अजूनकाही
हार्दिक पटेल यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतरचे कवित्व
चार दशकांच्या पत्रकारितेत काही पंतप्रधानांना जवळून, तर काही लांबून पाहता आलं, मात्र सच्चा, साधा, नम्र आणि सुसंस्कृत पंतप्रधान केवळ डॉ. मनमोहनसिंग हेच एकमेव. सुसंस्कृतपणाची साधना त्यांच्याकडे होती. देशाच्या आर्थिक धोरणांचा शिल्पकार, उच्चविद्याविभूषित, आर्थिक विद्वान, सुसंस्कृत म्हणून डॉ.मनमोहनसिंग कायम स्मरणात राहतील. असे उच्च विद्याविभूषित, अर्थतज्ज्ञ, सुसंस्कृत नेते समकालात किती आहेत?.......
लख्ख गोरा वर्ण, सहा फुटाच्या जवळ पोहोचणारी शरीरयष्टी, मस्तपैकी ‘कलावंतीय’ अस्ताव्यस्त डोईवरचे केस, चष्म्याआडचे डोळे उत्सुकतेनं भरलेले, समोरच्याशी बोलताना प्रतिक्रिया म्हणून चेहऱ्यावरचे सतत बदलणारे भाव, ‘मेलोडियस’ म्हणता येईल, अशी वाणी, स्वभाव गप्पिष्ट आणि अत्यंत टीपटाप कपडे. कपड्यांची निवड चोखंदळ... सप्रे यांना मी कधीच चुरगाळल्या-मुरगाळल्या कपड्यांत बघितलंच नाही.......
लोक नेहमी असे विचारतात, प्रेमाच्या विज्ञानाचे एवढे सगळे ज्ञान झालेल्या या फिशरबाईंना प्रेमाने तर नाही बिघडवले? प्रेमाची इंगळी तर नाही त्यांना डसली? त्यावर फिशरबाईंचे उत्तर होते जवळपास नाहीच! तुम्हाला चॉकलेट केकमध्ये कोणकोणते घटक पदार्थ असतात, हे नेमकेपणाने ठाऊक असते, पण जेव्हा तुम्ही तो केक खाता, तेव्हा फक्त मौज असते. आनंद असतो. टिकाऊ प्रेमाची खरी किल्ली, आयुष्यभर प्रणयभावना जपण्यातच असते.......
धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......
ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......
तथाकथित वृत्तपत्राचा आणि सेना, ब्रिगेड, संघटना यांचा घाटातल्या धबधब्यातला इन्ट्रेस्ट आता संपला आहे. मध्यवर्ती सरकारने घेतलेल्या कुठल्याशा महत्त्वाच्या, दूरगामी, कदाचित आत्मघाती निर्णयावर देशभर चालू झालेल्या चर्चा, निदर्शने, निषेध, आंदोलने इ. मध्ये आता त्यांनी उडी घेतली आहे. तीन हवालदार अजूनही निलंबित आहेत, चौकशीचा फेरा अजून थांबलेला नाही. पावसाळा संपल्यामुळे आता धबधब्याची तब्येतही खालावली आहे.......
भारत हा महाप्रचंड देश आहे. येथे सगळ्यांना सामोपचारानेच बरोबर घेऊन जावे लागते, हा धडा मोदीजी विसरले होते. कुणाच्याही टाचेखाली यावा, इतका ‘अनाडी भारत’ आता राहिला नव्हता! ‘मी प्रधानसेवक आहे’, असं म्हणणाऱ्या माणसाची मजल ‘ईश्वरीय ऊर्जा माझ्यामधून काम करते’, असं म्हणण्यापर्यंत गेली होती. परंतु भारतीय जनता फसली नाही.......
...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......
मोदीजी आणि विरोधी पक्ष असे दोघेही निशीसारख्या लोकांची मतं आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न करणार होते. कुठल्याच बाबतीत निश्चित मत नसलेले निशीसारखे लोक त्या निवडणुकीचा निकाल ठरवणार होते. ते काय ठरवणार आहेत, याचा त्यांनाच पत्ता नव्हता. त्यामुळे तो इतर कुणाला लागायची काहीच शक्यता नव्हती. मोदी, मोदीभक्त, मोदी-विरोधक, दोन्ही बाजूंचे ‘ओपिनियन पोल्स’वाले असे सगळेच हवेत बोलत होते.......
सगळे पक्ष एक-दुसऱ्याला भ्रष्ट म्हणत होते आणि मूलतः स्वतः सत्तेवर आल्यावर तेच करत होते, हे ‘मोदीकालीन भारता’तील दारुण वास्तव होते. शिरोजीने फक्त भ्रष्टाचार हा विषय घेऊन बखर लिहिली नव्हती. भ्रष्टाचार या विषयात पुरावे मिळणं फार दुरापास्त असल्याने शिरोजी भ्रष्टाचारावर लिहीत नव्हता. परंतु इलेक्टोरेल बाँडचे भांडे फुटल्यावर त्याचाही नाइलाज झाला असणार.......
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment