद्युत भागवत, माझी पोलीस महासंचालक मुश्रीफ आणि कॉ. विलास यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचे बळ येथून मिळाले.

याच काळात डाऊ आंदोलन सुरू झाले होते. त्याचा अभ्यास करण्यासाठी स्त्री अभ्यास केंद्राच्या सहकार्याने आम्हा विद्यार्थ्यांचे एक पथक शिंदे वासुली गावात गेले होते. त्यावर ‘साधना’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या नियतकालिकांमध्ये लेख लिहिले. मधल्या काळात मतभेद झाल्याने न्यायमूर्तींच्या घरचे अभ्यासवर्ग बंद झाले होते. तेव्हा आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत कॉ. विलास यांनी संवाद साधत कृतीतून मोठेपणा दाखवला होता. त्यामुळे थांबलेला संवाद पुन्हा सुरू झाला होता. यातून पुढे सर्वधर्म आणि सर्वपंथ सामाजिक परिषद भरवण्यात मोलाचा वाटा देता आला. सुरुवातीला ‘एक तर वारकरी रहा नाहीतर कम्युनिस्ट. दोन्ही होता येत नाही’, असे म्हणणारे कॉम्रेड विलास सोनवणे पुढे वारकऱ्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देत संघर्ष करायला लावून डाऊ लढा यशस्वी केला होता. त्यामुळे वारकरी मंडळी कीर्तनातून कम्युनिस्ट तत्त्वज्ञान सांगू लागले. आमचा कृष्ण हा कम्युनिस्ट होता, असं म्हणू लागले. त्यातून पुढची दिशा निश्चित करून जल, जंगल, जमीन, पर्यावरण रक्षणासाठी सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषद भरवली होती. यानंतर सर्वधर्मीय ओबीसी चळवळ जन्माला आली होती. हे हस्तक्षेप यशस्वीपणे शेवटाला नेता आले असते तर आज देशात ओबीसी राजकारण करून हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आलेच नसते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

हभप बंडातात्या कराडकर, बद्रीनाथ तनपुरे, डॉ. सुहास महाराज फडतरे, प. पू. डॉ. बस्वलिंग पट्टदेवरू, अलमप्रभू मठाचे मठाधिपती, मकरधोकडा येथील न्यायंबासबाबा यांचा सर्वधर्मीय परिषदेस मोठा प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद, लातूर, सांगली, पुणे (आळंदी), नागपूर, अमरावती जिल्ह्यात या परिषदा झाल्या. विषय जल, जंगल, जमीन रक्षणाचा होता. शेतकरी जगला तरच सर्वधर्म, पंथ जगतील, अशी भूमिका मांडली. दरम्यान, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, पुणे येथे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन झाली. यात डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी सहभाग घेऊन केलेली मांडणी व्यापक हस्तक्षेप अधोरेखीत करणारी आहे.

३.

विद्यार्थी म्हणून वर्गात शिकणाऱ्या गोष्टी, वर्गाबाहेर कार्यकर्ता म्हणून शिकायला मिळाले ते विचार, व्यवहाराच्या पातळीवर उन्नत करणारे होते. आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी हभप बद्रीनाथ महाराज तनपूरे विद्यापीठात आले आणि त्यांनी केलेली मांडणी तथाकथित बुद्धिजीवी मंडळींना अंतर्मुख करायला लावणारी होती. असा कार्यक्रम घेण्याची कल्पना सोनवणे यांचीच होती. ‘कमवा आणि शिका योजने’त सहभागी विद्यार्थांच्या प्रश्नावर विद्यापीठात आम्ही पुकारलेले साखळी आंदोलन असो की, मंगळूर येथे श्रीराम सेनेच्या अत्याचारविरोधी आंदोलन असो, तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या मिशन मृत्युंजय विरोधात आंदोलन असो की, गोध्रा, खैरलांजी, सिंगूर, नंदीग्रामचा निषेध... यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि मागण्यादेखील मान्य झाल्या पाहिजेत, असे लढे देण्याची, व्यापक भूमिका मांडण्याची सम्यक दृष्टी कॉ. विलास यांनीच दिली. यातूनच ‘ब्राह्मणवाद और भांडवलवद की क्या पहेचान; गोध्रा खैरलांजी, नंदीग्राम’ ही अशी घोषणा विद्यापीठात घुमली.

..................................................................................................................................................................

उद्धव धुमाळे

udhavsr@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......