‘नोमॅडलँड’ : हा चित्रपट म्हणजे एक भटकंती आहे. प्रवास आहे. त्यामुळे केवळ पाहण्यापेक्षाही तो अधिक अनुभवावा असा आहे
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुरेंद्रनाथ बाबर
  • ‘नोमॅडलँड’चे पोस्टर व त्यातील एक प्रसंग
  • Tue , 01 June 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र नोमॅडलँड Nomadland जेसिका ब्रुडर Jessica Bruder क्लोई झाओ Chloé Zhao फ्रान्सेस मॅकडरमंड Frances McDormand

जेसिका ब्रुडर यांच्या ‘नोमॅडलँड : सर्व्हायव्हिंग अमेरिका इन ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी’ या पुस्तकावर नोव्हेंबर २०२०मध्ये ‘नोमॅडलँड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात डिस्ने हॉट स्टारवर तो उपलब्ध आहे. त्याला २०२०चा उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘अकॅडमी अवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. त्याचे दिग्दर्शन क्लोई झाओ यांनी केले आहे, तर मुख्य अभिनय फ्रान्सेस मॅकडरमंड यांनी केला आहे. या चित्रपटासाठी त्यांनाही उत्कृष्ट अभिनयाचे ‘अकॅडमी अवॉर्ड’ मिळाले आहे. फ्रान्सेस मॅकडरमंड यांचे हे चौथे अकॅडमी अवॉर्ड आहे.

‘नोमॅडलँड’ हा अमेरिकेतील कार (व्हॅन)मध्ये वास्तव करणाऱ्या भटक्या लोकांची अवस्था दाखवणारा चित्रपट आहे. २०११ साली एम्पायर या नेवाडा प्रांतातील शहरामध्ये जिप्समचे खाणकाम बंद पडले. संपूर्ण शहरामधील रहिवाश्यांना आपले घरदार सोडून कामासाठी भटकावे लागले. २०११मध्ये हे शहर पूर्णतः ओसाड पडले. ही सत्य घटना आहे.

या चित्रपटातील मुख्य पात्र ‘फर्न’ ही ६० वर्षांची वृद्ध विधवा महिला आपले एम्पायरमधील घर सोडून व्हॅनमधून भटकू लागते. अ‍ॅमेझॉन कंपनी, हॉटेल्स, मिल्स इत्यादी ठिकाणी रोजंदारीवर काम करू लागते. गाडी कशीबशी रात्री पार्क करून प्रचंड गारठ्यात ती व्हॅनमध्ये राहते. तिचे उजाड झालेले आयुष्य आणि तिची भटकंती, याचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अमेरिकेतील तिच्यासारखेच ‘नवीन भटके’ लोक ऍरिझोनाच्या वाळवंटात एका ठिकाणी शिबिरास एकत्र येत असतात. ही शिबिरे बॉब वेल्स नावाची व्यक्ती आयोजित करत असते. यु-ट्युबच्या माध्यमातूनदेखील तो मार्गदर्शन करत असतो. हिवाळ्यामुळे कुठेही काम मिळत नसल्याने आणि प्रचंड गारठा असल्याने फर्न त्या शिबिराला जाते. बॉबच्या मते ही भांडवली व्यवस्था आपल्याला घोड्याप्रमाणे राबवून घेते आणि वेळ आली की, कुरणाबाहेर फेकून देते. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन एकमेकांची काळजी घ्यायला हवी, एकत्र यायला हवे. या शिबिरात लोक आपापली दुःखे व्यक्त करतात. भटके जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीने जगायला हवे, यावर चर्चा करतात. टायरचे पंक्चर कसे काढावे, गरजेच्या कोणत्या वस्तू जवळ असाव्यात, लपूनछपून गाडी कशी पार्क करावी, एकूणच आपली घाण आपण कशी काढावी, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हे शिबीर आयोजित केलेले असते.

फर्नला शिबिरात डेव्ह नावाचा एक माणूस भेटतो. त्याच्यासोबत तिचा परिचय वाढतो. पण जेव्हा ती डेव्हच्या घरी जाते, तेव्हा तिला त्या सुसज्ज व्यवस्था असणाऱ्या घरात झोप लागत नाही. ती मध्यरात्रीच उठून आपल्या व्हॅनमध्ये जाऊन झोपते आणि सकाळी प्रवासाला निघते. कारण कुणावर अवलंबून राहणे किंवा बळजबरी घर करणे, तिला पसंत नसते. ‘घर’ या शब्दाचा अर्थ तिला पूर्णतः समजलेला असतो.

एका दृश्यामध्ये फर्नला तिची भाची एका शॉपमध्ये भेटते. ती विचारते की, ‘तुला घर नाहीये, असं समजलं.’ त्यावर फर्न म्हणते, ‘मला घर (Home) आहे, पण निवासस्थान (House) नाहीये.’ फर्नच्या या संवादातून ‘घर’ आणि ‘निवास’ या किती विभिन्न संकल्पना आहेत, हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. पुढे पैशांच्या अडचणीपोटी ती बहिणीच्या घरी जाते. तिथे रिअल इस्टेटवर गप्पा सुरू असतात. तेव्हा ती म्हणते, ‘तुम्ही भांडवलदार लोकांना घर नावाची खोटी अपेक्षा दाखवून कर्जबाजारी करता.’

एकूणच भांडवली व्यवस्थेवरील तिची नाराजी आणि किमान गरजा यासंबंधीचे तिचे मत अतिशय महत्त्वाचे वाटते. नाईलाजास्तव आलेले ‘नो मॅड’ जीवन तिला कशा पद्धतीने सवयीचे होते आणि परावलंबी न राहता नवीन स्वातंत्र्याचा ती कशा पद्धतीने स्वीकार करते, हे या चित्रपटात प्रभावीपणे मांडले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

हा चित्रपट अमेरिकेतील भटक्या लोकांचे आयुष्य पडद्यावर आणतो. बेरोजगारी, मंदी, वृद्धांची पेन्शनची समस्या, उदध्वस्त झालेली कुटुंब व्यवस्था, अशा अनेक समस्या अमेरिकेतील दुर्लक्षित भागांत आहेत. ज्या परिस्थितीकडे अमेरिकन व्यवस्थेने कधीही पाहिलेले नाही. ‘नो मॅड लँड’च्या माध्यमातून एका वेगळ्या अमेरिकेचे चित्र समोर आले आहे.

‘नो मॅड’ जगण्यात असलेल्या स्वातंत्र्यामुळे ते किती समृद्ध आहे, असे म्हणणे म्हणजे दारिद्र्याचे उदात्तीकरण करणे होय, अशी टीका या चित्रपटावर/कादंबरीवर केली गेली. तरीही भांडवली महासत्ता असणाऱ्या अमेरिकेतील हे ‘नो मॅड’ दृश्य नजरेआड करता येणार नाही. पूर्वी अमेरिकेतील लोक ‘नो मॅड’ आयुष्यच जगत होते आणि फर्न ही एकप्रकारे अमेरिकन परंपरा चालवत आहे, असे तिची बहीण एकदा म्हणते.

पण अलीकडच्या भांडवली व्यवस्थेच्या काळात लोकांना नाईलाजास्तव ‘नो मॅड’ व्हावे लागते आहे, ही फार वेगळी बाब आहे. त्यामुळे हा चित्रपट एकीकडे ‘नो मॅड’ आयुष्य दाखवत असताना भांडवली व्यवस्थेवरदेखील प्रश्नचिन्ह उभे करतो. त्यामुळे पूर्वीचे ‘नो मॅड’ जगणे आणि २१व्या शतकातील दुष्ट व्यवस्थेमुळे पदरी पडलेले ‘नो मॅड’ जगणे, यातील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. याला आपण ‘आधुनिक नो मॅड’देखील म्हणू शकतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘अकॅडमी अवॉर्ड’मध्ये नेहमी भांडवली व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या आणि अमेरिकन (पाश्चिमात्य) मूल्यव्यवस्था कशी श्रेष्ठ आहे, हे दाखवणाऱ्या चित्रपटांनाच सन्मान मिळतो, असे आरोप नेहमीच होत आले आहेत. पण २०१५चा ‘अकॅडमी अवॉर्ड’ विजेता ‘स्पॉटलाईट’ अमेरिकेतील बोस्टन शहरातील चर्चमधील फादर लहान मुलांचे शारीरिक शोषण कसे करतात, यावर आधारलेला चित्रपट होता. आणि २०२०मधील ‘नोमॅडलँड’ हा याच अमेरिकेतील ‘नो मॅड’ लोकांच्या आयुष्यावरील आधारलेला आहे. या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या पुरस्कारांमुळे ‘अकॅडमी अवॉर्ड’ची विश्वासार्हता वाढली आहे, असे वाटते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय करणाऱ्या दोघीही महिला असल्या तरी तो काही स्त्रीवादी नाही, पण त्याची कथा एका स्त्रीच्या नजरेतून मांडल्यामुळे विषयाची व्याप्ती निश्चितच वाढते. चित्रपटाची पटकथा वेगवान नाही, तसेच त्यात प्रेक्षकांना चकित करणारी दृश्येदेखील नाहीत.

हा चित्रपट म्हणजे एक भटकंती आहे. प्रवास आहे. त्यामुळे केवळ पाहण्यापेक्षाही तो अधिक अनुभवावा असा आहे.

..................................................................................................................................................................

लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.

advbaabar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......