मैं हिंदूराष्ट्र बनावानू शरू कर्यूम अने हे काय घडला? मी हिंदू जागा होयाला पाहिजे, म्हणूनसाठी प्रयत्न केला अने रिझल्ट काय आली?
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
  • Sat , 17 April 2021
  • संकीर्ण व्यंगनामा नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah भक्त Devotee वाडनगर Vadnagar नितीन गडकरी Nitin Gadkari वेंद्र फडणवीस Devendra Fadnavis शरद पवार Sharad Pawar अजित पवार Ajit Pawar मन की बात Mann Ki Baat

नमोजींचे मित्र म्हणून अमितभाई आम्हाला ज्युनिअर आहेत. म्हणजे त्याचे असे आहे की, आमची आणि नमोजींची खूप घट्ट मैत्री झाल्यानंतर खूप वर्षांनी नमोजी आणि अमितजी यांची ओळख झाली.

आमची आणि नमोजी यांची ओळख कुठे झाली, कधी झाली, याविषयी आपण कधीही आणि कुणाशीही बोलायचे नाही, असे आम्ही दोघांनी एकमताने ठरवले आहे. कारण असे की, आपण बोलल्यावर लोक उगीच इतिहासात जातात. डिटेल्स खऱ्या आहेत की, खोट्या असा शोध घेतात.

उदाहरणच द्यायचे तर नमोजींच्या चहा विकण्याचे घेता येईल. ‘वाडनगर स्टेशनजवळ मी चहा विकत होतो’ असे आमच्या प्रिय नमोजींनी ‘गुडफेथ’मध्ये सांगितले. खरं तर ‘गुडफेथ’मध्ये सांगितलेली गोष्ट लोकांनी ‘गुडफेथ’मध्येच घ्यायला पाहिजे होती. तसे न करता काही मॅनरलेस आणि चावट लोकांनी नमोजी लहान होते, तेव्हा वाडनगर स्टेशनच नव्हते, असे शोधून काढले. नमोजी चहा विकत त्या काळी वाडनगर हा रेल्वेचा रिक्वेस्ट स्टॉप होता, हे आज कुणाला सांगून पटणार नाही. छोटे नमोजी रिक्वेस्ट करून रेल्वे थांबवत आणि रेल्वेत चढून पटकन चहा विकत. चहा विकून झाला की, परत रेल्वे सुरू व्हायच्या आत खाली उतरत. ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी असली तरी विरोधकांना खरी वाटणार नाही. आणि, त्यामुळेच ती कुणाला सांगू नका, असा सल्ला मी नमोजींना दिला आहे. सांगून काही फायदा नाही. विरोधक नमोजी चहा विकत होते, यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि भक्त लोक वाडनगरला स्टेशन नव्हते, यावर विश्वास ठेवणार नाहीत. मग आपण कशाला या विषयावर बोला, असे मी आणि नमोजी यांनी ठरवले आहे. आपण बोलून मोकळे झालेलो आहोत, तेव्हा आता भक्त आणि विरोधक यांनी एकमेकांचे काय करायचे ते बघून घ्यावे! दोघांनाही उत्साह भयंकर आहे.

आमचे आणि नमोजी यांचे जमते याचे मुख्य कारण म्हणजे आम्हाला स्वतःला राजकारणात आणि सत्तेत काडीचा रस नाही, हे नमोजींना माहिती आहे; आणि नमोजींना साहित्य, कला, काव्य आणि तत्त्वज्ञान यात काडीचा रस नाही, हे आम्हाला माहिती आहे.

क्षेत्रं वेगवेगळी असल्याने आम्हाला दोघांना एकमेकांबद्दल एकदम सिक्युअर वाटते. अमितभाईंचे क्षेत्र राजकारण पडल्याने त्यांच्या आणि नमोजींच्या मैत्रीला तशा मर्यादा पडल्या आहेत. आमची आणि नमोजींची दाट मैत्री आहे, हे कळल्यामुळे मध्यंतरी अमितजींचे वजन कमी झाले होते. मग जयच्या म्हणजे अमितजींच्या डिकऱ्याच्या सांगण्यावरून ‘मारा अने नमोजी वच्चे झगडो थयो हतो’ असे मी आमच्या बिल्डिंगच्या आवारात जाऊन दोन-तीनदा पुटपुटलो. ताबडतोब आमच्या पुटपुटण्यातील मतितार्थ आमच्यावर पाळत ठेवण्यासाठी अमितजींनी नेमलेल्या गुप्तहेरांनी दिल्लीला कळवला. अमितजींचे वजन तेव्हापासून अठरा किलोंनी वाढले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आता अमितजींचे वजन थोडे कमी व्हावे, म्हणून मी आमच्या बिल्डिंगच्या आवारात जाऊन नमोजींशी गोड भाषेत बोलावे, अशी विनंती जय करतो आहे. मी म्हटले की, आता बंगालची इलेक्शन आहे. ती झाली की, तुझ्या पापांचे वजन थोडे कमी करू. 

खरं तर कुठलीही ‘आतली’ बातमी द्यायला आम्हाला आवडत नाही. पण विषय निघाला होता म्हणून थोडे बोललो इतकेच.

आतापर्यंतच्या लेखात इतके सारे ऐकल्यावर आमची आणि नमोजींची जानी दोस्ती आहे, अशी चणाक्ष वाचकांची खात्री पटली असेलच. इतके सांगूनही ज्यांची खात्री पटलेली नाही, ते चाणाक्ष वाचक नाहीत असाच अर्थ होईल. पण आम्ही असे आमच्या तोंडाने बोलणार नाही. कुणाला दुखवायचा आमचा स्वभाव नाही.

आम्ही अजूनही लेखाच्या विषयाला हात घातलेला नाही, यावरून लेखाचा विषय महत्त्वाचा असावा, हे हुशार वाचकांनी नक्कीच ताडले असेल. ज्यांनी ताडले नसेल, त्यांच्याविषयी आम्ही अर्थातच काही बोलणार नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्याचे काय झाले, परवा रात्री अडीच वाजता आमचा फोन वाजला. नमोजींचा फोन होता. आम्ही जागेच होतो. (‘या निशा सर्व भूतानाम’… दुसरं काय!) हा फोन नक्की कसा आहे आणि तो कुणालाच टॅप कसा करता येत नाही, हे कुणालाही सांगायचे नाही, असे आमचे ठरले आहे. आम्ही फोन उचलला. नमोजी भयंकर चिडले होते.

नमोजी - आ बद्धा भक्तलोको गधेडा छे!

आम्ही - (शांतपणे) कोण गधेडा आहे नमोजी? (पाहिलंत, आमची मराठी गुजराती वळण कसे घेते ते!)

नमोजी - या भक्त लोकांनी मला वात आणलाय. (आमच्या मराठीने गुजराती चोळणा घातला की, नमोजींची गुजराती मराठीची नऊवारी नेसते. राहिलेल्या वाचकांचीही आता नक्कीच खात्री पटली असेल आमच्या मैत्रीविषयी!)

आम्ही – अरे, असं कसं शक्य झालं? भक्तांचे तर तमे प्राण छो. मग कसा काय बुवा वात आणला आहे त्यांनी?

नमोजी – अरे, हे लोक दिवस अने रात बोलत बसते मोदीजीला सगळा येते, मोदीजीला सगळा येते. आता तुमीच सांगा शिरुभाय आमाला, हे गोस्ट पोसिबल तरी हाय के हे दुनियामदी? केटलो कोम्प्लिकेटेड दुनिया हाय हे? तमे तो जाने छो! पीएम म्हणजे काय सोपा काम हाय के? ते चायना बॉर्डरवरचे नाव तरी केटला विचित्र छे! नथू ला, थांग ला, थांब ला, टांग ला, पाड ला, चोप ला. एकदम मराठी क्रियापदसारखी नावं ते गावची. कळणार कसा? लडाखी गाव छे के मराठी क्रियापद छे कसे समझ मदी येणार माणसच्या?

आम्ही - वास्तविक समस्या छे.

नमोजी – अरे, कुणाला काय विचारायची सोय उरली नथी छे. कुणाला काय विचारला आमी के लोक लाजून बोलते, सर यू नो एव्हरीथिंग!

आम्ही - ओ माय गोड! (नमोजींशी बोलताना गुजराती ढंगाचे इंग्रजी आमच्या मुखातून आपोआप बाहेर पडते! एरवी आम्ही गॉड म्हणतो न चुकता. पण नमोजींशी बोलताना गॉड गोड होतो. चालयचेच. निकटची दोस्ती म्हटल्यावर असे होणारच!)

नमोजी - केबिनेटमंत्री, राज्यमंत्री, सेक्रेटरी लोग बद्धा फाईल माझे ओफिसलाच पाठवते सही माटे. तमारे नितिनभाव गडकरी छे ने - मोटा तोफानी माणस छे. ते काय लिहिते फाईल पाठवताना जानो छे? सेन्ट टू पीम फॉर सिग्नेचर बिकोज T S Y.

आम्ही - T S Y?

नमोजी - तेना सगळे येते. बोल आता काय बोलते तू?

आम्ही - N L C K Y

नमोजी - N L C K Y?

आम्ही - नितिनभाऊना लबाडी चांगली करता येते. (यावर नमोजी एकदम हसले. आम्हाला नमोजींना चांगले हसवता येते!)

नमोजी - खूब लबाड छे आ नितिनभाव! हा माणस मीटिंगला आला ने के मला थोडा अनइजी होते. अधूनमधून तेची नजर मी बसलेल्या कुर्सीकडे जात असते. पण काय करणार केबिनेटमधून येला काडताच येत नाय. पूरे केबिनेट मा अमितभाई अने नितिनभाव आ बेजाच स्मार्ट लोको छे. बाकी बद्धा ओगणीस-बीस माल छे. एकदम सरेराश!

आम्ही - वास्तविक समस्या छे.

नमोजी - हकीकतमा जुओ तो आ माणस एकदम सरस छे. एकदम एफिसियन्ट. मला तर हे माणसलाच महारास्ट्राचा सीएम म्हणून पाठवायचा होता. पण अमितभाई कह्यूं के हा माणसचे काय सांगता येत नाय. त्यां बेठे बेठे हा माणस शरद पवारजीला लाईन देएल. मला अजिबात पटला नाय अमितभाईचा. नितिनभाव तसा सारू माणस छे. पण मनामदी म्हटला रिक्स नको.

आम्ही - आमचे शरदराव एकदम गोड प्रकरण आहे.

नमोजी - गोड बोलून बोलूनच फसवला ने शरदजीने देवेंदरला. अजितभाई पवारचे पचहत्तर हजार करोडचे करप्शनचे फाइल देवेंदरनेच तयार केले होते. देवेंदरनेच दस वरीस तैयार केलेले फाईलवर देवेंदरनेच पाच मिनिटमदी क्लीन चिट दिले. कारण काय? आ शरद जी बोलले की, देवेंदरजी तुमी सीएम होआ. काय गरज होती येला इतका एक्साईट व्हायची? आता आमचे भक्त लोगोने विचारला के अजितभाईला तुरुंगमदी का नाय पाठवला तुमी, तर आमी काय जबाब देनार?

आम्ही - भक्तलोक असे काही विचारणार नाहीत. प्रश्न विचारायची सवय नसलेले लोकच भक्त होतात.

नमोजी - साचु बात बोल गया तू. कम्प्लीट येडा लोग असते हे भक्तलोक. ए शिरुभाय, एक तरी भक्त मला प्रश्न विचारेल असा मला वाटला होता. (स्वतःशी हसत) एकने पन नाय विचारला. विचारायला पाहिजे होता के नाय रे? 

आम्ही - जाऊ दे ना सरजी! आपल्याला काय करायचे आहे? आपण भक्तांची मतं घ्यायची फक्त.

नमोजी आमच्याशी खरी खरी ‘मन की बात’ करतात. रात्री कुणी ऐकायला नसते म्हणून बरे!

आम्ही - पण, देवेंद्रजींनी फसायला नको होते. दहा वर्षे आपणच बिल्ड केलीली फाईल तीसुद्धा पंचाहत्तर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची, आपण स्वतःच निकालात काढायची? तीसुद्धा पाच मिनिटात? आता कुणी प्रश्न विचारला आपल्याला की, तुम्ही दोघे या प्रकरणात नक्की कुणाच्या बाजूचे? प्रामाणिकपणाच्या बाजूचे की, भ्रष्टाचाराच्या बाजूचे की, सत्तेच्या बाजूचे, आपण दोघांनी  काय उत्तर द्यायचे?

नमोजी - आ देवेंदर छे ने, आ सोचते कमी आणि बोलते जास्त. ते सुदा मोटी आवाजमा. मी कदी इतके ऊंच पट्टीमदी बात केलेली पाहिलीस तू? आपले अमितभाई बोलते असा कदी? नीतिनभाव बोलते कदी असा? ते शरद पवारजी कदी बोलते असा? मग हेलाच काय होतो असा की, हे इतके ऊंच पट्टीमदी बोलते?

आम्हाला स्वतःला देवेंद्रजी फार आवडतात. त्यांचा निष्पाप चेहरा बघून तर आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. परंतु, अजितदादा निष्पाप आहेत, या सर्टिफिकेटवर त्यांनी सही करायला नको होती. नमोजी आणि अमितजी यांनी अजितदादा यांना चांगले उपमुख्यमंत्रीपदाच्या अटकेत टाकले होते. देवेंद्रजींनी घाईघाईने सही करून त्यांना सोडले. ज्या क्षणी फाईलवर सही झाली, त्याक्षणी अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पळाले.

असे व्हायला नको होते, असे नमोजींना वाटणे साहजिक आहे. कारण शेवटी सगळ्या गोष्टींची जबाबदारी सर्वांत मोठ्या बॉसवर येऊन पडते. उदाहरणार्थ - शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले ते पहाऱ्याची जबाबदारी असलेल्या फुलादखानाने ढिसाळपणा केला म्हणून. पण आज लोक काय म्हणतात? शिवाजी महाराज औरंगजेबाला फसवून आग्र्यावरून सुटून आले. जणू काही औरंगजेब स्वतः पहाऱ्यावर बसला होता! अॅकच्युअलमध्ये औरंगजेब नाही तर फुलादखान गंडला होता, हे लोक लक्षात घेत नाहीत.

आता लोक अजितदादा प्रकरणात काय म्हणणार? शरद पवारजींनी मोदीजींना फसवून आपल्या पुतण्याची खोट्या आरोपातून सुटका करून घेतली. हो खोट्या आरोपातून असे म्हणावेच लागणार. कारण अजितदादांवरचे आरोप खरे असते तर आमच्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदासाठीच काय पण इंद्रपदासाठीसुद्धा कुणाची सुटका केली नसती. देवेंद्रजी सत्तेसाठी असला पाजीपणा नक्कीच करणार नाहीत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. अजिबात भ्रष्ट नाहियेत ते!

असो. झाले ते चांगलेच झाले. अजितदादांसारखा एक निष्पाप आणि स्वच्छ माणूस भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपातून देवेंद्रजींच्या कृपेने सुटला. असो.

आमच्या आणि नमोजींच्या चर्चा अशाच भरकटत जातात. नमोजींना मनमोकळेपणे दुसरीकडे कुठे बोलताच येत नाही. त्यामुळे आमच्या गप्पांमध्ये बोलण्याच्या ओघात एखादा मुद्दा भरकटला तरी आम्ही नमोजींना अडवत नाही. आणि अर्थातच नमोजीसुद्धा  आम्हाला अडवत नाहीत.

आमच्या डोक्यात असे सगळे विचार येत असतानाच नमोजी एकदम बोलू लागले…

नमोजी - देवेंदरमदी अजूनबी भक्तलोकचा थोडा अंश बाकी छे. नेतेलोकला भक्त जेवो राहून कसा चालेल? भक्त जेवो रहना है तो फोलोअर बनो. तिथे काय भेजाचा काम नसते.

आम्ही - जाने दीजीए सरजी. देवेंद्र डिकरा एक अच्छा माणस छे.

नमोजी - (विषय बदलत) परसो एक स्वप्न आला मला. हूं सत्ता नू वाघ पर सवार हतो. एक हाथमा सीबीआयचा नाग अने दुसरामा ईडीचा नाग. हे दोन चाबुकनी साथे हूं सत्ता नू वाघ पर सवार हतो. थोडी देर पछी मी मागे बगितला तर मागे मात्र भक्त लोग. बाकी कोणच नथी.

आम्ही - माय गोड!

नमोजी - हूं घबराईने जागी गयो.

नमोजींच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते वेदना दिसत होती. ते बघून आमच्याही पोटात थोडे कालवले. या भक्तलोकांमुळे नमोजींना घाबरून उठावे लागावे ना!

नमोजी - मैं हिंदूराष्ट्र बनावानू शरू कर्यूम अने हे काय घडला? मी हिंदू जागा होयाला पाहिजे म्हणूनसाठी प्रयत्न केला अने रिझल्ट काय आली तर भक्तलोग माजे खांद्यावरती आपना सर ठेवूनसी सोई गयो? जो सो जाता हैं, गुलाम बन जाता हैं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नमोजींनी खाडकन फोन ठेवून दिला. लाखो भक्तांच्या जड डोक्यांचा भार नमोजींना आपल्या खांद्यावर जाणवला असावा. नमोजी मनामधून डिस्टर्ब झाले की, अचानक फोन ठेवून देतात. इतक्या वर्षांची सवय आहे त्यांची! या मोठ्या लोकांना अशा सवयी असतातच. काय करणार? त्यांना सांभाळून घ्यायला आमच्यासारखा एखादा दर्जेदार मित्र असावाच लागतो, हेच खरे! नाही तर ते खरी खरी ‘मन की बात’ कोणाशी करणार?

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......