सध्याच्या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रातल्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना मदत करणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे!
पडघम - राज्यकारण
सुभाष वारे, संजीव साने, डॉ. सुगन बरंठ, ललित बाबर, रमेश ओझा, मानव कांबळे, प्रदीप खेलूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 04 May 2021
  • पडघम राज्यकारण सामाजिक कार्य करोना लॉकडाउन पूर्णवेळ कार्यकर्ते स्वराज अभियान सेवाग्राम कलेक्टिव्ह डॉ. आंबेडकर शेती विकास संस्था

महाराष्ट्रामध्ये वंचित आणि सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या, तसेच या घटकांसाठी रचनात्मक, संघर्षाचे काम करणाऱ्या संघटनांची मोठी परंपरा आहे. आदिवासी समूहांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, भटके विमुक्तांच्या विकासाचे कार्यक्रम, असंघटित कामगार, शेतकरी आणि शेतमजूर, सफाई कामगार, दिव्यांगांचे प्रश्न, विस्थापितांचे पुनर्वसन, पर्यावरण संरक्षण, जनशिक्षण आणि प्रबोधन अशा विविध क्षेत्रांत अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते आपापल्या संघटनेच्या माध्यमातून काम करत आहेत. या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या मासिक मानधनाची जबाबदारी महाराष्ट्रातल्या काही संघटना घेत आल्या आहेत.

गेल्या वर्षी करोनाच्या आगमनानंतर देशाची आर्थिक घडी पार विस्कटली. वंचित समूहांचे प्रश्न अतिशय दाहक बनले. त्या वेळी या पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी अक्षरशः झोकून देऊन काम केले. मात्र करोनाने या कार्यकर्त्यांच्या घरातील आर्थिक प्रश्न बिकट केले. या आपत्तीच्या काळात हे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय कसे जगत आहेत, हा प्रश्न फक्त त्यांच्या संघटनेपुरता मर्यादित नसून त्यांना मदत करणे, ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे, असे मानणारे विविध संस्था-संघटनांमधील काही समविचारी मित्र एकत्र आले आणि त्यांनी एक उपक्रम हाती घेतला.

‘स्वराज अभियान’, ‘सेवाग्राम कलेक्टिव्ह’ आणि ‘डॉ. आंबेडकर शेती विकास संस्था’ यांच्यातर्फे एक उपक्रम राबवण्याचे ठरले. संजीव साने आणि डॉ. सुगन बरंठ यांनी महाराष्ट्रातील ७५ पूर्णवेळ गरजू कार्यकर्त्यांची यादी केली. भारतीय संविधानावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या संघटनांचे हे पूर्णवेळ कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध भागांतील वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करत आहेत. या उपक्रमातील सर्व सहभागी मित्रांनी आपल्या संपर्कातील सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले. अपेक्षेनुसार मदतीचा ओघ सुरू झाला. ‘महाराष्ट्र फाउण्डेशन’नेसुद्धा आर्थिक मदत केली. या सर्व निधीचे व्यवस्थापन, वितरण आणि हिशोबाचे सर्व सोपस्कार ‘डॉ. आंबेडकर शेती विकास संस्थे’च्या कार्यकर्त्यांनी चिकाटीने पार पाडले. त्यामुळे पूर्णवेळ कार्यकर्त्यांना अडचणीच्या काळात नियमित मदत (आणि देणगीदारांना पावती) मिळाली. सध्याच्या कठीण परिस्थितीत पूर्णवेळ कार्यकर्त्यांना मदत करणे, हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे, या भावनेने हे काम झाले.

सध्या देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वंचित समूहांची स्थिती परत एकदा बिकट होऊ लागली आहे आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरची स्थिती बिघडायला सुरुवात झाली आहे. आजारपणाच्या खर्चाचा बोजा वाढला आहे.

म्हणून परत एकदा गरजू १०० पूर्णवेळ गरजू कार्यकर्त्यांना पुढील चार महिने दरमहा पाच हजार रुपये मदत म्हणून देण्याचा संकल्प ‘स्वराज अभियान’, ‘सेवाग्राम कलेक्टिव्ह’ आणि ‘डॉ. आंबेडकर शेती विकास संस्था’ यांनी केला आहे.

या कामात संवेदनाक्षम व्यक्तींनी स्वयं इच्छेने, प्रेरणेने आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून मदत करावी असे आवाहन मानव कांबळे, सुभाष वारे, संजीव साने, डॉ. सुगन बरंठ, ललित बाबर, रमेश ओझा, प्रदीप खेलूरकर यांनी केले आहे.

सध्याच्या कठीण काळात समाजासाठी अथकपणे काम करणाऱ्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना घरखर्चात अडचण येऊ नये, यासाठीचा हा प्रयत्न आहे. वेळेवर मिळणारी मदत ही मौल्यवान असते. कारण त्यामुळे सध्याच्या दुर्दैवी काळातही या कार्यकर्त्यांचे मनोबल टिकून राहू शकते आणि त्यांचा कामाचा उत्साह शाबूद राहू शकतो. म्हणून आपल्याला शक्य होईल तेवढी मदत सत्वर करावी, ही विनंती.

..................................................................................................................................................................

मदत ‘डॉ. आंबेडकर शेती विकास संस्थे’च्या नावाने पाठवावी. ती पाठवल्यानंतर 98697 89705 या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे आपले नाव, पत्ता, पॅननंबर, इ-मेल आयडी ही माहिती न विसरता पाठवावी. म्हणजे मदतीची नोंद ठेवणे सोपे होईल आणि संबंधितांना रितसर पावतीही पाठवता येईल.

संस्थेच्या बँक खात्याचा तपशील पुढीलप्रमाणे -

बँकेचे नाव - INDIAN BANK

बँक खात्याचे नाव - Dr. Ambedkar Sheti Vikas va Sanshodhan Sanstha

खाते क्रमांक - 412055894

शाखा - GOREGAON (WEST)

IFSC CODE - IDBI000GO14

पत्ता - 211, LINK ROAD, INDIRA NAGAR, GOREGAON (WEST), MUMBAI - 400104.

..................................................................................................................................................................

93239 41174 या मोबाईल नंबरवर गुगल पे द्वारेही मदत पाठवण्याची सोय केलेली आहे. त्यावरही मदत पाठवल्यानंतर आपले नाव, पत्ता, पॅननंबर, इ-मेल आयडी ही माहिती न विसरता पाठवावी.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......