जुनाट, पुराणमतवादी विचारसरणी असलेले अवैज्ञानिक लोक खरोखरच देशातील जनतेची जीवघेण्या करोनातून मुक्तता करू शकतील काय, याबद्दल रास्त शंका उपस्थित होतात
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत, त्रिवेंद्र सिंह रावत, तिरथ सिंह रावत, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, राजीव कुमार आशीष आणि स्वामी चक्रपाणि महाराज
  • Thu , 20 May 2021
  • पडघम देशकारण कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus

सध्या धुमाकूळ घालत असलेल्या करोना महामारीशी संघर्ष करण्याचा जगभर विविध पातळ्यांवर प्रयत्न चालू आहे. त्यासाठी जगभरातील संशोधन संस्था, विद्यापीठे व त्यांच्या प्रयोगशाळा या विषाणूच्या विविध प्रकारांवर, त्याने स्वत:मध्ये घडवून आणलेल्या बदलांवर संशोधन करत आहेत. इंजेक्शनद्वारे शरीरात घ्यावयाच्या वेगवेगळ्या व्हॅक्सिन किंवा मग नाकाद्वारे घ्यावयाचे द्रव यावरही संशोधन चालू आहे. जगभर असे संशोधन चालू असताना आणि त्याला बर्‍यापैकी यश येत असताना आपल्या देशात मात्र या करोना महामारीशी मुकाबला करण्याची ज्याच्यावर जबाबदारी आहे, त्या केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचे खासदार, मंत्री व इतरही (बे)जबाबदार नेते आणि इतर राज्यांतील त्यांचे विविध आमदार पूर्णपणे अवैज्ञानिक पद्धतीने या महामारीवर मात करण्यासाठी काही अघोरी उपाययोजना सुचवत आहेत.

काही जण तर प्रत्यक्षात तसा व्यवहारही करत आहेत. स्वतःच्या अंगाला शेणाचे लेप लावून करोना विषाणूपासून बचाव करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आधीच बऱ्यापैकी अशिक्षित असलेली भारतीय जनता अशा वक्तव्याला व व्यवहाराला बळी पडते आहे. परिणामी करोनापासून मुक्त होण्याच्या किंवा त्याची साखळी तोडण्याच्या प्रयत्नात एक प्रकारचा अडथळा निर्माण होत आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

नुकतेच भाजपच्या एक खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ‘मी रोज गोमुत्राचे प्राशन करत असल्यामुळे मला करोना झालेला नाही, होणारही नाही, कारण गोमूत्र हे अमृततुल्य असते’ असे वक्तव्य केले आहे. अशी बिनबुडाची वक्तव्ये त्यांनी आत्ताच केली आहेत असे नाही, यापूर्वीसुद्धा ‘मला कॅन्सर झाला होता, पण गोमूत्र सेवनामुळे तसेच गाईच्या पार्श्वभागाचे नियमितपणे दर्शन घेतल्यामुळे माझा कॅन्सर बरा झाला’ असे त्या पत्रकारांना व इतरही जनसमूहांना जाहीरपणे सांगत असत.

त्यांच्याच विचारसरणीच्या असलेल्या मित्र संघटनांकडून मागच्या वर्षी अशा गोमूत्राच्या पार्ट्या आयोजित करण्यात आल्या होत्या. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणि महाराज आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव कुमार आशीष यांनी अशा पार्ट्या देशाची राजधानी दिल्लीतही आयोजित केल्या होत्या. त्याची जाहीरपणे पोस्टर्स काढून त्यांचा प्रसारही केला होता. त्या पार्टीचे व्हिडिओ शूटिंग करून तेही सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केले होते.

आता तर करोनावर निघालेले वॅक्सिन लोकांनी घेऊ नये म्हणून त्यामध्ये गाईचे रक्त मिसळले असल्याचा अपप्रचारही करण्यात येत आहे. तशा अर्थाचे निवेदन त्यांनी राष्ट्रपतींनाही पाठवले आहे.

भाजपशासित उत्तराखंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी ज्या कुंभमेळ्यातून देशाच्या विविध भागांत करोनाचा प्रसार होण्यास हातभार लागला, त्या कुंभमेळ्याला विरोध करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून ‘गंगेत स्नान केल्यानंतर गंगेच्या पवित्र जलाने करोना नष्ट होतो’ असे विधान केले होते. प्रत्यक्षात या कुंभमेळ्यात गंगास्नान केल्याने करोनाचा किती प्रसार झाला आणि त्याने किती बळी घेतले आहेत, हेच आता त्या गंगेतून हजारोच्या संख्येने वाहत असलेल्या, कुजलेल्या, फुगलेल्या प्रेतातून दिसून येत आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तर त्याच राज्याचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी तर ‘करोना हाही एक प्राणीच असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे’ असे वक्तव्य केले आहे. सर्व प्राणीमात्रांवर दया करणारी ही ढोंगी विचारसरणी माणसं मृत्युमुखी पडत आहेत, हे मात्र निश्चलपणे पाहत बसलीये.

अशी अवैज्ञानिक वक्तव्ये केवळ आमदार, खासदार किंवा मंत्रीच करतात असे नव्हे, तर खुद्द आपल्या देशाचे पंतप्रधानसुद्धा अशी वक्तव्ये करण्यात माहीर आहेत. यापूर्वी दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले होते की, ‘शरीरावर सर्जरी करून दुसऱ्यांचे पार्ट इम्प्लान्ट करण्याची सोय आमच्या देशात वैदिक काळापासूनच होती’. त्याचबरोबर पाकिस्तानवर हल्ला करत असताना आपल्या वैमानिकांना त्यांनी ‘शत्रू देशाच्या रडारपासून वाचण्यासाठी ढगांच्या वरून विमानाचे उड्डाण करा, म्हणजे तुम्ही त्यांच्या रडारपासून वाचू शकाल’ असे वक्तव्य केले होते. हे पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. नाल्याच्या गॅसमधून चहा बनवण्याच्या वक्तव्याने तर सर्वत्र त्यांचे सर्वत्र हसू झाले आहे.

भारत बायोटेक या आपल्या देशातील संस्थेने फक्त एका व्हॅक्सिनचा शोध लावलेला आहे. दुसरी व्हॅक्सिन अदर पूनावाला यांची सिरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे. तो त्यांनी लावलेला शोध नसून इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ते संशोधन आहे. सिरम इन्स्टिट्यूटशी झालेल्या करारानुसार ते फक्त त्या व्हॅक्सिनचे उत्पादन करत आहेत. असे असतानाही आपल्या पंतप्रधानांनी दाओसच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत भारताने दोन व्हॅक्सिनचा शोध लावल्याची थाप मारली होती. त्याचबरोबर भारताचे पारंपरिक आयुर्वेदिक औषधी मनुष्याची रोग प्रतिकारशक्ती वाढवते, त्याचाही आम्ही जगभर प्रसार केला, असे सांगितले. या भाषणाचे  व्हिडिओ उपलब्ध आहेत. कोणीही ते पाहू शकतात.

थोडक्यात करोनाने आपल्या देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली असताना, अशा अवैज्ञानिक वक्तव्यांना खूपच बहर आला आहे. त्यात भरीस भर म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनीसुद्धा ‘पॉझिटिव्ह अनलिमिटेड’ या कार्यक्रमात बोलताना ‘आतापर्यंत करोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले आहेत, ते एक प्रकारे मुक्त झाले आहेत’ असे विधान केले आहे. ते ‘मुक्त’ झाले आहेत म्हणजे जणू काही त्यांना हिंदूधर्मियांना अपेक्षित असलेला ‘मोक्ष’ मिळाला आहे! कारण हिंदू धर्मामध्ये ‘मोक्षा’ला खूप महत्त्वाचे स्थान आहे. ‘मोक्ष’ मिळणे म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक झाले!

सत्ताधाऱ्यांपैकी अनेक जण अशा प्रकारची वारेमाप वक्तव्ये करत आहेत. पण मुद्दा समजण्यासाठी एवढी पुरेशी आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

केंद्रात आणि विविध राज्यांत सत्तेत असलेला भाजप, संघ आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर निरनिराळ्या संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या या वक्तव्यांमुळे सर्वसामान्य भोळ्याभाबड्या, धर्मभिरू जनतेची दिशाभूल होऊन करोना महामारीवर मात करण्यात एक प्रकारे अडथळेच निर्माण होत आहे, असे म्हणावे लागेल.

तेव्हा अशा जुनाट, पुराणमतवादी विचारसरणी असलेल्या अवैज्ञानिक लोकांकडे अनेक राज्य सरकारे व केंद्र सरकारही असल्यामुळे, हे लोक खरोखरच देशातील जनतेची जीवघेण्या करोनातून मुक्तता करू शकतील काय, याबद्दल रास्त शंका उपस्थित होतात.

अशा लोकांच्या हातात सत्ता देऊन ‘कोठे आणून ठेवला भारत माझा?’ असे म्हणण्याची पाळी भारतीय जनतेवर आली आहे.

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......