मानवी शहाणीवेने आज ओझोन थर जवळजवळ पुनर्स्थापित केला आहे. २०३० पर्यंत हे संकट पूर्ण टळलेले असेल…
ग्रंथनामा - झलक
संतोष शिंत्रे
  • ‘अशाश्वताच्या समशेरीवर’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 05 June 2021
  • ग्रंथनामा झलक जागतिक पर्यावरण दिन World Environment Day ओझोन Ozone पर्यावरणबदल Climate change अशाश्वताच्या समशेरीवर

पर्यावरण पत्रकार संतोष शिंत्रे यांचे ‘अशाश्वताच्या समशेरीवर...’ हे भारतातील हवामानबदल : अपाय आणि उपाय’ यांविषयीचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. आज ‘जागतिक पर्यावरण दिन’. त्यानिमित्ताने या पुस्तकातील हे एक प्रकरण...

..................................................................................................................................................................

आम वाचकांना हवामानबदलाचे गांभीर्य जाणवावे, हा या लेखनाचा मुख्य हेतू. परंतु निव्वळ दचकवणारे, घाबरवणारे लेखन अंतिमतः त्या उद्दिष्टापासून दूरच नेते. आणि मग घडत असलेल्या चांगल्या गोष्टीही दुर्लक्षित राहतात. मानवाने ओझोन थराचा विनाश गेल्या ३२ वर्षांत बर्‍यापैकी रोखला, ही अशीच एक गोष्ट. पण हवामान बदलाचे इतर धोके सांगताना हा विजय काहीसा दुर्लक्षित राहतो. ठरवलं तर माणूस अशा संकटांपासून मुक्ती मिळवू शकतो, हेच यातून दिसतं, म्हणून हा विजय महत्त्वाचा. तो कसा मिळवला, हे मूळ प्रश्नासोबत आपण दोन भागांत जाणून घेऊ.

प्राणवायूच्या नेहमीच्या दोन अणूंनी बनलेल्या रेणू (O2)ऐवजी तीन अणूंनी बनलेला प्राणवायूचा काहीसा अस्थिर रेणू (O3) म्हणजे ओझोन, हे बर्‍याच जणांना आठवत असेल. वातावरणाच्या वरच्या थरातील प्राणवायूची जंबूपार/अतिनील किरणांशी (ultraviolet rays) प्रक्रियेतून त्याची निर्मिती होते आणि तो तिथेच साठून राहतो. सजीवांमधील प्रथिने, न्यूक्लिक आम्ले असे अतिमहत्त्वाचे रेणू हे किरण शोषून घेतात. त्यामुळे ती सजीवांना मारक असतात. ओझोनच्या या थरामुळे सूर्यप्रकाशातील ही किरणे थोपवली जाऊन सजीवसृष्टीचे रक्षण होते. काही विशिष्ट रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे हा थर विरळ होत, नष्ट होत चालला होता, हेही एक मोठे संकट येऊ घातले होते. पण मानवाने वेळीच उपाययोजना करून त्याला बर्‍यापैकी आळा घातला. अर्थात अद्याप सगळा धोका टळलेला नाही. पण परिस्थिती निश्चितच सुधारली आहे, सुधारते आहे.    

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ओझोन थराचे विरळ होणे आणि हवामानबदल हे अनेक प्रकारे एकमेकांशी जोडलेले आहेत, पण ते हवामानबदलाचे मुख्य कारण नाही. वातावरणातील ओझोनचा पृथ्वीच्या तापमान संतुलनावर दोन प्रकारे परिणाम होतो. पहिला परिणाम म्हणजे पृथ्वीलगतच्या वातावरणाच्या ८ ते १६ किमी उंचीच्या सतत हलत्या हवेच्या आवरणामध्ये, म्हणजेच ‘तपांबरा’मध्ये (troposphere) पृथ्वीच्या पृष्ठभागाने परावर्तित केलेली अवरक्त किरणे, म्हणजे सोप्या मराठीत इन्फ्रारेड किरणे असतात. ओझोनचा थर ती शोषून घेऊन तपांबराची उष्णता वाढवतो. आणि तिथून पुढे पृथ्वीलगतच्या वातावरणाच्या ५० किमी उंचीवरील स्थिरांबर (stratosphere) आवरणात तो अतिनील किरणे शोषून त्या आवरणाची उष्णता वाढवतो. त्यामुळे ओझोनमुळे होणारे हवामानातील बदल, हे तो ओझोन किती उंचीवरचा आहे, त्यावरही अवलंबून असतात.

क्लोरीन आणि ब्रोमिन असणार्‍या काही रसायनांचा मानवाने केलेला घातक वापरच तापमानवाढ आणि ओझोन थर विरळ होणे, या दोन्ही घटनांना कारणीभूत ठरला. ही रसायने ओझोनबरोबर संयोग पावून तो नाहीसा करत चालली होती. कृत्रिम थंडावा देणार्‍या अनेक यंत्रांमध्ये मुख्यत्वे ती वापरली जात होती. १९८०मध्ये त्यांच्या वापरावर जागतिक बंदी आली; पण तोपर्यंत जगभरात ९ कोटी मोटारी व ट्रक यांच्या वातानुकूलन यंत्रणांमध्ये १० कोटी फ्रीज, ३ कोटी फ्रीझर्स आणि घरे आणि इतर ४.५ कोटी आस्थापनांमधील वातानुकूलन यंत्रणांमध्ये अशा रसायनांचा वापर झाला होता.

यंत्रणा ही रसायने हवेत आणि अंतिमतः स्थिरावरणात सोडत आणि तिथे ती १०० वर्षांपर्यंत टिकून रहात असल्याने उत्पादन थांबल्यावरही ती  अनेक वर्षे ओझोन विरळ करत राहणारच. खेरीज स्वतः ही रसायने म्हणजेही हरितगृह वायू आहेतच आणि कार्बनच्या प्रत्येक अणूपेक्षा तापमान वाढवण्याची त्यांची क्षमता कित्येक हजार पटींनी जास्त आहे. मानवी शहाणीवेने आज ओझोन थर जवळजवळ पुनर्स्थापित केला आहे. २०३० पर्यंत हे संकट पूर्ण टळलेले असेल.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

पर्यावरणाच्या भल्यासाठी आजवर मानवाने केलेल्या चांगल्या कृतींमधील मुकुटमणी, म्हणजे मोंट्रीयल करार. कारण संयुक्त राष्ट्रसंघाच्या  सर्वच्या सर्व, म्हणजे १९७ सभासद देशांनी तो मान्य करून त्यानुसार प्रभावी कृती केली, असा हा आजवरचा एकमेव करार आहे. त्यामुळे ओझोनविनाशी पदार्थांचे वातावरणातून समग्र उच्चाटन शक्य झाले. इतकी शहाणीव आजवर माणसाने अन्य कोणत्याही बाबतीत दाखवलेली दिसत नाही. या करारामुळे २०५० पर्यंत सदर प्रश्नापासून पृथ्वी मुक्त असेल अशी चिन्हे (निदान आज) दिसत आहेत.

१५ सप्टेंबर १९८७ रोजी हा करार अस्तित्वात आला. मानवनिर्मित सुमारे १०० ओझोनविनाशी रसायनांचे/पदार्थांचे उत्पादन आणि वापर सादर कराराने नियंत्रित झाले. त्यांचे उत्पादन शून्यावर आणणे, हे अर्थात मुख्य उद्दिष्ट होते. आजमितीला हे विनाशी पदार्थ, रसायने यांचे वातावरणाच्या विविध थरातील प्रमाण  १९९०च्या पातळीपेक्षा ९८ टक्क्यांनी कमी झाले आहे. हा करार सर्वांनीच धडपणी अमलात आणला नसता, तर ओझोन थराचा विनाश आजपेक्षा कमीत कमी दसपट झालेला असता. आणि त्यामुळे मेलानोमा, अनेक प्रकारचे कर्करोग आणि मोतीबिंदूंच्या केसेसमध्ये काही कोटींनी वाढ झालेली असती. सुमारे दोन दशलक्ष लोक २०३०पर्यंत त्वचेच्या कर्करोगाने ग्रस्त असते. पण तसे न होता, प्रभावी अंमलबजावणीमुळे उलट १९९० ते २०१० इतक्याच वर्षांत १३५ गिगाटन  कार्बनच्या सममूल्य, इतके हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी झाले, थांबले - म्हणजे प्रतिवर्षी ११ गिगाटनला सममूल्य!

२०१९ मध्ये सदर करारामध्ये एक सुधारणा घडवली गेली. ‘किगाली अमेंडमेंट’. त्यानुसार HFC वापरणार्‍या कूलंट्सच्या वापरावर मर्यादा आल्या. त्यामुळे आणखी १०.५ कोटी टन इतके उत्सर्जन होण्याचे थांबून वर्ष २१००पर्यंत जागतिक तापमान ०.५ सेंटीग्रेड वाढण्याचे थांबण्यासाठी चांगली मदत होईल. म्हणजे प्रथम सीएफसी, नंतर एचसीएफसी, आणि आता एचएफसी (यांच्या नावांची दीर्घरूपे माहिती नसली तरी फार बिघडणार नाही. जिज्ञासूंनी ती नेटवर पहावीत) हे सर्व विनाशकारी कूलंट्स हद्दपार होतील. पॅरिस करारात ठरलेल्या २  डिग्री सेंटीग्रेड तापमानवाढ रोखण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग होईल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सदर करार सर्व-विकसित अथवा विकसनशील-राष्ट्रांवर अशी रसायने, पदार्थ नष्ट करण्याची जबाबदारी समान पद्धतीने टाकतो. त्यांनी ते अमलात आणण्याचे वेळापत्रक त्या त्या राष्ट्राच्या वापरानुसार बदलते ठेवतो. ओझोन विनाशात क्रमांक एकची गुन्हेगार अर्थात अमेरिकाच होती. कारण त्यांच्या चंगळवादी जीवनशैलीत कूलंट्सचा वापर सर्वाधिक होता. पण कशी काय कुणास ठाऊक, अमेरिकेने आपल्या वाट्याची मोंट्रीयल करारातील कामेही अत्यंत निगुतीने, कुणाकडेही बोटे न दाखवता पार पाडली. आता अपेक्षा अशी आहे की, २०३० पर्यंत उत्तर गोलार्ध ओझोन प्रश्नापासून मुक्त झाला असेल. २०५०पर्यंत अन्य भूभाग, ज्यात ध्रुवीय प्रदेशही येतात, ते मुक्त झाले असतील.

सदर करार राबवण्यात भारतानेही खूप महत्त्वपूर्ण भूमिका वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या ओझोन सेलमार्फत बजावली होती. त्यासाठी वेगळी विशेष अधिकार समितीही कार्यरत होती. या ‘ओझोन सेल’ला तिच्या भरीव कार्याबद्दल २००७ मध्ये मोंट्रीयल प्रोटोकॉल इंप्लेमेंटर्स परितोषिकही मिळाले होते. तिचे संचालक डॉक्टर दुरायसामी यांनाही २००८मध्ये स्ट्राटोस्फीयर प्रोटेक्शन अवॉर्ड मिळाले होते. (२०१४ सालच्या आधी अशा काही किरकोळ गोष्टीही घडत असत!)

हवामानबदलाच्या आजवरच्या १७ परिषदांमध्ये हे सामंजस्य एकदाही दिसलेले नाही!

..................................................................................................................................................................

पर्यावरण पत्रकार संतोष शिंत्रे यांचे ‘अशाश्वताच्या समशेरीवर...’ हे भारतातील हवामानबदल : अपाय आणि उपाय’ यांविषयीचे पुस्तक  २५ टक्के सवलतीमध्ये खरेदी करण्यासाठी पहा

https://www.booksnama.com/book/5316/Ashashwatachya-Samsheriwar

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......