‘ट्रॉली टाइम्स’ : शेतकऱ्यांच्या मुलांचे ‘गोदी मीडिया’ला आव्हान
पडघम - देशकारण
कुणाल रामटेके
  • डावीकडे ‘ट्रॉली टाइम्स’ वाचताना एक आंदोलक, उजवीकडे ‘ट्रॉली टाइम्स’चे वाटप करताना आंदोलक तरुण
  • Fri , 01 January 2021
  • पडघम देशकारण ट्रॉली टाइम्स Trolley Times गोदी मीडिया Godi Media शेतकरी आंदोलन Farmer Protest शेतकरी Farmer शेती सुधारणा बिल Farm Reform Bill

कोणत्याही लोकशाहीप्रधान देशामध्ये जनहितासाठी होऊ घातलेली विधायक आंदोलने, ही त्या देशाची ‘लोकशाही व्यवस्था’ जिवंत असल्याची प्रतीके असतात. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनांना जनमानसापर्यंत पोहचवण्याचे काम ‘चळवळींचे पंख’ असलेली माध्यमे करत असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी मान्यता आपल्याकडे लाभली. मात्र, भारतासारख्या जात-वर्ण-वर्ग-धर्म-लिंग भेदांवर आधारित समाजरचना असलेल्या देशात ‘माध्यमे’ अपवाद वगळता अगदी प्राथमिक अवस्थेपासूनच आपली जनकेंद्रितता गमावून बसली आहेत. अर्थातच यामागे भारतीय सामाजाची जातवर्गीयपुरुषसत्ताक आणि शोषणाधिष्ठित व्यवस्था कारणीभूत आहे.

आजही या देशातील ‘मेनस्ट्रीम’ माध्यमांनी आपला खाक्या हा सत्ता आणि सत्ताधारी वर्गाला पोषक असाच ठेवलेला ठळकपणे दिसून येतो. अगदी अलीकडचेच ठळक उदाहरण घ्यायचे झाले तर देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या विरोधात अत्यंत नकारात्मकरित्या बातमीदारी आणि कथित सिद्धान्तन करून या देशातील मीडियाने आपल्या विकावूपणावर स्वतःच शिक्कामोर्तब केले आहे. त्यातूनच पर्यायी माध्यमांची आवश्यकता लक्षात घेत शेतकरी आंदोलनाचे खरे स्वरूप आणि वास्तव समाजासमोर मांडण्यासाठी आंदोलनस्थळी सातत्याने उपस्थित असलेल्या सात तरुणांनी एका मुद्रित माध्यमाची निर्मिती केली. त्याचे नाव म्हणजे ‘ट्रॉली टाइम्स’.

जगात आणि भारतातही अनेक वृत्तपत्रे ‘टाइम्स’ नावाने प्रचलित आहेत. मात्र आपल्यासारख्या कृषिप्रधान देशातही अशा माध्यमांसाठी ‘शेती’ हा विषय तसा उपराच. त्यातल्या त्यात ‘गोदी मीडिया’ने शेतकरी आंदोलनाबाबत घेतलेली नकारात्मक भूमिका लक्षात घेता, या आंदोलनाचे प्रतीक बनलेली ‘ट्रॉली’ आणि शेती हा विषय ‘जसा आहे तसा’ लोकांपर्यंत जाणे महत्त्वाचे होते. त्यासाठी व्यावसायिक पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या शुरुमीत मावी या लेखक आणि चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिणाऱ्या तरुणाने आपल्या अन्य सहा मित्र-मैत्रिणींना विश्वासात घेऊन १८ डिसेंबर २०२० पासून ‘ट्रॉली टाइम्स’ची सुरुवात केली.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

मुळात, सुरुवातीच्या या शेतकरी आंदोलन काळात सोशल मीडियाच्या वापरातून संदेश आणि बातम्या पोहचवण्याचा प्रयत्न ही मंडळी करत होती. मात्र, बरेचशे शेतकरी ग्रामीण भागातील आणि आणि तंत्रज्ञानाचा गंध नसलेले असल्यामाणे त्यांना त्यांच्या भाषेत, त्यांना हाताळण्याजोगे एखादे माध्यम सुरू करावे, असा विचार या तरुणांच्या मनात आला. त्याबाबतची एक छोटेखानी बैठकही या मंडळींनी आंदोलनातील एका ट्रॉलीमध्ये बसून घेतली. आणि त्यातूनच जन्माला आली ‘ट्रॉली टाइम्स’ कल्पना.

सुरुवातीला ‘ट्रॉली टाइम्स’च्या सात जणांच्या टीमला थोडं टेन्शनसुद्धा आलं. या कठीण काळात कामी आलं ते त्यांचं शिक्षण आणि टीम वर्क. अवघ्या पाच दिवसात ‘ट्रॉली टाइम्स’ची आखणी झाली आणि मित्रांच्या ११ हजार रुपयांच्या ‘कॉन्ट्री’मधून दोन हजार प्रतींचा चार पानांचा अंक हाती आला. त्यातही ‘वितरणा’सारखे काही प्रश्न टीमच्या समोर असतानाच कोणताही गाजावाजा न करता अवघ्या दोन तासांत अंक हातोहात अंदोलन स्थळीच संपले.

पुढे देशभरात ‘ट्रॉली टाइम्स’च्या जन्माची ही कहाणी खूपच गाजली. मात्र या वृत्तपत्रातून पैसा कमावणे हा उद्देश नसल्याचे संपादकांनी आधीच स्पष्ट केले. पुढच्या अंकांसाठीही मदतीचा ओघ आता सुरू झाला असल्याने या तरुण मित्रांची आर्थिक चिंताही काही प्रमाणात का होईना पण मिटली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले ‘ट्रॉली टाइम्स’ हे आज ‘आंदोलन की अपनी आवाज’ या आपल्या टॅगलाईनसह पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून प्रकाशित होत आहे. ‘जुड़ेंगे, लड़ेंगे, जीतेंगे!’ या लीडने सुरू झालेली बातमीदारी भगतसिंगांच्या क्रांतिकारी पत्रकारितेचा वारसा सांगत ‘मेनस्ट्रीम मीडिया’समोर उभी ठाकत आहे.

‘ट्रॉली टाइम्स’बाबत भूमिका मांडताना शुरुमीत मावी म्हणतो- “मैं पेशे से एक फ़िल्म राइटर हूँ. मेरी पढ़ाई पत्रकारिता की है, लेकिन हमारा पुश्तैनी काम ही ‘खेती’ है. ये सिर्फ तीन काले कानूनों की ही नहीं बल्की उससे बड़ी लड़ाई है. भारत का लोकतंत्र खत्म हो चुका है, उसकी बहाली की लड़ाई है. लोकतंत्र का चौथा स्तंभ पत्रकारिता है. मेरे मन में आया कि इस क्रांति में अगर मुझे अपना योगदान देना है, इस लड़ाई को लड़ने का मेरा तरीका ‘चौथा स्तंभ’ है.”

या आणि अशा पर्यायांची आवश्यकता लोकशाही आणि संविधानिक व्यवस्था वाचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

.............................................................................................................................................

लेखक कुणाल रामटेके सामाजिक कार्यकर्ता, मुक्त पत्रकार व लेखक आहेत.

ramtekekunal91@gmail. com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 01 January 2021

हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे तर खलिस्तानी फलक कशाला फडकावले? शाहीनबागेच्या आडोश्याने दिल्लीत मुस्लिमांनी दंगली घडवल्या. त्याची पुढची आवृत्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या आडून दिल्लीत घुसून दंगली माजवणे. कोणाला बरं माजवायच्या होत्या? कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मोदी व शहा यांना अक्कल आहे. पप्पूसारखे ते बथ्थड नाहीत.
आणि हा म्हणे ट्रॉली टाईम्स. ट्रोल टाईम्स म्हणायला पाहिजे. हे नाव नाय आवडलं तर मग खटारा टाईम्स म्हणा हवं तर.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......