अनेक प्रश्न उभे राहणार, पण गोंधळून न जाता त्यावर सामूहिक विचाराने वेळीच उपाय करणे जरुरीचे
पडघम - तंत्रनामा
प्रभाकर देवधर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 06 February 2021
  • पडघम तंत्रज्ञाना प्रश्न अडचणी समस्या

माणसाच्या जीवनात प्रश्नांना तोटा नाही. कामात आणि घरातसुद्धा प्रश्न सातत्याने पुढे उभे राहतात. रोजच्या प्रवासातही अनपेक्षित अडचणी वारंवार येतात. रहदारीच्या गर्दीमुळे वेळेवर पोहोचता येत नाही. कुटुंबाकडून किंवा मित्रांकडूनही अपेक्षित असलेली मदत ऐनवेळी मिळत नाही. सहकारी किंवा हाताखालची माणसे निष्काळजीपणे ठरलेली कामे करत नाहीत. कामात गुणवत्ता न मिळाल्याने अडचणी येतात. दिलेली वचने पाळता येत नाहीत. असे काही झाले की, मनात नाराजी निर्माण होते. कर्तव्यदक्षतेत कमी आल्याने मन विषण्ण होते. पुढे उभा ठाकलेला प्रश्न नुसता तसाच राहत नाही, बऱ्याच वेळा त्यातील गुंतागुंत वाढते. नकारात्मकता सारे मन व्यापते. प्रश्न सुटत नाही, पण बऱ्याच वेळा त्यातून नवे प्रश्न निर्माण करतात.

अशा अडचणींना तोंड देणाऱ्यांना प्रश्नाकडे पाहण्याची नजर अमूलाग्र बदलायला हवी. प्रश्नाच्या स्वरूपाप्रमाणे आपली त्यावरील पकड बदलायला हवी. प्रश्न उभा ठाकला की, आपल्या अनुभवावरून आपले मन उत्तराने किंवा शक्य असलेल्या विविध उत्तरांनी व्यापायला हवे. आपला माहितीसंच, अनुभव, उपलब्ध साधने आणि मदतीला येणाऱ्या ताकदी आपल्याला उत्तराकडे नेऊ शकतात. प्रश्नाने मन व्यापले तर उत्तर मिळवणे सोपे नाही. आपली शक्ती, आपली उत्पादकशक्ती, आपली उपलब्ध साधने आणि उत्तर शोधण्याची आपली जिद्द हे सारे महत्त्वाचे. प्रश्न हा प्रश्न नाही, उत्तर हा प्रश्न आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

उत्तर शोधण्याची एखाद्याची मनोभूमिका घडण्यासाठी मला चार महत्त्वाच्या पायऱ्या दिसतात.

व्यक्तीची मनोवृत्ती

प्रश्न उभा ठाकण्यापूर्वीच मी येणारा प्रश्न सोडवू शकेन अशी मनाची उभारी हवी. व्यक्तीच्या मनाची ठेवण तशी असणे आवश्यक. येणाऱ्या अडचणींवर मात करून उत्तर शोधण्याची जिद्द हवी. मनाची बैठक आशावादी असली पाहिजे. प्रश्न समजला की, तो सोडवण्यातील अपेक्षित अडचणी दिसायला हव्यात. मन त्यावरील उपाय शोधू लागले पाहिजे. काय हवे आणि जरूर असलेली मदत कुठे मिळेल, याचा विचार सुरू व्हावा. जिद्दी असलेले मन तसा विचार करू लागेल. जबरदस्त प्रेरणादायक विचारशक्ती हवी. तशी मनाची ठेवण हवी, शिस्त हवी. एक प्रसिद्ध संशोधक म्हणतो, “आपण खड्ड्यात जातोय असे वाटले की, प्रथम खड्डा खणणे थांबवावे!” प्रश्नाने आपल्याला खाता कामा नये, उत्तराच्या शोधात मन गुंतले पाहिजे. उत्तर मिळवण्याची जिद्द आणि खात्री मनोमन हवी. कामावर ताबा हवा.

विश्लेषणाने उत्तर शोधून काढणे हा विचाराचा केंद्रबिंदू हवा

प्रश्नाचे विश्लेषण, त्याचे मूळ आणि व्याप्ती प्रथम समजून घेतली पाहिजे. चक्रावून न जाता अपेक्षित अडचणींचे मूळ शोधले पाहिजे. प्रश्नाची छोटी छोटी अंगे समजणे आवश्यक. प्रश्न सोडवण्यासाठी असे विश्लेषणसुद्धा अतिशय आवश्यक. त्यावर अचूक उपाय सापडण्यासाठी त्याचा मोठा फायदा. नुसते बॅन्डएड लावले तर अनेक नव्या अडचणी येण्याची शक्यता. प्रश्न पूर्णपणे समजणे आवश्यक. प्रश्नाची विविध अंगे जाणणे जरुरीचे. दिसलेली छोटीशी चूकसुद्धा सर्वप्रथम निस्तरली पाहिजे, नाहीतर काट्याचा नायटा होऊ शकतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

उत्तर मिळण्यासाठी पारंपरिक विचार सोडून तुमच्या विचारांची सर्जनशीलता महत्त्वाची

सहज दिसणाऱ्या अडचणी सोडवण्यापूर्वी त्याचे परिणाम जाणणे आवश्यक आणि त्यासाठी सर्जनशील विचार करणे महत्त्वाचे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात- उत्तराचा आकार उमजण्यासाठी सर्वांगीण विचार करणे जरूर. आपली कल्पकता आणि क्रियाशीलता वापरून मार्ग शोधायला हवा. मनातील पूर्वग्रह अनेकदा उत्तरापासून दूर नेतात. आपल्या सहकाऱ्यांबरोबर विचारमंथन महत्त्वाचे. मनाची स्थिरता आणि शिस्त अतिशय आवश्यक. 

अंतिम विजयासाठी आपली वृत्ती, ज्ञान, सांघिक आत्मीयता आणि क्रयशक्ती महत्त्वाची

लवकरात लवकर उत्तर शोधणे यावर सांघिक भर अतिशय आवश्यक असतो. त्यासाठी शोधाचा मार्ग आपण स्वतः आणि सहकारी यांनी पूर्वनिश्चित करणे आवश्यक. अनेक प्रश्न उभे राहणार, पण गोंधळून न जाता त्यावर सामूहिक विचाराने वेळीच उपाय करणे जरुरीचे.

एकदा माझ्या वरिष्ठाने माझ्यासमोर अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास ठेवला आणि विचारले- “काय करावे?”. मी लगेच पाणी पिऊन ग्लास खाली केला आणि म्हणालो- “प्रश्न सुटला. मी संशोधक आहे, प्रश्न सोडवणे हा माझा छंद आहे!”. प्रश्न झपाट्याने सोडवला नाही तर तो अनेक प्रश्नांना जन्म देतो.           

..................................................................................................................................................................

लेखक प्रभाकर देवधर अ‍ॅपलॅब कंपनीचे संस्थापक आणि भारताच्या इलेक्ट्रॉनिक धोरणाचे प्रणेते आहेत.

psdeodhar@aplab.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......