आपापल्या क्षेत्रात स्वतःला गाडून घेऊन काम करणारी अशी माणसं अजूनही संपलेली नाहीत...
ग्रंथनामा - झलक
गौरी कानेटकर
  • ‘खरेखुरे आयडॉल्स – ३’ या पुस्काचं मुखपृष्ठ
  • Fri , 25 June 2021
  • ग्रंथनामा झलक खरेखुरे आयडॉल्स Kharekhure Idols समकालीन प्रकाशन Samkalin Peakashan

समाजाकडून कोणत्याही दखलपावतीची अपेक्षा न करता समाजपरिवर्तनाचं काम करणार्‍या ‘खरेखुरे आयडॉल्स’ या पुस्तकमालिकेतला तिसरा भाग नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाला संपादक गौरी कानेटकर यांनी लिहिलेलं हे मनोगत…

..................................................................................................................................................................

आपला समाज वर्षानुवर्षं अनेक समस्यांशी झुंजतो आहे. या समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी अनेक व्यक्ती आपापल्या परीने काम करत आहेत. अशा व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देण्याचं काम ‘युनिक फीचर्स’चे पत्रकार गेली अनेक वर्षं करत आले आहेत. त्या कामाचं पुस्तकरूप म्हणजे ‘खरेखुरे आयडॉल्स’ ही पुस्तकमालिका. या मालिकेतील पहिले दोन भाग यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. त्यातलाच हा तिसरा भाग. पहिल्या दोन भागांचं संपादन सुहास कुलकर्णी यांनी केलं होतं. आता तिसर्‍या भागाची जबाबदारी ‘युनिक फीचर्स’च्या वतीने मी निभवत आहे.

‘खरेखुरे आयडॉल्स’ या संकल्पनेची जन्मकथा थोडक्यात सांगायला हवी. २००४पासून टीव्हीवर ‘इंडियन आयडॉल्स’ नावाची मालिका सुरू झाली होती आणि तुफान लोकप्रियही झाली होती. हिंदी सिनेमातल्या गाण्यांची सही सही नक्कल करणार्‍या गायकांना तेव्हा (आणि नंतरही) देशाने डोक्यावर घेतलं होतं. चांगलं गाणारी तरुण मंडळी गायक होऊ इच्छिणार्‍यांसाठी आयडॉल्स असू शकतात, पण त्यांनाच ‘इंडियन आयडॉल्स’ अशी पदवी देणं योग्य आहे का, मग बाकीच्या क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणार्‍या मंडळींची दखल कोण घेणार असे प्रश्न ‘युनिक फीचर्स’च्या पत्रकारांना पडले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून समाजातले खरे आयडॉल्स कोण, हे शोधण्याचा प्रयत्न हाती घेतला गेला आणि त्यातूनच ‘खरेखुरे आयडॉल्स’ हे पुस्तक प्रत्यक्षात आलं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

समाजाकडून कोणत्याही दखलपावतीची अपेक्षा न करता समाजपरिवर्तनाचं काम करणार्‍या पंचवीस कार्यरतांची ओळख या पुस्तकाने महाराष्ट्राला करून दिली. महाराष्ट्रातील तमाम वाचकांनी त्या पुस्तकाला आणि पुस्तकातून मांडलेल्या संकल्पनेला जोरदार उचलून धरलं. वर्षांमागून वर्षं हे पुस्तक ‘बेस्टसेलर’ ठरलं. आजवर या पुस्तकाच्या ३०हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. यावरून या पुस्तकाला मिळालेला वाचकाश्रय लक्षात यावा. या प्रतिसादामुळेच २०१०मध्ये ‘खरेखुरे आयडॉल्स’चा दुसरा भागही काढला गेला. त्यात आणखी पंचवीस आयडॉल्सचा समावेश होता. हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरलं. याही पुस्तकाच्या पंधराएक आवृत्त्या आजवर प्रकाशित झाल्या आहेत.

आता ‘खरेखुरे आयडॉल्स’ या मालिकेतलं हे तिसरं पुस्तक प्रकाशित होत आहे. ज्यांच्या कामामधून कुठे प्रश्न सोडवले जात आहेत, कुठे न्याय मिळवून दिला जात आहे, कुठे संशोधनामुळे जीवन सुकर होत आहे, कुठे नवे पायंडे पाडले जात आहेत, कुठे स्थानिक बुद्धी-शक्तीचा मिलाफ करून नवनिर्माण घडत आहे, कुठे त्यांच्या कामामुळे व्यवस्थेत सकारात्मक हस्तक्षेप होऊन व्यवस्था सुधारण्यास मदत होत आहे, ते खरे समाजाचे आयडॉल्स. त्यांची नोंद घेण्याचं काम आम्ही करत आलो आहोत. महाराष्ट्राच्या सर्व भौगोलिक विभागांतील व जास्तीत जास्त सामाजिक गटांतील मंडळींचा यात समावेश असावा, असा आमचा प्रयत्न राहिला आहे.

आपापल्या क्षेत्रात स्वतःला गाडून घेऊन काम करणारी अशी माणसं अजूनही संपलेली नाहीत. त्यातली काही नावं लोकांना ऐकून माहिती आहेत, पण त्यांच्या कामाच्या तपशीलाची कल्पना नाही; तर काहींच्या कामाची पुरेशी दखल घेतली गेलेली नाही. अशा २० व्यक्तींचा या पुस्तकात समावेश आहे. यातील काही व्यक्ती संघर्षात्मक कामात गुंतलेल्या आहेत, काहींनी रचनात्मक कामं उभारली आहेत; तर काही जण समाजाच्या गरजेनुसार दोन्ही मार्ग अवलंबून प्रवास करत आहेत. कोण आहेत हे खरेखुरे आयडॉल्स?  

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मेळघाटातल्या दुर्गम भागात ठाण मांडून आदिवासींच्या आरोग्याचे प्रश्न सोडवणारे डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे, कोरडवाहू शेतकर्‍यांच्या समस्यांवर शाश्वत उपाय योजण्यासाठी धडपडणारे सांगली जिल्ह्यातले संपतराव पवार, गडचिरोलीतल्या मेंढा(लेखा) या छोट्याशा गावातून ग्रामीण स्वराज्याचा अन् वनहक्काचा नारा देणारे देवाजी तोफा आणि मोहन हिराबाई हिरालाल, विस्थापितांच्या हक्कांसाठी लढणार्‍या सुनीती सु. र., दलितांच्या आर्थिक भरभराटीसाठी उद्योजकतेचा वसा घेणारे मिलिंद कांबळे, आदिवासींच्या हक्कांसाठी अन् दारूबंदीसाठी संघर्ष करणार्‍या चंद्रपूरच्या पारोमिता गोस्वामी, शेतकर्‍यांच्या संघटनांना एका छत्रीखाली आणून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नगर जिल्ह्यातल्या अकोले गावचे डॉ. अजित नवले, सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यात बचतगटांचं जाळ विस्तारणार्‍या कुसुम बाळसराफ, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हाती विज्ञानाची दोरी देणारे नंदुरबारचे डॉ. गजानन डांगे, मराठवाड्यातल्या दलितांचं आणि ऊसतोड महिलांच्या मानवी हक्कांसाठी झगडणार्‍या मनीषा तोकले, माणदेशातल्या दुष्काळी भागात अशिक्षित महिलांसाठी बँक उभारणार्‍या चेतना सिन्हा, मेळघाटात बांबू केंद्र उभारून आदिवासींना आर्थिक स्वयंपूर्णतेचा मार्ग दाखवणारे सुनील व निरुपमा देशपांडे, वंचित मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणार्‍या ‘प्रथम’ संस्थेच्या फरिदा लाम्बे आणि कोकणातल्या ग्रामविकासाचं ‘भगीरथ’ मॉडेल साकारणारे हर्षदा आणि प्रसाद देवधर अशी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये, विविध क्षेत्रांत काम करणारी ही मंडळी आहेत.

त्यांच्यासोबत राजकारणात राहूनही सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका निभावणारे बुलडाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचा, तसंच काही संपूर्ण वेगळ्या क्षेत्रांमध्ये मूलभूत काम करणार्‍या काही कार्यरतांचाही या पुस्तकात समावेश केला आहे. गोव्यातले पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर, ‘माणसांमधले सापांचे प्रतिनिधी’ असं बिरुद मिळवलेले प्राणिमित्र नीलिमकुमार खैरे, लहान-थोरांमध्ये गिर्यारोहण आणि इतर साहसी खेळांची आवड रुजवण्यासाठी धडपडणारे ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे या मंडळींवरचे लेख वाचकांना वेगळ्या कामांची ओळख करून देतील.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या सर्व कार्यरतांचं वर्णन ‘खरेखुरे आयडॉल्स’ असं केलं असलं तरी माणूसपणाच्या मर्यादा त्यांनाही लागू आहेत, याची जाणीव ठेवायला हवी. त्यांच्यातही आपल्या सर्वांप्रमाणे काही ना काही कमी-जास्त असणारच; पण त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जावी आणि समाजातील प्रश्नांची उत्तरं शोधण्यात त्यांची मदत व्हावी, एवढीच इच्छा.

हे पुस्तक महाराष्ट्र दिनानिमित्त मे महिन्यात प्रकाशित करण्याचं नियोजन होतं. परंतु एप्रिलमध्ये महाराष्ट्राला करोनाच्या दुसर्‍या लाटेचा तडाखा बसला आणि सर्वत्र लॉकडाऊन लागला. त्यामुळे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही. दरम्यान, या पुस्तकातील एक आयडॉल, मेळघाटच्या ‘संपूर्ण बांबू केंद्रा’चे सुनील देशपांडे यांचं करोनामुळे निधन झालं. हे पुस्तक छपाईला जात असतानाच ही दुःखद बातमी कळली. पण तरीही त्यांच्यावरील लेख कोणताही बदल न करता प्रकाशित करत आहोत.

‘खरेखुरे आयडॉल्स – ३’ : संपादक गौरी कानेटकर

समकालीन प्रकाशन, पुणे

मूल्य – २५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......