अजूनकाही
तमिळ दिग्दर्शक मारी सेल्वाराज यांचा नवीन चित्रपट ‘कर्णन’ने अनेक स्तरांवर आपल्याला ठाम राहण्यास सांगितले आहे. ही दृश्यमान आणि अदृश्य अशा लढायांची, उलथापालथींची आणि गंभीरपणे प्रवेश करणाऱ्या, खोलवर खचलेल्या ‘पॉवर ब्लॉकस्’च्या उत्कर्षाची कथा आहे.
‘परियेरम पेरुमल’ (२०१८) नंतर मारी सेल्वाराजचा हा दुसरा चित्रपट ९ एप्रिल २०२१ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. धनुष या सुप्रसिद्ध अष्टपैलू अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम’वर १४ मे २०२१ रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तमिळ नसलेल्या इतर दर्शकांचे प्रेम, कौतुक व अपार औत्सुक्य या चित्रपटाला लाभलेय.
हा चित्रपट दक्षिण तमिळनाडूमधील सुपीक पट्ट्यात असलेल्या तिरूनेलवेली या भागात घडतो. तिथे जातीयतेचा लोक प्रतिकार करताहेत, परंतु जातीवर आधारित क्रौर्य पद्धतशीरपणे घडवणारे लोक हिरव्यागार शेतात राहतात. इथे खालच्या जातीच्या लोकांचा समूह असणाऱ्या पोडीयांकुलम गावाला बस स्टॉप हवा आहे, जो आरोग्य सेवा आणि शिक्षणाची सोय निश्चित करू शकेल आणि भौतिक सुविधेच्या विलगतेचा शेवट करेल. हा बस स्टॉप म्हणजे अवलंबून राहणे आणि प्रतिनिधित्व करणे, यातला फरक आहे. म्हणूनच उच्चजातीय लोकांनी त्याचे बांधकाम रोखण्यासाठी सर्व काही केले आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
एका महाकाव्यसदृश्य युद्धाच्या रूपात मारी सेल्वाराज जुन्या पौराणिक कथेतून नवे सृजन घडवतो. तो त्याच्या पात्रांना हिंदू धर्मातील पौराणिक देवदेवतांची नावे देतो. उदाहरणार्थ, ‘कर्णन’ (कर्ण), ‘येमेन’ (यम) आणि ‘द्रौपथी’ (द्रौपदी). ही ‘महाभारत’ या महाकाव्यातील उच्च जातीची पात्रे आहेत. मात्र, चित्रपटात ही पात्रे उच्च जातीच्या आरक्षित पात्रांच्या नावाचा उच्चार अभिमानाने करताना दिसतात. हा अधिक्षेप त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांच्या ‘अहम्’ला आपसूकच विरोध करतो. त्यांना असे वाटते की, अशा दाव्यांचा त्यांना कोणताही हक्क नाही.
‘महाभारता’त कर्ण हा एक क्षत्रिय आहे. त्याचे संगोपन बाहेरच्या पालकांद्वारे झाले आहे. सेल्वाराजच्या ‘कर्णन’ला मात्र अधिमान्यता मिळवण्यासाठी क्षत्रिय असण्याची गरज नाही. त्याचे योद्धा असणे हे जातियतेविरुद्धचा पर्याय सांगणे आहे. ही अशी व्यवस्था आहे की, जी त्याला गुन्हेगार ठरवते आणि त्याचे स्वतःचे लोक, गावकरी त्याच्या कृत्यांना आख्यायिका मानतात. त्याचे गीतांमधून, गाण्यांतून गौरवगान करताना पाहायला मिळतात.
संतोष नारायण यांचे संगीत, गाणी लोकवाद्यांच्या समन्वयातून याच बाबींचा नेमका शोध घेतात. कर्णनच्या उत्पत्तीविषयी, मुळाविषयी असणारे प्रतिज्ञावजा ‘कंदा वारा चोल्लुंगा’ हे गीत असो किंवा आंतरजातीय विवाहाबद्दल गोंधळलेल्या गोड मंजनथीचे ‘मंजनाथी पुराणम्’ असो, ही गाणी म्हणजे एक प्रकारे राजकीय घोषणाच आहेत.
मारी सेल्वाराजने त्याच्या कथानकास लोकदेवतांच्या ‘संस्कृतायझेशन’चा एक आणखी स्तर जोडला आहे. तमिळनाडूतील अनेक लोकदेवतांच्या मूळ कथा जातीय हिंसेच्या आहेत. त्याचे सेल्वाराज अतिशय चातुर्याने अन्वेषण करतो. कर्णनची धाकटी बहीण जवळच्या रुग्णालयात नेण्यापूर्वीच अपस्माराच्या फिट्समुळे रस्त्यावरच मृत्यू पावते. ती गावाची कल्पित ग्रामदेवता, पालकदेवता कट्टू पेची बनते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
हिंसाचाराचे चित्रण केल्याबद्दल या चित्रपटावर टीका झाली आहे. मात्र, धनुषच्या नायकत्वाने एक प्रभावी उत्तरदेखील प्रदान केले आहे. जेव्हा सजग आणि वडीलधारा येमेन (लाल) कर्णनला उच्च जातीतील कपटी मेलुर गावच्या गावकऱ्यांशी सावध आणि संयमाने भिडण्याचा सल्ला देतात, तेव्हा कर्णन प्रत्युत्तर देताना म्हणतो, ‘मी का असे करावे? आपले जीवन आता संपले आहे. आमची नुकतीच सुरुवात आहे. आम्ही जिथे जिथे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, तिथे तिथे ते आमचा मार्ग अडवतात आणि आमचे पंख छाटतात!’
नंतर गावातील दिवस भरत आलेल्या, बसची वाट पाहणाऱ्या गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष करत बस पुढे निघून जाते. परंतु तिचा लहान मुलगा दगड भिरकावून त्या बसची काच फोडतो आणि बस थांबायला भाग पाडतो. यातून मारी सेल्वाराज दर्शवतात की, मानवी जीवनापेक्षा मालमत्तेला महत्त्व देणारी ही व्यवस्था मूलतः तिच्याविरुद्ध लढा देणाऱ्यांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त हिंसक आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
शिवाजी गणेशन अभिनित १९६४ साली प्रदर्शित झालेल्या जुन्या ‘कर्णन’ या चित्रपटाच्या चाहत्यांना या शीर्षकाने भीती वाटली. हे शीर्षक त्यांना खटकले. नामांकित तमिळ अभिनेत्याला समर्पित असणाऱ्या कल्याणकारी संस्थेच्या सदस्यांनी २०२०मध्ये अभिनेता धनुष याला एक पत्र लिहून आपल्या चित्रपटाचे नाव बदलायला सांगितले. एकाच पात्राच्या दोन भिन्न भिन्न आवृत्त्यांची कल्पना करणे अशक्य आहे. एक गोरा, उजळ, सामर्थ्यशाली, तेज:पुंज आणि वजनदार सोन्याचे आभूषण ल्यालेला आणि संस्कृत ‘महाभारता’ला अनुरूप असणारा. आणि दुसरा बारीक शरीरयष्टी असणारा, काळ्या रंगाचा, अंगावर सुंदर आभूषणे नसणारा, दैवी चिलखत नसणारा, अगदी कसलीच जोरकस अनुरूपता नसणारा.
हा मारी सेल्वाराजचा ‘कर्णन’ आहे. तो खरा वाटतो. त्याच्याशी आपण सहानुभूती दर्शवतो. त्याला तुम्ही जिथे जिथे जात नष्ट करण्याचा लढा चाललेला असेल, तिथे तिथे भेटाल!
..................................................................................................................................................................
नानासाहेब गव्हाणे
gavhanenanasahebcritics@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment