‘आपण भूगोलाला ‘इतिहासाची दासी’ मानतो, पण, भूगोलाभ्यास हे सर्व विज्ञानाभ्यासाचं आदि-विज्ञान मानायला हवं!’
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जीवन तळेगावकर
  • ‘भूगोल कोश’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 16 July 2021
  • ग्रंथनामा शिफारस भूगोल कोश Bhugol Kosh एल. के. कुलकर्णी L. K. Kulkarni सुवेझ कालवा Suez Canal लॉर्ड कर्झन Lord Curzon

मानवाच्या अस्तित्वासाठी भू-राजकीय समीकरणं किती महत्त्वाची असतात, याची जाणीव आधुनिक जगाला द लेसेप्स या फ्रेंच इंजिनीअरने सुवेझचा कालवा (१८५९-६९) बांधून पूर्व व पश्चिम यामधील भौगोलिक सीमारेषा पुसून टाकली, तेव्हा झाली. या विचारांची मुळे नेपोलियनने स्थापन केलेल्या ‘सोसिएने द जिऑग्राफी द पारि’ या संस्थेत धरली गेली, याची जाणीव ठेवून अशी संस्था इंग्लंडमध्ये असावी, असे लॉर्ड कर्झनला वाटले. पुढे १९१२ साली ती स्थापन झाली, तेव्हा तो म्हणाला होता, “आपण भूगोलाला इतिहासाची दासी मानतो... पण भूगोलाभ्यासापासून आपण जरा विचलित झालो तर आपणाला भूस्तरशास्त्र, प्राणिशास्त्र, संस्कृतिशास्त्र, रसायन, पदार्थविज्ञान इत्यादी अनेक शास्त्रांत शिरावं लागतं. म्हणून मला वाटतं की, भूगोलाभ्यास हे सर्व विज्ञानाभ्यासाचं आदि-विज्ञान मानायला हवं.” या घटनेचा उल्लेख दिनेश द. माहुलकर यांच्या ‘वृद्धि:’ या पुस्तकात आहे.

भूगोलाचं महत्त्व जाणून या विषयाचा परीघ, विविध संकल्पना, घटना, संज्ञा, संशोधन-कार्य समजून घेण्यासाठी हाती एखादा शास्त्रशुद्ध पायाभरणी करणारा मराठी संदर्भ कोश असावा, असं संशोधकांना, अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना किंवा जिज्ञासू वाचकांना वाटतं, तेव्हा एल. के. कुलकर्णी यांचा ‘भूगोल कोश’ अपरिहार्य बनून राहतो. तो मराठीतील एका आघाडीच्या विज्ञान लेखकाकडून आणि भूगोलाच्या अध्यापकांकडून लिहिला गेल्यामुळे त्यात अभ्यासकाच्या दृष्टीनं संदर्भ शोधणं, तपासणं सोयीचं जाईल, याची काळजी घेण्यात आली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

३५० पानांच्या या दीर्घ कोशात महत्त्वपूर्ण अशा ३५० संबोधांबद्दल शास्त्रीय माहिती आहे आणि त्याची व्यवस्थित वर्णमालेप्रमाणे येणारी अनुक्रमणिका आहे. त्यामुळे पुस्तकात आपल्याला हवं ते सहजपणे शोधता येतं. तसंच काही मराठी संज्ञा या आताशा इंग्रजीत अंगवळणी पडल्या आहेत, याची जाणीव ठेवून एक पारिभाषिक शब्दांची पुरवणी शेवटी जोडली आहे. या पुस्तकाला असलेली परिशिष्टं अतिशय माहितीपूर्ण आहेत. त्यात एकक, मापे, गणना, ग्रह, उल्का, धूमकेतू, तारे, तसंच बऱ्याच माहितीपूर्ण बाबींचा जागतिक व राष्ट्रीय दृष्टिक्षेप दिला आहे.

जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या दृष्टीनं काही तरी वेगळा संदर्भ हवा असतो. कोणाला भूगोल विषयाशी संबंधित व्यक्तींच्या म्हणजे अमेरिगो व्हेस्पुसी, अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट, आर्यभट्ट, कार्ल रिटर, ख्रिस्तोफर कोलंबस, गेरहार्ट मर्केटर, टॉलेमी, फर्डिनांड मॅगेलान, मार्को पोलो, वास्को-द-गामा, शेर्पा तेनसिंग नोर्गे, यांच्या योगदानाबद्दल नेमकी माहिती हवी असते. कोणाला भौगोलिक स्थानाबद्दल माहिती हवी असते, कोणाला राशीचक्र जाणून घ्यायचं असतं, कोणाला आपण कुठे जाऊन आलो वा जाणार त्या प्रदेशाची शास्त्रीय माहिती हवी असते, तर कोणाला जो आपला भवताल आहे; तो पूर्णतः जाणून घेण्याची जिज्ञासा असते. एखाद्याला कैलास, सरस्वती किंवा मानस यांसारख्या धार्मिक स्थळांचा संदर्भ हवा असतो, संशोधकांचं नेमकं मत जाणण्याची उत्सुकता असते.

असे सगळे संदर्भ हा कोश पुरवतो. यात खंड, महासागर, समुद्र, सागर, सागरप्रवाह, उपसागर, हिमनग, नदी, सरोवर, धबधबा, पर्वत, शिखर, घाट, देश, खडक, मृदा, वाळवंट, वने, वातावरण, हवामान, आकाश, आकाशगंगा, ग्रह, उपग्रह, तारे, वारे, झरे, गर्ता, राशी, नक्षत्र, संज्ञा, व्याख्या, घटना, संस्था, प्रकल्प याविषयी साद्यंत माहिती मिळते. आवश्यक तिथं नकाशे आणि रंगीत चित्रं दिली आहेत. त्यामुळे कोश अतिशय उपयुक्त झाला आहे.                   

बहुधा आपल्या सर्वांना सात जागतिक आश्चर्ये आहेत, याची माहिती असते, पण त्यांचे संदर्भ कसे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात बदलत गेले आणि ते नेमके काय आहेत, याची कल्पना नसते, अशा काही रिकाम्या जागा योग्य माहितीने भरण्याचं कामदेखील हा कोश करतो.

माझ्या अनुभवात मिलान ते जिनेव्हा हा नितांत सुंदर ट्रेन प्रवास दोनदा आला. आजूबाजूचं निसर्गसौंदर्य मोहून टाकणारं होतं. आपण आल्प्सच्या कुशीत आहोत, हे कळत होतं, पण आपण इटली व स्वित्झर्लंडच्या मध्ये असलेल्या ‘ग्रेट सेंट बर्नार्ड’ खिंडीतून प्रवास केला, हे हा कोश वाचल्यावर लक्षात आलं. हा कोश हाताशी असला तर, असाच एखादा वैयक्तिक अनुभव समृद्ध करेल, हे निश्चित.           

भूगोलात अनेक विषयांचा अंतर्भाव होतो. १७४व्या पानावर ‘भूगोला’ची व्याख्या विशद केली आहे. पण स्थूल स्वरूपात ज्या विषयाला आपण भूगोल समजतो, तो शालेय अभ्यासक्रमात आपण वाचतो, अभ्यासतो, पण अगदी तेवढ्यापुरता. त्यानंतर त्याची आपली साथ संपते. मात्र ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असतो, त्यांना या विषयाचा हात घट्ट धरून ठेवावा लागतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आजकाल एमपीएससी आणि यूपीएससी यांच्या परीक्षेत ‘भूगोल’ या विषयाला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यात तो सामान्य-ज्ञानाचा विषय आहे. म्हणून प्राथमिक गाळणी परीक्षेत टाळता येण्यासारखा नाही. शिवाय त्यात उत्तम मार्क पडत असल्यामुळे मुख्य परीक्षेसाठीदेखील विद्यार्थ्यांचा आवडता विषय असतो. पण ज्यांनी भूगोलाची साथ सोडली, ते पुढे कोणत्याही क्षेत्रात गेले तरी तो मात्र त्यांची पाठ सोडत नाही. प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला या विषयाचं भान असणं आवश्यक असतं. ते त्याला अधिक कार्यक्षम बनवतं, दृष्टिकोन व्यापक करतं. कामानिमित्त देशात-परदेशात फिरताना त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास अपरिहार्य बनून राहतो.

आपल्या शिक्षण पद्धतीत ‘शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विषयांचं नेमकं मानवी आयुष्यात उपयोजन काय?’, या प्रश्नाचं उत्तर देणारा पहिला पाठ समाविष्ट करण्याची आता आवश्यकता आहे. नाही तर होतं काय की, इलेक्ट्रॉनिक शिकायचं, इंजिनीअर व्हायचं, पण या ज्ञानाचं उपयोजन नेमकं काय, हा प्रश्न मनात धरून आयुष्य ढकलत राहायचं… कधी या क्षेत्राशी संबंधित वा कधी असंबंधित नोकरी वा व्यवसाय करायचा आणि मग संघर्षातून वा आपापल्या अनुभवातून उत्तर शोधायचं. हा स्व-भ्यासाचा एक मार्ग झाला. तो व्यक्तिकेंद्री आहे. दुसरा मार्ग शिक्षणातून आहे मानस घडवण्याचा. तो अधिक दूरगामी परिणाम करणारा आहे. म्हणून बाळकडू दिल्याप्रमाणेच वेगवेगळ्या विषयांच्या उपयोजनाचा पाठ आता त्या त्या विषयारंभी दिला जाण्याची आवश्यकता आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ना. गो. कालेलकरांचं ‘भाषा : इतिहास आणि भूगोल’ हे पुस्तक मराठी भाषेच्या इतिहासाचं पुस्तक म्हणून वाचण्यात आलं होतं, पण भाषेला केवळ इतिहास असतो असे नव्हे, तर भूगोलदेखील असतो, याची जाणीव त्यानंतर वाढीस लागली. भाषा अभ्यासात भूगोलाचं असणं जेवढं अनपेक्षित वाटतं, तेवढंच आपल्याला कोणत्याही कार्यक्षेत्रात सकृतदर्शनी वाटतं, पण थोड्या विचाराअंती त्या क्षेत्राला असलेलं भूगोलाचं अस्तर आपल्याला जाणवतं, म्हणून हा विषय आयुष्यभराचा सोबती होतो.

समर्थ रामदास ‘दासबोधा’त ‘ऐसा त्या भूगोळाचा पार | कोण जाणे ||’ असं म्हणतात, तेच खरं!

‘भूगोल कोश’ - एल. के. कुलकर्णी

राजहंस प्रकाशन, पुणे

मूल्य - ५०० रुपये

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......