पुस्तक कसे वाचावे, हे आता नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
महेंद्र कदम
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 05 March 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो सार्वजनिक वाचनालये किरण नगरकर भालचंद्र नेमाडे

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत वाचन चळवळी केलेले भाषण…

..................................................................................................................................................................

महाराष्ट्रात आज जवळपास १२,२४१ आणि सोलापूर जिल्ह्यात ९५०च्या आसपास सार्वजनिक वाचनालये आहेत. शासनाचे यासाठीच एकूण तरतूद १२० कोटी रुपये असल्याची माहिती राज्य ग्रंथालय संघाचे संचालक मा. किरण धांडोरे यांनी दिली. ही तरतूद तशी फार आहे, अशातला भाग नाही. पण तरी एकूण वाचनालय चळवळीसाठी तशी ती फार कमीही नाही. या अनुषंगाने काही एक गंभीर विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे.

ही सर्व वाचनालये साधारणपणे अ, ब, क आणि ड अशा वर्गवारीतील आहेत. या पार्श्वभूमीवर विचार करताना आजपर्यंत काय झाले, या तपशिलात न जाता काय करता येऊ शकेल, यावर विचार होणे महत्त्वाचे आहे. यातला पहिला महत्त्वाचा विचार म्हणजे सर्व वाचनालये चालवणाऱ्यांनी मिळणारा निधी तुटपुंजा आहे, असे म्हणून चालणार नाही. आपण जर ते काम स्वेच्छेने स्वीकारलले आहे, तर आहे त्यात काय करता येईल यावर विचार करणे गरजेचे आहे. ४०-५० टक्के सवलत देणारी आणि केवळ संख्या वाढवणारी पुस्तके खरेदी करण्यावर जो भर दिला जातो आणि त्यातून जी रद्दी जमा होते ती काहीच कामाची नसते. त्यावर उपाय शोधला पाहिजे. याला उत्तर देताना संचालकांनी हा बदल या वर्षीपासून अमलात आणला असल्याचे सांगितले. तसेच दर्जेदार प्रकाशकांची पुस्तके घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करत असल्याबाबतही त्यांनी आश्वासकता दाखवली. म्हणजे आता किमान गुणवत्तेच्या दिशेने ही चळवळ निघाली आहे, पण ती मूलभूत गोष्ट झाली.  तरीही ती महत्त्वाची आहे. 

या चळवळीच्या संदर्भात विचार करताना लक्षात येते ते असे की, पूर्वी वाचन चळवळ नव्हती, पण गावोगाव एक मौखिक परंपरा होती. तिच्या माध्यमातून लोकांचा कान तयार केला जायचा. त्यात धार्मिकता फार दिसत असली तरी ती मुळात तशी नव्हती. चार्वाक, बुद्ध, ज्ञानेश्वर-तुकारामांची वारकरी परंपरा, महानुभाव, गावागावातील कीर्तन-भजन, पोथी-प्रवचने, विविध लोककला, तमाशा या सगळ्या परंपरा आपण पाहिल्या तर एक सलग अशी प्रबोधनाची परंपरा दिसून येते. कालांतराने या परंपरांना विधीचा दर्जा येत गेला असण्याच्या दाट शक्यता आहेत. कारण या मौखिक परंपरांमागे रंजन, श्रमातून विसावा आणि प्रबोधन या मुख्य प्रेरणा होत्या. काळ बदलत आला आणि हे हेतू मागे पडले. काळाबरोबर रंजनाची साधने बदलली. तरीही प्रारंभी रंजनाबरोबर प्रबोधन केले जात होते. उदाहरणार्थ, हिंदी सिनेमाचा नव्वदपूर्वीचा कालखंड पाहिला तर त्यात सामान्य माणूस आणि त्याचे शोषण केंद्रस्थानी असल्याचे लक्षात येते. तसेच पारतंत्र्याच्या काळत छपाई यंत्रणा आली आणि इंग्रजधार्जिणे लेखन करण्याच्या नादात आपली ही प्रबोधनाची परंपरा लुप्त होत गेली. तरीही लिखित परंपरेने साधारणपणे नव्वदीच्या दशकापर्यंत ही प्रबोधनाची पताका फडकावत ठेवली होती.  पण अलीकडे मात्र केवळ रंजनच प्रधान बनत चालले आहे. त्याला काही अपवाद असले तरी अपवादानेच नियम सिद्ध होत असतो.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

नव्वदनंतरच्या जागतिकीकरण-खाजगीकरणाने आणि एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान क्रांतीने जग आमूलाग्र बदलून गेले. आणि वाचन व प्रबोधन परंपरेची जागा सगळ्या सामाजिक माध्यमांनी हस्तगत केली. असे असले तरी नुकताच अलीकडे जो सर्व्हे झाला आहे, त्यानुसार मराठी वृत्तपत्रांचा खप वाढला आहे. असे असूनही वाचनाच्या बाबतीत मात्र फार आशादायक चित्र नाही. एकूणच सगळी वैचारिक दिवाळखोरी आणि ‘नो इझम्स’चा जमाना आला आहे. त्यामुळे एक प्रकारचे वैचारिक अराजक खूप वेगाने वाहू लागले आहे. आणि त्याची गंभीरता एक तर कुणाच्या नीट लक्षात येत नाही, आली तर त्याबाबत कोणतीही भूमिका घेण्याची कोणाची तयारी नाही.

सोशल मीडिया जितका उपयोगी आहे, तितकाच तो घातक आहे. कारण तासाभरात एखाद्या माणसाचे, महापुरुषाचे होत्याचे नव्हते करण्याची ताकद या मीडियात आहे. परंतु याचाही विचार कोणी करायला तयार नाही. अशा सगळ्या कालात वाचनालयांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. कारण मोबाईल क्रांतीमुळे माणूस काही वाचायलाच नको म्हणत आहे. अशा गंभीर काळात आपण टिकणार का? तर याचे उत्तर आहे- हो जरूर टिकू. पण त्यासाठी कात टाकावी लागेल. म्हणजे काय करावे लागेल? 

तर आपण पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे की, जितकी परिस्थिती प्रतिकूल तितक्या परिवर्तनाच्या संधी जास्त असतात. आणि आजचा हा काळ आपण त्यासाठी अनुकूल मानायला हवा. तसेच आपण काहीच न करता टीका करण्याला काही अर्थ नाही. आधी काम करावे लागेल. पालथ्या घड्यावर सतत पाणी घालत राहिलो तर त्या घड्याचं बूड झिजून त्यात पाणी जाऊ शकतं; यावर आपण विश्वास ठेवायला हवा. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी काही गोष्टींना प्रारंभ करावा लागेल. यासाठी फार मोठं शिवधनुष्य उचलण्याची गरज नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पहिली गोष्ट म्हणजे आपल्या हातात आता सोशल मीडिया आहे. गावातील काही जाणकार लोकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप करून रोज किंवा चार–दोन दिवसातून वाचनालयातील पुस्तकाचे मुखपृष्ठ टाकावे. त्याबद्दलची काही माहिती त्यासोबत शेअर करावी. तसाच फेसबुक ग्रुप करावा किंवा फेसबुकवर स्वतंत्र माहिती शेअर करावी. त्याचा पाठपुरावा करून काही नवे प्रयोग करता येतील का ते पहावे. तिथं काही चर्चा करता येऊ शकते. अशा काही चर्चा दरम्यानच्या काळात सुरू झाल्या आहेत. काही जणांची निरीक्षणे अशी आहेत की, करोना महामारीच्या काळात पुस्तकांची विक्री वाढली आहे. वाचकवर्ग वाढत चालला आहे. अनेक पुस्तकांच्या मोफत पीडीएफ उपलब्ध आहेत. सोशल मीडियात पुस्तकांच्या चर्चा सुरू आहेत.

या मीडियाच्या आधारेच चांगल्या पुस्तकांची माहिती गोळा करावी. आणि तशीच पुस्तके खरेदी करावीत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत महिलांचा जास्तीत जास्त सहभाग कसा होईल, यावर भर द्यावा. कारण त्यांच्यामार्फत ही चळवळ अधिक परिणामकारक करता येते. ही चळवळ अधिक गतिमान होण्याची आवश्यकता आहे. कारण पुस्तक कसे वाचावे, हे आता नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण जातीच्या आणि धर्माच्या अस्मिता टोकदार बनत चालल्या आहेत. प्रत्येक जण आपल्या अस्मितेच्या चष्म्यातून पुस्तकांच्या जगात प्रवेश करू लागला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मागे एका मुलाखतीत किरण नगरकर म्हणाले होते की, मी आज माझी ‘प्रतिस्पर्धी’ ही कादंबरी लिहू शकलो नसतो. इतका हा काळ तीव्र अस्मितांच्या संवेदनशीलतेचा बनला आहे. याच दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील कवितेवरून गोंधळ झाला. तर तब्बल १० वर्षानंतर भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ कादंबरीच्या अंगाने जातीय राजकारण केले दिसत आहे. हा सगळा गोंधळ आपण निमूटपणे सहन करत निघालो आहोत, जो अत्यंत चुकीचा आहे.

ही चळवळ अधिक व्यापक करण्याची आणि ती अधिक दुरुस्त करण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. कारण वाचन परंपरा विकसित करण्यासाठी अभिरुची निर्माण होण्याची गरज असते. ही अभिरुची निर्माण करण्याचे काम प्रगल्भ वाचक आणि समीक्षक यांचे असते. त्याचीही वाणवा आज जाणवते आहे.

अलीकडे तर दोन पानांचा काही तरी खरडलेला मजकूर शोधनिबंध म्हणून प्रकाशित केला जात आहे. समीक्षा नावाचा स्वतंत्र प्रकार शिल्लक राहिलेला दिसत नाही. त्याची आणि त्याच्या अनुषंगाने अभिरुची विकसित होण्याची गरज आहे. ती करण्यासाठी आपल्याला विविध प्रयोग करावे लागतील.

..................................................................................................................................................................

लेखक महेंद्र कदम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

mahendrakadam27@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......