आई मुलीची पहिली मैत्रीण असते, तसं वडिलांना आपल्या मुलाचा चांगला मित्र का होता येत नाही?
पडघम - महिला दिन विशेष
स्नेहल भालेराव
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 08 March 2021
  • पडघम महिला दिन विशेष जागतिक महिला दिन International Women's Day मुलगा Boy मुलगी Girl पालक Parents लैंगिक शिक्षण Sex Education

आपल्याकडे स्त्री-पुरुष नातेसंबंध, आकर्षण याबद्दल फारसं बोललं जात नाही. वयात येणाऱ्या मुलींच्या प्रश्नावर अनेक लेखिका-लेखक वर्तमानपत्रं व सोशल मीडिया यांत लिहितात. मात्र वयात येणाऱ्या मुलांबद्दल अजूनही फारसं लिहिलं जात नाही.

पालकांना मुली वयात आल्याची जाणीव होते, पण मुलंही वयात येतात याचं भान नसतं. समाजात वावरताना वयात येणाऱ्या मुलांना कितपत जबाबदारीची जाणीव करून दिली जाते? आई-वडिलांचा मुलीबरोबर चांगला संवाद असतो, मात्र मुलांबरोबर तेवढाच मनमोकळा संवाद असतो का? आपल्या मुलाच्या बेजवाबदार वागण्यामुळे इतरांच्या जगण्यावर बंधनं येतात, याची जाणीव त्या मुलांच्या पालकांना असते का? या मुलांमुळे अनेक मुलींचं शिक्षण बंद होतं... बलात्कार, अँसिड हल्ले, हत्या यांसारख्या घटना घडतात...

मोबाईल कोणत्या वयात वापरावा? कसा वापरावा? त्यावर काय बघावं? ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे. आता करोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झालं आहे. त्यामुळे कमी वयात मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत. केंद्र सरकारने काही पॉर्न साईट बॅन केल्या असल्या तरी शेकडो नवीन साईट्स निर्माण झालेल्या आहेत. या वयात येणाऱ्या मुलांचा माहितीचा स्रोत म्हणजे या पॉर्न साईट्स.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आपल्याकडे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ याची नेहमी चर्चा होते. मात्र हे वरीस कोणासाठी धोक्याचं, याचं उत्तर मात्र सहसा दिलं जात नाही. मुलं १६ वर्षांची झाली म्हणून पालकांना धोका की मुलांना? मुलं वयात आली की, खरी कसोटी असते ती पालकांचीच. मात्र आपल्याकडे मुलांच्या वयात येण्याला गांभीर्यानं घेतलं जात नाही. पालकांचं कर्तव्य म्हणजे पालनपोषण आणि शिक्षण एवढाचं अर्थ घेतला जातो. पण त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी कितपत प्रयत्न केले जातात? त्यांच्या निरागस प्रश्नांना आगाऊपणा, शेफारला, उद्धटपणा, बेअक्कल अशी बिरुदावली लावून गप्प बसवलं जातं. अशा वेळी मुलं या प्रश्नाची उत्तरं स्वतः शोधतात. 

मला एका १० वर्षांच्या मुलानं प्रश्न विचारला होता -‘बाळ कधी होतं?’ त्याचा दुसरा प्रश्न होता - ‘लग्नाच्या अगोदर होतं का?’ मी त्याला रागावले नाही किंवा चेष्टा केली नाही म्हणून तो बराच वेळ माझ्याबरोबर गप्पा मारत होता. त्याच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की, जरी तो १० वर्षांचा असला तरी त्याच्यामध्ये वाढत्या वयासोबत हळूहळू एक प्रकारचं कुतूहल वाढत होतं.  

आपल्याकडे घर आणि शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात लिंगभेद रुजवला जातो. लहान मुला-मुलींना एकत्र येऊ दिलं जात नाही. त्यांना परिपाठ आणि क्लासमध्ये स्वतंत्र्य बैठक व्यवस्था, कवायती आणि खेळदेखील वेगवेगळे. त्यामुळे एकमेकांबद्दल आदर आणि मैत्री निर्माण होत नाही, विचार आणि भावना समजत नाहीत. यामुळे विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल न्यूनगंड वाढत जातो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मुलींना त्यांची मोठी बहीण, मैत्रिणी किंवा जास्त शिकलेली आई असेल तर समजावून सांगते. वयात आल्यावर होणारे बदल, त्यांना होणाऱ्या स्पर्शाचा अर्थ, कोणती काळजी घ्यायची, कशी घ्यायची इत्यादी. मात्र ही गोष्ट मुलांबाबत सहसा घडत नाही. वडील किंवा मोठा भाऊ मनमोकळेपणाने वयात आलेल्या मुलांशी बोलत नाहीत. मित्रांमध्ये होणाऱ्या चर्चा किंवा इतर स्रोताद्वारे मिळणारी माहिती त्यांना चुकीच्या मार्गानं घेऊन जाते.

शिक्षक, वडील, मोठा भाऊ यांनी मुलांना विश्वासात घेऊन काय चुकीचं काय बरोबर, हे सांगायला पाहिजे. चांगला संवाद ठेवल्यानं नात्यातील अंतर कमी होतं. ज्या प्रकारे आई मुलीची पहिली मैत्रीण असते, तसं वडिलांना आपल्या मुलाचा चांगला मित्र का होता येत नाही? मुलांना आई-वडिलांशी मैत्री का करावी वाटत नसावी, याचा विचार पालकांनी करायला हवा. मुलं वयात येणं हीसुद्धा खूप संवेदनशील गोष्ट आहे, याकडे सुद्धा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मुलगी वयात आली की, तिच्यातील अल्लडपणा कमी होतो, शरीर आणि मनानं स्वतःला आखडून घेते. त्या उलट मुलं वयात आले की, ‘सैराट’ बनतात. या वयात होणाऱ्या बदलांमुळे काही प्रमाणात मुलांमध्ये उद्धटपणा येतो. त्यांच्यामध्ये पुरुषी अहंकार वाढू लागतो. याला घर आणि समाजात असलेलं पुरुषी वर्चस्व, टीव्ही मालिका आणि चित्रपटांतून महिलांचं चुकीच्या पद्धतीनं केलं जाणारं चित्रणदेखील कारणीभूत आहे. 

‘मी कोण आहे’ - स्त्री आहे, पुरुष आहे की अजून कोण, याबद्दल मुलांना सांगायला हवं. समाज प्रत्येक कृतीमधून दाखवून देतो की, मर्द को दर्द नहीं होता. पण त्यांना सांगण्याची गरज आहे - ‘पुरुषालाही भावना असतात, त्यालाही रडू येतं. पुरुषपणाचं भान जपलं पाहिजे. तुझीही जबाबदारी आहे.

..................................................................................................................................................................

अ‍ॅड. स्नेहल भालेराव, अहमदनगर

snehalbhalerao1404@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......