हर्षालीचा चंद्रपूर ते लंडन व्हाया ‘टाटा इन्स्टिट्यूट’ हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आपण तिला आर्थिक मदत करून साथ देण्याची नितांत निकडीची गरज आहे
पडघम - राज्यकारण
कुणाल रामटेके
  • हर्षाली नगराळे आपल्या आई-वडिलांसोबत
  • Wed , 23 June 2021
  • पडघम राज्यकारण हर्षाली नगराळे Harshali Nagrale टीआयएसएस TISS डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar

कुठल्याही प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना स्वतःला सावरत सावरत सामाजिक बदलांच्या प्रक्रियेत आपल्याला वाटेकरू होता येत असेल तर ती निश्चितच मोठी गोष्ट असते. कारण स्वतःपासूनच कोणत्याही सकारात्मक बदलाची सुरुवात होते असं म्हणतात. कठोर परिश्रम आणि निरंतर ध्यास यांच्या जोरावर स्वतःला घडवणाऱ्यांच्या ‘कहाण्या’ इतरांनाही प्रेरित करतात. हळूहळू हा प्रेरणेचा झरा मोठा होत जातो आणि त्यातूनच सामाजिक परिवर्तन घडत जाते.

सामाजिक क्रांती, परिवर्तन, पुरोगामित्व या संकल्पना आपण अनेकदा वापरत असतो. मात्र हे परिवर्तन घडणं, वाटतं तितकं सहजसोपं नसतं. त्यासाठी वैचारिक स्पष्टता आणि भरपूर परिश्रमाची तयारी करावी लागते. त्यातही भारतासारख्या जात-वर्ग-लिंगभेद यांनी ग्रस्त असलेल्या समाजात एक महिला म्हणून स्वतःला सावरणं, पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्वतःला उभं करणं आणि सामाजिक बांधीलकी मानत परिवर्तनासाठी सिद्ध होऊ पाहणं, हे सारंच खूप कठीण असतं.

मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह या ग्रामीण भागातून आलेल्या हर्षाली नगराळेच्या प्रवासाकडे बघितलं की, हे ‘शक्य’ आहे असं वाटू शकतं!  

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हर्षालीच्या घरची परिस्थिती बेतासबात. वडील निवृत्त गिरणी कामगार आणि आई गृहिणी. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा समृद्ध विचार-वारसा भक्कमपणे तिच्यासमोर उभा होता. बालपणापासूनच तिला आपल्या वस्तीत असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं मोठं आकर्षण वाटत असे. ते तिला नवी भरारी घ्यायलाच प्रेरित करत होते. मोठं झाल्यावर आपणही बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ‘खेड्यातून शहराकडे’ जावं, उच्चशिक्षण घेऊन त्यांच्या ‘पे बॅक टू सोसायटी’ या संदेशानुसार ज्या शोषित-वंचित समाजात आपण जन्मास आलो, त्याच्यासाठी काहीतरी करावं, हा विचार तिच्या मनात घोळू लागला. मात्र नेमकं काय करावं? हे वळत नव्हतं.

पुढे ती पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘भौतिकशास्त्र’ या विषयात पदवीचा अभ्यास करत असताना अनेक बरे-वाईट अनुभव येत गेले. चांगले मित्र लाभले. त्या जोडीला विज्ञानासोबत सामाजिक विषयांचंही वाचन वाढत गेलं. त्यातून आपल्या समस्यांचं स्वरूप जरी ‘भौतिक’ वाटत असलं तरी त्यांचे इतरही असंख्य कंगोरे असतात, हे तिला जाणवायला लागलं. शोषण, अन्याय, अत्याचार यावर आधारित सामाजिक व्यवस्था बदलवून समतेवर उभा असणारा समाज का स्थापन होऊ शकत नाही? असे अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण होत होते.

इथल्या व्यवस्थेनेनं हजारो वर्षांच्या कालखंडात एका बृहद समाजाला अस्पृश्य म्हणून हिणवत त्यांना मानवाधिकारही नाकारले होते. मागासवर्गीय महिलांना तर अत्यंत खालच्या स्तरावरची वागणूक दिली जात होती.

जोवर इथल्या सामाजिक समस्यांचा शोध घेतला जात नाही, तोवर परिस्थिती बदलणं निव्वळ अशक्य आहे, असं हर्षालीला वाटत होतं. त्यातच तिला मुंबईस्थित ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’त चालवल्या जाणाऱ्या ‘विमेन सेंटर प्रॅक्टिस’ या विषयातील पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. ही व्यावसायिक समाजकार्याचं शिक्षण देणारी जगातली तिसरी आणि आशिया खंडातली पहिली संस्था आहे. दर वर्षी तिच्यामार्फत राबल्या जात असलेल्या विविध अभ्यासक्रमासाठीच्या निवड प्रक्रियेत लाखो विद्यार्थी सहभागी होतात. मात्र बोटावर मोजण्याइतक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

हर्षालीने प्रवेशपरीक्षा दिली आणि यशस्वीरीत्या ‘टीआयएसएस’मध्ये प्रवेश मिळवला. तिथलं वातावरण भारून टाकणारं, विचारांना चालना देणारं होतं. ती विद्यार्थी चळवळीत सहभागी झाली. दुसऱ्या वर्षाला असताना छात्रसंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीलाही उभी राहिली. या सगळ्यातून तिला बरंच काही शिकायला मिळालं.

त्यातून व्यवस्था बदलायची असेल तर आपल्यासारख्या लोकशाहीप्रधान देशात निवडणुकीशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही, याची खात्री तिला पटत गेली. बाबासाहेबांनी इथल्या शोषित-वंचितांना ‘शासनकर्ती जमात’ होण्यास सांगितलं होतं. हा प्रवास मात्र निवडणुका, लोकशाही आणि त्यासाठी समान संधी या मार्गानेच आपल्याला करावा लागेल, हे हर्षालीला उमजू लागलं.

‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ आपल्या विद्यार्थ्यांना पोषक वातावरण, अनुभव मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नरत असते. या संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून राबवण्यात येणाऱ्या ‘इंटर्नशिप’सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. हर्षालीने या काळात मुंबईच्याच ‘महिला राजसत्ता आंदोलना’त ‘इंटर्नशिप’ केली. त्यातून राजकीय क्षेत्रात आणि त्यातही पंचायतराज क्षेत्रात काम करत असणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार व शोषणाबद्दल तिला माहिती मिळत गेली. त्यामुळे ‘ग्रामपंचायतींमध्ये महिला प्रतिनिधींचा लैंगिक छळ’ या विषयावर तिने संशोधन केलं. त्यासाठी २०१८च्या सहाव्या ‘राष्ट्रीय काँग्रेस परिषदे’मध्ये ‘मार्था फरेल’ या अत्यंत महत्त्वाच्या अशा पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं.

ही बदलाची नांदी होती… हर्षालीला आपलं ‘क्षेत्र’ गवसलं होतं...

पुढे ‘महिला आणि राजकारण’ या विषयावर काम करत असतानाच हर्षालीला पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचारमोहिमेत प्रशांत किशोर यांच्या ‘भारतीय-राजकीय कृती समिती’ (आय.-पी.ए.सी.)मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातून महिला राजकारणात आल्या तर काय बदल घडवता येऊ शकतात, याचा प्रत्यक्ष अनुभाव तिला येत गेला.

हर्षालीला आता ‘सक्षम आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी निवडणुकीचे राजकारण’ या क्षेत्रात काम करायचं आहे. नुकतीच तिची लंडन येथील ‘रॉयल होलोवे’ या प्रतिष्ठित विद्यापीठात ‘एम.एस.सी.’ या पदव्युत्तर पदवीसाठी निवड झाली आहे. तिथं ती ‘निवडणूक, प्रचार मोहीम आणि लोकशाही’ (Election, Campaign and Democracy) या विषयाचा अभ्यास-संशोधन करणार आहे

मात्र हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तिला बराच खर्च येणार आहे. बेताच्या आर्थिक परिस्थितीत हर्षालीने आपलं आजवरचं शिक्षण पूर्ण केलं, ते केवळ सरकारी स्कॉलरशिप आणि स्नेहीजनांच्या मदतीच्या भरवशावर. ‘रॉयल होलोवे विद्यापीठा’च्या अभ्यासक्रमाची फी, राहण्या-खाण्याचा-प्रवासाचा खर्च हे सारं तिच्या आई-वडिलांच्या खूप आवाक्याबाहेरचं  आहे. त्यासाठी तिला आपल्या आर्थिक मदतीची गरज आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हर्षालीचा हा अभ्यासक्रम येत्या २० सप्टेंबर २०२१ पासून सुरू होतोय. त्यासाठी तिने मदतीचं आवाहन केलं आहे. या बाबतची पारदर्शकता ठेवण्यासाठी तिने ‘मिलाप’ या अधिकृत माध्यमाची मदत घेतली आहे. https://milaap.org/fundraisers/support-harshali-3 या लिंकवर जाऊन तुम्ही तिला शक्य ती मदत करू शकता.

किंवा ‘harshalinagrale21@gmail.com’ या तिच्या ई-मेल अड्रेसवर प्रत्यक्ष संपर्क करू शकता.

भारतीय रुपयांमध्ये तिला लागणारा हा खर्च पुढीलप्रमाणे आहे -

शिकवणी फी : १८,०६,००० रुपये

भोजन आणि निवास खर्च : (११ महिन्यांसाठी) : १६,००,००० रुपये

इतर खर्च : १,००,००० रुपये

व्हिसा आणि विमान प्रवास : १,४५,००० रुपये

एकूण खर्च : ३६,५१,००० रुपये

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून कष्ट आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे येऊ पाहणाऱ्या हर्षालीला आपल्या मदतीची, सहकार्याची गरज आहे.

..................................................................................................................................................................

लेखक कुणाल रामटेके सामाजिक कार्यकर्ता, मुक्त पत्रकार व लेखक आहेत.

ramtekekunal91@gmail. com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......