जेवढी दुर्दशा व दयनीय स्थिती आपल्या देशाची झालीय, तेवढी जगातील इतर कोणत्याच देशाची झालेली नाही...
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 15 May 2021
  • पडघम देशकारण कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus

सध्या आपल्या देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने खूपच हाहाकार माजवलेला आहे. दिवसेंदिवस त्याचे भयानक व बीभत्स रूप आणखी आणखी उघड होत आहे. या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात मुख्यत्वेकरून केंद्र सरकार व विशेषत: भाजपशासित राज्य सरकारे पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे दिसत आहे. आजच्या तारखेपर्यंत आपल्या देशात २,६६,४०३ लोक मृत्यू पावले आहेत. ही आकडेवारी केंद्र सरकारनेच जाहीर केलेली असल्यामुळे प्रत्यक्षात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते. हे जे मृत्यू झालेले आहेत, ते आपली आरोग्य व्यवस्था करोनाचा समर्थपणे मुकाबला न करू शकल्यामुळे. किंबहुना त्यासाठी केंद्र सरकारने कोणतीच पूर्वतयारी न केल्यामुळे.

या लाटेची पूर्वसूचना आपल्या देशातील वैज्ञानिकांनी दिली होती. पण त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. विशेष म्हणजे करोनाने आता ग्रामीण भागांतही शिरकाव केला आहे आणि तिथे त्याने अनेकांचे बळी घ्यायला सुरुवात केली आहे.

या दुसऱ्या लाटेत आपल्या जवळचे, ओळखीचे कुणीतरी मृत्युमुखी किंवा मग निदान बाधित तरी झाले आहेत. सरकारी व खाजगी हॉस्पिटल्समधून करोनारुग्णांना आवश्यक असलेली औषधे, इंजेक्शन्स (रेमडेसीवर) त्यासाठी आवश्यक असलेले बेड, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन न मिळाल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत. या रुग्णांना जर वेळेवर सगळ्या सोयी-सवलती पुरवल्या गेल्या असत्या, तर मृतांचा आकडा इतका मोठा झाला नसता.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्यापेक्षाही अत्यंत लाजीरवाणी बाब म्हणजे मृत्यूनंतर ज्या सन्मानाने दफनविधी अथवा दहनविधी व्हायला पाहिजे होते, तोसुद्धा अनेकांना करता येत नाहीयेत. दफनभूमीमध्ये दफनासाठी लागणारी सहा फूट जागा मिळणे किंवा दहन करण्यासाठी लागणारी लाकडे मिळणे दुरापास्त होत चालले आहे. परिणामी अनेक मृतांच्या नातेवाईकांनी नाईलाजाने नदीपात्रात तीन फूट खोल वाळूत मृतदेहांचे दफन करून टाकले किंवा मग गंगा, यमुना व नर्मदेच्या जलप्रवाहात ते सोडून दिले. त्याची हृदयद्रावक दृश्ये आपण प्रसारमाध्यमांतून पाहत आहोतच. 

गरीब रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी ॲम्बुलन्स मिळत नाहीयेत. त्यांना रिक्षातून, सायकलवरून, ढकलगाडीवरून दवाखान्यात न्यावे लागतेय. रुग्ण दगावल्यानंतर स्मशानभूमीत नेण्यासाठीसुद्धा ॲम्बुलन्स मिळत नाहीयेत. एकावर एक प्रेते रुचून स्मशानभूमीत नेली जाताहेत. असे नाही की, आपल्याकडे ॲम्बुलन्सचा तुटवडा आहे. काही मंत्री व खासदार यांच्याकडे पन्नास-पाऊणशे ॲम्बुलन्स घरी वा कार्यालयात सुरक्षित झाकून ठेवल्या असल्याची दृश्येही काही प्रसारमाध्यमांतून दाखवली गेली आहेत.

करोनाने माजवलेला हाहाकार म्हणजे आपल्याला कमाई करण्याची संधीच आहे, असे समजून काही ॲम्बुलन्सवाल्यांनी, हॉस्पिटल्सच्या मालकांनी, इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांनी हजारो-लाखो रुपयांची लूटमार रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली आहे. ‘मरता, क्या न करता’ या म्हणीप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांना हे सगळे सहन करणे भाग पडते आहे. आपल्याजवळ असलेला पैसा-अडका, ठेवी, दागदागिने, विकून जमेल त्या मार्गाने रुग्णांना लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत... 

अशा भयाण परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांसारखे काही लोक आपापल्या राज्यांतल्या जनतेशी संवाद साधून मार्ग काढण्यासाठी निदान धडपड करत असल्याचे तरी दिसतात. वेळोवेळी याबाबतच्या परिस्थितीची कल्पना प्रसारमाध्यमांतून आपल्या लोकांना देतात. पण भाजपशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार येथील राज्य सरकारे काय करत आहेत?

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

ते काहीच करत नाही, असेही नाही. पण काय करतात, तर आपल्या राज्यात सर्व काही आलबेल आहे, कोणत्याही गोष्टीचा तुटवडा नाही, असा प्रचार करण्यात दंग आहेत. त्यासाठी जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करत आहेत.

कोणी जर ॲम्बुलन्सचा वा ऑक्सिजनचा तुटवडा आहे, बेड व व्हेंटिलेटर मिळत नाही, असे सांगण्याचा किंवा तसे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर सूडबुद्धीने कारवाई करणे, गुन्हे दाखल करणे, तुरुंगात डांबणे, यांसारखे प्रकारदेखील ही सरकारे करत आहेत. 

हे झाले राज्य सरकारांचे, पण देशातील जनता अशा कठीण जीवघेण्या परिस्थितीतून जात असताना केंद्रात सत्तेत असलेले व संपूर्ण देशाची धुरा वाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत आहेत? गेल्या एक महिन्यापासून ‘न ‘मन की बात’, न काम की बात, कोणतीच बात नाही’ असे का?

खरे तर या सर्व कठीण परिस्थितीत पंतप्रधानांनी सर्वांत आघाडीवर राहणे आवश्यक आहे. पण त्यांचा तर कुठेच पत्ता दिसत नाही. पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील निवडणुका, उत्तर प्रदेशतील पंचायतींच्या निवडणुका आणि हरिद्वारमधील कुंभमेळा, या घटनांमुळे करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे, हे आता उघड झाले आहे. हे सगळे टाळता आले नसते का? नक्कीच, पण तशी इच्छाशक्ती केंद्र सरकारला दाखवता आली नाही, हे खरे.

करोनाचा कहर फक्त भारतात आहे असे नाही, तर जगातील अनेक देशांत त्याने हाहाकार माजवलेला आहे. पण जेवढी दुर्दशा व दयनीय स्थिती आपल्या देशाची झाली आहे, तेवढी जगातील इतर कोणत्याच देशाची झालेली नाही, हे वास्तव आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भारताने करोनाला हरवून करोना व्हॅक्सिनची निर्यात जगातील १५० देशांना केली असल्याचा टेंभा ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या दावोस बैठकीत करण्यात आला होता. ते कसे खोटे होते, हे आता करोनाने सिद्ध केले आहे.

लोकांच्या हाल-अपेष्टा व त्यांच्या जीविताबद्दलची बेफिकिरी, अवैज्ञानिक दृष्टिकोन, चुकलेला प्राधान्यक्रम, विरोधकांचे सहकार्य न घेणे, त्यांनी केलेल्या सूचनांकडे तुच्छतेने बघणे, विरोधकांना शत्रू समजणे, रुग्णांना मदत करणाऱ्यांनाच अडचणीत आणणे, त्यांच्यावर खटले दाखल करणे, जनतेला विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे माहिती न देता खोटी माहिती व आकडेवारी देणे, आमच्या देशात आता ‘रामराज्य’ अवतरले असल्याचा आभास निर्माण करणे, यातच केंद्र सरकार व भाजपशासित राज्य सरकारे मग्न आहेत. आणि त्याचे भोग समाजातील सर्वच घटकांना भोगावे लागत आहेत…

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Arvind Deshmukh

Sun , 16 May 2021

प्रत्येक लेखात भाजप आणि मोदींवर टीका यापलीकडे आपल्या लेखांत काहीही नसते. वेगळं काही तरी लिहीत जा राव! सारखं सारखं तेच तेच लिहायला तुम्हाला बोअर होत नाही का?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......