‘पावसातला सह्याद्री’ आणि निसरड्या वाटेवरच्या नोंदी…
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जयदेव डोळे
  • ‘पावसातला सह्यादी शरद पवार’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 12 July 2021
  • ग्रंथनामा शिफारस पावसातला सह्यादी शरद पवार Pavsatala Sahyadri Sharad Pawar शरद पवार Sharad Pawar

भारतीय राजकारणी एक तर आत्मचरित्र लिहीत नाहीत वा कुणा लेखकाला हाताशी धरून आत्मकथनही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे आणि त्यांच्या राजकारणात लपाछपी खूप असल्याचा संशय अनेकांना येतो. अशा संशयी वातावरणात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद बळकावताच स्वतःची एकांगी, एकतर्फी कौतुके भरपूर छापून घेतली. कॉमिक्स काय, कविता काय अन चरित्रे काय! आज मोदी पुस्तकरूपाने प्रत्येक दुकानात उपलब्ध असतात. ते प्रचंड आत्मलुब्ध, बढाईखोर आणि सत्याला चकवा देणारे आहेत. त्यांच्याभोवती भाट आणि स्तुतिपाठक हेच जमतात. त्यांना स्वतःलाही अशी माणसे विशेष आवडतात. त्यातच गेली सात वर्षे अवघी प्रसारमाध्यमे आपल्या मांडीखाली दाबून त्यांच्याकडून हे पंतप्रधान सपशेल गोडवे गाऊन घेतात. त्यामुळे भारताचा राजकीय इतिहास पडताळताना मोदी इतक्यांदा समोर येत राहतील की, ते कुणी थोर, महान वा अजेय पुढारी होते, असे कुणालाही वाटेल. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांच्या नावावर ना काही सेवा, संस्था वा विकास. पंतप्रधान झाल्यावर तर गुजरातेत मुख्यमंत्री म्हणून जे करून ठेवले ते पोकळ व दिखाऊ असल्याचे दिसू लागले. मूळचे प्रचारकच मोदी, तेवढे कार्य मात्र त्यांना अजूनही उत्तम जमते!

भाजपच्या बव्हंश नेत्यांचे असेच आहे. मुळात रा.स्व.संघ काही उभारण्याच्या किंवा विकास अथवा सुधारणा यांच्या कार्यासाठी जन्माला आला नाही. त्यामुळे भाजपचे सारे राजकारण काँग्रेस व अन्य पक्षांची नक्कल करण्यात संपते. नोकरशाही, पक्षांतर करणारे कार्यकर्ते आणि दडपशाही, ही त्यांची अवजारे. ते जे करतील ते सारे भाजपच्या नावावर जमा होत जाते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

काँग्रेस आणि भाजपेतर पक्षांची अशी स्थिती नाही. स्वातंत्र्य चळवळीचा वारसा, भाषावार प्रांतरचनेची आंदोलने, समाजवाद-समता-न्याय यांचा प्रभाव आणि धर्मनिरपेक्ष वर्तन, यांमुळे या पक्षांचे नेते व कार्यकर्ते संस्थात्मक आणि विकासात्मक अशा विधायक राजकारणावर आपले स्थान उभे करतात. ते भक्कम टिकाऊ असतेच. खेरीज ते सहिष्णू, समजूतदार, संतुलित असते. लोकांना जबाबदार असते. म्हणूनच शरद पवारांना ‘लोक माझे सांगाती’ असे सांगताना आनंद व अभिमान वाटतो. लोकही या नेत्याबद्दल आपली भलीबुरी मते मांडताना सावध असतात. भक्तांसारखे एकदम तुटून पडत नाहीत की, बचावासाठी खोटे बोलतील.

पण जवळपास प्रत्येक नेत्याविषयी काही मिथके जमा होतात. बुवा आणि महाराज यांचे प्रस्थ व धंदा अशा मिथकांवर, चमत्कारांवर, तथाकथित साक्षात्कारांवर वधारतात. लोकशाहीला धर्मराष्ट्राचा पर्याय द्यायचा असल्याने खुद्द मोदी व संघ परिवार मिथकांवर फार जोर देतात. इतिहास, वास्तव याऐवजी दंतकथा, मिथ्यकथा, प्रवाद यांची गुंफण करून हे लोक हव्या त्या व्यक्तीला मोठेपण बहाल करतात. खोटारडेपणा त्यांचे व्यक्तिमहात्म्य रंगवत राहतो. मोदी अशाच मार्गाने एक मिथक बनू पाहत आहेत. योगी आदित्यनाथही त्याच वाटेवर आहेत. लोकशाही प्रजासत्ताक ऐकीव अन बनावट कार्यकर्तृत्वावर फार काळ तग धरत नाही. तिथे लोकांशी रोकडा, थेट संबंध असतो. हा/ही मी, हे माझे काम अशा रोखठोक बोलीवर लोकशाही चालते; चाललीही पाहिजे. बोलणे व पडताळा बरोबरीने चालत लोकांपर्यंत जायला हवेत.

साधारणपणे भाट, खुशामतखोर, चापलूस मंडळी सत्ताधाऱ्यांचे कोणतेही काम, स्वभाव, निर्णय, बोलणे, अशा काही गोष्टी मिथकात बदलवून लोकांवर प्रभाव टाकत असते. बऱ्याचदा चतुर नेते अशी कृत्ये वा स्वभावदर्शन मुद्दाम करून त्याचे मिथक तयार करतात. बनेलपणा खूपदा मिथकांच्या तळाशी असतो. हिशोबी आणि संस्मरणीय घटनांवरून नेते त्यांना हवी ती प्रतिमा घडवतात.

शरद पवार अशा प्रतिमांपासून दूर असत. कारण यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची कारकीर्द मिथकांविना संपून गेली. त्यांनी प्रसारमाध्यमेही फार वापरली नाहीत. यशवंतराव मूळचे मार्क्सवादी. त्यांनी त्यांचे राजकारण अमानवी, चमत्कारी वा तीर्थप्रसादाचे कधी केले नाही. त्यामुळे महाराष्ट्र वाह्यात अन बनावट पुढाऱ्यांपासून बचावला. पवारही धर्मनिरपेक्षता आणि विज्ञाननिष्ठा जपणारे. त्यांच्याही प्रतिमा, दंतकथा, आख्यायिका बनल्या नाहीत. त्यामुळे साताऱ्याच्या सभेत पवारांनी सरंजामशाहीला पायउतार केले, हा मुद्दा जास्त महत्त्वाचा होता. यशवंतराव कोल्हापूर-सातारा-नागपूर येथील सरंजामदारांना कधीही जवळ करत नसत. अगदी गरीब, सामान्य घरांतील कार्यकर्ते यशवंतरावांनी राजकारणात आणले. काँग्रेसची समाजवादी, गरीबनिष्ठ ओळख टिकवून ठेवली. वारशापेक्षा विचार अन गादीपेक्षा खादी त्यांनी प्रत्येकांत बघितली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भर पावसात पवार उभे राहिले. भिजत भिजत बोलले. त्यांचे वय, प्रकृती, वेळ, तडफ यांचा परिणाम झालाच. पण त्याहीपेक्षा आपल्याकडून एका सरंजामदाराला उमेदवारी दिल्याचा पश्चात्ताप त्यांनी व्यक्त केला. आपला पक्ष आधुनिकता व पुरोगामित्व यांच्या मार्गावर अडखळला व राजेशाहीकडे वळला याबद्दलची चूक त्यांना पटली. ऐन प्रचारात असे कोणी बोलत नसते. पवार बोलले. अगदी खरे बोलले. एका बेजबाबदार, बेभरवशाच्या माणसाला त्यांनी मते देऊ नये, असे सांगितले.

सातारच्या त्या सभेवर ‘पावसातला सह्याद्री शरद पवार’ हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. तो पवारांचे एक मिथक तयार करणारा आहे. त्या सभेने महाराष्ट्राची निवडणूक (विधानसभा २०१९) कशी फिरली अन पवारांनी कशी एकहाती जीत मिळवली, याविषयी काही मराठी पत्रकारांनी फेसबुक आदी मंचांवर जे लिहिले त्याचे हे संकलन होय. मराठी पत्रकार आपापल्या पत्रांत तसे कधी कोणाचे मिथक रचत नसतात. मात्र फेसबुकादी मंचांवरचे अनिर्बंध अन बेताल स्वातंत्र्य त्यांना फार मोहवते असे दिसते. मिथक निर्मितीमागे पत्रकार नसले पाहिजे. पत्रकार एखाद्या ललित लेखकाप्रमाणे लिहू लागले की, अडचण होते. प्रसंग खरा, अनुभवही सच्चा, पण लिखाणाचा उद्देश आख्यायिका अथवा मिथक तयार करायला होतो आहे, हे जरा विसंगतच.

त्यातच बहुसंख्य पत्रकार संघाशी फटकून वागणारे. संघाचे टीकाकार. त्यामुळे खोटा इतिहास, बनाव मिथक आदी तयार करण्यात नापास. तरीही एका पावसाळी सभेचा प्रसंग निवडून अवघ्या महाराष्ट्राचे सत्तेचे राजकारण कसे फिरले, याची साऱ्यांनी घेतलेली दखल मनोरंजक आहे. खुद्द पवारांचेही चांगले रंजन झाले असेल!

‘गोदी मीडिया’ देशाची इतकी हानी करतो आहे की, ती येत्या ५० वर्षांतही भरून येणार नाही. त्याने विरोधकांना अदृश्य केलेले. मोदी सरकार, भाजप व संघपरिवार यांचे दडवलेले वास्तव... प्रत्येकाने शरणागत आणि हतबल झाल्याखेरीज (केंद्रातली सत्ता) जिणे सहज करणार नाही, अशा हवा केलेली. त्यामुळे देशावर कोणी अजेय व अभेद्य राज्य करतो आहे, अशी खात्रीच पटलेली. तेवढ्यात सातारी जर्दा तळहातावर आला अन त्याने पाऊस, सत्ताधारी, सरंजामदार यांची मुजोरी दाढेखाली सारून एक पिचकारी मारली. भयंकर खोटारड्यांची सत्ता असह्य झाल्याचे अनेकांना जाणवत होते.

पवारांना ती जाणीव तीव्रतेने झाली. चिकाटी, आशावाद, प्रयत्नवाद त्यांनी सोडला नाही. नेता असाच असतो. मोदी नेता नाहीत, कधीही नव्हते. त्यांनी सर्वत्र ‘पॅराशूट लँडिंग’ केलेले आहे. सत्ताकेंद्रे चलाखीने वापरून त्यांनी जरब बसवलेली आहे. त्यांना ‘हांजी, हांजी’ आवडते. तसे पवारांचे नाही.

या संग्रहात त्यांना प्रतिकूल असाही मजकूर त्यांचे कौतुक करता करता लिहिलेला आहे. श्रीरंजन आवटे हा तरुण विश्लेषक लिहितो, “बाबासाहेबांच्या नावाचे समर्थन केले म्हणून त्यांना थेट प्रतिगामी म्हणता येत नाही. हमीद दलवाईंना पाठिंबा दिला म्हणून बावनकशी पुरोगामी म्हणता येत नाही. पुरोगामी, प्रतिगामी, उजवे-डावे अशा कप्प्यांत पवारांना बंद करता येत नाही. व्यवहारी, मुरब्बी पद्धतीने पण शक्य तितक्या प्रागतिकतेसह पुढे जाणारे राजकारणी म्हणून मला शरद पवारांचे नेतृत्व मोलाचे वाटते.”

‘महाराष्ट्र टाइम्स’ला न पचलेले पुरोगामी पत्रकार विजय चोरमारे सांगतात, “साताऱ्यात पाऊस सुरू झाल्यावर ना लोक विचलित झाले, ना नेते मंडळी. कदाचित सगळ्यांनाच या म्हाताऱ्याची जादू ठाऊक असावी. हा म्हातारा काहीही करामत करू शकतो, असं काही वर्षांपूर्वी म्हटलं जायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट घडली तरी त्याला शरद पवार जबाबदार आहेत, असं म्हणण्याची पद्धत रूढ झाली होती. पंचवीस वर्षांपूर्वी अनेक आरोपांतून तावूनसुलाखून निघाल्यानंतर ‘किल्लारीचा भूकंप मी घडवला, एवढाच आरोप माझ्यावर व्हायचा राहिलाय’, असं शरद पवार जाहीरपणे म्हणायचे. असा शक्तिमान माणूस आपल्या शक्तीनं पाऊस थांबवू शकतो, असं व्यासपीठावरच्या कुणाला वाटलं असल्यास नवल नाही. म्हातारा पाऊस थांबवू शकत नव्हता, परंतु पाऊसही म्हाताऱ्याला थांबवू शकला नाही, विचलित करू शकला नाही… साताऱ्याची ही सभा म्हणजे शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीतलं सर्वोच्च शिखर होतं… जेव्हा सगळं संपलंय असं वाटायला लागतं, तेव्हा स्वत:ला शरद पवार समजून मैदानात उतरा, हा प्रेरणामंत्र महाराष्ट्राला दिला.”

अशाच थाटाचे लेख या संग्रहात आहेत. ते लिहिताना पवारांची दुसरी बाजू दाखवायचे अस्फुट प्रयत्न त्यात आहेत. असे लिखाण मोदींना त्यांच्याविषयी मुळीच खपले नसते. कारण त्यांची संघाच्या साच्यातली घडण! तो साचा अत्यंत अरुंद, चिंचोळा व हवाबंद आहे. पवार महाराष्ट्राच्या सुधारकी-क्रांतिकारक-मवाळ असा संमिश्र हवेचे अपत्य आहेत. काही लेखकांनी त्यांना कशी मिथकीय विशेषणे दिली आहेत ते पहा – ‘वास्तवातला सुपरमॅन’ (उदय मोहिते), ‘छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेणारा कुटुंबप्रमुख’ (अश्विनी सातव-डोके), ‘द ग्रेट पॉलिटिकल वॉरियर’ (मोहन म्हसकर-पाटील), ‘असा राजयोद्धा होण नाही’ (हरिश केंची), ‘बाजीगर ओ बाजीगर’ (विजयकुमार स्वामी)!

अमेय तिरोडकर, वसंत भोसले, ज्ञानेश महाराव या तिघांचे लेख राजकारण, व्यक्तित्व, अंत:प्रवाह अशा वेढ्यांतून पवारांचे यश उत्तम टिपतात. त्याने आपली राजकीय समज वाढते. प्रवीण बर्दापूरकर यांनीही ‘जोर का झटका धीसे से लगे’ असे म्हणत पवारांचे यथार्थ वर्णन केले आहे. सुप्रिया सुळे यांचा ‘माझे लढवय्ये बाबा’ असा चांगला आत्मकथनात्मक लेख आहे. एक पिता त्याच्या प्रिय कन्येला कसा दिसतो, हे त्यातून आपण जाणतो.

आवर्जून मुलीला राजकारणात प्रस्थापित करणारा हा पिता काँग्रेसच्या महाराष्ट्रीय राजकारणात फार दुर्मीळ. एरवी बहुतांश स्त्रियांना गौशात ढकलणारे, नाही तर त्यांच्या नावाने आपलेच घोडे दामटवणारेच.... समाजवादी, साम्यवादी, शेकाप, रिपब्लिकन या पक्षांत तरी वेगळे काय घडले?

तरुण पत्रकार गिरीश लता पंढरीनाथ यांची या संग्रहामागची धडपड आणि संपादक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांची जुळवाजुळव आणि कल्पकता पानोपानी आढळते. असा संग्रह सचित्र, रंगीत आणि आकर्षक असावा लागतो, तसा तो झाला आहे. मिथक रचताना ते टिकेल असे रचावे लागते. एका प्रसंगाने कलाटणी मिळालेल्या अशा पुस्तकाची इतिहास दखल घेत असतो. पण का काही अभ्यास अथवा संशोधनात्मक आढावा नव्हे. हा काही इतिहास नाही. कारण त्यात तपशील, बारकावे, माहिती, नोंदी नाहीत. आहेत त्या उत्स्फूर्त, आनंदी, भावनिक प्रतिक्रिया. मराठी मनाच्या त्या असल्याने त्या सतर्क आणि ठामपणे मांडल्या गेलेल्या आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हजारो डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलेल्या एका घटनेच्या अनुषंगाने एका राजकीय नेतृत्वाचे महत्त्व आणखी पक्के करण्याचा हा प्रयत्न खोट्या, बनावट प्रसंगातून मिथके रचणाऱ्या संघपरिवाराशी पूर्णपणे पंगा घेतो.

महाराष्ट्र व बंगाल हेच दोन प्रांत देशाच्या राजकारणाला कलाटणी देतात, हे आपण गेल्या दीडर्शे वर्षांत पाहिलं आहे. त्याचाच हे पुस्तक एक भाग आहे. (बंगालीत आता ‘प्लास्टरच्या पायाची लाथ’ असे पुस्तक आले की झालेच तसे!)

‘पावसातला सह्यादी शरद पवार’ : संपादन – चन्नवीर भद्रेश्वरमठ

प्रकाशक – सतीश दत्तात्रय पवार, पुणे

पाने – १९२, मूल्य – ४०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......