कामसूत्र कार्टुन्स - एक ढळढळीत सत्यदर्शन!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास आगवणे
  • या लेखातील सर्व कार्टुन्स श्रीनिवास आगवणे यांची आहेत
  • Sat , 04 February 2017
  • व्यंगनामा श्रीनिवास आगवणे Shrinivas Agawane कामसूत्र Kama Sutra

 

भारतीय कलेतील माणसांचा शरीरशास्त्राचा अभ्यास करताना ‘कामसूत्र’ हा ग्रंथ पाहण्यात आला. खजुराहोच्या मंदिरातील प्रमाणबद्ध शिल्प व आकृत्या अचाट आणि फारच काल्पनिक वगैरे वाटल्या. त्यातून पांचट विनोद निर्माण होऊ शकतो, असं वाटून गेलं आणि ही मालिका तयार झाली.

२००१ साली केलेली ही मालिका बऱ्याच जणांना आवडली. सध्याचं वारं पाहता विनोदापेक्षा कुठल्यातरी गटाच्या भावना दुखवण्याचीच भीती वाटते. ही चित्रमालिका ‘प्रौढ’ व  ‘विनोदसाक्षर’ रसिकांसाठी आहे. भारतीय संस्कृतीचा आणि पांचट विनोदाचा उचित मान ठेवावा. आणि या मालिकेकडे खेळकर पद्धतीने पाहावं. सेक्सविषयी आपल्याकडे पूर्वापार अफाट, अचाट आणि अतर्क्य कल्पना असतात. त्या कल्पनांच्या निखळ फँटसी पातळीवरून विचार करताना ज्या गमतीजमती घडतात, हे दाखवण्याचा प्रयत्न या मालिकेत केला आहे.

चित्र क्रमांक १

चित्र क्रमांक २

चित्र क्रमांक ३

चित्र क्रमांक ४

चित्र क्रमांक ५

चित्र क्रमांक ६

चित्र क्रमांक ७

चित्र क्रमांक ८

चित्र क्रमांक ९

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......