आपल्या मनाची कधी नव्हे एवढी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे!
पडघम - विज्ञाननामा
सोपान मोहिते
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 19 April 2021
  • पडघम विज्ञाननामा मन Mind मनाचे आजार Mental illness मानसशास्त्र Phycology ऐकून घेणारा माणूस LISTENER

माणसाने प्रगतीची अनेक साधने निर्माण केली. सर्वच क्षेत्रांत माणसाची प्रगतीही होत आहे. शहरीकरण, यांत्रिकीकरण, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदल, यांचा मानवी वर्तनावर प्रभाव पडत आहे. त्यामुळे मानवी वर्तन गुंतागुंतीचे झाले आहे. जगातील सर्व देशांत दिसून येणारी प्रगती माणसातील प्रेम, आपुलकी, आंतरव्यक्ती संबंधावर परिणाम करत आहे. नवनवीन शोध, जागतिकीकरण यामुळे जग जवळ आले, पण मानसिक अंतर वाढत गेले. माणूस माणसापासून दूर जाऊ लागला.

सध्याच्या करोनाकाळात तर याचा खूप परिणाम जाणवतो आहे. त्यातून बेकारी, दारिद्रय, महागाई, भ्रष्टाचार, गुंडगिरी, खून, दरोडे, खंडणी, बलात्कार, व्यसनाधीनता, वैवाहिक समस्या, संप, अशा तणावजन्य प्रसंगांना तोंड देणे कठीण होत आहे. अशा ताणतणावांमुळे शारीरिक आजारांमध्येदेखील भर पडते आहे. रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, अल्सर, फुप्फुसाचे आजार उद्भभवत आहेत. आधुनिक संस्कृतीने वाहतूक, ऊर्जा, संप्रेषण, शेती, वैद्यकीय, राजकारण, समाजकारण, प्रसारमाध्यमे इ. क्षेत्रांत प्रगती साधली आहे. पण त्याचबरोबर अनेक सामाजिक समस्या, व्यक्तिगत अडचणी, मानसिक ताणतणाव वाढत आहेत.

याचा परिणाम म्हणून मानसिक समस्यादेखील तेवढ्याच तीव्रतेने वाढत आहेत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत प्रचंड स्पर्धा, चढाओढ यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे मत्सर, द्वेष, निराशा, वैफल्य, हिंसा, न्यूनगंड यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून सुटका करून घेण्यासाठी विविध प्रकारची औषधे घेणे किंवा मद्यपान, मादक पदार्थ यांच्या आहारी जाणे हेही घडते. ‘रोगापेक्षा ओषध भंयकर’ या न्यायाने हे परिणाम मूळ मानसिक समस्यांपेक्षा भयंकर असतात.

आपले शारीरिक आजारांकडे जेवढे लक्ष असते, तेवढे मानसिक आजारांकडे नसते. किंबहुना मानसिक आजार असतो, हेदेखील आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नसते किंवा माहीत असला तरी आपल्या समाजात मानसिक आजार लपवून ठेवण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी योग्य वेळी मानसिक उपचाराची गरज असताना ती मिळत नाही, पर्यायाने आजार वाढत जातो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आपण अनेक ध्येय समोर ठेवून जीवन व्यतीत करत असतो. एक उद्दिष्ट पूर्ण झाले की, दुसरे उद्दिष्ट समोर ठेवून ते पूर्णत्वाकडे कसे जाईल, यासाठी पराकाष्ठा करण्याचा प्रयत्न करतो. असे सतत धडपडत राहणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु प्रगती करताना कुठपर्यंत पुढे गेले पाहिजे, यावर मात्र मर्यादा ठेवलेली नाही आणि हे खूपच धोकादायक आहे.

आपल्याला वर्तनाबाबत समस्या भेडसावतात, त्या कधी स्वतःच्या तर कधी दुसऱ्याच्या वर्तनाबद्दलही असतात. असे वर्तन सुसंगत नसते, त्याचबरोबर समाजाच्या दृष्टीनेही योग्य नसते. आपल्यापैकी बरेच जण स्वतःचा पुष्कळ वेळ आणि मानसिक शक्ती इतरांचे वर्तन समजावून घेण्यात खर्च करतात आणि स्वतःच्या वर्तनाबद्दल बुचकळ्यात पडतात. करोनाकाळात अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. परंतु मोठमोठ्या कंपन्या एका कर्मचाऱ्याला दोन कर्मचाऱ्याचे काम देऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे अनेक जण सतत ऑनलाईन राहून कामाचा निपटारा करत आहेत. अनेक व्यक्ती त्यांचे आयुष्य कमालीच्या त्रासात, निराशेत जगत असतात. मोठ्या आव्हानांना त्या तोंड देऊ शकत नाहीत. मानवी वर्तनाची खोली आणि गुंतागुंत प्रचंड मोठी आहे आणि त्याबाबतचे आपले आकलन सदोष आहे.

व्यक्तिगत जीवनात आपण खूप काही मिळवत असतो आणि जे काही मिळवले आहे वा आपल्यामध्ये काही समस्या आहेत किंवा आपले काही पूर्वनियोजित आहे, ते एकमेकांना सांगून आनंद मिळवला जातो. परंतु असे अनुभव दुसऱ्या व्यक्तीला सांगण्याचे प्रमाण मात्र कमी झाले किंवा पर्यायाने कोणाला सांगावे हेच न उमगल्यामुळे प्रत्येक जण आपल्याच विश्वात गुरफटलेला आहे. कोणाला कोणाशी देणेघेणे उरलेले नाही. प्रत्येक जण प्रचंड ओझ्याखाली दडपून गेला आहे. आपले इप्सित साध्य करण्यासाठी धावपळ करतो आहे. भावनिक पाठिंबा, ओलावा कमी झालेला आहे. परिणामी आपले यश, दु:ख, समस्या सांगायला आणि ऐकून घ्यायला कोणीही नसते. उदा. माझ्या मुलाला बारावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळाले, मी गाडी घेतली, सोने घेतले, फ्लॅट घेतला, मुलाला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला, पुरस्कार मिळाला इत्यादी.

एखादी समस्या उभी राहिली तर योग्य वेळी योग्य सल्ला मिळेलच असे नाही. कोणाजवळ आपले मन मोकळे करावे, कोण आपल्याला व्यवस्थित समजून घेऊन योग्य रस्ता दाखवेल, हेच कळेनासे होते. अशा वेळेस आपली बुद्धी कुंठीत होते. अशा वेळी आपण एकटे पडतो, निराशेने खचून जातो. त्यामुळे अनेक मानसिक समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मानसतज्ज्ञ फ्राईड यांनी आपल्या मनोविश्लेषण उपचार पद्धतीमध्ये ‘मुक्त साहचर्य’ ही एक संकल्पना सांगितली आहे. ते असे म्हणतात- व्यक्तीने आपले विचार, भावना दाबून ठेवलेल्या असतात. त्याला त्याची जाणीव नसते. हा मनाचा फार मोठा भाग असून आपल्या नकळत तो वर्तनावर परिणाम करत असतो. आपल्या मनात ज्या इच्छा, आकांशा, प्रेरणा, भावना, विचार येतात; त्यांचे कुठेतरी ‘भावविरेचन’ होणे गरजेचे आहे. भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करताना माणूस ज्या वेळी हतबल होतो किंवा आपल्या तीव्र इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरतो, त्या वेळी त्याच्या मनाची व्यवस्था विस्कळीत होते. त्याच्या मनात अनेक विचार येतात आणि ते एका साखळीने जोडलेले असतात. ते सर्वच्या सर्व मोकळेपणाने व्यक्त केले पाहिजेत. प्रत्येक विचार मग तो कितीही निरुपद्रवी, निरर्थक, हास्यास्पद, लाजीरवाणा, त्रासदायक किंवा असंबधित असला तरी तो व्यक्त होणे आवश्यक आहे. म्हणजेच या विचारांच्या साखळीचे जे सूत्र असते, त्याला पकडून खोल अबोध मनापर्यंत जाता येते. अव्यक्त मनोव्यापारांना मोकळी वाट करून देणे खूपच गरजेचे आहे. यालाच ‘भावविरेचन’ असे म्हणतात.

दडपलेल्या इच्छा अबोध मनात जाऊन दबा धरून बसलेल्या असतात. सरळ मार्गाने पूर्ती होत नसल्यामुळे त्यांचे मनोविकारात रूपांतर होते. बोलण्यातून या इच्छा, विचार व्यक्त होतात, तेव्हा भावविरेचन होते, अतृप्त इच्छांचा निचरा होतो, मन हलके होते. एखाद्या पडक्या विहिरीतील पाण्याचा उपसा होत नाही, तोपर्यंत त्या पाण्याला दुर्गंधी येते. विहिरीतील पाण्याचा सतत वापर होत असेल तर ते पाणी वापरण्यालायक होते. तसेच आपल्या मनाचेदेखील आहे. मनामध्ये ज्या ज्या इच्छा, प्रेरणा, भावना निर्माण होतात, त्या सर्व आपल्या बोलण्यातून व्यक्त होणे गरजेचे आहे. काहीही साठून राहता कामा नये. जे काही यश-अपयश आपल्याला मिळते, ते कोणाशी तरी शेअर करणे (सांगणे) अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी एकत्र आले पाहिजे, एकत्र येण्याने नवीन काहीतरी करण्याची स्फूर्ती मिळत राहते.

‘listener’ या नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. त्यात एका हॉटेलात जेवण करण्यासाठी एक व्यक्ती जाते. वेटर तिला मेनू कार्ड देतो. त्यावर जेवणाच्या पदार्थांसह ‘listener’चाही दर तासाचा दर दिलेला असतो. तो पाहून ती व्यक्ती जेवणासोबत ‘listener’चीही मागणी करते. तो येतो, मग त्या ‘listener’ला आज दिवसभरात काय केले, काय मिळाले, काय गमावले, काय गमतीजमती केल्या, त्या सांगितल्या जातात. ‘listener’ सर्व ऐकून घेतो आणि सांगणाऱ्या व्यक्तीला आवश्यक त्या प्रतिक्रयादेखील देतो. या व्यक्तीला आपण ‘ऐकून घेणारा माणूस’ म्हणूयात. त्याला आपण समस्या, आव्हाने सर्व काही सांगावयाचे आणि त्याने ते ऐकून घ्यायचे व योग्य त्याच फक्त प्रतिक्रया द्यायच्या. त्यासाठी ते हॉटेल तासाप्रमाणे दर आकारते.  

भविष्यात अशा ‘ऐकून घेणाऱ्या माणसा’ची मागणी वाढली, तर आश्चर्य वाटायला नको. भविष्यात नक्कीच अशी संकल्पना आकाराला येईल. कारण अशा मदतीची आवश्यकता भासण्याची अनेक कारणे आहेत. पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होऊन छोटी कुटुंबे दिसू लागली आहेत. व्यवसायानिमित्त दूरच्या गावी जावे लागत असल्यामुळे वडील माणसांचा आधार तुटला आहे. स्त्रीचे अर्थार्जन, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव यामुळे सामाजिक रूढी झपाट्याने बदलत आहेत. ‘फॅमिली डॉक्टर’ कुटुंबाचा मित्र असे. कुटुंबाचा इतिहास, त्यातील व्यक्तीचे स्वभाव इ. त्याला माहीत असत. बऱ्याच वेळा कौटुंबिक आपत्तीमध्ये तो यशस्वी सल्लागाराची भूमिका पार पाडत असे. परंतु आज ही संस्था हळूहळू नाहीशी होत आहे. आता डॉक्टरचा संबंध फक्त रोगाचे निदान करून औषधे देण्यापुरता मर्यादित झाला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पूर्वी यासाठी फारसे वेगळे प्रयत्न करावे लागत नसत, कारण जवळचे नातलग, मित्र, शेजारी यांच्याशी उत्तम प्रकारचे संबंध असत. प्रत्येकाजवळ थोडाफार वेळ होता. बोलत बोलत आपले मन मोकळे होत होते. म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने मनाचा निचरा होत होता. गोष्टी शेअर केल्या जात.

माणसाचे जीवन काचेसारखे पारदर्शक असले पाहिजे. आतादेखील काही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. परंतु काळानुसार आपणाला बदलावे लागले, एकमेकांना वेळ देता येईनासा झाला किंवा कामाच्या ओझ्यामुळे एकमेकांना वेळ देता येत नाही. परिणामी मानसिक विकारदेखील वाढायला लागलेत. कौटुंबिक हिंसा, आत्महत्या यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या मनाची कधी नव्हे एवढी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रा.डॉ. सोपान हनुमंत मोहिते श्री शिवाजी महाविद्यालयाच्या (बार्शी, सोलापूर) मानसशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.

profshmohite@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......