‘हॉबसन–जॉबसन’ : ‘भिस्त्या’पासून ‘वाल्या’पर्यंत हिंदुस्तानी शब्दांची चविष्ट ‘केजरी’, नव्हे, ‘खिचडी’!
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • ‘हॉबसन – जॉबसन’ या शब्दकोशाचे एक मुखपृष्ठ
  • Mon , 28 December 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध हॉबसन – जॉबसन Hobson-Jobson

शब्दांचे वेध : पुष्प विसावे

Now in Injia’s sunny clime, 

Where I used to spend my time 

A-servin’ of ’Er Majesty the Queen, 

Of all them blackfaced crew 

The finest man I knew

Was our regimental bhisti, Gunga Din, 

He was ‘Din! Din! Din!

‘You limpin’ lump o’ brick-dust, Gunga Din!

‘Hi! Slippy hitherao

‘Water, get it! Panee lao,

 ‘You squidgy-nosed old idol, Gunga Din.’

(-----)

You Lazarushian-leather Gunga Din! 

Though I’ve belted you and flayed you, 

By the livin’ Gawd that made you,

You’re a better man than I am, Gunga Din!

सन १८९० मध्ये रडयर्ड किपलिंगने लिहिलेली ‘Gunga Din’ (‘गंगा दीन’) नावाची ही कविता आज किती लोकांना माहीत असेल? त्या काळात मात्र तिने खूप वादळ उठवले होते. एका गोऱ्या ब्रिटिश सैनिकाच्या तोंडून काळ्या भारतीयाची तारीफ? तीही पखालीतून पाणी आणणाऱ्या सामान्य भिस्त्याची? अनेक ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना ही कल्पनादेखील असह्य होती. पण त्यांची पर्वा न करता किपलिंगने या ओळी लिहिल्या आणि त्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. या कवितेवर हॉलिवुडने दोन सिनेमे काढले आहेत. जगातल्या अत्युत्तम इंग्रजी कवितांमध्ये तिचा समावेश केला जातो.

काल एक खूप जुने चित्र मला इंटरनेटवर दिसले. ते बघून मला किपलिंगचा हा भिस्ती आठवला. ‘आपली ती गटारी, त्यांचा तो बॅकॅनॅलिया’ या लेखात मी ‘on the wagon’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगताना जुन्या काळच्या दगडी आणि धूळभरल्या रस्त्यांवर पाणी टाकणाऱ्या ‘water carts’ किंवा ‘water wagons’चा उल्लेख केला होता. काल मी पाहिलेल्या चित्रात हेच काम काही भिस्ती करताना दाखवले आहेत. भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याची राजधानी असलेल्या कलकत्ता शहरात १८५८ साली असेच दगडी आणि धूळभरले रस्ते होते. त्यांच्यावर पाणी टाकून त्यांना स्वच्छ करण्याचे काम हे भिस्ती लोक करत असत. न्यू यॉर्कमधून निघणाऱ्या ‘Harper's Weekly’ या नियतकालिकात हे रेखाचित्र प्रसिद्ध झाले होते.

WATERING THE STREET OF CALCUTTA in the year of 1858 Source --- Harper's Weekly, New York

भिस्ती किंवा भिश्ती ही जमात आज जवळपास लुप्त झाली आहे. जे काही थोडेफार उरले आहेत, त्यांना फारसे काम उरले नाही. त्यामुळे हा शब्दही आता अडगळीत जाऊन पडला आहे. पण प्राचीन काळापासून अगदी आत्ता-आत्तापर्यंत भिस्त्याला आपल्याकडे फार महत्त्व होते. चामड्याच्या पिशवीतून म्हणजेच पखालीतून तो दूरदूरून पाणी घेऊन येत असे आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या किंवा विहिरींची सोय नसलेल्या ठिकाणी त्याचे वाटप करत असे. त्याच्या उपजीविकेचे ते साधन होते. युद्ध करायला जाणाऱ्या भूदल सैन्यासाठी तर तो देवदूतच असायचा. सैनिकांसोबत जे गैरलष्करी (मुलकी) कामगार लष्करी छावण्यांमध्ये असायचे, त्यात स्वयंपाक्यांसोबतच भिस्त्यांचाही भरणा असे. लढताना जखमी झालेल्या सैनिकाला किंवा एरवीही तहानलेल्या सैनिकांना ऐन समरभूमीवर जाऊन पाणी देण्याचे जोखमीचे काम त्यांना करावे लागे. रणांगणावर आलेल्या भिस्त्यांसारख्या गैरलष्करी माणसांवर बंदूक चालवायची नाही, तलवारी उचलायच्या नाहीत, हा युद्धनीतीचा नियम जरी दोन्ही बाजूंकडून पाळला जात असे तरी अनेकदा अपघातसुद्धा घडायचेच. किपलिंगचा ‘गंगा दीन’ भिस्ती अशाच एका आणीबाणीच्या प्रसंगात रणांगणावर मरण पावतो - आणि त्याने ज्याचा जीव वाचवला असतो, तो गोरा सैनिक कधी नव्हे ते एक सत्य बोलून जातो- ‘You’re a better man than I am, Gunga Din!’

गेल्या शतकाच्या पहिल्या दशकानंतर मोटरकार आणि ट्रकसारखी यांत्रिक वाहने रस्त्यांवर सरसकट धावू लागली आणि मग लांबून पाणी आणण्यासाठी भिस्त्यांवर अवलंबून राहणे हळूहळू कमी होत गेले. पाण्याचे दुर्भिक्ष्य काही भागांत अजूनही आहे, पण आपली गरज भागवण्यासाठी लोक आता भिस्त्यांची मदत घेत नाहीत.

मुळात फारसी किंवा पर्शियन असलेला असा हा भिस्ती एक शब्द म्हणून हिंदीतून इंग्रजी भाषेत केव्हा शिरला असेल? याची नक्की तारीख जरी सांगता येत नसली तरी अकबर आणि जहांगीरच्या काळापासून जे युरोपियन लोक भारतात आले, त्यांनी त्याचा उल्लेख आपापल्या कागदपत्रांत कुठे तरी केला असणार असा तर्क आहे. फर्ग्युसनच्या १७७३च्या ‘Dictionary of the Hindostan Language’मध्ये भिस्तीचा पहिला छापील उल्लेख सापडतो. Bheesty, Beasty, Bheestee, आणि bhisti अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याचे स्पेलिंग केले जात होते. फारसी भाषेत ‘बिहिश्त’ म्हणजे ‘स्वर्ग’. ‘बिहिश्ती’ म्हणजे ‘स्वर्गाचा रहिवासी’. यापासून ‘पाणी पुरवणारा’ हा त्याचा अर्थ कसा बनला, हे एक कोडेच आहे. कर्नल टेंपल याने तर ‘भिश्ती’ हा शब्द संस्कृत ‘विश’ या धातूपासून तयार झाला असावा, असेही अनुमान काढले आहे. ‘विश’ म्हणजे (पाणी) शिंपडणे. यावरून पुढे ‘भिस्ती/भिश्ती’ शब्द बनला, असा त्याचा तर्क आहे. (बघा- ‘हॉबसन जॉबसन’).

ते काहीही असो - शंभर वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात भारतातल्या कोणत्याही धनिकाच्या घरात - आणि विशेषतः युरोपियन आणि अँग्लो-इंडियन घरांमध्ये भिस्त्याला घरगृहस्थीचा आवश्यक घटक मानला जात असे. अर्थात यालाही जात आणि प्रदेशनिहाय आयाम होते. कर्मठ ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मणेतर जातीच्या माणसाने आणलेले पाणी (आणि तेही मृत जनावराच्या कातड्याच्या पिशवीतून) निषिद्ध मानले जात असे. त्यामुळे त्यांचे ‘पाणके’ वेगळे असत. मात्र बाकी ठिकाणी भिस्त्याची जात विचारली जात नव्हती. या भिस्त्यांजवळ जी (बहुधा बकऱ्याच्या) कातड्याची पिशवी असायची तिला ‘मसक’ किंवा ‘पखाल’ असे म्हटले जाई. यावरूनच मराठीत ‘पखालजी’ असाही शब्द तयार झाला. ‘मसक’ हा शब्द संस्कृत ‘मशकः’पासून तयार झाला आहे. कलकत्ता इलाक्यात १८६० पर्यंत या भिस्त्यांचा सरसकटपणे पगार दर महा पाच रुपये असायचा, अशी नोंद आहे.

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

‘भिस्ती’ हा शब्द इंग्रजीत किपलिंगमुळे खरा रुजला. पण भारतीय भाषांमधून इंग्रजीत गेलेला हा काही एकमेव शब्द नाही. असे हजारो भारतीय शब्द हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, तामिळसह अन्य अनेक भाषांमधून इंग्रजांनी १७००पासून आयात केले. त्यातले अर्ध्याहून जास्त शब्द आज विस्मृतीत गेले आहेत, कारण ते वापरणारी पिढीच आता उरली नाही. १९४७ साली ब्रिटिश साम्राज्याचा अस्त झाल्यावर हे शब्द वापरणाऱ्यांचीही पिढी अस्तंगत होऊ लागली. आज त्यांच्यातले फार थोडे लोक शिल्लक आहेत. त्यामुळे भिस्तीसारखे अनेक शब्द हळूहळू विस्मृतीत जाऊ लागले.

तसे पाहिले तर अजूनही इंग्रजीत भरपूर भारतीय शब्द आहेत, पण गेल्या शतकाच्या सुरुवातीला त्यांची जशी चलती होती, तसे आज दिसत नाही. कर्नल हेन्‌री यूल आणि ए. सी. बर्नेल या दोघांनी १९०२ साली ‘Hobson-Jobson’ (‘हॉबसन जॉबसन’) या नावाचा शब्दकोश तयार केला होता. त्यात मुख्यत्वे भारतीय उपखंडातून इंग्रजीत गेलेल्या अशा शेकडो शब्दांची तपशीलवार माहिती दिली होती. या ग्रंथाचे पूर्ण नाव ‘A glossary of colloquial Anglo-Indian words and phrases, and of kindred terms, etymological, historical, geographical and discursive’ असे आहे. हा एक नुसताच सामान्य शब्दकोश नसून त्यातून त्या साऱ्या शब्दांचा इतिहास, त्यांच्याशी निगडित असलेल्या कहाण्या, आख्यायिका, तसेच त्यांच्याबद्दलची अनेक अवतरणे, उदाहरणे ससंदर्भ वाचायला मिळतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ग्रंथकारांनी अनेक ठिकाणी स्वतःचे भाष्यदेखील केले आहे. ब्रिटिश भारताच्या इतिहासाला अनेक कंगोरे, पैलू आहेत; भाषा हा त्याचाच एक भाग. तत्कालीन राज्यकर्त्यांची भाषा कशी होती, त्यात एतद्देशीय शब्दांची कशी सरमिसळ झाली होती, एकूणच त्यातून तयार झालेला हा ‘patois’ (पॅट्वा) (विशिष्ट समुदायाशी संबंधित भाषा अथवा बोलीभाषेची वैशिष्ट्ये) कशा पद्धतीचा होता, याची सखोल कल्पना या ग्रंथामुळे येते. निव्वळ मनोरंजन म्हणूनही हे पुस्तक वाचायला हरकत नाही. कधीही, कोणतेही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा. प्रत्येक वेळी अतिशय मोलाची आणि तेवढीच आगळीवेगळी माहिती वाचायला मिळते.

उदाहरणार्थ, ‘वाला’ (wallah) हा शब्द बघा. याचे बरेच अर्थ होतात. करणारा, कर्ता, विकणारा, अशा अर्थाने तो एखाद्या शब्दाला उत्तरपद म्हणून जोडला जातो. ‘कामवाला’, ‘घरवाला’, ‘दारूवाला’, इत्यादी. ‘पूनावाला’मध्ये तो ‘चा’ या अर्थाने आला आहे. पुण्याचा राहणारा तो ‘पूनावाला’. इंग्रजांना हा शब्द एवढा भावला की, ते जे दिसेल त्याला ‘वाला’ असे उपपद लावून त्यापासून नवा शब्द बनवायचे. असाच एक प्रसिद्ध शब्द आहे, ‘काँपिटिशनवाला’ (Competitionwallah). ‘हॉबसन-जॉबसन’मध्ये या शब्दाची प्रविष्टी अशी आहे -

“COMPETITION-WALLAH  COMPETITION-WALLAH, s. A hybrid of English and Hindustani, applied in modern Anglo-Indian colloquial to members of the Civil Service who have entered it by the competitive system first introduced in 1856. The phrase was probably the invention of one of the older or Haileybury members of the same service. These latter, whose nominations were due to interest, and who were bound together by the intimacies and esprit de corps of a common college, looked with some disfavour upon the children of Innovation. The name was readily taken up in India, but its familiarity in England is probably due in great part to the "Letters of a Competition-wala," written by one who had no real claim to the title, Sir G. O. Trevelyan, who was later on member for Hawick Burghs, Chief Secretary for Ireland, and author of the excellent Life of his uncle, Lord Macaulay.

The second portion of the word, wālā, is properly a Hindi adjectival affix, corresponding in a general way to the Latin -arius. Its usual employment as affix to a substantive makes it frequently denote "agent, doer, keeper, man, inhabitant, master, lord, possessor, owner," as Shakespear vainly tries to define it, and as in Anglo-Indian usage is popularly assumed to be its meaning. But this kind of denotation is incidental; there is no real limitation to such meaning. This is demonstrable from such phrases as Kābul-wālā ghoṛā, 'the Kabulian horse,' and from the common form of village nomenclature in the Panjāb, e.g. Mīr-Khān-wālā, Ganda-Singh-Wālā, and so forth, implying the village established by MirKhan or Ganda-Singh. In the three immediately following quotations, the second and third exhibit a strictly idiomatic use ofwālā, the first an incorrect English use of it.

1785.-

"Tho' then the Bostonians made such a fuss,

Their example ought not to be followed by us,

But I wish that a band of good Patriot<-> wallahs . . ." -- In Seton-Karr, i. 93.

 

" In this year Tippoo Sahib addresses a rude letter to the Nawāb of Shānūr (or Savanūr) as "The Shahnoorwâlah."-<-> Select Letters of Tippoo, 184.

 

1814. -- "Gungadhur Shastree is a person of great shrewdness and talent. . . . Though a very learned shastree, he affects to be quite an Englishman, walks fast, talks fast, interrupts and contradicts, and calls the Peshwa and his ministers 'old fools' and . . . 'dam rascals.' He mixes English words with everything he says, and will say of some one (Holkar for instance): Bhot trickswalla tha, laiken barra akulkund, Kukhye tha, ('He was very tricky, but very sagacious; he was cock-eyed')." -- Elphinstone, in Life, i. 276.”

(हे उदाहरण तर अगदी आपल्या पुण्यातले आहे. सर टी. ई. कोलब्रुकलिखित एल्फिन्स्टनच्या चरित्राच्या पहिल्या भागातून घेतलेले.)

आज ‘हॉबसन-जॉबसन’ हा ग्रंथ चाळताना सहज लक्षात येते की, यातले अनेक भारतीय शब्द (किंवा त्यांची व्युत्पती) आपल्यालाही माहीत नाही. यूल आणि बर्नेल यांनी किती मेहनत घेऊन हा ग्रंथ सिद्ध केला असेल, हे यावरून आपल्याला कळून येते. त्यासाठी त्यांनी ज्या संदर्भ ग्रंथांची मदत घेतली, त्यांची नुसती यादीदेखील थक्क करून टाकते. ब्रिटिश साम्राज्याचे गुण-दोष जे काय असतील ते असतील, पण भाषांच्या अभ्यासाच्या बाबतीत ब्रिटिश लोकांनी आपल्यासाठी जे ज्ञानभांडार उघडे करून ठेवले आहे, त्याची वाहवा करायलाच हवी. या विषयावर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला जाऊ शकतो.

टॉम स्टॉपर्डच्या ‘इंडियन इंक’ या नाटकातली दोन पात्रे आपसात बोलताना ‘हॉबसन-जॉबसन’मधले जास्तीत जास्त शब्द वापरून बोलण्याची शर्यत लावतात.

Flora : While having ''tiffin'' on the ''veranda'' of my ''bungalow'' I spilled ''kedgeree'' on my ''dungaree''s and had to go to the ''gymkhana'' in my ''pyjamas'' looking like a ''coolie''.

Nirad : “I was buying ''chutney'' in the ''bazaar'' when a ''thug'' who had escaped from the ''chokey'' ran ''amok'' and killed a ''box-wallah'' for his ''loot'', creating a ''hullabaloo'' and landing himself in the ''mulligatawny''.

या संवादांमधले अवतरण चिन्हांमधले सर्व शब्द मूळचे भारतीय आहेत. आहे ना गंमत?

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

‘हॉबसन-जॉबसन’मध्ये समाविष्ट असलेल्या आपल्या ओळखीच्या आणखी काही शब्दांची ही एक झलक बघा. या शब्दांचे स्पेलिंग त्या काळात असेच केले जात असे.

Anicut (अॅ‌‌निकट) : नदीच्या पात्रात बांधलेला छोटा बंधारा. जलसिंचन आणि पाटबंधारे विभागाच्या बोलीत हा शब्द जास्त ऐकू येतो. मुळात तत्कालीन मद्रास इलाक्यात वापरला जाणारा हा शब्द पुढे भारतभर वापरला जाऊ लागला व नंतर इंग्रजीत शिरला. याची पहिली इंग्रजी नोंद १७७६ सालची आहे. ‘अनई कट्टू’ या तामिळ जोडशब्दापासून हा शब्द बनला आहे.

Bandicoot (बॅंडीकूट) : मोठ्या आकाराची घूस. मूळ तेलुगू पांडी-कोक्कू (डुक्कर-उंदीर) या शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश.

Bhyacharra (बायचॅरा) : भाईचारा. एकास एक लागून असलेल्या दोन किंवा अधिक खेड्यांचा सामुहिक विकासासाठी केलेला गट block.

Carcoon (कॅरकून) : कारकून. मराठीतून इंग्रजीत गेलेला शब्द. १५९० साली पहिली नोंद.

Coprah (कोप्रा) : खोबरे. पहिली नोंद १५६३.

Dhoby, Dobie (डोबी) : धोबी.

Dirzee (डर्झी) : शिंपी. पहिली नोंद १६२३.

Ecka (एका) : एक्का (एका घोड्याची छोटी गाडी).

Firmaun (फर्मॉन) : फर्मान. मूळ फारशी शब्द. पहिली नोंद १५६१.

Ghee (गी) : घी, तूप. पहिली नोंद १५९०.

Gorawallah (गोरावाला) : सईस. घोड्यांचा मोतदार. 

Hummaul (हमॉल) : हमाल (मूळ अरेबिक). पहिली नोंद १३५०.

Istubbul (इस्टबल) : तबेला. इंग्रजी stable चे नव्हे तर अरेबिक अस्तबलचे भ्रष्ट रूप.

Jasoos (जॅसूस) : जासूस, गुप्तहेर.

Karcanna (कॅरकॅना) : कारखाना. पहिली नोंद १६६३.

Lattee (लॅटी) : लाठी. पहिली नोंद १८३०.

Luddoo (लड्डू) : लाडू. पहिली नोंद १८२६.

Mahout (मॅहूट) : माहुत. हत्ती चालक. पहिली नोंद १५९०.

Naund (नॉंद) : नांद, मोठा रांजण.

Ooplah (ऊप्ला) : शेणाची गोवरी. (मूळ हिंदी उपला).

Puckerow (पकराओ) : हिंदी पकडो. एखाद्याला पकडण्याचा हुकुम.

Qui - Hi (कॉई हाय?) : हिंदी ‘कोई है?’चे भ्रष्ट रूप. नोकरांना बोलावण्याची पद्धत. पुढे बंगालमधल्या अँग्लो-इंडियन लोकांना याच नावाने हाक मारले जाऊ लागले.

Rumna (रम्ना) : हिंदी आणि संस्कृत रमनापासून. आनंददायी. रमणीय. नंतर क्रिडा मैदान असाही अर्थ झाला. पहिली नोंद १७६०.

Singara (सिंगॅरा) : शिंगाडा. पहिली नोंद १७९८.

Tope-khana (टोपकॅना) : तोफखाना.

Tulwaur (टलवॉर) : तलवार. पहिली नोंद १७९९.

Tumasha (टमॅशा) : तमाशा. पहिली नोंद १६१०.

Urz, Urzee, Urjee (अर्झ, अर्झी) : (मूळ फारशी) अर्ज, आवेदन. पहिली नोंद १६०६.

Vizier, Wuzeer (वजीर) : (मूळ अरेबिक). पहिली नोंद १६१२.

Zenana (झेनॅना) : मूळ फारशी जनाना, महिला. महिलानिवास. पहिली नोंद १७६०.

ही यादी म्हणजे फक्त एक वानगी आहे. या शितावरून तुम्ही जर परीक्षा केली असेल आणि तुम्हाला ही डिश आवडली असेल, तर तुम्ही ‘हॉबसन-जॉबसन’ हे मूळ पुस्तक अवश्य वाचा. मज़ा आ जायेगा!

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भारतातल्या अनेक बुद्धिवंतांना लॉर्ड मकॉले हा एक फार मोठा खलनायक वाटतो. भारतीय संस्कृती, शिक्षणपद्धती, आणि भाषा यापैकी त्याला काहीच आवडत नव्हते. म्हणून त्याने भारतीयांवर इंग्रजी भाषा आणि पाश्चात्य विचार लादले, असा या बुद्धिवंतांचा आरोप असतो. माझे त्यांना एकच सांगणे आहे की, त्यांनी ही चिंता करणे सोडून द्यायला हवे. कारण काळाने या आधीच मकॉलेवर सूड उगवला आहे.

कसा?

भारताची प्रत्येक गोष्ट नाकारणाऱ्या मकॉलेच्या मायदेशात म्हणजे ब्रिटनच्या मानसिकतेत भारतीय बनावटीच्या दोन गोष्टी आज अशा काही खोलवर रुजल्या आहेत की, मकॉलेच काय, त्याचा पणजाही वरून खाली आला तरी तो त्यांना आता दूर करू शकणार नाही. या दोन गोष्टी आज ब्रिटिशांच्या जीवनाचा, जेवणाचा, आणि भाषेचा अविभाज्य हिस्सा बनल्या आहेत. त्या आहेत आपल्या कढीपासून प्रेरणा घेऊन त्यांनी तयार केलेली ‘करी’ (curry) आणि आपल्या खिचडीपासून त्यांनी बनवलेली ‘केजरी’ (kedgeree). इंग्रजी संस्कृती आणि भाषा जोवर जिवंत आहेत तोवर ‘करी’ आणि ‘केजरी’ला मरण नाही. Am I right, Lord Macaulay?

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......