जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी दोन वेळा नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या मारी क्युरी यांना लिहिलेल्या पत्रांची गोष्ट….
पडघम - सांस्कृतिक
मारिया पोपवा
  • अल्बर्ट आईन्स्टाईन आणि मारी क्युरी
  • Mon , 28 June 2021
  • पडघम सांस्कृतिक अल्बर्ट आइन्स्टाईन Albert Einstein मारी क्युरी Marie Curie

निकृष्ट प्रतिभा असलेल्या व्यक्तींनी अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्यांवर आरोप करताना प्रत्यक्षात पाहणं निराशाजनक असतं. अशा टोळ्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही खूप मोठी असते, हे पाहून खचायला होतं.

मारी क्युरी (७ नोव्हेंबर १८६७ – ४ जुलै १९३४) या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला. किरणोत्सर्गाविषयी मूलगामी संशोधन केल्याबद्दल क्युरी पती-पत्नींना हे पारितोषिक संयुक्तपणे प्रदान करण्यात आलं होतं. पुढे १९०६ साली पियर क्युरी यांचं एका अपघातात निधन झालं. त्यानंतर चार वर्षं मारी शोकात होत्या, एकट्या पडल्या होत्या. १९१० साली त्यांना थोडं बरं वाटू लागलं. याच काळात पियर यांचा शिष्य पॉल लांगेविन त्यांच्या जीवनात आला. पॉलचं लग्न मोडलेलं होतं. त्याच्या पत्नीला मानसिक विकार होता. तिने मारी यांच्या घरी गुंड पाठवून पॉल यांनी लिहिलेली प्रेमपत्रं हस्तगत केली आणि वर्तमानपत्रांकडे पाठवून दिली. त्या पत्रांच्या आणि मारी-पॉल यांच्या प्रेमप्रकरणाच्या चविष्ट बातम्या छापून आल्या. माध्यमांना चटकमटक बातम्या हव्याच असतात. काही पिवळ्या वर्तमानपत्रांनी मारीचं वर्णन ‘एक परदेशी, ज्यूईश आणि घर फोडणारी स्त्री’ असं केलं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्यानंतर ब्रसेल्समध्ये भरलेल्या एका विज्ञान परिषदेत आइन्स्टाईन आणि मारी यांची भेट झाली. तिथून त्या पॅरिसला परतल्या खऱ्या, पण त्यांच्या घरासमोर संतप्त जमाव उभा होता. परिणामी त्यांना आपल्या मैत्रिणीच्या घरी आसरा घ्यावा लागला.

आइन्स्टाईन मारी क्युरी यांचं वर्णन ‘लखलखीत बुद्धिमत्ता असलेली, नम्र आणि प्रामाणिक स्त्री’ असं करत असत. त्यांच्या कानावर मारीबद्दलच्या गावगप्पा आल्या, तेव्हा त्यांना वाईट वाटलं. प्रसारमाध्यमांची घसरलेली पातळी आणि त्यांचे लज्जास्पद वृतान्त वाचून ते संतप्त झाले. आइन्स्टाईन यांचा धीर देणारी पत्रं लिहिण्यात हातखंड होता आणि ते मूलतः मानवतावादी होते. त्यांनी मारी यांना मनापासून समर्थन दिलं आणि माध्यमांतून येणारं तिरस्करणीय भाष्य मनावर न घेण्याचा सल्ला दिला.   

‘‘या कमअसल वृत्तपत्रांनी मारी यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. त्यांच्या खाजगी जीवनातीलच नव्हे, तर पूर्ण मानवतेच्या तरल भावनांचा विध्वंस केला आहे. पण एवढं करूनही ते थांबले नाहीत, तर त्यांनी मारी यांची वैज्ञानिक प्रतिष्ठाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला’, अशा शब्दांत पत्रात त्यांनी आपला विषाद व्यक्त केला.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मारी यांना त्यांनी लिहिलेली पत्रं वॉल्टर आयझॅक्सन यांच्या ‘आइनस्टाईन : हिज लाइफ अँड युनिव्हर्स’ (पब्लिक लायब्ररी) या चरित्रात संग्रहित आहेत. आइनस्टाईन यांची बुद्धी अतुलनीय होतीच, पण त्या सोबत असलेली सहृदयता अशी होती की, त्यांना आपली बुद्धिमत्ता आध्यात्मिक आहे, असं वाटत असे. दुसऱ्या एका पत्रात त्यांनी लिहिलंय –

‘‘हा गोंधळ असाच चालू राहिला तर ते गरळ तुम्ही वाचूच नका, दुर्लक्ष करा, कारण ज्यांना बनावट आणि भ्रामक गोष्टींची आवड असते, अशा विचारशून्य वाचकांसाठी तो मजकूर लिहिलेला असतो.”

आणखी एका पत्रात ते म्हणतात-  ‘मारी क्युरी नामांकित शास्त्रज्ञांपैकी असूनही त्यांनी प्रसिद्धीपायी आपल्या प्रतिष्ठेला डाग लावू दिला नाही.’

अजून एका पत्रात ते म्हणतात -

“आदरणीय श्रीमती क्युरी

मला विशेष असं काही सांगायचं नसतानाही मी हे पत्र तुम्हाला लिहिले आहे, म्हणून तुम्ही हसू नका. पण समाज आणि माध्यमं तुमच्या खाजगी जीवनाबद्दल इतक्या अश्लाघ्य पद्धतीनं भाष्य करत असताना मी काहीतरी बोलायला पाहिजे असं मला वाटतं. मला खात्री आहे की, तुमच्या पुढे पुढे करणाऱ्या लोकांची प्रशंसा तुम्हाला जितकी खटकते, तितकीच तुमच्या खाजगी जीवनाबद्दल सनसनाटी वृत्तान्त लिहिणाऱ्यांची वृत्ती तुम्हाला निंदनीय वाटत असेल.  

तुमची बुद्धी, तुमची प्रेरणा आणि तुमच्या प्रामाणिकपणाचं मी कौतुक करतो आणि हे मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे, असं मला वाटतं. ब्रसेल्समध्ये तुमची प्रत्यक्ष भेट होणं मी माझं अहोभाग्य समजतो.

अफवा पसरवणाऱ्या गटात नसणाऱ्यांना तुमचं असणं फार मोलाचं वाटतं. तुमची ओळख होणं, तुमच्यासोबत वेळ घालवायला मिळणं, यातच त्यांना आनंद होतो. हा गदारोळ सुरू राहिला तरी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सतत गॉसिप आवडणाऱ्यांसाठी असा मजकूर लिहिलेला असतो.

तुम्हाला आणि लॅन्जवीन आणि पेरी यांना सप्रेम नमस्कार. ए. आइनस्टाईन.”

या प्रकरणानंतर मारी क्युरी यांना रसायनशास्त्रातील रेडियम आणि पोलोनियम यांच्या घटकांच्या शोधासाठी दुसरं नोबेल पारितोषिक मिळालं. दोन वेगवेगळ्या विषयांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत. भविष्याचा वेध घेणारी उमदी नोबेल पारितोषिक विजेती म्हणून त्या कायम लक्षात राहतील. त्यांच्याबद्दल गरळ ओकणारे पत्रकार मात्र विस्मृतीच्या पडद्याआड गेले आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हेलेन केलरवरही वाङ्मयचोरीचा आरोप झाला होता. तेव्हा प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांनी तिला पत्र लिहून तिच्यावरील आरोपांना अचूक आणि भेदक उत्तर दिलं होतं. मारी यांच्याबाबत जे घडलं, त्यावरून एकोणिसाव्या शतकातील डॅनिश तत्त्वज्ञ सरेन किरेकगार्ड आठवतात. ते म्हणाले होते -

मत्सराचा एक प्रकार असतो, जो नेहमी बघायला मिळतो. दुसऱ्याचा छळ करून काही मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती असतात. समजा एखाद्या जागी गप्पांचा अड्डा जमलेला आहे. त्यात मी प्रवेश करतो. समूहातील एखादा माझी थट्टा करण्याचा प्रयत्न करतो. पण मी त्याला रोखठोक प्रत्युत्तर दिलं की, त्याला अदमास येतो. खरं तर मी त्याच्यापेक्षा वरचढ आहे, पण माझ्या वर्तुळात त्याला सहजी प्रवेश करता येत नसल्यामुळे तो माझी टवाळी करण्यास उद्युक्त होतो. एकदा त्या वर्तुळात त्याचा प्रवेश झाला की, तो माझी थोरवी गाऊ लागतो. क्षुल्लक ज्ञान असलेल्या व्यक्ती आपलं क्षुल्लकत्व लपवण्यासाठी आक्रमक होतात!

अनुवाद - अलका गाडगीळ

..................................................................................................................................................................

या मूळ इंग्रजी लेखासाठी पहा - 

https://www.brainpickings.org/2016/04/19/einstein-curie-letter/

..................................................................................................................................................................

लेखिका मारिया पपोवा मूळच्या बेल्जियन. त्या ‘Brain Pickings’ हे ऑनलाइन जर्नल चालवतात. या जर्नलच्या त्या लेखिका, संपादिका आणि चालक आहेत. हे जर्नल लेखक, संस्कृती, साहित्य, दृश्यकला, मानसशास्त्र इत्यादी विषयांवर भाष्य करते. त्यांच्या शाब्दिक आणि दृश्यशैलीमुळे त्यांचे जर्नल लोकप्रिय झाले आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......