अजूनकाही
तीन पिढ्यांचा साहित्य-परंपरेचा वारसा चालवणाऱ्या अशोक देवदत्त टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज समाप्ती होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख...
..................................................................................................................................................................
ना. वा. टिळक, लक्ष्मीबाई टिळक, देवदत्त टिळक, अशोकदेव टिळक, धृव टिळक आणि मुक्ता टिळक या सहा टिळकांनी एकूण १३२ पुस्तके लिहिली आणि मराठी साहित्यात व मराठी ख्रिस्ती साहित्यात स्वत:ची एक परंपरा आणि ओळख निर्माण केली. या परंपरेत काव्य, नाट्य, चरित्र, आत्मचरित्र, धर्म, ख्रिस्ती धर्मियांचे भारतीयत्व इत्यादी विषयांचे प्रतिबिंब पडलेले दिसते.
ना. वा. टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या साहित्यातूनच नव्हे तर त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातून पदोपदी खिस्तदर्शन घडते. त्यांनी कळत-नकळत त्यांच्या साहित्यातून आणि जगण्यातून भारतीय ख्रिस्ती ईश्वरविज्ञान विकसित केले आहे.
देवदत्त टिळकांनी त्यांच्या आईवडिलांचा वारसा पुढे चालवला आणि त्यानंतर त्यांचे पुत्र असलेले चवथे टिळक अशोकदेव यांनी तो वारसा केवळ जपलाच नाही, तर टिळकांचे ख्रिस्ती असणे म्हणजे नेमके काय हे त्यांच्या संशोधक साहित्यातून जगाला सांगितले.
‘अप्पा टिळक’ म्हणजे अशोक देवदत्त टिळक यांचा जन्म २९ मे १९२१ रोजी झाला. त्यांनी मराठी आणि संस्कृत भाषेतून एम.ए.ची आणि अध्यापनशास्त्राची पदवी प्राप्त केल्यानंतर शिक्षकी पेशा पत्करला. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘अशोकदेवी’ १९४२मध्ये प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाला ग.त्र्यं माडखोलकरांची प्रस्तावना होती. त्यानंतर त्यांचे ‘लहरी’, ‘रुप्यांची झालर’, ‘कविता’, ‘जय जय येशों’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. १९७ मध्ये त्यांनी ‘सप्रेम भेट’ हे कुमार वाड्मय प्रकाशित केले. ‘विषय आजचा’, ‘असे केले तर?’ आणि ‘मित्रहो’ ही वैचारिक पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली. नारायण वामन टिळक यांचे अभिनव चरित्रदर्शन असलेले ‘जरा वेगळा अँगल’ हा समीक्षापर ग्रंथ, तसेच ‘सावल्या’, ‘प्रौढांचे भाऊ तरुणांचे बाबा- मुलांचे आजोबा’, ‘त्यांची कन्या शांतीसदन’ आणि ‘चवैतुहि’ हे ललितगद्यही त्यांनी लिहिले. ‘अभंगाजलि’, ‘खिस्तायण अ.९’, ‘टिळकांची कविता’. ‘स्मृतिचित्रे अभिनव आवृत्ती’, ‘देवदत्तांची कविता’, ‘विश्रब्ध शारदा खुर्द’ या पुस्तकाचे संपादन टिळक यांनी केले.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
२०००मध्ये अप्पांची नारायण वामन टिळक यांच्या व्यक्तिमत्वावर शोधप्रकाश टाकणारी ‘चालता बोलता चमत्कार’ ही प्रदीर्घ चरित्रात्मक कादंबरी प्रकाशित झाली. नारायण वामन टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू या कादंबरीतून उजेडात आले. २००६ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे ‘टक्करमाळ’ हे पुस्तक गाजले. या पुस्तकातून त्यांनी टिळक दाम्पत्याशी गेल्या शतकभराच्या जो इतिहास जोडला गेला आहे त्याचा आलेख मांडलेला आहे.
अप्पा टिळक आपल्या दर वाढदिवसाला एक पुस्तक प्रकाशित करत असत. नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित तिसाव्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. तसेच नाशिक येथे भरलेल्या खिस्ती साहित्य संमेलनाचेही ते उद्घाटक होते. शालेय जीवनापासून हुशार म्हणून प्रसिद्ध असलेले अप्पा टिळक वादपटू होते.
आम्ही १९६७ ते ७० नाशिकला असताना त्यांच्या भेटी नियमित होत. त्यानंतरही नाशिकला जाणे झाले की, त्यांच्या घराची घंटी वाजवल्याशिवाय चैन पडत नसे. त्यांचा स्वभाव मिस्कील होता. तथापि त्यांच्या मिस्किलीत बालिश खोडकरपणा होता. त्यात विखार व खवचटपणा तिळमात्र नसे. शुभ्र दाढी हाताने कुरवाळत त्यांनी केलेली मिष्किली ऐकणे आणि बघणे हाही संस्मरणीय अनुभव असायचा. त्यांच्या पत्नीचे नांव ‘माया’ आणि मुलीचे नाव ‘मुक्ता’. त्यावर त्यांची टिपणी असायची ‘मी मायेतून मुक्त झालो’!
ते बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि डोळ्यात लकाकणारे भाव बघण्यासारखे असत. मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवणे हा त्यांचा एक आवडता छंद होता. माझ्या वाढदिवशी त्यांचे शुभेच्छेचे पोस्टकार्ड येऊन धडकायचे.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
ते हयात असते तर आज त्यांनी वयाचे शतक पूर्ण करून १०१व्या वर्षात पदार्पण केले असते. लेखक, प्रकाशक, मुद्रक, समीक्षक, संशोधक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ना. वा. टिळक व लक्ष्मीबाई टिळक यांचे नातू दे. ना. टिळक यांचे पुत्र या पलीकडे त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ते नाहीत, तरी त्यांच्या स्मृती आहेत. त्या जागवल्या पाहिजेत. त्यांना उजाळा दिला पाहिजे.
आज अप्पा असते तर १००व्या वाढदिवसाचा केक कापल्यावर म्हणाले असते, ‘अनिलराव, आज मी शतकाधिपति झालो!’ आणि केकचा कापलेला तुकडा हसत हसत तोंडात टाकला असता…
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा
(रेवरंड ना. वा.) टिळकांच्या चार पिढ्यांशी जुळलेले मैत्र! - हर्षवर्धन निमखेडकर
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment