‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ या ग्रंथाकडे केवळ साधनसामग्री म्हणून पाहता कामा नये, हा सत्यशोधक समाजाची वाटचाल दाखवणारा राजमार्ग आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजेंद्र मगर
  • ‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 14 May 2021
  • ग्रंथनामा शिफारस रा. ना. चव्हाण R. N. Chavhan सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे सत्यशोधक चळवळ Satyashodhak Chalval महात्मा फुले Mahatma Phoole

भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील एखाद्या चळवळीचा इतिहास पद्धतशीरपणे (तटस्थपणे) लिहिण्याची परंपरा तशी दुर्मीळ आहे. इतिहासलेखनात व्यक्तिनिष्ठेपेक्षा वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. इतिहासामध्ये काही कालावधीनंतर जरी बदल होत असला तरी सद्यस्थितीत तो सत्य स्वरूपात मांडणे अपेक्षित असते. या तत्त्वाला अनुसरून महाराष्ट्रातील एक चिकित्सक, वैचारिक लेखक आपले कार्य प्रसिद्धीविन्मुख राहून करत होते- ते म्हणजे रा. ना.चव्हाण (१९१३-१९९३).

त्यांनी आयुष्यभर जी इतिहास, समाजशास्त्र आणि इतर प्रबोधनात्मक चळवळ एकहाती चालवली, त्याला तोड नाही. त्यांनी वेळोवेळी अनेक विषयांवर वस्तुनिष्ठपणे भाष्य करत, हा वैचारिक इतिहास परखडपणे लिहिण्याचे धाडस केले.

चव्हाण यांनी महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांची ‘सत्यशोधकीय चळवळ’ जवळून अनुभवली, वाढवली आणि त्याविषयी जनमानसात प्रबोधन केले. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील स्वातंत्र्याची चळवळही पाहिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी भाषिक राज्य निर्मितीची आंदोलने जवळून पाहिली. चव्हाण अशा मोठ्या घडामोडींचे साक्षीदार होते. एवढा मोठा वैचारिक पैस असणाऱ्या व्यक्ती तत्कालीन समाजात अगदी कमी होत्या. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचे महत्त्व आपोआपच वाढते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी वैचारिक विश्लेषण करून जनमानसात वैचारिक जागरण करण्याचा व्रत स्वीकारले होते. कोणतीही मुद्रित संस्था हाताशी नसताना त्यांनी त्यांच्या संतुलित विचारांचा केलेला प्रचार आणि प्रसार अतुलनीय आहे. त्यांनी वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळ्या वृत्तपत्रांत कसदार वैचारिक लेखन केले. त्यांच्या या लेखनाला एकत्रित करून पुन्हा समाजापुढे ठेवण्याचे श्रेष्ठ कार्य त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी केले आहे. यासाठी त्यांनी आजवर ४२ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

याच प्रबोधकीय चळवळीच्या मालेतील ‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा ४२वा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. सध्या जगभर पसरलेली करोनाची साथ आणि स्तब्ध झालेले जग या विपरित पार्श्वभूमीवरही एक नव्हे तर तीन-तीन पुस्तके प्रकाशित करण्याचे धाडस करणे खरोखरच अनोखे आहे.

यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’शी संबंधित असणारी अस्सल कागदपत्रे विषयानुसार एकत्रित करून प्रकाशित केली आहेत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचा एक चिटोराही अतिशय मोलाचा असतो. त्यामुळे या ग्रंथातून सत्यशोधक समाजाचे प्रबोधन आणि सत्यशोधकीय तत्कालीन परिणाम, याचा आलेख पाहता येतो.

यात सत्यशोधक समाजाचे निर्माते महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या वृत्तपत्रांत आलेले श्रद्धांजलीपर लेख एकत्रित स्वरूपात आहेत. यामुळे त्या काळात महात्मा फुले यांच्या समाज परिवर्तनाचा परिणाम आणि त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. त्यानंतर रा.ना. चव्हाण यांनी जमवलेले, एकत्रित केलेले आणि त्यांनी स्वतः नानाविध प्रसंगी लिहिलेले लेख विषयानुसार एकत्रित करून क्रमवार दिले आहेत. हे सर्व लेख\टिपणे बाबा आढाव चालवत असलेल्या ‘पुरोगामी सत्यशोधक’ या नियकालिकातून ‘जुनी कागदपत्रे’ या सदरातून पूर्वप्रसिद्ध झालेली आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या सर्व लेखनाचे आजच्या काळात महत्त्व काय, याचा विचार केला तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते की, सत्यशोधक समाजाच्या एकत्रित इतिहास आजपर्यंत लिहिला गेलेला नाही. याही कागदपत्रांतून संपूर्ण इतिहास समोर येतोच असे नाही. एक मात्र आहे, ज्या वेळी हा इतिहास लिहिला जाईल, त्या वेळी अस्सल साधने म्हणून सदरहू ग्रंथाचा उपयोग केल्याशिवाय अभ्यासकांना पुढे जाता येणार नाही.

फक्त अस्सल कागदपत्रे म्हणून या ग्रंथाकडे पाहता येणार नाही, कारण प्रत्येक घटना-प्रसंगामागची कारणमीमांसा संपादकांनी विदित केलेली आहे. प्रस्तावनाकार अरुण शिंदेंनी ‘महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा दस्ताऐवज’ या दीर्घलेखात ही कागदपत्रे आणि त्यांचे आजच्या काळातले महत्त्व अभ्यासपूर्णरित्या विशद केले आहे.

रा.ना. चव्हाण हे कोणत्या एका पक्षाचे वाहक नव्हते, तर ते स्वतःच्या संतुलित वैचारिक मतांचे संप्रेरक होते. त्या काळी मोठ मोठे मतप्रवाह आणि राजकीय संघटना असताना स्वतःच्या वैचारिक प्रबोधनाचा दीप त्यांनी नेहमी तेवत ठेवला. तत्कालीन समाजजीवनावर परिणाम करणारे अनेक समाजधुरीण त्या काळात सक्रिय होते. त्यांच्या ‘रुकरात रुकार’ आणि ‘नकारात नकार’ मिळवणारे रा.ना. चव्हाण नव्हते, तर ‘चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर’ म्हणायचे धाडस त्यांच्याकडे होते. म्हणूनच त्यांचा उल्लेख ‘स्वतंत्र मतांचे वैचारिक सुधारक’ म्हणून केला जातो.

या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या काही परिषदांचे अहवाल आहेत, त्यातून तत्कालीन समाजात सत्यशोधकांनी चालवलेले प्रयत्न लक्षात येतात. हे अहवाल लेखन करताना रा.ना. चव्हाण यांनी समकालीन परिस्थितीत ही चळवळ किती महत्प्रयासाने सुरू होती, याचेही विवेचन केले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या ग्रंथाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा फुले यांचे सत्यशोधकीय वारसदार यांची दिलेली माहिती. यामध्ये गंगारामभाऊ म्हस्के, संतुजी लाड, विश्राम घोले, नारायण लोखंडे, जावजी चौधरी, बाबूराव यादव, वा.रा. कोठारी, नारायण चव्हाण, भाऊशास्त्री लेले, मोरो वाळवेकर, केशव जोशी, वसुदेराव बिर्जे, दिनकरराव जवळकर, रामचंद्रराव धामणसकार, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, बाबूराव हैबतराव, भाऊराव पाटील, विनायक भांडारकर, हरी रावजी चिपळूणकर, गोपाळबाबा वलंगकर, महर्षी वि.रा. शिंदे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा समावेश आहे.

जवळजवळ ४० भागांत हे जुने लेख आणि टिपणे देताना चव्हाण यांनी महात्मा फुले, त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज, त्याची वाटचाल, समाजाची अधिवेशने, महात्मा फुले यांचे मित्र, सत्यशोधक कार्यकर्ते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सत्यशोधक समाजासाठी असणारे भरीव योगदान, यांविषयी विस्तृत भाष्य केले आहे. यातून महर्षी शिंदे यांचे सत्यशोधक समाजासाठी असणारे योगदान स्पष्टपणे समजते.

या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात रा.ना. चव्हाण यांना आलेली अत्यंत दुर्मीळ पत्रे दिली आहेत. त्यांवरून तत्कालीन परिस्थितीत सत्यशोधक चळवळ कशा रीतीने मार्गक्रमण करत होती, याची कल्पना येते. त्याचबरोबर रा.ना. चव्हाण यांचा अनेकांशी असणारा वैचारिक स्नेहबंधही उलगडत जातो. त्याच अंगाने सत्यशोधक ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्नशील होते, याचीही कल्पना येते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या ग्रंथाकडे केवळ साधनसामग्री म्हणून पाहता कामा नये, हा सत्यशोधक समाजाची वाटचाल दाखवणारा राजमार्ग आहे. त्याचबरोबर यातून दीडशे वर्षांचा इतिहास प्रामुख्याने समोर येतो. प्रस्तावनाकार अरुण शिंदे म्हणतात त्याप्रमाणे सत्यशोधक चळवळ व बहुजन समाजाच्या इतिहासाभ्यासाचा एक विश्वसनीय दस्तऐवज म्हणून हा ग्रंथ मोलाचा आहे. त्याचबरोबर यातून महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या उत्खननाची अनेक क्षेत्रे व दिशा पाहता येतात.

रा.ना. चव्हाण यांचे सर्वच लेखन हे वैचारिक अक्षरधन आहे. त्यामध्ये समाजपरिवर्तनाची धमक आहे. वैचारिक शिस्त लावण्याएवढे त्यांचे लेखन कसदार आहे. त्यामुळे त्यांच्या समग्र लेखनाचा अभ्यास करणे, समाजहितकारक आहे.                                                                                   

‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ : रा. ना. चव्हाण                                                     

संपादक व प्रकाशक : रमेश चव्हाण                                                     

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई                                                   

पाने : ३०४, मूल्य : ३५० रुपये

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. राजेंद्र मगर महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, औरंगाबाद येथे संशोधन सहायक आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......