“देव ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीनुरूप इतकी बदलत जाणारी आहे की, या प्रश्नाचे फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ या शब्दांत उत्तर देणे दिशाभूल करणारे असेल” - जयंत नारळीकर
संकीर्ण - मुलाखत
पी. ए. कृष्णन
  • खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Mon , 12 April 2021
  • संकीर्णमुलाखतजयंत नारळीकर jayant Narlikar देव अण्वस्र स्टिफन हॉकिंग

उत्तरार्ध

कृष्णन : तुमच्या ‘Seven Wonders of the Cosmos’ या पुस्तकात तुम्ही भगवदगीतेमधली एक गोष्ट सांगता. त्यात असं म्हटलय की प्रत्येक व्यक्तीसाठी काळ जाण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतोकाही जणांसाठी हे एवढेच असं म्हणायला पुरेसे आहे की, आमच्या पूर्वजांना आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताचे ज्ञान होते. तामिळ काव्यजीवक चिंतामणीमध्ये एक कविता आहे आणि तिच्यात आकाशातील एक रथ आहे, ज्याला कोणीही चालक नाही. हे वाचून तामिळबुद्धिवंतअसा दावा करतील की, तामिळ लोकांना अत्याधुनिक विमानशास्त्राचे ज्ञान होते. आपल्या पुराणांमधील एकमेकांविरोधात वापरले जाणारे हेच त्यांचे अस्त्र असते. सर्वसामान्य लोकांना याचे लोकशिक्षण कसे देता येईल?

नारळीकर : प्रत्येक पारंपरिक समाजाचे एक अपयश असते. ते हे विसरतात की, कल्पना करणे एक गोष्ट आहे आणि वैज्ञानिक शोध लावणे आणि कल्पनाशक्तीने नियम तयार करणे ही दुसरी गोष्ट आहे. पृथ्वी चंद्राला आकर्षित करते एवढेच म्हणणे पुरेसे नाही. यासाठी वैज्ञानिक तत्त्वावर आधारित विधान करण्यासाठी गणिती सिद्धांत सादर करणे आवश्यक आहे. कोणताही वैज्ञानिक शोध हा अचानक लागत नाही. शास्त्रज्ञांच्या अनेक पिढ्यांचा वेळ घेऊ शकणाऱ्या दीर्घ प्रक्रियेचे ते फलित असते. उदाहरणार्थ विमान घ्या. योग्य त्या इंधनाशिवाय, कमी वजनाच्या धातूशिवाय किंवा वायूगतीशास्त्र पुरेसे समजावून घेतल्याशिवाय ते वास्तवात येऊ शकले नसते.

कृष्णन : एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात अनेक भौतिकशास्त्रज्ञांना असं तीव्रतेने वाटत होतं की, भौतिकशास्त्राचा शेवट आता जवळ आला आहे. त्यानंतर प्लॅन्क आले. काही वर्षांपूर्वी फुकुयामा यांनीइतिहासाचा अंत याबद्दल मांडणी केली. ज्ञानाची अशी मांडणी करणं कधी थांबेल का?

नारळीकर : खुद्द हॉकिंग यांनी भौतिकशास्त्राच्या अंताबद्दल विधान केलं होतं. प्रत्येकाला असंच वाटतं की, त्यांच्या आयुष्यात अंतिम उत्तर सापडेल. ज्ञानाच्या कोणत्याही शाखेला मर्यादित अंत कधीही नसतो.

कृष्णन : विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी तुमच्या योजना काय आहेत? मी असं ऐकलं आहे की, जर कुणी शालेय विद्यार्थ्याने तुम्हाला पोस्टकार्डवर लिहून विज्ञानविषयक प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तुम्ही  स्वतः देता?

नारळीकर : हो, मला खूप पोस्टकार्डस येतात. मराठीत मी ‘सफर विश्वाची’ नावाचे एक पुस्तक लिहिले. नेहरू सेंटर, मुंबई यांनी त्याच्या १००० प्रति काढल्या आणि गावोगावी वाटून टाकल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले पुस्तक वाचत आहेत आणि प्रश्न विचारत आहेत. आजपर्यंत जवळपास १५ हजार प्रश्न विचारले गेले आहेत.

कृष्णन : हे फारच छान आहे. तुमचे पुस्तक इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित व्हायला हवीत.

नारळीकर : तुम्ही जर तामिळमध्ये करणाऱ्या कुणाला शोधू शकला तर मी त्याचा नक्की विचार करील. (हास्य)

कृष्णन : भारतातील शिक्षण हे अधिकाधिक प्रमाणात अधोगतीच्या दिशेने जात आहे. काही अपवाद वगळता, आजकालची विद्यापीठे रोजगाराला पात्र होऊ शकणारी पदवीधर तयार करत आहेत. ग्रामीण शाळांतील शिक्षकानाही अनेकदा पुरेसे ज्ञान नसते. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांतील शाळांतील दरी कधीही भरून येण्याएवढी प्रचंड वाढली आहे. हे आपल्याला कसं थांबवता येईल?

नारळीकर : हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि संस्था या विद्यापीठाच्या जवळ आणणे होय. तेथे कार्यरत वैज्ञानिक हे विद्यार्थ्यांशी मोकळेपणे हितगुज करू शकले पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना मुक्तपणे त्यांच्या प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करण्याची मुभा असली पाहिजे. यामुळे दूरदृष्टीच्या अंगाने विद्यार्थ्यांना योग्य ती प्रेरणा मिळेल आणि आपल्याला चांगले शिक्षक मिळतील. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत शिक्षकांचे प्रशिक्षण करणे, योग्य मानधन देणे, सतत त्यांच्याबरोबर संवाद करणे आणि त्यांचे ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक आहे. हे राष्ट्रीय स्तरावर आणि १५ ते २५ वर्षे एवढे दीर्घकाळासाठी करणे गरजेचे आहे. याची फळे कदाचित आपल्या नातवंडांना मिळतील. पण यासाठी आज सुरुवात केली पाहिजे. निसंदेहपणे शिक्षण हे रोजगारासाठी जोडले गेले आहे. लोकांना जगण्याचे साधन न देता त्यांना केवळ शिक्षित करणे हा निरंतर उपाय नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कृष्णन : आपल्याकडे असा एक सर्वसाधारण समज आहे की, आपल्या विद्यापीठांत गुणवत्तेला मारले जाते किंवा तिची प्रगती कुंठवणारे वातावरण आहे. ही व्यवस्था अशा रीतीने तयार केलेली आहे की, तुलनेने कमी क्षमतेच्या लोकांची शैक्षणिक पायऱ्यांवर प्रगती होते. याबद्दल तुम्हाला काय वाटते? प्रतिष्ठेच्या अकादमि नियतकालिकांमध्ये भारतीय लोकांचे संशोधन लेख प्रकाशित होत नाहीत, यामागे काय कारण असेल?

नारळीकर : हे होते कारण शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्था गुणवत्तेची दखल न घेता, बढती किंवा प्रोत्साहन देण्यासाठी नोकरशाहीची पद्धत अवलंबतात. ते अति-सुरक्षित वातावरणात वाढतात. ज्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांनी ही व्यवस्था स्वीकारली आहे. त्यांनी नोकरशाहीच्या विळख्यापासून दूर राहिले पाहिजे, परंतु जर असं केलं तर याला विरोध करणारी हीच मंडळी असतील. कारण काही न करता ते खुश आहेत आणि सध्याची व्यवस्था चालू राहण्यात त्यांचे हित सामावले आहे.

कृष्णन : विद्यार्थी हे महाविद्यालयीन पातळीवरील इंग्रजीच्या ज्ञानाने समाधानी आहेत. त्यांना हे माहीत नाही की, इंग्रजी साहित्याच्या जगामुळे किती आनंद मिळू शकतो. तुम्हाला हे वाटत नाही का की, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण दिलं पाहिजे? वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनासुद्धा?

नारळीकर : भाषिक कौशल्ये ही विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा महत्त्वाची आहेत, याबद्दल मी सहमत आहे. हे साध्य करण्यासाठी त्या त्या भाषेतील साहित्य अभ्यासणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण आणि एकात्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. अगदी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सुद्धा.

कृष्णन : तुम्ही शाळेत असताना शिक्षणाचे माध्यम कोणते होते?

नारळीकर : हिंदी.

कृष्णन : तुम्हाला यामुळे कधी नुकसान झाले का?

नारळीकर : नाही, अजिबात नाही.

कृष्णन : शाळेमध्ये माझे शिक्षणाचे माध्यम तामिळ होते. कोणत्याही अर्थाने ते नुकसानदायक नव्हते. त्या दृष्टीने मला माझ्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडून घेता आले आणि त्याचा मला आजही अभिमान आहे. पण आज सगळीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. तामिळनाडू सरकार प्राथमिक पातळीवर तामिळचा शिक्षणाची माध्यम भाषा म्हणून आग्रह धरताना दिसत नाही. ही निश्चितच समाधानाची बाब नाही. यामुळे मुलं अकार्यक्षम आणि परावलंबी बनतील. महाराष्ट्रात काय स्थिती आहे? तेथे मराठीची हेळसांड होत आहे का?

नारळीकर : महाराष्ट्रात दुर्दैवाने परिस्थिती तशीच आहे. आता कनिष्ठ-मध्यमवर्गीय वर्गातील पालकसुद्धा आता त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचं म्हणून धडपडत आहेत. यापैकी बहुतांश शाळांमध्ये बनावट पदव्या घेतलेले आणि इंग्रजी येत नसलेले शिक्षक आहेत. पण यासाठी समाजाच्या नेतृत्त्वाला जबाबदार ठरवलं पाहिजे. माझ्या पालकांचे असं ठाम मत होते की, मी हिंदी माध्यमात शिकावे. त्यांना आपल्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान होता. आपल्या संस्कृतीमधील उच्च तत्त्वे अंगी बाणवून घ्यावीत यासाठी पालक आग्रही होते. आज आपला हा आग्रह मोडून पडल्यामुळे मुलांना त्याचा त्रास होत आहे. इंग्रजी ही आपली द्वितीय स्तरावरील भाषा असायला पाहिजे. माझ्या मनात कोणतीही शंका नाही की, शिक्षणासाठी मातृभाषा सर्वोत्तम आहे. मी असेही म्हणेन की परक्यांच्या भाषा आपल्या कल्पनाशक्तीला रोखून धरतात. 

कृष्णन : तुमचा देवावर विश्वास आहे का?

नारळीकर : देव ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीनुरूप इतकी बदलत जाणारी आहे की, या प्रश्नाचे फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ या शब्दांत उत्तर देणे दिशाभूल करणारे असेल. विश्व किती उत्तम रीतीने चाललेलं आहे, याचे पुरावे सादर करून वैज्ञानिकांनी देवाचे अस्तित्व सिद्ध करावे असे आपले म्हणणे आहे का? विज्ञानाचे नियम का लागतात, हे समजून घ्यायला वैज्ञानिकाला देवाची मदत होते का? माझ्या मते वरील प्रश्न वैज्ञानिकाला -  तो वैज्ञानिक आहेत म्हणून विचारणे - अन्यायकारक ठरेल.

‘हे जग विज्ञानाच्या नियमांनुसार का चालते?’ किंवा ‘कोणी ठरवलं की याच नियमांनी चालेल आणि इतर कोणत्या नियमांनी नाही?’ असे प्रश्न विज्ञानाच्या कक्षेच्या बाहेरचे आहेत.

या प्रश्नांना फक्त ‘देव’ असं उत्तर दिल्याने आपण फार काही मोठी मजल मारत नाही. निसर्गाचे काही मूलभूत नियम आहेत आणि ते शोधून काढणे हेच विज्ञानाचे जाहीर उदिष्ट आहे, हा विश्वास वैज्ञानिकाला असतो आणि तोच त्याला/तिला कार्यरत ठेवतो. हे वगळता इतर कोणत्याही ‘देव आहे का?’ वगैरे अशा कोणत्याही श्रद्धा आणि विश्वासविषयक प्रश्नांची उत्तरे एखादा वैज्ञानिक, वैज्ञानिकाच्या भूमिकेतून नाही तर  माणूस म्हणून देऊ शकेल.

आईन्स्टाईन म्हणायचे : “सत्य संकल्पनेमध्ये धर्म आणि विज्ञान यांच्यातील झगडा अस्तित्वात असू शकत नाही, हे जरी मी मान्य केले, तरी जेव्हा ऐतिहासिक धर्मांमध्ये सांगितलेल्या सत्याचा संदर्भ देण्याचा मोक्याचा क्षण जेव्हा येईल तेव्हासुद्धा ही हेच पुन्हा ठामपणाने आणि स्पष्टीकरण देऊन सांगितले पाहिजे. हे स्पष्टीकरण देवाच्या संकल्पनेबद्दल आहे.

मानवजातीच्या अध्यात्मिक उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या उत्साही कालखंडात, मानवाने त्याची रम्य कल्पनाशक्ती वापरून त्याच्यासारख्याच दिसणार्‍या देवाची निर्मिती केली, जो हे अभूतपूर्व जग स्वत:च्या इच्छेनुसार चालवेल, त्याचे नियंत्रण करेल आणि काहीही करून त्याच्यावर आपला प्रभाव टाकेल. जादू आणि प्रार्थनेच्या माध्यमातून देवाचा स्वभाव आपल्या ताब्यात ठेवण्याचे मार्ग मानवाने शोधून काढले. आज धर्मांमध्ये शिकवली जाणारी देवाची संकल्पना ही जुन्या काळातील देवाच्या संकल्पनांचे मिश्रण आहे. मानव देवाला आवाहन करताना प्रार्थना करतो आणि स्वत:च्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वत:ची वकिलीही करतो. अशा वेळी आपल्याला त्याचे मानववंशशास्त्रीय दर्शन होते.

साधे रोजचेच उदाहरण पहा. महाविद्यालयात शिकणारा एखादा ‘अ’ विद्यार्थी  दररोज अभ्यास करत नाहीत आणि जशीजशी परीक्षा जवळ येते, तेव्हा त्याला जाणीव होते की, त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी लागतील तेवढे गुण तो मिळवू शकत नाही. मग तो विद्यार्थी ‘अ’ मंदिरामध्ये जातो आणि अधिक गुण मिळण्यासाठी तेथील देवाला काहीतरी अर्पण करतो किंवा नवस करतो.

विद्यार्थी ‘ब’लासुद्धा अशीच भीती आहे परंतु तो अधिक व्यावहारिक आहे. तो परीक्षक कोण असणार आहेत, हे शोधून काढतो आणि त्यांना गाठून लाच देतो. त्यामुळे कदाचित त्याला जास्त गुण मिळतील.

‘अ’ विद्यार्थ्यांच्या देवाच्या नैतिकतेबद्दलच्या अपेक्षा आणि ‘ब’च्या परीक्षकांकडून असलेल्या अपेक्षा, यात काही फरक आहे का? जर देव खरंच  ‘अ’च्या अपेक्षा पूर्ण करत असेल तर ज्याने परीक्षेसाठी मेहनत घेऊन तयारी केली आहे. अशा ‘क’ या विद्यार्थ्याशी अन्याय करत नाही हे कशावरून? ‘अ’ आणि ‘क’ला सारखेच गुण का मिळावेत?”

या प्रकारच्या ‘देवा’बद्दल आईनस्टाईनचे काही आक्षेप होते, तो म्हणतो- ‘देव नैतिक की अनैतिक’, या झगड्यामध्ये धर्मगुरूंचे मन इतके मोठे असावे की त्यांनी वैयक्तिक देवाच्या संकल्पानेला थारा देऊ नये. म्हणजेच लोकांच्या भीती आणि आशा यांना नियंत्रित करणारी जी अमर्याद शक्ती भूतकाळापासून धर्मोपदेशकांकडे आहे तिलाच फाटा द्यावा.

खरं तर त्याला अशी आशा होती की, विश्वाच्या नियमितपणामागील सत्याचा शोध अतिशय सूक्ष्मस्तरापासून ते मोठ्यापातळीवर घेण्यासाठी धर्म विज्ञानाच्या मदतीला धावून येईल. निसर्गातील क्रियांचा तार्किकतेने अभ्यास करूनच आपल्याला विश्वातील गूढ सत्यांचा शोध घ्यावा लागेल

आपल्याला आलेला प्रत्येक अनुभव आपण वैज्ञानिक माहितीच्या नियमिततेमध्ये बांधू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत विचारांना पूर्णपणे दुर्लक्षिता येणार नाही. या शतकातील आणखीन एक महान विचारवंत रवींद्रनाथ टागोर यांनी ‘पाऊस आला आणि पानगळ झाली’ या अनुभवाचे केलेले वर्णन पहा - “अखेर मी एका अशा जगात आलो जेथे मला माझा संपूर्ण अर्थ गवसला. माझ्या मनाने एका सर्जनशील अभिव्यक्तीच्या पटलाला स्पर्श केला. पावसाने झोडपलेल्या पानांच्या नादमय चित्रांनी जे जग माझ्या मनाला दाखवले, त्यात केवळ माहिती नव्हती. त्यात माझा स्वतःबरोबर केलेला संवाद होता. माझ्या जीवनात जे अर्थहीन तुकडे होते ते उडून गेले आणि माझी दृष्टी स्पष्ट आणि स्वच्छ झाली. मला खात्री आहे की मला आणि माझ्या जगाला समजून घेईल अशी कोणीतरी व्यक्ती माझ्या सर्व अनुभवांमध्ये व्यक्त होण्यासाठी जागा शोधत आहे. या सर्वांचे एकत्रीकरण होऊन माझे व्यक्तिमत्त्व बनते. असे व्यक्तिमत्व एक अध्यात्मिक कलाकृतीच आहे.”

या उदाहरणांवरून प्रश्नाच्या विविध कंगोऱ्यांचा अंदाज आपल्याला येतो, परंतु अंतिम उत्तर मिळत नाही. म्हणून जेव्हा मला कोणी विचारतं की, ‘एक वैज्ञानिक म्हणून तुम्ही देवावर विश्वास ठेवता का?’ तेव्हा  उत्तर देण्यासाठी हा खूप अवघड प्रश्न आहे. मी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर ते दिशाभूल करणारे असेल. देव संकल्पनेबाबत तुमची जी आकलनशक्ती आहे, त्यानुसार तुम्ही माझ्या उत्तराचा अर्थ लावायला जाल तर ते अगदीच वेगळे असू शकते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कृष्णन : तुम्ही जगातील १५०० अशा वैज्ञानिकांमध्ये होता, ज्यांनी मानवतेविरुद्ध असलेल्या धोक्यांबद्दल एका निवेदनावर हस्ताक्षर केले होते. पर्यावरणाचा विनाश थांबवण्याचे अपील करणारे हे निवेदन होते. पण याला दुसरी एक बाजूसुद्धा आहे. तुम्ही भारताच्या अण्वस्त्रांचेसुद्धा समर्थक आहात असे आम्हाला कळले. पर्यावरणाचे संरक्षण आणि अण्वस्त्रांचे समर्थन हा विरोधाभास नाही का?

नारळीकर : मला ते समजावून सांगू द्या. मी सर्व प्रकारच्या अण्वस्त्रांचा विरोधातच आहे. तुम्ही म्हणत असलेल्या पर्यावरण रक्षणाच्या समर्थनार्थ मी सही केलेल्या ओळींवर व भूमिकेवर मी ठाम आहे. पोखरण नंतर मी असं म्हणालो होतो की, पोखरण स्फोट करणे ही एक मोठी वैज्ञानिक उपलब्धी होती. या शब्दांना वेगळं वळण देऊन असं म्हणता येणार नाही की, मी अण्वस्त्रांचा समर्थक आहे. माझे अभिनंदन बॉम्ब बनवण्याचा राजकीय निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी नव्हते, तर ते वैज्ञानिक चाचणी सफल केल्याबद्दल वैज्ञानिकांसाठी होते.

कृष्णन : तुम्ही, बाबा आमटे आणि अरुंधती रॉय यांच्याबरोबर सरदार सरोवर प्रकल्पाबद्दल आणि त्याने विस्थापित झालेल्या लोकांबद्दल एक याचिका तयार केली गेली. ही याचिका दुर्लक्षित गेली. शहरी भारतातील नागरिक या प्रकारच्या घटनांबद्दल अनभिज्ञ असतात. अलीकडेच दिल्लीच्या ,००,००० मजुरांना नाहक नोकरी सोडावी लागली. देशातील श्रीमंत हे लाखो भारतीयांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. या सगळ्याचा अर्थ काय?

नारळीकर : मला माहीत नाही की, या याचिका किती प्रभावी असतात. पण फक्त या याचिकेच्या काही अपेक्षित साध्य होणार नाही, अशा गृहीतकाच्या आधारे एखाद्याने अशा याचिका सही करण्यापासून दूर पळू नये. या प्रकारच्या बाबींमध्ये प्रत्येक छोट्या पावलाने केलेल्या योगदानाचे महत्त्व आहे. हो. खरेच शहरी भारत या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करतो आणि त्यात कडी म्हणजे शहरी श्रीमंत शहरी गरिबाला मदत करत नाहीत. ज्यांना वाटते की, गरिबांच्या वेदना ऐकल्या गेल्या पाहिजेत, त्यांनी यामागील कारणांवर जरूर लक्ष घालावे. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कृष्णन : तुम्ही साहित्य मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन ही भाषांत लिहिले आहे. तुमचा अनुभव कसा राहिला?

नारळीकर : तो खूपच आनंददायी अनुभव होता.  तो खूप समाधानकारक अनुभव होता. मला त्यावर चर्चा करायला वेळ नाही.

कृष्णन : संस्कृत भाषेतील सर्वात आवडता कवी कोणता?

नारळीकर : नि:संदेह कालिदास! त्यांच्या ‘रघुवंशम’ आणि त्यानंतरचे ‘शाकुंतल’ या माझ्या आवडत्या कृती होत्या. 

कृष्णन : मी अलीकडे तुमचे ‘Seven Wonders of the Cosmos’ हे पुस्तक वाचले. ते खूपच सुंदर आहे. वैज्ञानिक लेखनाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड करता सोप्या भाषेमध्ये आशय व्यक्त केला आहे.

नारळीकर : मी तुम्हाला या बाबतीत काही रंजक माहिती सांगतो. माझे पुस्तक ‘Cosmic Adventure’ हे प्रथम सर्वप्रथम मराठीत आले होते. नंतर ते इंग्रजीमध्ये आले. जेव्हा मी महाराष्ट्रातील लोकांशी विज्ञान विषयांवर संवाद साधतो, तेव्हा सामान्य लोकांशी मराठीमध्ये बोलतो. जेव्हा उत्तरेत असतो तेव्हा हिंदीमध्ये बोलतो.

कृष्णन : संत ऑगस्टीनचे एक उद्गार नेहमी सांगितले जाते – ‘मी काळाचा भाग आहे, मी काळाबद्दल बोलतो. परंतु सध्या कोणता काळ चालला आहे हे मला माहीत नाही’. मानवजातीला काळ म्हणजे नक्की काय हे कधी कळेल का?

नारळीकर : मला नाही वाटत, ते कधी कळेल असं. 

..................................................................................................................................................................

ही मूळ इंग्रजी मुलाखत पी. ए. कृष्णन यांच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. ती पाहण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मराठी भाषांतर  

कृतार्थ शेवगावकर (अभिनेता, अनुवादक)

shevgaonkarkrutarth@gmail.com

राहुल माने (विज्ञान-तंत्रज्ञान आणि समाज-संस्कृती विषयक लेखक, संवादक)

creativityindian@gmail.com)

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Tejas Shiral

Wed , 28 April 2021

वाचनीय...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......