‘द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट’ : तीन भिन्न महिलांच्या ऐतिहासिक शोकांतिकेच्या एकत्रित अनुभवाचा लेखाजोखा
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
सतीश बेंडीगिरी
  • ‘द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Wed , 30 June 2021
  • ग्रंथनामा इंग्रजी पुस्तक द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट The Granddaughter Project शाहीन चिश्ती Shaheen Chishti

जागतिक शांततेबद्दल आपली ठोस मते मांडणारे भारतीय-ब्रिटिश लेखक शाहीन चिश्ती यांची पहिली कादंबरी, ‘द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट’ (The Grand Daughter Project) नुकतीच प्रकाशित झाली आहे. तीन भिन्न महिलांच्या ऐतिहासिक शोकांतिकेच्या एकत्रित अनुभवाचा लेखाजोखा, या स्त्रियांच्या वाट्याला आलेले कष्ट, त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा, त्यांच्या नातींसाठी त्यांनी सामाजिक पूर्वग्रह बदलावेत म्हणून पुकारलेला आवाज, असा आवाका असणारी ही कादंबरी अंतर्मुख करते.  

भारतीय-ब्रिटिश परंपरेतल्या अनेक लेखकांपैकी एक असणारे शाहीन चिश्ती अजमेरमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्याचे आदरणीय सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे वंशज आहेत. चिश्ती व्यवसायाने लेखापाल असून लंडनमधील साहित्यिक संस्था आणि मुस्लीम-ज्यू फोरमचे सदस्य आहेत. वयाच्या १५व्या वर्षी आपल्या आई-वडिलांसमवेत लंडनला जाण्यापूर्वी शाहीन अजमेरच्या मयूर स्कूलमध्ये शिक्षण घेत होते.

या कादंबरीत ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासोबत असणाऱ्या पुरुषांनी त्यांना वाईट परिस्थितीत ठेवले. तरुण आणि एकटे असणाऱ्या या स्त्रियांनी अशा हलाखीच्या परिस्थितीवर काबू मिळवण्यासाठी बराच संघर्ष केला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या कादंबरीतील एक पात्र हेल्गा ही लाडात वाढलेली मुलगी दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरने केलेल्या विनाशात (होलोकॉस्ट) सापडते. औशविट्झमधल्या छळछावण्यांत ती तिच्या कुटुंबापासून वेगळी पडते. मरण केव्हाही येणार, अशा भयानक परिस्थितीतून ती वाचते आणि इस्राएलमध्ये नव्या जीवनाची सुरुवात करते.

याउलट, कमला एक अत्यंत गरीब शेतकऱ्यांची मुलगी बंगालमधल्या भयानक दुष्काळात वाढते. दारुडा बाप आईला मारहाण करत असतो. घरात अठराविश्वे दारिद्र्य. अखेरीस दुष्काळात आई-वडील मरतात, पण कमला जिवंत राहते आणि एका महिलाश्रममध्ये कामाला लागते. राजीव नावाच्या मुलाशी लग्न  करते, पण तोही तिला सोडून निघून जातो.

लीनेट आणि तिची आई पाम या दोघी कॅरेबियन किनारा सोडून १९५०च्या दशकातल्या लंडनमध्ये येतात. भयानक परिस्थितीत राहून आई-मुलगी सतत भेदभाव करणाऱ्या समाजाशी संघर्ष करत जगतात. एके दिवशी पाम मरते आणि लीनेट एकाकी होते. भोवतालचा समाज तिची अवहेलना करू लागतो. त्याच वेळी नॉटिंग हिलला पेटलेल्या दंगलीत तिला जबरदस्त मारहाण केली जाते आणि ती मेली असे समजून सोडले जाते, परंतु ती जिवंत राहते.

मनावर घाव करून सोडणाऱ्या या कादंबरीत चिश्ती लैंगिक असमानता, वांशिक दडपशाही, युद्धकाळातील आघात आणि स्त्री-मुक्ती यांसारख्या कालातीत विषयांवर समर्पक भाष्य करतात. दुसर्‍या महायुद्धातील होलोकॉस्टसह छळछावण्या, १९५८ सालात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडमधील नॉटिंग हिलमध्ये झालेल्या जातीय दंगली, १९४३चा बंगालचा विनाशकारी दुष्काळ, ज्यात भूक आणि उपासमार, मलेरिया आणि इतर प्राणघातक आजारांमुळे अंदाजे दहा लाख लोकांचा बळी गेला, अशा इतिहासातल्या काही महान शोकांतिकांचा चिश्ती यांनी या कादंबरीत सविस्तर आढावा घेतला आहे.

तावूनसुलाखून निघालेल्या या महिला पहिल्यांदाच त्यांच्या नातींना त्यांच्या कथा सांगतात. आपण ज्या वळणावर अयशस्वी झालो, त्यावरून धडा घेऊन त्या यशस्वी होऊ शकतील आणि स्वत:साठी जे योग्य आहे, ते करण्यास सक्षम होतील, त्यांना प्रेरणा मिळेल, आपण लढायला समर्थ आहोत, असे वाटेल, या आशेने या स्त्रिया हे कथन करतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

शाहीन चिश्ती म्हणतात, “ ‘द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट’ प्रकाशित करताना मला आनंद  होतो आहे. आशा आहे की, या पुस्तकांमुळे महिला सशक्तीकरण आणि वांशिक समानतेचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण होईल. माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच प्रेरणादायक स्त्रिया माझे संगोपन करत असत, जे मी माझे भाग्य समजतो. या सर्वांनीच माझ्या आजच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला  आहे.  

ज्या स्त्रियांनी कठीण परिस्थितीशी मुकाबला करताना आणि सर्वसाधारणपणे जगभरातील अशा स्त्रिया, ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांच्यासाठी ही कांदबरी एक प्रकारची श्रद्धांजली ठरावी, अशी माझी इच्छा आहे. आताही जगातील बऱ्याच समुदायांमध्ये बऱ्याच स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हे जाणून फार वाईट वाटते. हे बदलणे आवश्यक आहे. माझे पुस्तक त्या बदलांसाठी योगदान देईल, अशी मी मनापासून आशा करतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

महिलांचे सबलीकरण ही माझी धार्मिक श्रद्धा आहे. पुरुषांना जेवढे महत्त्व आहे, तेवढेच माझ्या मुलींनाही आहे. मला एक असे काम करायचे होते, जे लोकांच्या त्वचेचे रंग, त्यांचे राष्ट्रीयत्व, त्यांचा धर्म किंवा त्यांच्या पंथाची पर्वा न करता एकत्र जोडेल. हेल्गा, कमला आणि लीनेट या पूर्णतः वेगळ्या जगातील महिला आहेत, तरीही त्यांच्या अनुभवांचा एक समान धागा आहे. तो म्हणजे त्यांच्या आयुष्यात पुरुषांनी त्यांना दिलेले दुःख. माझा विश्वास आहे की, ही कादंबरी जगातल्या अशा कहाण्यांमध्ये किती साम्य आहे, जे सहसा कसे गृहित धरले जाते, त्यावर प्रकाश टाकेल.”

‘द ग्रँड डॉटर प्रोजेक्ट’ ही कादंबरी निंबल बुक्स एलएलसी, अमेरिका या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......