करोना महामारीच्या काळात ‘भीती’ या एकाच भावनेवर आपले लक्ष केंद्रित झालेले दिसून येते!
पडघम - विज्ञाननामा
सोपान मोहिते
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 22 June 2021
  • पडघम विज्ञाननामा चिंता Worry भीती Fear फोबिया Phobia कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus

करोना महामारीच्या काळात भीतीची भावना खूपच वाढली आहे. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी यांना जर करोनाची लागण झाली, तर आपल्यालाही होईल का?, असे वाटायला लागते. या काळात भीती या एकाच भावनेवर आपले लक्ष केंद्रित झालेले दिसून येते.

भीतीयुक्त परिस्थिती नसतानासुद्धा एखाद्या प्रसंगाविषयी, घटकाविषयी निरर्थक भीती वाटत असेल तर, त्याला ‘भीती’ या मानसिक आजाराने ग्रासलेले आहे असे म्हटले जाते. या महामारीच्या काळात डॉक्टर, शासकीय अधिकारी यांनी सांगितलेली पथ्ये, नियम पाळत नसाल तरच करोनाची बाधा होऊ शकते. हा आजार बरा होणारा आहे. पण माध्यमातून त्याविषयीच्या बातम्या अतिशयोक्त रंगून प्रसारित केल्या गेल्या. साहजिकच या आजाराविषयी माणसांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालीय. त्यामुळे मूळ आजार बाजूला राहून ‘भीती’ हा मानसिक आजार या काळात बळावल्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती सापडतील.

भीती ही एक भावना आहे. आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक भावना निर्माण होत असतात. या भावनांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला रंग व छटा प्राप्त होतात. सुख, आनंद, हर्ष, प्रसन्नता, प्रेम या सकारात्मक भावना; तर दु:ख, राग, मोह, माया, चिंता, भीती या नकारात्मक भावना असतात. प्रत्येक भावनिक छटेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु या छटा मर्यादित स्वरूपात व्यक्त होणे आवश्यक असते. कोणतीही भावना अतिरेकीपणे व्यक्त होण्यास सुरुवात झाली, तर विकृती निर्माण व्हायला सुरुवात होते. तीव्र भावस्थिती जास्त काळ टिकून राहिली की, अंतर्बाह्य बदल घडून येतात आणि भावनांचा उद्रेक होतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

भीतीची काही शास्त्रीय लक्षणे सांगता येतील. गुदमरल्यासारखे वाटणे, हृदय धडधडणे, घाम फुटणे, चक्कर येणे, अशी काही प्राथमिक लक्षणे दिसून येतात. याच भीतीतून पुढे मनात भयगंड निर्माण होतो. कोणत्याही गोष्टीविषयी भीतीची भावना निर्माण झाल्यानंतर आपल्या मनात ‘लढण्याची किंवा पलायनाची’ प्रतिक्रिया निर्माण होते. उदा. रस्त्याने जात असताना गुरगुरणारा कुत्रा अंगावर धावून येतोय, हे पाहताच आपण पळ काढतो. त्यामुळे हृदयस्पंदनाचा वेग वाढतो, शरीर थरथर कापू लागते, घाम येतो. कुत्रा पाहिल्यानंतर भीती वाटण्याचे काही कारण नाही. परंतु गुरगुरणारा कुत्रा पाहून पळण्याची क्रिया केली जाते. पलायनाबरोबरच शारीरिक बदल होतात. त्याची आपल्याला जाणीव होते. त्याला आपण ‘भीती’ म्हणतो.

रडू आल्यामुळे दु:ख होते. याउलट जर भीतीदायक प्रसंगाला तोंड देण्याची भूमिका ठेवली, तर कशाचीही भीती वाटत नाही. अशा वेळी शरीरामध्ये जे बदल होतात, त्यांचा आपण कसा अर्थ लावतो, यावर भावनिक अनुभवाचे, म्हणजेच भीतीच्या भावनेचे स्वरूप अवलंबून असते.

विशिष्ट प्रसंगाच्या उपस्थितीमुळे किंवा अपेक्षेमुळे अतिरिक्त प्रमाणात निराधार, तर्क विसंगत भीती आढळून येते. ज्या वस्तूची, घटकाची मनामध्ये भीती बसलेली असते त्याचे नाव घेतले, दर्शन झाले तरीसुद्धा मनात ताणतणाव निर्माण होतात. कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. प्रसंगी काम टाळण्याचा प्रयत्न केला जातो.

भीतीचे काही प्रकार आहेत. उंच जागेची भीती, यातनांची भीती, वीजांच्या गडगडाटाची, वादळाची भीती, पाण्याची भीती, बंद जागेची भीती, अंधाराची भीती, एकटेपणाची भीती, जंतूसंसर्गाची भीती, गर्दीची भीती, रोगाची भीती, विशिष्ट प्राण्याची भीती. अशी कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती मनामध्ये घर करून बसलेली असते. साप, पाल, कोळी यांची भीती वाटणे हे साधारण लक्षण मानले जाते. परंतु विकृती जडलेल्या माणसामध्ये सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त प्रमाणात भीतीची लक्षणे जाणवतात. उदा. बंदिस्त जागेची भीती असणारे लोक लहान खोलीत जात नाहीत. रक्ताची, जखमेची भीती असणाऱ्या लोकांसमोर एखादा अपघात झाला; तर मळमळ, भोवळ, उलटी, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, अशा प्रकारचे बदल होतात.

भीती ही अध्ययनाने विकसित होते. भीतीच्या प्रतिक्रियेचे अभिसंधीकरण होते. सुरुवातीला तटस्थ असणाऱ्या उद्दिपकाशी जर त्रासदायक घटनेचे साहचर्य निर्माण झाले, तर माणसाच्या मनात भीतीची प्रतिक्रिया निर्माण होते. उदा. लहान मुलांना डॉक्टरांची भीती साहचर्य संबंधांमुळे वाटते. प्रथम डॉक्टरांना लहान मुले घाबरत नाहीत. डॉक्टर इंजेक्शन देतात, ते वेदनादायक असते यातून मूल ‘डॉक्टर- इंजेक्शन- वेदना’ यात साहचर्य संबध शिकते. त्यातून डॉक्टरांना घाबरायला सुरुवात होते.

वेदना-क्लेशकारक अनुभवाबरोबरच निरीक्षणामुळेदेखील भीती निर्माण होते. ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होते. घरातील किटक, पाल, झुरळ यांना घाबरण्यासारखे काही नसते. जर आई त्यांना घाबरत असेल, तर मुलांनादेखील त्यांची भीती वाटायला लागते. म्हणजेच दुसऱ्याला वाटलेल्या भीतीमुळे आपल्याही मनात भीतीची भावना निर्माण होते. आपल्या पूर्वजांना ज्या प्रसंगांची, घटनांची दहशत, भीती वाटत असते, त्याच प्रसंगाची भीती संपादित करण्याची आपली सहज प्रवृत्ती असते. म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भीती संक्रमित होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

वडीलधाऱ्यांकडून बालवयात मुलांमध्ये भीतीची भावना निर्माण केली जाते. लहान मुलांना गाई, बैल अशा पाळीव प्राण्यांबद्दल प्रथम भीती नसते. त्यांच्याकडे मुले पळत जातात. पण वडीलधारी माणसे लहान मुलांचे संरक्षण व्हावे, या हेतूने त्यांची भीती दाखवतात. चोर, राक्षस, भूत, चेटकीण अशांच्याच काल्पनिक गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे मुलांच्या मनात भीतीची भावना आकाराला येते. स्त्री-पुरुष दोघांमध्ये सारखीच भीती असते. आपला स्वभाव, अनुभव यावर भीती निर्माण होईल की नाही, हे अवलंबून असते.

भीती निर्माण होण्यामागे आपल्या मेंदूतील जैवरासायनिक बिघाड कारणीभूत असतो. सोडियम लॉकट्टेड, कोफिन या आंतरस्त्रावामुळे भीती निर्माण होते. मेंदूतील लोकस कार्चुलस या भागातील नॉरएपिनेफ्रिनच्या कार्यात बिघाड झाला असेल, तर भीतीचे झटके येतात.

शरीरामध्ये होणाऱ्या बदलांचा चुकीचा अर्थ लावला, तर भीतीची भावना निर्माण होते. उदा. छातीत धडधड होत असेल, तर मला हृदयरोगाचा झटका येतोय की काय, असं वाटणं किंवा दोन-तीन दिवस खोकला असेल, तर मला टीबीचा आजार तर झालेला नसेल ना किंवा आताच्या भाषेत करोना तर झाला नसेल ना…. अशा विचारांमुळे आपण भीतीच्या गर्तेत अडकून पडतो.

याउलट धावून आल्यानंतर, जिन्याच्या पायऱ्या जलद चढत गेल्यानंतर हृदयाची धडधड वाढली, तरी वास्तव विचार केला जातो. घटना एकसारखीच परंतु विचार सकारात्मक की नकारात्मक, यावर तिची परिणामकारकता अवलंबून असते. ज्यांना भीती वाटते, ते त्यांच्याकडे असलेल्या माहितीवर प्रक्रिया करतात. त्यांच्या मनात पूर्वग्रह असतात. भीतीदायक माहिती लक्षात ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. भीतीदायक शारीरिक धोक्याकडे या रुग्णाचे जास्त लक्ष वेधले जाते. थोडासा आवाज आला तरी ‘पराचा कावळा’ केला जातो.

मानसिक आजाराच्या बाबतीत सुरुवातीला सौम्य अशा प्रकारची लक्षणे दिसू लागतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात ते बळावून त्याचे रूपांतर गंभीर विकृतीत होते. परंतु नेहमीच असे घडते असे नाही, काही वेळा आयुष्यभर मानसिक विकाराचा सौम्यपणा टिकून राहतो. ते मानसिक विकार आहेत, हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. आपण ‘अमक्याचा स्वभावच तसा आहे’ असे म्हणून त्याचे वर्तन गृहीत धरतो. पण याचा त्या व्यक्तीला, स्वतःला व कुटुंबातील सदस्य किंवा इतरांना त्रास होतो. म्हणून अशा व्यक्तीकडे कानाडोळा न करता जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते. जेणेकरून त्याला वेळीच मानसिक उपचार मिळतील. 

वैद्यकीय व्यवसायात मनो-औषधांना महत्त्वाचे स्थान आहे. भीती हा आजार असलेल्या रुग्णांना अशा औषधांमुळे आराम मिळतो व त्यांची लक्षणे कमी होतात. परंतु काही आठवड्यानंतर त्या औषधांची परिणामकारकता कमी होते. त्याचबरोबर अशा औषधांचे शरीरावरदेखील दुष्परिणाम होतात. त्याचबरोबर अशी औषधे घेण्याची सवयही लागू शकते.

मानसशास्त्रीय उपचारात भीती कमी करण्यासाठी ‘पद्धतशीर अवेद्नशिलता तंत्र’ (Systematic desensitization) वापरले जाते. यामध्ये ज्या रुग्णाला ज्या घटकाची, प्रसंगाची भीती वाटते, ती टप्याटप्याने कमी केली जाते. उदा. एखाद्या माणसाला सापाची भीती वाटत असेल, तर त्याला काही दिवस सापाचे चित्र दाखवले जाते. नंतर ते चित्र हाताळण्यास दिले जाते. सर्वच साप विषारी नसतात, हे पटवून दिले जाते. त्यानंतर नकली खेळण्यातील साप दाखवला जातो, तो हाताळण्यास दिला जातो. सापाविषयी शास्त्रीय माहिती सांगितली जाते. त्यानंतर प्राणी संग्रहालयातील साप दाखवला जातो. सतत त्या ठिकाणी भेट दिली जाते. क्रमवार असे केले जाते. नंतर प्राणी संग्रहालयातील बिनविषारी साप प्रत्यक्ष हातात दिला जातो. असे अनेक वेळा प्रयत्न केले असता, सापाची भीती कायमची जाते.

ज्याला भीती वाटते, त्याला स्वतःला असे वाटले पाहिजे की, आपली भीती कमी झाली पाहिजे. असे असेल तरच ती कमी होते. त्यासाठी चिकाटी, धैर्य दाखवणे गरजेचे असते. समुपदेशक भीती कमी करण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करतो.

‘तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती’त अल्बर्ट एलिस असे म्हणतात की, ‘तर्क आणि भावना यांचे स्वरूप एकमेकांत गुंतलेले असल्यामुळे त्यांना वेगळे करणे कठीण आहे.’ उदा. एखादा अनुभव आपण घेत असताना तर्कबुद्धीने त्याचे ज्ञान होते, त्याच वेळी त्याला जोडून भावनाही निर्माण होतात. त्यातून आपण त्या वेळी कसे वर्तन असावे, याचा निर्णय घेतो. बोधन, भावना आणि वर्तन या गोष्टी एकाच वेळी घडत असतात.

उदा. मुलांना साप दिसला असता त्याच्यापासून धोका आहे, अशी लहानपणापासून शिकवण दिली असल्या कारणाने तसे बोधन होते. भीतीची भावना आणि पळून जाण्याची क्रिया (वर्तन) केली जाते. हे सर्व एकाच वेळी घडते. त्याच वेळी मनात साप = धोका हे समीकरण रुजले जाते. विचार, भावना, वर्तन हे तिन्ही घटक एकाच वेळी कार्यरत होत असल्यामुळे वर्तणुकीत बदल घडवून आणावयाचे असल्यास त्याच्यापाठीमागे असलेल्या ठाम समजुती आणि त्यांना जोडून आलेल्या भावना यांच्यात बदल करावा लागतो.

आपण आपल्या मनाशी काही ठाम समजुती करून ठेवलेल्या असतात. त्या बदलणे गरजेचे असते. अशा समजुती अनेकदा नकारात्मक स्वरूपाच्या असतात. आपली विचारसरणी आपण स्वत:च घडवत असल्यामुळे तर्कविसंगत चुकीच्या समजुती टाकून देऊन स्वतःच्या प्रगतीला, विकासाला योग्य, अशी तर्कसंगत विचारसरणी नव्याने घडवणे गरजेचे असते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मास्लोसारखे मानवतावादी संशोधक असे म्हणतात की, मानव हा मूलतः चांगल्या स्वभावाचा प्राणी आहे. त्याच्यात अनेक सुप्त शक्ती, अनेक चांगले गुण असत. त्यांच्या साहाय्याने विकासाच्या दिशेने त्याचे प्रयत्न सुरू असतात. नैसर्गिक प्रेरणा आत्मविकासाकडे नेणाऱ्या असतात. त्यामुळे नकारात्मक प्रेरणा दूर सारून सकारात्मक विचारांची मनात पेरणी करणे गरजेचे असते. अशा वेळी धाडसी अनुभव घेण्यास उत्तेजन देण्यात आले तर भीती कमी होते.

उदा. ज्यांना भाषण देण्याची भीती वाटत असेल तर त्यांना कोणतीही तयारी नसताना, अभ्यास नसताना एखादा विषय देऊन भाषण देण्यास प्रवृत्त केले जाते. अपयश आल्यानंतर आवडीचे खेळ खेळण्यास सांगितले जाते. त्यामुळे अपयशाची धार बोथट होते. धोका पत्करून एखादे धाडसी पाऊल पुढे टाकण्याची हिंमत अंगी येते. असे अनेक धोके पत्करून अनपेक्षितपणे यश मिळते. म्हणूनच ही पद्धत सरळ, रोखठोक, समस्यांना आमनेसामने भिडणारी आणि भीती कमी करणारी आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रा.डॉ. सोपान मोहिते श्री शिवाजी महाविद्यालयाच्या (बार्शी, सोलापूर) मानसशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.

profshmohite@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......