सूर्य, पाऊस, झुकलेले आकाश, पर्वतराजी, महासागर, पाने-फुले, दगड, तारे आणि चांदणे हेच फक्त आहेत माझे असे आजकाल वाटू लागले आहे मला...
पडघम - महिला दिन विशेष
श्रीनिवास जोशी
  • माया अँजेलो
  • Mon , 08 March 2021
  • पडघम महिला दिन विशेष जागतिक महिला दिन International Women's Day माया अँजेलो Maya Angelou वुमन वर्क Woman Work

माया अँजेलो (१९२८-२०१४) ही स्त्री मनाची सगळी रूपे अत्यंत मनस्वीपणाने मांडणारी कवयित्री. क्लब डान्सर, सेक्स वर्कर, हॉटेलात कुक इथपासून सगळी कामं या आफ्रिकन-अमेरिकन कवयित्रीला करावी लागली. हे सर्व भोग भोगत असताना तिने आपली संवेदना प्राणपणाने जपली. ती मनस्वी कविता लिहीत राहिली. आपल्या कर्तृतवाने पुढे ती अमेरिकेची सगळ्यात लाडकी कवयित्री झाली. तिने ब्रॉडवेसाठी नाटके लिहिली, हॉलिवुडसाठी सिनेमे लिहिले. अमेरिकेचा सर्वोच्च बहुमान - प्रेसिडेन्शियल गोल्ड मेडल - तिला मिळाला. जगभराच्या विद्यापीठांकडून ५० ऑनररी डॉक्टरेटस् तिला मिळाल्या. जगभरातील स्त्रीवादी चळवळीची ती स्फूर्तिस्थान ठरली.

‘Woman Work’ ही तिची एक अत्यंत मनस्वी कविता. त्या कवितेचा मुक्त अनुवाद आजच्या ‘जागतिक स्त्री-दिना’निमित्त...

..................................................................................................................................................................

वुमन वर्क

मला आवरायचेय पोरांचे...

नंतर

घालायच्यात घड्या कपडयांच्या...

धुवायचीय फरशी त्यानंतर

आणि आणायचाय किराणाही...

करायचाय स्वयंपाक नंतर

आणि आंघोळही घालायचीय बाळाला...

घालायचेय जेऊ सगळ्यांना

आणि वेचायचे आहेत तण बागेतले...

इस्त्र्या करायच्यात शर्टांना

आणि झबली घालायचीत बाळांना...

त्यानंतर सोडवायचेत पुडे

भरायच्यात बरण्या

नंतर आवरायचेय उरलेले घर...

...आणि ह्या रगाड्यात काढायची आहेत आजारपणेही एकेक करून, जशी अंगावर येतील तशी...

आणि हे सर्व झाल्यानंतर

जायचे आहे शेतात कापूस वेचायला...

 

हे सूर्य प्रकाशा

उतरून ये अंगावर माझ्या...

हे पावसा

उतरून ये शरीरावर माझ्या...

हे दवबिंदुंनो उतरून या अलगद

माझ्या कपाळावर...

...आणि पुसून टाका...

हा रामरगाडा एकट्याने ओढताना

माझ्या कपाळावर उमटलेल्या माझ्या एकटेपणाच्या दुखऱ्या आठ्या...

 

हे झंझावता तुझ्या तीव्र आवर्तात उचल मला इथून आणि फिरवून आण मला आकाशभरातून...

माझे मन शांत होईपर्यंत परत एकदा...

 

हिमफुलांनो उतरून अलगद माझ्यावर...

भरून टाका माझे सर्वांग

तुमच्या शुभ्र-धवल ओठांच्या चुंबनांनी...

..म्हणजे मिळेल विश्रांती मला रात्रभर...

 

सूर्य, पाऊस, झुकलेले आकाश, पर्वतराजी, महासागर, पाने-फुले, दगड, तारे आणि चांदणे

हेच फक्त आहेत माझे

असे आजकाल वाटू लागले आहे मला....

भाषांतर - श्रीनिवास जोशी

..................................................................................................................................................................

मूळ इंग्रजी कविता

Woman Work

I've got the children to tend

The clothes to mend

The floor to mop

The food to shop

Then the chicken to fry

The baby to dry

I got company to feed

The garden to weed

I've got shirts to press

The tots to dress

The can to be cut

I gotta clean up this hut

Then see about the sick

And the cotton to pick.

 

Shine on me, sunshine

Rain on me, rain

Fall softly, dewdrops

And cool my brow again.

 

Storm, blow me from here

With your fiercest wind

Let me float across the sky

'Til I can rest again.

 

Fall gently, snowflakes

Cover me with white

Cold icy kisses and

Let me rest tonight.

 

Sun, rain, curving sky

Mountain, oceans, leaf and stone

Star shine, moon glow

You're all that I can call my own.

..................................................................................................................................................................

अनुवादक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......