अजूनकाही
९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून, शुक्रवार रविवारपर्यंत डोंबिवली (पूर्व) येथील पु. भा. भावे साहित्य नगरी अर्थात ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकूल इथं होत आहे. काल रात्री उशिरापर्यंत संमेलनाची जोरदार तयारी सुरू होती. डोंबिवलीमध्ये होणारं हे संमेलन फारशा कुठल्याही ताज्य वादाशिवाय होऊ पाहत आहे. संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवर राजकारण्यांचा भरणा, नियोजनातला काहीसा ढिसाळपणा आणि बहुधा अपुरी पडणारी जागा, अशा काही गोष्टींची चर्चा आजपासून पुढची दोन दिवस होत राहीलच. गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवडला डी.वाय.पाटील यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या संमेलनाशी या संमेलनाची तुलना कालपासूनच सुरू झाली होती आणि त्याबाबतीत डोंबिवलीच्या संमेलनाने मार खाल्ला असाही वहिम व्यक्त केला जात होता. असो. अशा चर्चांना अंत नसतो. काल संध्याकाळपर्यंत संमेलनाची जोरदार तयारी आयोजक संस्था करत होती. त्याची ही चित्रमय झलक...
साहित्य संमेलनाचे मुख्य प्रवेशद्वार - पु. भा. भावे साहित्य नगरी
खालच्या बाजूला दिसणारे संमेलनस्थळाचे प्रवेशद्वार क्रमांक दोन. डावीकडे दिसणारा मुख्य मंडप
मुख्य मंडप. संमेलनाचे उदघाटन, समारोप आणि काही महत्त्वाचे कार्यक्रम याच व्यासपीठावर होतील.
मुख्य मंडपासमोरील भव्य आसनव्यवस्था. किमान दहाएक हजार लोक बसू शकतील एवढा मोठा हा मंडप आहे.
मुख्य मंडपासमोरील भव्य आसनव्यवस्था. व्यासपीठाच्या डाव्या बाजूने घेतलेले छायाचित्र
मुख्य मंडपाच्या डाव्या बाजूला ग्रंथप्रदर्शन असून त्यात तीनशेच्या आसपास पुस्तकांचे स्टॉल्स आहेत.
मुख्य मंडपाच्या उजव्या बाजूची तयारी काल रात्री उशिरापर्यंत चालू होती. हे छायाचित्र संध्याकाळचे आहे.
कवीसंमेलन व इतर परिसंवादासाठीचा छोटा मंडप उजवीकडे तर डावीकडे भोजनकक्ष आहे.
भोजनकक्षाची आतील रचना. इथे पापलेट, बांगडा आणि सुरमई मिळेल की नाही हे अजून माहीत नाही! आज दुपारीच कळेल.
छोटीशी भूक व तहान भागवणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. हे स्टॉल्स प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून येताना डाव्या बाजूला आहे तर, मुख्य प्रवेशद्वारातून येतानाही ते डाव्या बाजूलाच लागते.
मुख्य प्रवेशद्वार व प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून आत आल्यानंतर दिसणारा संमेलनाचा मुख्य मंडप.
साहित्य संमेलन ही महाराष्ट्रातील एक अभूतपूर्व अशी सांस्कृतिक घडामोड आहे. डोबिंवलीत ज्या म्हात्रे क्रीडा संकुलमध्ये हे संमेलन होत आहे, त्याचा गेल्या १०-१२ दिवसांत पुरता कायापालट झाला आहे. ती मूळ जागा २२ जानेवारीपर्यंत कशी होती, हे पाहण्यासाठी http://www.aksharnama.com/client/article_detail/443 या लिंकवर क्लिक करा.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment