वैयक्तिक दु:खाच्या भेसूर सामूहिकीकरणाचं वर्ष...
पडघम - साहित्यिक
प्रवीण बर्दापूरकर
  • स्थलांतरितांच्या वेदना व्यक्त करणारं हे रेखाटन नाशिकचा ज्येष्ठ चित्रकार दोस्तयार धनंजय गोवर्धने याचं
  • Sat , 02 January 2021
  • पडघम साहित्यिक करोना लॉकडाउन

१.

परवच्या भेटीत दोस्तयार मुकुंदा बिलोलीकर म्हणाला, ‘चला, एकदाचं २०२० हे वर्ष संपलं. तुझ्यासाठी हे वर्ष खूपच दु:स्वप्न ठरलं.’

माझी बेगम मंगला हिच्या प्रदीर्घ आजारानं झालेल्या निधनाचा संदर्भ त्याच्या म्हणण्याला होता. क्षणभर थबकून मी म्हणालो, ‘ते दु:ख  माझ्या एकट्याचं कसं? वैयक्तिक दु:खाचं सामूहिकीकरण होताना २०२०मध्ये बघायला मिळालं. दु:खाचा एक वेगळा आणि अतिव्यापक भेसूर पोत सरल्या वर्षात अनुभवायला मिळाला.’  

कृष्णबिहारी ‘नूर’ यांची एक गझल आहे, कोणतं ही कारण नसताना जगणं अचानक एक सजा बनून गेलं-

जिंदगी से बडी सजाही नहीं

और क्या जुर्म है पता ही नहीं ।’

(शुजात खान यांच्या आवाजात ही गझल मला फार भावते.)

बेगम मंगलाची वाटचाल मृत्यूच्याच्या दिशेनं निर्णायकपणे सुरू झाली, तेव्हाचा आणखी  एक संदर्भ आहे. महेश एलकुंचवार यांच्या एका लेखात तेव्हा वाचलं होतं, ‘दु:खापेक्षा आपणच मोठं होऊन जावं’. हे वाचल्यावर वाटलं होतं, बेगमच्या मृत्यूचा शोक, दु:ख आणि नंतरचं एकाकीपण  सहन करण्याचं बळ आपल्याला आधीच मिळालं आहे. प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाहीये... अजूनही. बेगम गेल्यावर तसं घडणं शक्यही नव्हतंच म्हणा, पण  एखादी अभिव्यक्ती मग ती कविता असो की लेख, गाणं असो की चित्र की शिल्प, एका वेगळ्या स्वरूपात जेव्हा अनुभवायला मिळते, तेव्हा गहिरी उदासी असलेला एहसास आपल्याला घट्ट वेढा घालतो.

२०२०नं माझ्या किंवा अन्य कुणा एकट्याच्याच वाट्याला दु:ख आणलं नाही तर करोनानं निर्माण केलेला, असंख्य एक-एकट्याच्या दु:खाचा तो एक विश्वव्यापी भेसूर सामुहिक एहसास होता. करोनाचं रूप जसजसं आक्राळविक्राळ होत गेलं आणि बळींचा आकडा वाढू लागला, तसतसं त्या दु:खाला असंख्य नवीन धुमारे फुटले आणि ते समस्त मानव जमातीवर चाल करून येत आहेत, असं वाटू लागलं.

६ मार्चला बेगमनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा आपल्याही देशावर करोनाचं संकट घोंघावू लागलं होतं. हे संकट महाभीषण असेल याची कल्पनाच तोवर आलेली नव्हती. खूप तपशीलात जात नाही, पण तो जो सुरुवातीचा टाळेबंदीचा काळ होता. त्या काळात या देशातल्या प्रत्येकच माणसाच्या जगण्यावर एकटेपणाने झडप घातली. ही नुसती एकटेपणाची झडप नव्हती, ती केवळ एक अनामिक घनगर्द भीती नव्हती तर मृत्यूची भेसूर आणि अनामिक छाया होती. जसे दिवस सरत गेले, तशी ती मृत्यूची  छाया अतिशय अक्राळ-विक्राळ झाली आणि केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक जगण्याचासुद्धा सगळा पोतच विस्कटून टाकला.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

काय घडलं नाही गेल्या वर्षभरात? करोनानं जगण्याचे सर्वच संदर्भ बदलून टाकले. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, उद्योग, शिक्षण,  वैद्यकशास्त्र अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर एका अतिशय महाभीतीदायक संदर्भानं अशी चाल केली की, प्रत्येक माणसाच्या डोळ्यात मृत्यूचं भय दाटून आलं. माणसाच्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनात तोवर प्रस्थापित झालेले सर्व मापदंड तपासून पाहण्याची नितांत गरज निर्माण झाली. आपण समजतो तितकं आयुष्य सोपं नसतं. एखादी अनपेक्षित आपत्ती सगळं होत्याचं नव्हतं करून टाकते; खूप मोठी उलथापालथ होते, सुन्न करणारी आगतिकता येते आणि असहाय्य होऊन बघत राहण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरत नाही, हे जगानं २०२० मध्ये अनुभवलं.

अशी नैसर्गिक आपत्ती हाताळण्यात आपण कोणतीही कसूर ठेवली नाही, असा दावा भलेही केंद्र सरकार आणि राज्य सरकार करोत पण , या दोन्ही सरकारांना ते आव्हान समर्थपणे पेलवलं नाही हे मात्र खरं. त्याच्या तपशीलात जात नाही. थोडासाही अवधी न देता टाळेबंदी लागली गेली. सर्व व्यवहार अचानक ठप्प झाले. जगणं किती कठीण आहे, हे त्या काळात अनुभवायला लागलं. दोन्ही सरकार चूकच वागले असा काही माझा दावा नाही. परंतु जी काही घिसाडघाई या दोन्ही सरकारांकडून घडली. त्याचे फार मोठे परिणाम लोकांना सहन करावे लागले.

जगात लक्षावधी जण करोना झाल्यामुळे मृत्यू पावले. काही जगण्याच्या घाईत अकारण चिरडून मेले. काही टाचा घासून मृत्यूच्या अधीन झाले. अनेकांना रोजगार गमवावे लागले. बाजारपेठ ठप्प झाली. लोकांना जगणंही असह्य झालं. जगण्याची एक वेडी स्पर्धा आणि त्यातून येणारं भीषण असं दारिद्रय, भीषण अशी अगतिकता या सगळ्या काळात अनुभवायला मिळाली. माणसं घरात कोंडली गेली. त्या सलग कोंडण्यातून अपरिहार्यपणे येणार्‍या नैराश्यानं अनेकांना गाठलं. स्थलांतरितांचा प्रश्न निर्माण झाला. ते काही केवळ मोठ्या शहरातून आपल्या गावाकडे जाणाऱ्या लोकांचे तांडे नव्हते. ते वेदनेचं तांडव होतं. तो रक्ताळलेल्या टाचांचा प्रवास होता.

हे सगळं २०२०मध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर माणसाच्या जगण्यावर भीषणपणानं आदळलं आणि प्रत्येक माणूस अधिकाधिक असाहाय्य होत गेला. आर्थिक दुष्परिणाम तर अनेक जाणवले. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातही राजकारण खेळण्याची किळसवाणी मनोवृत्ती आपल्याला अनुभवायला मिळाली आणि राजकारण्यांविषयी असणारी एक नफरत, जी आपल्या मनात ज्योतीच्या स्वरूपामध्ये मंदपणे तेवत होती, तिचा वणवा झाल्यासारखं चित्र निर्माण झालं...

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दु:खाचं सामूहिकीकरण ही संकल्पना यापूर्वीही मांडली गेलेली आहे, पण दोन जागतिक महायुद्धानंतर आता ती पुन्हा अनुभवायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. ते या २०२०ने अनुभवायला दिलं. तो अनुभव म्हणजे भविष्याच्या चिंतेचा पेटलेला ता दाह होता. अनेकांनी असंख्यांनी जी काही स्वप्न रंगवलेली होती, त्याचा पेटलेला तो वणवा होता.

असं खूप काही या २०२०मध्ये घडत गेलं. २०२० ने सगळ्यात महत्त्वाचं काय शिकवलं असेल तर ते हेच की, कोणताही कुसूर नसताना ‘जिंदगी से बडी सजाही  नहीँ’. हे जे शिकणं होतं यातून आपण २०२१मध्ये सावरणार का? हाच खरा प्रश्न आत्ताच्या घटकेला आहे. हा प्रश्न पडण्याचं कारण करोनाचा नवा अवतार आता पुन्हा अस्तित्वात आलेला आहे आणि २०२१वरसुद्धा त्याचं २०२०मध्ये दाटून आलेल्या महाभयानक नव्या भीतीचं मळभ घोंघावू लागलेलं आहे. हे मळभ २०२१मध्ये कायमचे दूर होवो हीच शुभेच्छा.

.
२०२१मधल्या पहिल्या सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या अनेक पोस्ट वाचनात आल्या, प्रकाश वृत्तवाहिन्यांवरही दृश्ये पाहिला मिळाली. त्या संदर्भात बेगम मंगलाच्या साथीनं आम्ही (म्हणजे अंजली आणि मिलिंद देशपांडे, पुष्पा आणि रवी जोशी दोस्तांसह) अनुभवलेले काही क्षण शेअर करतो –

२०१७च्या जानेवारी महिन्यात आम्ही सर्व चेरापुंजीहून शिलाँगला परतताना मावळता दिनकर दिसला.

कारमधून खाली उतरलो तर हाडाला झोंबणारा थंडssssssगार वारा आणि सर्वदूर पसरलेला सन्नाटा... तोही इतका गहिरा की स्वत:च्याही श्वासाचा आवाज वैरी वाटावा.

गावात-खेड्यात-जंगलात-जगाच्या सर्वदूर भागात इतकी भटकंती झाली, पण मावळणाऱ्या सूर्याच्या प्रकाशात इतके तपशील यापूर्वी कधी दिसल्याचं आठवत नाही.

चेरापुंजीचा सूर्यास्त 

मावळतीचे ते विविध रंग एकमेकात इतक्या तृप्तीने विलीन झालेले की, रंगांचं एक महादेखणं, अतिलोभस रूप समोर आलं. त्यात त्या काळ्या रंगाने अशी बहार आणली की, ते एकूण दृश्य सुख-दु:ख कवेत घेतलेल्या आणि त्या झाडांसारखे दोस्तयार साथीला असणाऱ्या एखाद्या माणसाचं परिपूर्ण जगणं वाटलं.

.

भारतातलं पहिलं सूर्यदर्शन कुठ होतं ठाऊक आहे?

आपल्या देशातलं सर्वात पहिलं सूर्यदर्शन होतं ते दार्जीलिंगजवळ!

ते स्थळ येतं अरुणाचल प्रदेशात आणि त्याचं नाव आहे डोंग.

भल्या पहाटे आणि अजस्र थंडीत उठून सुमारे २८-३० किलोमीटर्स प्रवास करून एका डोंगरावर जायचं आणि कितीही गरम कपडे घातलेले असले तरी कुडकुडत सूर्याची वाट पाहणं असा तो अनुभव असतो.

आपल्या डाव्या हाताला दूरवर कांचनजंगाची हिमशिखरे दिसत असतात आणि समोर सोनेरी लालसर रंग उधळत सूर्य दर्शनाला येतो... मग ती किरणे कांचनजंगावर पडतात आणि ती पर्वतरांगही उजळून निघते.

तो सोनेरी लालसर रंग आधी गडद असतो, मग तो गडदपणा विरळ होत जातो आणि कांचनजंगा पर्वतरांग लखलखीत रुपेरी होत जाते.

त्या सोनेरी लाल रंगाची उधळण ते कांचनजंगाचं रुपेरी होणं, हा अवघ्या बारा-पंधरा मिनिटांचा खेळ इतके रंगविभ्रम निर्माण करतो की, त्यात आपलं अस्तित्व विलीन होतं.

अनिमिष नेत्रांनी तो एक वेगळा अनुभव आपल्या रंध्रारंध्रात सामावला जातो... एका विलक्षण तुप्तीचे ते क्षण असतात.

अरुणाचल प्रदेशातल्या डोंग इथं होणारं भारतातलं पहिलं सूर्यदर्शन!

४.

२०२१ हे नवं वर्ष म्हणजे-

जिंदगी कि किताब में एक कोरा पन्ना और जुडने जा रहा है!

इस पर कुछ ऐसा लिखिये , जो पिछले पन्ने पर लिखे से बेहेतर हो!!

असं आपल्या सर्वांच्या बाबतीत घडावं, बस्स!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......