‘ट्रान्सजेंडर इंडिया.कॉम’ : एक ‘आवाज’, एक ‘व्यासपीठ’, एक ‘चळवळ’, एक ‘मिशन’…
पडघम - देशकारण
सतीश बेंडीगिरी
  • ‘ट्रान्सजेंडर इंडिया.कॉम’चे बोधचिन्ह
  • Sat , 19 June 2021
  • पडघम देशकारण ट्रान्सजेंडर इंडिया Transgender India ट्रान्सजेंडर Transgender नेसारा राय Neysara Rai

सोशल मीडिया हे आजच्या जगात एक प्रभावशाली माध्यम असून सामाजिक बदलाचं एक साधन म्हणूनही त्याकडे पाहिलं जात आहे. अनेक विषयांबाबतची जाणीव-जागृती करण्याचं कामही सोशल मीडियावरून होत असल्याचं पाहायला मिळतं.

गेल्या काही वर्षांत अनेक अल्पसंख्याक समुदायासाठी सोशल मीडियाचा एक ‘प्लॅटफॉर्म’ म्हणूनही उपयोग होताना दिसतो आहे. त्यामुळे या समुदायातील लोक तिथे व्यक्त होऊ लागले आहेत. समाजाकडून त्याची दखल घेतली जाऊ लागली आहे.

पण इतर माध्यमांमधून - वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, वेबपोर्टल - अल्पसंख्याक समुदायाच्या प्रश्नांना किती महत्त्व दिलं जातं? बरीच माध्यमं त्यांच्या प्रश्नांना हातही घालत नाहीत. काहीतरी वेगळं घडलं, नवीन समोर आलं तरच त्याविषयीची बातमी या माध्यमांतून समोर येते, एरवी त्यांच्या दृष्टीने हा विषय फारसा दखलपात्र नसतो.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा वापर आपल्या देशात सामाजिक, जातीय आणि धार्मिक वैमनस्यासाठी मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. त्याचबरोबर हेही तितकंच खरं आहे की, अल्पसंख्याक समुदायांनाही सोशल मीडियामुळे ‘आवाज’, ‘व्यासपीठ’ मिळत आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘ट्रान्सजेंडर’ किंवा ‘तृतीयपंथी’ हा असाच एक आपल्याकडचा अल्पसंख्याक समुदाय. त्यांच्यासाठी एक हक्काची ‘स्पेस’ असावी, या विचारातून ‘ट्रान्सजेंडर इंडिया डॉट कॉम’ ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. नावातूनच तिचं वेगळेपण लक्षात येतं. तृतीयपंथी समुदाय हा या वेबसाइटचा केंद्रबिंदू आहे.

प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून किंवा शिकवून घडवला जात नाही. पण तरीही तृतीयपंथी व्यक्तीकडे पाहताना समाजाची नजर ‘वेगळी’ असते. त्यात एक शंका असते. त्यामुळे या व्यक्तींना समाजात वावरताना अनेक मर्यादा येतात. समाजाच्या दबावामुळे बहुतेक जण आपला लिंगभाव लपवून ठेवायचाही प्रयत्न करतात.

भीतीमुळे या समुदायातील लोक स्वतःला उघडपणे व्यक्त करत नाहीत. त्यांना अनेक वेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, कुणाशी मैत्री किंवा ओळख करून घेणे, या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. या व्यक्तींना बऱ्याचदा कुटुंबाची साथ नसते आणि समाजाची तर नसतेच.

मग आपल्यात होणारे बदल काय आहेत? हे काही चुकीचे आहे का? काय करावे? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. त्यांची उत्तरे त्यांच्याकडे नसतात आणि इतरांकडून ती सहजासहजी योग्य प्रकारे मिळतही नाहीत. अशा वेळी त्यांना गरज असते मार्गदर्शनाची... मार्गदर्शकाची.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्यासाठी एक स्वतंत्र माध्यम असणं आवश्यक आहे, जे सामाजिक मान्यता आणि रूढीवादी सिद्धान्तांपलीकडे जाऊन त्यांना मदत करू शकेल. या उद्देशातून ‘ट्रान्सजेंडर इंडिया’ची निर्मिती करण्यात आली. अशा प्रकारची ही भारतातली पहिलीच वेबसाइट आहे. नेसारा राय यांनी ती तयार केली आहे. त्या ॲमस्टरडॅममध्ये राहतात आणि ट्रान्सॲमस्टरडॅमच्या आजीवन प्रतिनिधी आहेत.

मार्च २०२oमध्ये वॉशिंग्टनमधल्या ‘जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’च्या ‘हॉल ऑफ नेशन्स’मध्ये नेसारा यांचा भारताची पहिली ट्रान्स महिला म्हणून सहभाग होता. तिथल्या प्रदर्शनात त्यांनी चितारलेली पेंटिंग्ज ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमाची थीम होती – ‘Vital Voices-100 Women using their Power to Empower’. या कार्यक्रमात सेरेना विल्यम्स, ग्रेटा थनबर्ग, मलाला युसुफजाई यांसारख्या अनेक प्रतिष्ठित महिलांचाही सहभाग होता.

तृतीयपंथी व्यक्तींचे शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती करून देण्यासाठी ही वेबसाईट बनवली असल्याचे नेसारा यांनी म्हटले आहे. या समुदायासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची सविस्तर माहिती मिळावी, जेंडर आयडेंटिटी काय असते, ट्रान्सजेंडर कायदा २०२० काय आहे, लिंगबदल शस्त्रक्रिया कशी करतात, त्याविषयीची न्यायालयीन प्रक्रिया काय असते, ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे, एखादा फॉर्म भरताना मेल-फिमेल असे दोनच पर्याय असतील तर काय करावे, ट्रान्सजेंडर व्यक्तींने पासपोर्ट कसा मिळवावा, समाजात वावरताना काय काळजी घ्यावी, या समाजातील उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्ती, अनेक शहरांत त्यांची असणारी मंडळे, अशी सर्व उपयुक्त माहिती या वेबसाईटवर मिळते.

या समुदायासाठी होत असलेल्या सामाजिक चळवळी, त्यांचे आणि सामान्य जनाचे प्रबोधन यामुळे बदल घडत आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोनही आता बदलत चालला आहे.

अशाच प्रबोधनातून के. प्रीतिका यशिनी पोलीस उपनिरीक्षक बनल्या. या पदासाठी गरजेचा असलेला पोलीस अकादमीचा अभ्यासक्रम त्यांनी जिद्दीने पूर्ण केला. नंतर शारीरिक क्षमता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत यातही प्रावीण्य मिळवले आणि तमिळनाडूमधील धर्मपुरी जिल्ह्यात त्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर नेमणूक झाली.

सत्यश्री शर्मिला या भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील आहेत. त्यांनी तमिळनाडू आणि पाँडेचेरी बार कॉन्सिलमध्ये नोंदणी करत भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील होण्याचा मान मिळवला आहे.

प. बंगाल‌मध्ये उत्तर दिनाजपुर जिल्ह्यात‌ जोईता मंडल या तृतीयपंथी न्यायाधीश आहेत. त्यांचा प्रवास भीक मागण्यापासून ते थेट न्यायाधीश असा झालेला आहे. एकेकाळी ज्या भागात भीक मागितली होती त्याच भागातल्या कोर्टात आज त्या  ‘न्यायाधीश’ आहेत.

नताशा विश्वास हिने भारतातील पहिली ‘ट्रान्स ब्युटी क्वीन’ स्पर्धा जिंकली आहे.

मुंबईच्या आयआयपीएममधून व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी घेतलेल्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी या नावाजलेल्या भरत नाट्यम नृत्यांगना आहेत.

२०१६मध्ये उज्जैन इथे झालेल्या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याचे पहिले महामंडलेश्वर म्हणून मान्यता देण्यात आली.

प. बंगालमधल्या एका महाविद्यालयामध्ये डॉ. मानबी बंदोपाध्याय या पहिल्या तृतीयपंथी प्राचार्या आहेत.

पद्मिनी प्रकाश या तमिळनाडूमधील लोटस चॅनेलवर वृत्तनिवेदिका आहेत.

बारा भाषांवर प्रभुत्व असलेल्या शबनम बानो या मध्य प्रदेश विधानसभेत १९९८ ते २००३ या काळात आमदार होत्या.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नेसारा यांच्या म्हणण्यानुसार ‘ट्रान्सजेंडर इंडिया’ ही वेबसाइट तृतीयपंथी व्यक्तींचे कुटुंब आहे. तिच्या माध्यमातून या समुदायाविषयीची संवेदनशीलता वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे. त्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. सरकार आणि धोरण-निर्मात्यांचे लक्ष या समुदायाच्या समस्यांकडे वेधले जात आहे.

ही वेबसाईट इंग्रजीसह हिंदी, बंगाली, तमीळ, तेलुगु आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये आहे.

नेसारा यांच्या या प्रयत्नांमुळे भारतातील तृतीयपंथीयांसाठी एक नवीन आशा निर्माण झाली आहे. त्यांचे हक्क, अधिकार यांच्याविषयी जाणीव-जागृती व्हायला या वेबसाईटचा नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर इतर समाजघटकांचा या समुदायाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलायला चालना मिळू शकेल, अशी आशा करायला हरकत नाही.

वेबसाईट लिंक :

https://transgenderindia.com/

यू-ट्युब चॅनेल लिंक :

https://www.youtube.com/channel/UCHZhgKxFK1qcQgyQk4NVe2Q

फेसबुक पेज लिंक :

https://www.facebook.com/Transgender-India-224912497891952/

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......