‘शेरनी’ : सर्वांत हिंस्त्र प्राणी कोणता? जंगलातला वाघ की माणूस?
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘शेरनी’चं एक पोस्टर
  • Mon , 21 June 2021
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा शेरनी Sherni विद्या बालन Vidya Balan विजय राज Vijay Raaj नीरज काबी Neeraj Kabi अमित मसुरकर Amit Masurkar

माणसाचा जंगलातील प्राण्यांशी संघर्ष अनेक वर्षे सुरू आहे. पृथ्वीतलावर सर्वांत अलीकडे जन्म झालेल्या माणसाने पृथ्वी काबीज केली आणि जंगलावर म्हणजेच प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करत राहिलाय. हा प्रश्न फक्त एवढ्यावरच संपलेला नाही. शिकारीच्या हव्यासामुळे आणि प्राण्यांची कातडी-नखे-शिंगे यांचा काळाबाजार सुरू झाल्यामुळे अनेक वन्यप्राणी-पक्षी-जलचर पृथ्वीवर दुर्मीळ झाले आहेत. आपण जंगलामध्ये वास्तव्य करण्यास सुरुवात केली आणि जंगली प्राणी आपल्या घरात घुसतात, अशी तक्रार करता करता त्याला आंदोलनाचे स्वरूप दिले. याला खरे तर ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणणे सयुक्तिक होईल. परंतु साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून माणसाने वन्यप्राण्यांना त्यांच्याच जंगलातून बाहेर हुसकून लावण्यास सुरुवात केली. अशाच प्रश्नाच्या अनेक बाजूंचा विचार करायला लावणारा चित्रपट ‘शेरनी’ नुकताच ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला आहे.

वन-अधिकारी विद्या (विद्या बालन) बदली होऊन नव्या ठिकाणी हजर होताच तिला एकेक वास्तव समजू लागते. राजकारणी लोकांचे लागेबांधे असलेले कंत्राटदार, त्या कंत्राटदारांना जाब विचारताच ‘ये सब उन्नीस-बीस तो यहाँ चलता है’ अशी उत्तरे, जंगलाच्या जवळपास वस्तीत राहणारे लोक, त्यांची जंगलात जाण्यामागची कारणे, त्यांच्या पाळीव प्राण्यांची होणारी शिकार आणि जंगलातील ‘वॉटर होल’कडे कंत्राटदारांनी केलेले दुर्लक्ष आणि पाणी/शिकारीच्या शोधात कधी होणारी मनुष्याची शिकार, त्याचे गावपातळीवर होणारे राजकारण, हे सर्व आपण विद्येच्या नजरेतून बघतो.

हे सर्व दाखवताना दिग्दर्शकाने कुठेही ड्रामेबाजी करण्याचे टाळले आहे. माणसाने जंगलात अतिक्रमण केल्यामुळे पाळीव प्राण्यांची आणि माणसाची होणारी शिकार आणि त्यासाठी राजकीय व्यवस्थेने कंत्राटदारांच्या मदतीने शोधलेले उत्तर आपल्याला अस्वस्थ करते. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा मानवी स्वभावाचा अभ्यास करून लिहिल्या आहेत. आयटीमध्ये काम करणारा नवरा सरकारी नोकरी करणाऱ्या बायकोला, कितीही प्रश्न आले तरी नोकरी न सोडण्याचा सल्ला देताना स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, परंतु जंगलातील प्रश्न बायकोने सोडवणे त्याला पसंत नाही. ‘सरकारी पगार घे आणि मजेत रहा. प्रश्न सोडवण्याच्या भानगडीत पडू नकोस’ या सल्ल्यावर पत्नी काय उत्तर देणार? आयटीतल्या करिअरमध्ये किती गहन प्रश्न आहेत, हे सांगतानाच पत्नीच्या करिअरमधील कोणताही प्रश्न त्याला ऐकून घ्यावा असे वाटत नाही. असे प्रत्येक व्यक्तिरेखेचे अनेक कंगोरे दिग्दर्शकाने उत्तमरीत्या दाखवले आहेत.

वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या मिटिंगमध्ये साहेब एकाची ओळख करून देतात ‘ये तितली के एक्स्पर्ट है’. त्यावर हसन नुरानी सांगतो की, ‘सर, तितली नहीं, मॉथ’. मग साहेबांना समजेल अशा भाषेत तो एक्स्पर्ट सांगतो की, त्याला ‘परवाना’ म्हणतात. साहेब मात्र ‘परवाना’ या शब्दावरून एक शेर ऐकवतात. तत्क्षणी मिटिंगमधले वातावरण बदलून गंभीर विषयावर चर्चा होण्याऐवजी गप्पा-टप्पा असे स्वरूप येते. ते सांगताना दिग्दर्शकाने मूळ प्रश्नाचे गांभीर्य कसे निघून जाते, हे अतिशय संयतपणे सांगितले आहे. 

‘शेरनी’ ही कोणत्याही वाघाची किंवा वाघिणीची गोष्ट नाही. दिग्दर्शकाने ‘मनुष्य विरुद्ध जंगलातील प्राणी’ या प्रश्नाच्या निमित्ताने मनुष्य स्वभावाचे एकेक नमुने दाखवले आहेत. दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी ‘न्यूटन’ या चित्रपटात भारतातील निवडणुकीमधील सत्य सांगितले होते. ‘शेरनी’मध्ये त्यांनी जंगलराजमधील सत्याचे अनेक कंगोरे अतिशय संयतपणे सांगितले आहेत. सर्वच पात्रांमधील गुण-दोष दाखवताना नायक-खलनायक, अशी वर्गवारी न करता कोण कसे वागते, याचे चित्रीकरण करून त्यांच्या स्वभावाबद्दल भाष्य टाळून तो निर्णय प्रेक्षकांवर सोडला आहे. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना राजकारण्यांशी कसे जुळवून घ्यावे लागते, राजकारणी व्यवस्थेचा कसा वापर करून घेतात, हे सर्व आपण बघतो पण त्यामध्ये कोणतेही नाट्य नाही. आपण प्रसंग बघून वस्तुस्थिती बघावी आणि आपले अनुमान काढावे, ही दिग्दर्शकाची अपेक्षा आहे. चित्रपटात कुठेच कोणाही पात्राच्या एन्ट्री–एक्झिटला सनसनाटी पार्श्वसंगीत वाजत नाही. एकामागोमाग एक प्रसंग घडतात, सगळेच त्या प्रसंगाना सरावले आहेत, कारण तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. दिग्दर्शकाने फक्त ते प्रसंग आपल्याला तटस्थपणे दाखवले आहेत, हीच या चित्रपटाची सर्वांत जमेची बाजू आहे.  

आस्था टिकू यांनी कथा आणि पटकथा लिहिताना जंगल विभागाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांचे प्रश्न उत्तमरीत्या मांडले आहेत, तसेच वन्य प्राणी न दाखवता त्यांचेही प्रश्न चित्रपटामधून समजावून सांगितले आहेत. असे असले तरीही हा चित्रपट आहे, माहितीपट नाही हे भान राखले आहे.  

राकेश हरिदास यांची सिनेमटोग्राफी उल्लेख करण्याइतकी जाणवत नाही, कारण आपण जंगल जीवन-जंगलात राहून बघतो आहोत, असे वाटत राहते, ही त्यांच्या कॅमेऱ्याची कमाल आहे. विद्या बालनने साकारलेली भूमिका तिच्या उत्कृष्ट अभिनयापैकी एक आहे. जंगलातील प्रश्नांची माहिती घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारी, पण परिस्थितीमुळे निराश होणारी ही वनअधिकारी आपल्याला अस्वस्थ करते. सरकारी बैठकीमध्ये कोणत्याच प्रश्नावर गांभीर्याने चर्चा होत नाही.  अशा प्रसंगी विद्या बालनचा अभिनय बघण्यासारखा आहे. तिच्या प्रतिक्रिया संयमित आहेत, लक्षवेधी नाहीत, तरीही आपल्याला भिडतात. 

विजय राज हा कमालीचा अभिनेता आहे. जंगल-जीवनाची शास्त्रीय माहिती असणारा संशोधक हसन नुरानी बघताना आपल्याला वेगळाच विजयराज दिसतो. नीरज कबी यांनी नोकरीत बढती मिळवण्यासाठी राजकारण्यांना शरण गेलेला नांगिया उत्तमरीत्या साकारला आहे. शरद सक्सेना यांचा शार्प शुटर पिंटू लक्षणीय. बिजेंद्र काला (बन्सल) यांनी कोणत्याही प्रश्नाची माहिती नसणारा वनअधिकारी उत्तमरीत्या उभा केला आहे, पण त्यांच्या वेगाने संवाद बोलण्याच्या लकबीमुळे त्यांचे काही संवाद स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. अनेक वनविभाग अधिकारी जंगलात सरावलेले दिसतात, खरे तर ते अभिनय करत आहेत, असे वाटत नाही इतक्या नैसर्गीकपणे वनविभाग आपल्यासमोर साकारला जातो. 

पर्यावरण की विकास या प्रश्नावर उत्तर शोधताना तथाकथित विकासाचा नेहमी विजय होतो आणि पर्यावरणाचा प्रश्न अधिक गहिरा बनतो. जंगल विभागाजवळ राहणारे लोक आपल्या शेळ्या-मेंढ्या-गायी-म्हशी चरायला घेऊन जातात, त्यावर बंदी आणली तर त्यांनी पाळीव प्राणी कोठे चरायला घेऊन जायचे? त्यासाठी त्या रहिवाश्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन नसेल तर पर्यावरणास अनुकूल असा दुसरा उपाय होऊ शकतो. परंतु कारखाना काढणे पर्यावरणाची हानी कशा पद्धतीने अपायकारक आहे, हे आपल्याला चित्रपटात दिसते. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हा चित्रपट वन्यप्राण्यांसंबंधी असला तरी वाघ कधी एकदा बघायला मिळतो, या अपेक्षेने बघू नये. जंगल वाचनाबद्दल सुशिक्षित होण्यास आपल्याला अजूनही वेळ आहे. जंगल सफारीसाठी गेल्यावर आपण केव्हा एकदा वाघ दिसतो, याची वाट बघतो आणि आजूबाजूचे जंगल, पशु, पक्षी यांना नजरेआड करतो. जंगल सफारी करून आल्यावर सगळेच एकच प्रश्न विचारतात, “वाघ दिसला का?” या प्रश्नाला उत्तर देताना काही वेगळ्या पक्षांची नावे सांगितली तरी तिकडे दुर्लक्ष करून पुन्हा विचारले जाते की, “ते ठीकाय, पण वाघ दिसला का?”

आपल्याला गोष्टीचा ठोस शेवट ऐकण्याची लहानपणापासून सवय झाली आहे, त्यामधून बाहेर पडणे गरजेचे आहे. दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी शेवटी काय झाले, याचा निष्कर्ष प्रेक्षकांवर सोपवला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला माणूस जंगलात वाघाप्रमाणे चालताना दिसतो… 

सर्वांत हिंस्त्र प्राणी कोणता? जंगलातला वाघ की माणूस?

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......