देवळाला वाहिलेले गुलाम आणि आदेश काढणारे राजकीय नेते व संघटना
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 01 June 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध हायरड्युल Hierodule इप्सी डिक्सिटिस्ट Ipse-Dixitist लॅन्याप Lagniappe

शब्दांचे वेध : पुष्प छत्तिसावे

आजचे शब्द आहेत – ‘हायरड्युल’ किंवा ‘हायरोड्युल’ (hierodule) म्हणजेच देवाचा दास किंवा देवळाला वाहिलेला गुलाम आणि ‘इप्सी डिक्सिटिस्ट’ (ipse-dixitist).

‘हायरड्युल’ हा एक फारच अप्रचलित शब्द आहे. प्राचीन काळी ग्रीस, इजिप्त आणि अन्य काही देशांमध्ये काही व्यक्तींना तेथील देवळांमध्ये राहून देवाची आजन्म सेवा करण्यासाठी निवडलं जात असे. ही वेगळ्या प्रकारची गुलामगिरी असे. या अशा देवाच्या गुलामांना ‘हायरड्युल’ (hierodule) या नावानं संबोधलं जायचं. हे वाचल्या क्षणी तुम्हाला आपल्याकडच्या देवदासींची आठवण आली असल्यास नवल नाही!

आधी या शब्दाची शब्दकोशातली व्याख्या बघू या - hierodule [hye-er-uh-d(y)ool] a slave who lives in a temple and is dedicated to the service of a god किंवा a prostitute or enslaved person who is in the service of a temple (as in ancient Greece).

प्राचीन ग्रीस देशात आणि त्याला लागून असलेल्या पूर्वीच्या आनाटोलिया किंवा एशिया मायनर म्हणजेच आजच्या टर्की (तुर्कस्तान) या प्रांतात ही प्रथा हजारो वर्षं प्रचलित होती. तिथल्या एखाद्या विशिष्ट देवतेच्या सेवेसाठी ज्यांना जीवनभर एखाद्या देवळात रहावं लागत होतं, असे हजारो दास किंवा गुलाम तेव्हा तिथे होते. एवढंच नाही, तर ग्रीसमधल्या अशा अनेक दास-दासींना धर्मगुरूंच्या आदेशावरून वेश्यावृत्ती पण करावी लागत होती. या सर्वांना ‘हायरड्युल’ या नावानं ओळखलं जात असे. धार्मिक कारणासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी इंग्रजीमध्ये ‘हायरड्युल’ हा शब्द १८३५मध्ये पहिल्यांदा वापरण्यात आला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हा मुळात ग्रीक शब्द असून तिथून तो लॅटिन भाषेच्या माध्यमातून इंग्रजीत शिरला. ग्रीकमध्ये ‘हायरो’ (Hiero) या धातूचा अर्थ ‘पवित्र’ (holy) असा होतो. या धातूपासून तयार झालेले अन्य शब्द असे आहेत – ‘हायरोमॉनर्क’ (hieromonarch) किंवा ‘a monk who is also a priest’ (धर्मगुरू असलेला संन्यासी), ‘हायरोनेमन’ (hieromnemon) किंवा ‘a sacred recorder’ (पवित्र वचनांची, लेखांची, भाषणांची, साहित्याची लेखी नोंद ठेवणारा लेखनिक), ‘हायरोग्राफी’ (hierography) किंवा ‘the description of religions’ (विविध धर्मांचं वर्णन किंवा त्यांच्याविषयीची लेखी चर्चा आणि ‘हायरोफोबिया’ (hierophobia) किंवा ‘fear of sacred things’ (पवित्र गोष्टींची, वस्तूंची भिती), इत्यादी.

याच ‘हायरो’/‘हायरॉस’ (ἱερός) शब्दाला ‘डूलॉस’ (δοῦλος) म्हणजे ‘गुलाम’ (slave) हा शब्द जोडून ‘hieródoulos’ हा शब्द तयार करण्यात आला. याचंच पुढे ‘hierodule’ असं रूपांतर झालं. यात ‘hieron’ म्हणजे देऊळ किंवा पवित्र देवालय असा अर्थ आहे.

‘हायरो’ (Hiero) या धातूपासून तयार झालेला सगळ्यात प्रसिद्ध शब्द आहे ‘हायरोग्लिफ’ (hieroglyph). ग्रीक भाषेत ‘कोरणे’ (कोरीव काम करणे) याला ‘γλύφω’, ‘ग्लायफो’ असा शब्द आहे.  तो ‘हायरो’ला जोडून ‘हायरोग्लिफ’ बनला- पवित्र कोरीव काम.

अत्यंत प्राचीन काळी इजिप्त देशात लिखाण करण्याची जी लिपी अस्तित्वात होती, तिला ‘इजिप्तशियन हायरोग्लिफ्स’ असं म्हटलं जातं. यात सुमारे एक हजार वेगवेगळी चित्ररूपी चिन्हं (पिक्टोग्राम) होती. धार्मिक म्हणजेच पवित्र लिखाण पपायरस किंवा भूर्जपत्रांवर ही चिन्हं वळणदार म्हणजेच कर्सिव्ह शैलीत वापरून केलं जाई, तर अन्यत्र दगडांवर किंवा भिंतींवर ही चिन्हं कोरून मजकूर लिहिला जात असे. याच ‘हायरोग्लिफिक’ (hieroglyphic) लिपीतून कालांतरानं फिनिशियन, ग्रीक, आरामाईक, लॅटिन, अरेबिक, ब्राह्मी आणि सिरिलिक (रशियन) लिप्यांचा जन्म झाला.

थोडक्यात ही हायरोग्लिफिक लिपी आधुनिक जगातल्या बहुतेक सर्व लिप्यांची पणजी, आजी किंवा आई आहे!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘ग्लिफ’ म्हणजे त्या विशिष्ट कोरीव चिन्हांना टॉलेमीच्या काळापासून पवित्र मानलं गेलं आहे.  ग्रीक लोक त्यांना ‘τὰ ἱερογλυφικὰ [γράμματα] (tà hieroglyphikà [grámmata])’ असं म्हणत, तर इजिप्तचे लोक याच चिन्हांना ‘mdw.w-nṯr’ म्हणजे ‘god's words’ (देवाचे शब्द) असं म्हणत. ही चिन्हं कोरणं हे फार कौशल्याचं काम होतं आणि त्यामुळे कसबी कारागीरच ते करू शकत असत. इंग्रजीत ‘हायरोग्लिफ्स’/‘हायरोग्लिफिक’ हे शब्द सुमारे १५८०च्या आसपास पहिल्यांदा वापरात आले.

मध्यपूर्वेतले किंवा पश्चिम एशिया खंडातले देश आणि त्यांना लागून असलेला युरोप आणि अफ्रिका खंडांचा भाग यांची भौगोलिक रचना लक्षात घेतली, तर ग्रीक, रोमन, इजिप्ट्शियन, पर्शियन या सगळ्या संस्कृती प्राचीन काळापासून कशा एकमेकांशी जोडलेल्या होत्या आणि एकमेकांवर अवलंबून होत्या, याचं एक उदाहरण म्हणजे हा भाषिक विकास आहे.

इजिप्तमधले बरेच ‘हायरड्युल’ म्हणजे ‘देवदास’ स्वतःहून, स्वखुशीनं त्यांच्या देवाचं आजन्म दास्यत्व पत्करायला तयार असत. ‘टेब्त्युनिस’ (Tebtunis) या इजिप्तमधल्या एका जुन्या गावात उत्खननाच्या वेळी या अर्थाचा सुमारे २२०० वर्षं जुना एक लेखी करार संशोधकांना सापडला. त्यानुसार हे देवभक्त लोक नुसतीच गुलामगिरी करत असं नाही, तर हे सौभाग्य त्यांना प्राप्त व्हावं म्हणून ते स्वतःच्या खिशातून दर महिन्याला काही ठराविक रक्कमही दास्यत्व-शुल्क म्हणून त्या देवाला देत असत. काही ठिकाणी मात्र असे दास बळजबरीनं तयार केले जात असत.

ग्रीस देशात प्राचीन काळी गुलामगिरीची प्रथा होती आणि अ‌ॅरिस्टॉटलसारख्या काही मातब्बर विचारवंतांनी या प्रथेला सामाजिक हितासाठी आवश्यक मानलं होतं. अनेक वर्षं ही परंपरा सुरू होती. गुलामांची मुलं आपोआपच गुलामगिरीत येत. त्याशिवाय युद्धकैद्यांना गुलाम बनवण्याचीही तिथे पद्धत होती. यातल्याच अनेकांना ‘देवदास’ बनवलं जात असे.

याचाच अनुषंगिक भाग म्हणजे त्या वेळी तिथल्या मंदिरांमध्ये खुलेआम वेश्याव्यवसायही केला जात असे. (हे सर्व ख्रिस्ती धर्माच्या आगमनापूर्वी आणि प्रसारापूर्वी घडलेलं आहे, हे लक्षात घ्या.) तिथल्या अनेक गुलाम महिलांकडून एक तर सशुल्क किंवा काही वेळा फुकट देहव्यापार करून घेतला जात असे. पैशांच्या मोबदल्यात केलेल्या अशा संभोगाला ‘Sacred prostitution’, ‘temple prostitution’, ‘cult prostitution’ आणि ‘religious prostitution’ म्हटलं जाई; तर विनामूल्य शरीरसंबंधाला ‘sacred sex’ अशी संज्ञा होती. यातल्या काही स्त्रियांचं देवळातल्या मूर्तीशी लग्न लावून दिलं जात असे.

भारतात, विशेषतः दक्षिण भारतात, जी देवदासी पद्धत प्रचलित होती, तिचं थोड्याफार फरकानं या प्राचीन ग्रीक परंपरेशी साम्य दिसून येतं, हे उल्लेखनीय आहे.

हेन्री यूल यांच्या ‘हॉबसन जॉबसन’ या शब्दकोशातली ही प्रविष्टी बघा - DANCING-GIRL , s. This, or among the older Anglo-Indians, Dancing-Wench, was the representative of the (Portuguese Bailadeira) Bayadère, or Nautch-girl (q.v.), also Cunchunee. In S. India dancing-girls are all Hindus, [and known as Devadāsī or Bhogam-dāsī;] in N. India they are both Hindu, called Rāmjanī (see RUM-JOHNNY), and Mussulman, called Kanchanī (see CUNCHUNEE). In Dutch the phrase takes a very plainspoken form, see quotation from Valentijn; [others are equally explicit, e.g.

Sir T. Roe (Hak. Soc. i. 145) and P. della Valle, ii. 282.]

यातला ‘Bhogam-dāsī’ हा शब्द महत्त्वाचा आहे.

‘Cunchunee’ हे कंचनीचं जुन्या काळी केलं जाणारं इंग्रजी स्पेलिंग आहे. (कविवर्य ना. घ. देशपांडे यांचं ‘कंचनीमहाल’ हे दीर्घकाव्य आठवलं का?)

मोल्सवर्थ आपल्या मराठी-इंग्रजी शब्दकोशात देवदासी म्हणजे ‘A female dancer and courtesan attached to a temple’ असं सांगतो.

दात्यांच्या ‘महाराष्ट्र शब्दकोशा’तल्या या प्रविष्टी बघा -

भावीण —स्त्री. १ देवीच्या सेवेला जिणें वाहून घेतलें आहे अशी स्त्री; मुरळी; देवदासी. या वर्गांतील पुरुषांना देवळी म्हणतात. २ नायकीण; वेश्या.

मुरळी —स्त्री. खंडोबाला वाहिलेली स्त्री; भक्तीण; देवदासी. [सं. मैराल = मल्लारि (खंडोबा) मैराली (स्त्री.) = मुरळी; का. मरळी]

रावळी —स्त्री. देवदासी; देवळी

सुळी —स्त्री. (तंजावर) देवदासी; कलावंतीण; नायकीण. [का. सूळे = वेश्या; देवदासी].

थोडक्यात काय, मुरळी म्हणा, भावीण म्हणा किंवा देवदासी – त्यांचा आणि जुन्या ग्रीसमधल्या स्त्री हायरड्युलचा जीवनप्रवास समांतर मार्गांनी होत होता, हे दिसून येतं. पळसाला पानं तीनच, दुसरं काय!

आता आजचा ‘लॅन्याप’ (lagniappe) उर्फ पस्तुरी -

‘आहे हे असं आहे, भाऊ. मी सांगतो ना, मग ते तसंच बरोबर आहे. नो आर्ग्युमेंट’, हे किंवा अशा अर्थाचं एखादं वाक्य तुम्ही कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल. एखादा साहेब, पत्रकार, न्यायाधीश, वकील, राजकारणी नेता, अगदी विचारवंत आणि तत्त्वज्ञसुद्धा काही वेळा हटखोरपणे वागतात. एखाद्या विषयाबद्दल त्यांनी जे मत मांडलेलं असतं, जी भूमिका घेतलेली असते, तिच्यात ते पुढे तसूभरही बदल करायला तयार होत नाहीत. आपल्या मताच्या विरुद्ध दुसरं मत असू शकेल, आपलं मत चुकीचं असू शकेल, हे त्यांना पटतच नाही. मी म्हणतो तेच ‘ब्रह्मवाक्य’ हा त्यांचा खाक्या असतो. आपल्या प्रतिपादनाला आधार नाही, असला तरी तो कमकुवत आहे, हे लक्षात न घेता जे आपल्या मताचा आग्रह धरतात आणि आपणच कसं बरोबर हे समोरच्याला पटवून देतात, अशा लोकांसाठी एक छान शब्द आहे – ‘इप्सी डिक्सिटिस्ट’ (Ipse dixit).

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या लॅटिन शब्दप्रयोगाचा साधा, सरळ अर्थ म्हणजे ‘he said it himself’. म्हणजेच -  ‘आहे हे असं आहे.’ सिसेरो नावाच्या प्रख्यात रोमन वक्त्यानं आणि तत्त्वज्ञानं ‘autòs épha’ या ग्रीक शब्दप्रयोगाचं केलेलं हे लॅटिन रूपांतर आहे. सबळ पुरावा नसताना बोलणाऱ्या, तर्काच्या कसोटीवर खऱ्या न ठरणाऱ्या विधानांना बिनधास्तपणे समोरच्याच्या गळ्यात उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हे दोन शब्दप्रयोग केले जातात.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध विचारवंत जेरेमी बेंथम यानं यावरून ‘ipse-dixitism’ असा एक नवा शब्दप्रयोग वापरात आणला. (त्याच्या मते) जनहिताच्या नसलेल्या योजनांचं आणि विचारांचं तो ‘ipse-dixitism’ असं वर्णन करू लागला. अर्थातच ‘ipse-dixitism’चे चाहते किंवा अनुयायी म्हणजेच ‘ipse-dixitist’.

आजच्या काळात ‘एक्स कथिड्रा’ घोषणा करणाऱ्या किंवा आदेश काढणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी आणि संघटनांसाठी हा शब्दप्रयोग केला जातो.

(‘एक्स कथिड्रा’ या शब्दप्रयोगावरचं भाष्य वाचण्यासाठी या दुव्याला भेट द्या -  https://www.aksharnama.com/client/article_detail/5104 )

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......