वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन, विविध धर्माच्या आणि पंथाच्या धर्माधिकाऱ्यांना भेटून जुने पायंडे मोडण्याची पोप जॉन पॉल यांची परंपरा पोप फ्रान्सिस यांनी चालू ठेवली आहे
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • पोप फ्रान्सिस
  • Sat , 06 March 2021
  • पडघम माध्यमनामा पोप फ्रान्सिस Pope Francis पोप जॉन पॉल दुसरे Pope John Paul II मदर तेरेसा Mother Teresa जोसेफ वाझ Joseph Vaz

ही पाच वर्षांपूवीची घटना आहे. पुण्यातल्या सकाळ माध्यमसमूहाच्या ‘सकाळ टाइम्स’चे संपादक राहुल चंदावरकर यांच्याकडे पणजीतल्या ‘गोमंतक टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचीही अतिरिक्त जबाबदारी होती. त्यासाठी पहिल्यांदा ते पणजीला गेले, तेव्हा गोव्यातील माझे संबंध ध्यानात घेऊन मलाही सोबत घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर पोप फ्रान्सिस श्रीलंकेच्या दौऱ्यावर आले असून ते १४ जानेवारी २०१५ रोजी गोव्याचे सुपुत्र आणि श्रीलंकेतील एक प्रमुख मिशनरी फादर जोसेफ किंवा जुझे वाझ यांना संतपदाचा सन्मान देणार आहेत, ही बातमी समजली. या योगायोगामुळे माझ्यातील बातमीदाराचे हात शिवशिवायला लागले!

याचे एक कारण म्हणजे फादर जुझे वाझ यांच्याविषयी खूप वर्षांपासून ऐकत आलेली माहिती आणि गोव्यातील कोर्तालीम-वॉस्को रस्त्यावरील सांकवाल येथील त्यांच्या वाडवडिलोपार्जित घराशी असलेले माझे अनेक वर्षांपासूनचे घट्ट नाते. माझ्या बहिणीच्या होली  फॅमिली ऑफ नाझरेथ या सिस्टरांच्या संस्थेचे सांकवाल येथेच मुख्यालय आणि फादर वाझ यांच्या घराची देखभाल या सिस्टर्स करत असल्याने तिथे माझी १९८०च्या दशकापासून ये-जा होती. 

त्या दिवशी गोव्यातील वृत्तपत्रे चाळताना ‘नवहिंद टाइम्स’, ‘हेराल्ड’ वगैरे इंग्रजी दैनिकांनी गोव्याच्या या सुपुत्राचा होणाऱ्या या सन्मानाची बातमी पान एकवर आठ कॉलम लावली होती आणि आमच्या ‘गोमंतक टाइम्स’ने हीच बातमी आतल्या कुठल्यातरी पानावर घेतली होती. इतर मराठी दैनिकांत तर ही बातमी शोधावी लागत होती.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भारतातून वसईच्या गोन्सालो गार्सिया, केरळच्या सिस्टर अल्फान्सो, कोलकात्याच्या मदर तेरेसा यांना कॅथोलिक चर्चने यापूर्वी संतपदाचा सन्मान दिला असला तरी गोव्याच्या भूमिपुत्राला असा सन्मान पहिल्यांदाच मिळत होता. आणि पोपमहाशय त्यासाठी खास श्रीलंकेत आले होते. त्यामुळे भारतातील आणि आशियातील अनेक बिशप्स, धर्मगुरू आणि भाविक या समारंभासाठी आले होते.   

मी पत्रकारितेची कारकीर्द सुरू केलेल्या ‘नवहिंद टाइम्स’चा प्रतिस्पर्धी असलेल्या ‘हेराल्ड’ या दैनिकाने पणजीतला एक बातमीदार या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी श्रीलंकेत पाठवला होता, हे त्या बातमीदाराची पान एकवरची बातमी पाहून कळाले. मलासुद्धा आमच्या दैनिकाच्या वतीने हे वार्तांकन करण्यासाठी श्रीलंकेला जाता आले असते. त्यासाठी प्रयत्न करायला हवे होते असे वाटले. मात्र आता निदान गोव्यातूनच याच प्रसंगाची काही वेगळी बातमी करावी आणि त्यासाठी सांकवाल इथल्या फादर जोसेफ वाझ यांच्या घराला छायाचित्रकारासह मी भेट देतो, असे संपादक चंदावरकर यांना मी सुचवले. त्यांनी ती कल्पना लगेचच उचलून धरली.

‘गोमंतक टाइम्स’चा छायाचित्रकार आतिष नाईकच्या बाईकवर बसून आम्ही दोघे सांकवाल येथे गेलो आणि त्यावर आधारित मी लिहिलेली बातमी ‘गोमंतक टाइम्स’ आणि पुण्यात ‘सकाळ टाइम्स’मध्ये दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर माझ्या आणि आतिषच्या बायलाईनसह प्रसिद्ध झाली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कालच्या पाच मार्च २०२१पासून पोप फ्रान्सिस यांनी इराकच्या आपल्या पाच दिवसांच्या ऐतिहासिक दौऱ्याची सुरुवात केली. त्यानिमित्ताने मागची ही घटना आठवली. याआधी पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारताला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात १९८६ला आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ला भेट दिली होती. 

वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन, विविध धर्माच्या आणि पंथाच्या धर्माधिकाऱ्यांना भेटून जुने पायंडे मोडण्याची पोप जॉन पॉल यांची परंपरा पोप फ्रान्सिस यांनी चालू ठेवली आहे. साधारणतः एखाद्या मोठ्या व्यक्तीला संतपदाचा मान द्यायचा असल्यास पोप स्वतः त्या देशात जाऊन समारंभपूर्वक ही घोषणा करतात. कोलकात्याच्या मदर तेरेसा यांना २०१६ साली संतपद जाहीर झाले, तेव्हा हा समारंभ कोलकात्यात होईल आणि पोप फ्रान्सिस त्यानिमित्ताने भारताला भेट देतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.

पोप धर्मप्रमुख असले तरी व्हॅटिकन सिटी या चिमुकल्या राष्ट्राचे प्रमुखही आहेत. त्यामुळे शिष्टाचारानुसार राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांच्या भेटीआधी त्या राष्ट्राचे अधिकृत निमंत्रण आवश्यक असते. मदर तेरेसांच्या संतपदाच्या रोम येथे झालेल्या समारंभास भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज हजर होत्या. त्यांनी पोप यांना भारताच्या भेटीसाठी निमंत्रण दिले, असे म्हटले गेले, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

याच काळात परदेश दौऱ्याहून रोमकडे परतताना आपल्या खास विमानातल्या पत्रकारांशी बोलताना ‘आपली भारत भेट जवळजवळ नक्की आहे’ असे विधान पोप फ्रान्सिस यांनी केले आणि मग यासंदर्भात अनेक बातम्या येत राहिल्या.

‘कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया’ या कॅथोलिक पंथाच्या देशातील सर्वोच्च संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांची या काळात भेट घेतली होती आणि त्यादरम्यान भारताने पोपमहाशयांना भारतभेटीचे आमंत्रण द्यावे, अशी विनंती केली होती. 

मात्र यानंतर आशिया खंडातील ख्रिस्ती लोकसंख्या अगदी नगण्य असलेल्या बांगलादेशसारख्या, फिलिपाइन्ससारख्या इतर देशांना पोप भेट देत होते आणि ख्रिस्ती धर्माचे आशियातील एक प्रमुख केंद्र असलेल्या भारतात मात्र त्यांचा दौरा होत नाही, याबद्दल भुवया  उठणे साहजिकच आहे. मोदी सरकारचा पोप यांच्या भारत दौऱ्याविषयी थंडा प्रतिसाद पाहता देशातील कॅथोलिक चर्चनेही याबाबत आता पुढाकार घेणे वा विनंत्या करणे थांबवले आहे. मात्र भारतासारख्या देशाला अशी बाब नक्कीच भूषणावह नाही. 

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......