डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?, या प्रश्नासंदर्भात ‘कौन बनेगा करोडपती’वर एफआयआर
पडघम - देशकारण
सोनिया यादव 
  • छायाचित्र सौजन्य - सोशल मीडिया
  • Fri , 25 December 2020
  • पडघम देशकारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar मनुस्मृति Manusmriti अमिताभ बच्चन Amitabh Bachchan कौन बनेगा करोडपती Kaun Banega Crorepati केबीसी KBC

‘२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?’ हा प्रश्न ‘कौन बनेगा करोडपती-१२’ या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये ३० ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात विचारला गेला. या प्रश्नामुळे अभिनेता अमिताभ बच्चन आणि केबीसी-१२च्या निर्मात्यांविरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यातील औसा येथील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी एसपी निखिल पिंगळे यांना एक तक्रारपत्र दिले आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन आणि केबीसीच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केल्याची बातमी आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित केबीसीवरील स्पेशल एपिसोडमध्ये रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सफाई कर्मचारी आंदोलन (एसकेए)चे संस्थापक बेजवाडा विल्सन उपस्थित होते, ज्यांनी लाखो सफाई कर्मचाऱ्यांचे आयुष्य बदलले. त्यांना साथ देण्यासाठी ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकेचे सूत्रधार अनूप सोनी हेदेखील सामील झाले होते. केबीसीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी बेझवाडा विल्सन आणि अनूप सोनी यांना ११ व्या प्रश्नावर ‘हॉट सीट’वर बसवून सहा लाख चाळीस हजार रुपयांसाठी प्रश्न विचारला होता की, २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चार पर्यायही देण्यात आले. पहिले- विष्णू पुराण, दुसरे- भगवदगीता, तिसरे- ऋग्वेद आणि चौथे- मनुस्मृति.

या प्रश्नाच्या उत्तरात बेजवाडा विल्सन यांनी ‘मनुस्मृती’ असे सांगितले. यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या सुपरिचित शैलीत विचारले, ‘शुअर, लॉक कीया जाय?’ उत्तर बरोबर होते, सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

त्यानंतर अमिताभ म्हणाले की, ‘१९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी जाती-भेदभाव व अस्पृश्यतेचे वैचारिक औचित्य सिद्ध करणाऱ्या प्राचीन हिंदू ग्रंथ ‘मनुस्मृती’चा निषेध केला आणि त्याच्या प्रतीही जाळल्या.’ यावर बेजवाडा विल्सन म्हणाले की, ‘जर आज मी हेच काम केले तर मला अटक केली जाईल.’ या प्रश्नानंतर शोच्या विरोधात त्याच दिवसापासून आरंभ झाला. ‘# बॉयकोटकेबीसी’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरुवात केली. ट्विटर वापरकर्त्यांनी या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले. काही नेटिझन्सनी ते ‘डावे प्रचारवादी’ किंवा डाव्या विचारसरणीचा अजेंडा राबवत असल्याचा आरोपही केला. 

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

त्याच वेळी काहींनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचं वर्णन केलं. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०२० रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष ऋषी त्रिवेदी आणि प्रदेश प्रवक्ते पंकज तिवारी यांच्यासह अनेक नेते लखनौच्या हजरतगंज कोतवाली येथे दाखल झाले आणि एफआयआर दाखल करण्यात आला. ऋषी द्विवेदी म्हणाले की, या शोमधील मजकूर आक्षेपार्ह असून हिंदू समाज हा परस्पर संघर्ष करण्यासाठी पेटून उठला असता.

‘मनुस्मृती’बद्दल अनेकदा वाद का उद्भवतात?

‘मनुस्मृती’त लिहिलेल्या गोष्टी बऱ्याच वर्षांपासून वादाचे कारण ठरतात. डॉ. आंबेडकर यांनी जाळल्यानंतर हे पुस्तक देशभरात बऱ्याच ठिकाणी जाळले गेले. त्यानंतर त्याचा देश आणि समाजावर होणारा परिणाम यासारख्या विषयांवर चर्चा सुरू झाली. तथापि असे मानले जाते की, महान समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांनी ‘मनुस्मृती’ला सर्वप्रथम आव्हान दिले होते.

बीबीसीच्या एका अहवालानुसार मनुच्या ‘मनुस्मृती’ या धार्मिक ग्रंथात २६८४ श्लोकांसह एकूण १२ अध्याय आहेत. या ग्रंथाच्या काही आवृत्तींमध्ये श्लोकांची संख्या २९६४ आहे. यातील दलित आणि महिलांविषयी अशी अनेक श्लोक आहेत, जी बऱ्याचदा वादाचे कारण ठरतात. ‘मनुस्मृती’च्या पहिल्या अध्यायात निसर्गाची निर्मिती, चार युग, चार वर्ण, त्यांचे व्यवसाय, ब्राह्मणांचे मोठेपण यासारख्या विषयांचा समावेश आहे. 

दुसरा अध्याय ब्रह्मचर्य आणि त्याच्या मालकाची सेवा यावर आधारित आहे. तिसर्‍या अध्यायात विवाहसोहळा, विवाहाच्या प्रथा आणि पूर्वजांच्या आठवणी यांचे प्रकार वर्णन केले आहेत. चौथ्या अध्यायात गृहस्थ धर्माची कर्तव्ये, खाणेपिणे व पथ्याचे नियम आणि २१ प्रकारच्या नरकाविषयीच्या बाबींचा उल्लेख आहे.

पाचव्या अध्यायात महिलांची कर्तव्ये, शुद्धता आणि अपवित्रता आदींचा उल्लेख आहे. सहाव्या अध्यायात संत आणि सातव्या अध्यायात राजाची कर्तव्ये सांगितली आहेत. आठवा अध्याय हा गुन्हा, न्याय, वचन आणि राजकीय बाबी आदींविषयी आहे. नववा अध्याय वडिलोपार्जित मालमत्तेबाबत, दहाव्या अध्याय वर्णांचे मिश्रण, अकरावा अध्याय पापकर्म आणि बारावा अध्याय तीन गुण व वेदांची स्तुती याबाबत आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘मनुस्मृती’च्या पाचव्या अध्यायातील १४८व्या श्लोकात स्त्रियांबद्दल लिहिलेल्या गोष्टी समाजात पुरुषप्रधान विचारांना प्रोत्साहन देतात. यात असेही लिहिले गेले की, मुलगी नेहमीच तिच्या वडिलांच्या निगराणीखाली असली पाहिजे, लग्नानंतर पती तिचा संरक्षक असावा, पतीच्या मृत्यूनंतर तिने तिच्या मुलांच्या दयायाचनेवर अवलंबून राहावे, कोणत्याही परिस्थितीत स्त्री ही मुक्त होऊ शकत नाही. 

या पुस्तकात असे म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर केला पाहिजे. कोणत्याही स्त्रीचे कल्याण तेव्हाच होऊ शकते, जेव्हा पुरुषाचे कल्याण होते. स्त्रीला कोणतेही धार्मिक हक्क नसतात. आपल्या पतीची सेवा करून ती स्वर्ग गाठू शकते. ‘मनुस्मृती’ने शूद्रांचा शिक्षण घेण्याचा अधिकारही नाकारला होता.

डॉ. आंबेडकर ‘मनुस्मृती’बद्दल काय म्हणाले?

डॉ. आंबेडकर यांनी आपल्या ‘हिंदू तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान’ या पुस्तकात लिहिले आहे की, ‘‘मनुने चार वर्ण प्रवृत्तीचा पुरस्कार केला. मनुंनी हे चार वर्ण वेग वेगळे असल्याचे सांगून जातीव्यवस्थेचा पाया घातला तथापि, असे म्हणता येणार नाही की मनुने जातिव्यवस्था निर्माण केली असावीपरंतु त्यांनी या व्यवस्थेची बीजे नक्कीच पेरली.’’

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

त्यांनी ‘मनुस्मृती’ला विरोध दर्शविण्यासाठी ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ आणि ‘जातीभेद निर्मूलन’ या पुस्तकात विचार मांडले आहेत. त्या वेळी दलित आणि महिलांना सामान्य जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. यासह ब्राह्मणांच्या वर्चस्वामुळे जातीव्यवस्थेचा जन्म झाला. डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, ‘वर्णव्यवस्था तयार केल्याने केवळ कर्मच विभागले जात नाहीत, तर जे काम करतात ते देखील विभागले जातात.’

महत्त्वाचे म्हणजे डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ जाळून या देशाला संविधान दिले, परंतु आजही कट्टरपंथी हिंदुत्ववादी संघटना आणि उजव्या विचारसरणीतील लोकांवर मनुवाद आणि ‘मनुस्मृती’चा प्रचार केल्याचा आरोप केला जातो. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिला सहभागाच्या उल्लेखाबाबत ‘मनुस्मृती’चा संदर्भ दिला होता. संभाजी भिडे या नेत्याने तर मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याहूनही मोठे असल्याचे सांगून वाद निर्माण केला होता. भिडे हे कट्टर हिंदूवादी मतांसाठी प्रसिद्ध आहेत आणि ते ‘मनुस्मृती’चे उघड समर्थन करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या भाषणात संभाजी भिडे यांचे समर्थन केले होते आणि फेब्रुवारी २०१८मध्ये भिडे यांच्यासमवेतचे छायाचित्रही ट्वीट केले होते. भीमा कोरेगाव हिंसाचारात भिडे यांची कथित भूमिका जानेवारी २०१८ मध्ये उघडकीस आणणारी होती. त्यानंतर त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. तथापि या हिंसाचाराच्या विरोधात शासनाने काय कारवाई केली गेली, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

..................................................................................................................................................................

मूळ हिंदी लेख hindi.newsclick.in या पोर्टलवर ४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

अनुवादक प्रा. प्रियदर्शन भवरे हे बद्रिनारायण बारवाले महाविद्यालय जालना येथे समाजशास्त्राचे अध्यापन करतात.

priyadarshan1971@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......