‘स्व’प्रतिमामग्न पुरुषाच्या लक्षणांबाबतची काही निरीक्षणे…
पडघम - विज्ञाननामा
मोहन देस
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 28 December 2020
  • पडघम विज्ञाननामा ‘स्व’प्रतिमा Self-image

‘स्व’प्रतिमेची जाणीव पहिल्यांदा आपल्याला पौगंडावस्थेच्या सुरुवातीला येऊ लागते. त्याआधी आपल्याला कसलीच शुद्ध नसते. आयुष्याच्या दुसऱ्या दशकात म्हणजे वय वर्षे ११ ते २०, या काळात ‘स्व’प्रतिमेची जाग प्रचंड महत्त्वाची असते. आपल्या आयुष्यातील हे दुसरे दशक ‘स्व’प्रतिमेने फार उजळून निघालेले असते. या काळात ही ‘स्व’प्रतिमा सारखी बदलत असते, विकसित होत जाते! आपण सारखे आरशात बघतो. दुसऱ्यांच्या, खास करून प्रिय माणसाच्या डोळ्यांचा आरसा करतो! आपण तिच्या नजरेने आपल्याला बघतो. आपले शरीर आणि मन आपण भारी सजवत असतो!

ड्रेस, कपडे, ओढणी, इस्त्री, फॅशन, हेअरस्टाईल, दाढी मिशांची ठेवण, कात्रण, आवाज, हावभाव, देहबोली, चालणे, वावरणे, आवाज, व्यक्तिमत्त्व, कौशल्ये, कला, व्यायाम, योग, आवड, निवड, आपले एखादे खास वैशिष्ट्य, शैली आणि एखाद दुसरे व्यसन... इत्यादी जोपासण्याची प्रचंड हौस असते. यातले आपले स्वतःचे असे फार थोडे असते. स्वतःचे खरे काही नसतेच! मात्र या काळात ही हौस मोलाचे कार्य करत असते. पुढे ही जाणीव अर्थातच काहीशी कमी होते. आपण सामान्य माणसे स्वतःला सामंजस्याने स्वीकारतो. समजूतदार असतो.

सत्ताधाऱ्यांचे, खास करून हुकूमशहांचे मात्र तसे नसते. त्यांना लाभलेल्या अनेक गंडांमध्ये पौगंडावस्था त्यांच्या जीवनात पुन्हा येते आणि त्यांच्या आयुष्य भर जिंदादिल राहते. तिचे विविध आविष्कार रोजच्या रोज नव्याने निर्माण करणे, ते वाढवणे, बदलणे, प्रजेच्या नजरेत आपण कसे भरावे, कसे दिसावे या विषयी हे लोक खूप शक्ती, विचार आणि वेळ देतात. या बाबत दुसऱ्यांचाही खूप वेळ, शक्ती, विचार, सल्ला घेतात. आजच्या मास मीडियाने संपृक्त झालेल्या राजकीय वातावरणात तर या आविष्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

रोजच कॅमेऱ्याला सामोरे जावे लागणे (आनंदाने), कॅमेरा आणि आपण यात कोणी आलेच तर त्याला तिला निक्षून बाजूला सारणे, दर तासाने कपडे बदलणे, प्राणी पक्षी यांना आपल्या व्यक्तिमत्त्वात सहभागी करून घेणे, प्रकाशयोजना, सावल्या, रंग, टेक्श्चर, पार्श्वभूमी यांचा अतिशय बारकाईने विचार करणे हे कामच होऊन बसते.

स्व-शरीर प्रतिमा तर अतिशय महत्त्वाची असते. कारण अतिदक्ष, प्रजाहितदक्ष अशी विचारधारा ज्या शरीराने धारण केली आहे, ते शरीरदेखील खूप दर्शनी स्वरूपात समोर यायला हवे असते. चेहरा, दाढी, मिशा, चष्मा, टक्कल, टोपी, वस्त्रप्रावरणे, आणि चेहराच नव्हे, तर छाती, पोट, हात पाय, चाल, वावर, अँगल, प्रोफाइल… आणि त्यांनी प्रसवलेली चिन्हे (उदा. नाझी स्वस्तिक) वगैरे… याही गोष्टींना एक वेगळे गूढ महत्त्व द्यावे लागते.

फार पूर्वीचे राजे, बादशहा, सरदार, पेशवे, नवाब याबाबत बरेच जागरूक असायचे म्हणतात. त्यांना कोणी पाहिलंय? त्यांच्या गरजा किती आणि त्यांचे भाट असणाऱ्यांच्या गरजा किती, ते सोडून देऊ. पण हिटलर, मुसोलिनी, स्टालिन यांची कठोर मुद्रा, मिल्ट्रीसारखे चालणे, मिल्ट्रीचे कपडे, खास कठोर मिशी, दाढी किंवा जे काही अतिशय सकारात्मक असे देवाने दिले असेल त्याचे प्रसंगी विद्रूपीकरण करून ते सतत दाखवत राहण्याची सक्ती आपण पाहिली आहे. युरोप, आशिया, मध्य आशिया, आफ्रिकेतील अनेक हुकूमशहांचे असेच अफाट विदूषकी आणि काही वेळा विपरीत, भयावह आणि कधी हास्यास्पद वाटणारे दर्शन त्यांची छायाचित्रे-व्हिडिओमध्ये आपल्याला झाले आहे. अमेरिकन मावळत्या अध्यक्षाचीदेखील अवाक करणारी रूपे आपण पाहिली आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आपला आवडता नेता दिसायलादेखील किती समृद्ध आहे, श्रीमंत आहे, किती लाखांचा सूट घालतो, त्या सूटवर किती बारीक अक्षरांत त्याचे नाव विणलेले आहे, तो किती व्यायाम योग करतो, काय खातो, तो झोपतो कधी, उठतो कधी, त्याचा ब्यूटीपार्लरवाला कोण आहे, त्याचे पाळीव प्राणी पक्षी कोण, त्यांची नावे काय, स्वैपाकी कोण आहे, टेलर कोण, नेता शरीराने किती फिट आहे, त्याचा आवाज किती ठाम, स्वाभिमानी, कठोर आणि परिणामकारक आहे, तो खास आवाज काढून नकला कशा छान करतो... आणि तो परिस्थिती बदलेल तशी किती रूपे किती सहज बदलू शकतो आणि डार्विनचा सिद्धान्त किती समर्थपणे सिद्ध करतो...

हे सारे प्रजेलाही रोज पहायचे असते. म्हणून बिचाऱ्या सत्ताधारी नेत्याचाही इलाज नसतो.

काही नेत्यांचे मात्र याहून वेगळे असते. सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक नीतीमूल्ये आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवणाऱ्या, उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या व्यक्तीदेखील स्वप्रतिमा जपतात. शरीर, चेहरा, हावभाव, देहबोली, पेहराव, वावर, आवाज इत्यादींचा विशेष विचार करतात. त्यांची विचारसरणी त्यांच्या दर्शनी आविष्कारात दिसते! गांधी, नेहरू, विनोबा, सरहद्द गांधी, जयप्रकाश नारायण, लालबहादूर शास्त्री, मार्टिन ल्युथर किंग, मंडेला, टागोर इत्यादी नावे या बाबत समोर येतात. आणखीही असणार!

काही नेते लोक स्व-प्रतिमेची कसलीच काळजी घेत नाहीत. ते जसे आहेत तसे सहजपणे लोकांसमोर येत राहतात. लोकांना तेही आवडते. लोक अद्भुत असतात!

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

नेत्यांची, खास करून हुकूमशहांची रूपे ही खासच असल्याने व्यंगचित्रकार लोक भरपूर फायदा उठवतात. हुकूमशहाचा जन्म केवळ कार्टुनिस्टसाठीच झालेला आहे असे तेही मानतात. कमीत कमी रेषा, मोजके रंग… मस्त काम अगदी थोड्याच वेळात होऊन जाते. त्यांची चित्रे लोकदेखील पटकन  ओळखतात. यात कधीही चूक होत नाही! ‘द ग्रेट डिक्टेटर’मध्ये चार्ली चॅप्लिन यांनी तर कमाल केली आहे. आपली चूक होतच नाही!

अर्थात या व्यंगचित्रणाच्या प्रक्रियेत काही वेळा व्यंगचित्रकार जीव गमावतात हेही खरे आहे.

सत्ताधाऱ्यांना, विशेषतः हुकूमशहांना या स्व-प्रतिमेची लत लागते. चटक लागते. आणि त्यात ते खुदखुश असतात. त्यांच्या स्व-प्रतिमेचे एक अफलातून व्यसनच असते. त्यांना त्याच अद्भुत रूपांत बघून समाधान पावण्याचे व्यसन गरीब प्रजेलाही लागते. नेता आणि प्रजा दोघांनाही पौगंडाच्या गंडाचे व्यसन  लाभते.

या व्यसनातून दोघांना  बाहेर काढण्यासाठी अजून तरी व्यसनमुक्ती केंद्र निघालेले नाही.

एकच गोष्ट वाईट असते ती म्हणजे… सत्ताधारी आणि प्रजा दोघेही स्वत्व हरवून एकमेकांकडे पाहत राहतात. ते त्यांचे राहतच नाहीत! आपापली खरी प्रतिमा त्यांना कधीच भेटत नाही!

शोकांतिकाच ही…

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......