गजानन खातू : मूल्य पेरणारा, विधायक संघर्ष करत रचनात्मक कामांचा डोंगर उभा करणारा माणूस
पडघम - राज्यकारण
राजा कांदळकर
  • गजानन खातू
  • Fri , 25 December 2020
  • पडघम राज्यकारण गजानन खातू Gajanan Khatu महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार अपना बाजारची गोष्ट Apna Bazarchi Gosht

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन खातू यांना नुकताच महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चा समाजकार्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख...

..................................................................................................................................................................

काही माणसं वेगळ्याच गुणांची असतात. त्यांना पदं, खुर्च्या मिळो वा ना मिळो; नाव, मानमरातब प्राप्त होवो, ना होवो ती चारचौघांत उठून दिसतात. समाजवादी विचारवंत गजानन खातू हे अशा वेगळ्या माणसांपैकी एक.

चळवळीतले लोक त्यांना ‘खातूभाई’ म्हणतात. २०१६मध्ये त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त मुंबईत १५ ऑक्टोबर २०१६ रोजी शिवाजी मंदिरात दिमाखदार सोहळा झाला. हा सोहळाही वेगळाच होता. ‘वेध बदलत्या जगाचा’ या विषयावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, अच्युत गोडबोले, मकरंद साठे यांची वेध घेणारी भाषणं झाली. सौमित्र आणि नीरजा यांच्या राजकीय कवितांनी सोहळ्यात रंग भरला. त्यानंतर डॉ. बाबा आढाव, मेधाताई पाटकर आणि पुष्पाताई भावे यांनी खातूभाईंबद्दल मनोगतं व्यक्ती केली. खातूभाईंचा चळवळीतला गोतावळा मोठा आहे. या सोहळ्यात त्याचं प्रतिबिंब दिसत होतं.

प्रा. संजय मंगला गोपाळ, संजीव साने, दत्ता इस्वलकर, प्रमोद निगुडकर, युवराज मोहिते, सुधीर देसाई, जीवराज सावंत, दत्ता बाळसराफ यांचा सोहळ्यात पुढाकार दिसत होता. सोहळ्यात सारं काही शिस्तबद्ध, आखीव-रेखीव होतं. खातूभाईंच्या ७५ वर्षांच्या तरल जीवनासारखं.

मुंबईत ‘अपना बाजार’च्या व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून खातूभाईंची कर्तबगारी समोर आली. गिरणगावात कामगारांच्या वस्तीत ‘अपना बाजार’ची भरभराट झाली. त्याआधी खातूभाई एका बड्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत होते. ते सोडून कमी पगारातली ‘अपना बाजार’ची नोकरी त्यांनी पत्करली. मन रमेल त्या कामात जीव ओतायचा, हा त्यांचा स्वभाव. त्याप्रमाणे त्यांनी ‘अपना बाजार’ वाढवला. फुलवला. नफ्यात आणला. त्याची आर्थिक उलाढाल वाढवली. ग्राहक चळवळीत वेगवेगळे प्रयोग केले. ग्राहकांना स्वस्तात दर्जेदार जीवनावश्यक गरजेच्या वस्तू दिल्या.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

‘अपना बाजार’मध्ये कामगारांच्या सोबतीने कसा चमत्कार घडवला, याविषयी खातूभाईंनी पुस्तक लिहिलंय. हे आहे चरित्रात्मक पुस्तक, पण त्यात खातूभाईंनी स्वतःबद्दल कमी आणि ‘अपना बाजार’च्या सहकारी प्रयोगाविषयी भरभरून लिहिलंय. हे पुस्तक वाचण्यासारखं आहे.

‘अपना बाजार’सारखा महत्त्वाचा ‘न भूतो’ प्रयोग साकार करूनही तो प्रयोग ऐनभरात चांगलं चाललेलं असताना खातूभाईंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. लोक कुजबुजत बोलायला लागले की, काहीतरी गडबड झाली असावी. खातूंचं अपना परिवारात काहीतरी बिघडलं असावं. पण तसं काही नव्हतं. खातूभाईंनी ते पुस्तकात लिहिलंय. ‘अपना बाजार’ सोडताना खातूभाई किती तटस्थ होते. पुष्पाताईंनी सोहळ्यात पुस्तकातल्या शेवटच्या वाक्याचा उल्लेख केला. खातूभाईंचं ते वाक्य असं, ‘अपना बाजारचा राजीनामा दिला. मुक्त झालो. बसस्टॉपवर पुढच्या बसची वाट पाहात थांबलो.’ खातूभाईंचं हे खास वैशिष्ट्य आहे. त्यांचं मन प्रतिष्ठेच्या नोकरीत गुंतलं नाही.

‘अपना बाजारा’तून बाहेर पडल्यानंतर खातूभाईंनी विविध प्रयोग केले. काही फसले, काही फुलले. कोकणात माणगावजवळ वडघर इथं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत खातूभाईंचा मोलाचा वाटा आहे. ५० एकर जमिनीवर हे स्मारक उभं राहिलंय. १५-१६ वर्षे खपून त्यासाठी पैसा जमा करून, कार्यकर्ते जोडून जवळपास पाच कोटी रुपयांच्या उलाढालीतून हे स्मारक उभं राहिलंय. तिथं वर्षभर बाल, किशोर शिबिरं चालतात. कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग होतात. विविध चळवळींच्या बैठका होतात. शाळा-कॉलेजातल्या हजारो मुलांची उपस्थिती या शिबिरात असते. खातूभाई म्हणतात, ‘मुलं इथं यावीत. त्यांनी साने गुरुजींचं नाव  ऐकावं. फोटो बघावा. गुरुजी त्यांच्यात रुजावेत. हे खरं माझं पॉलिटिक्स आहे.’

खातूभाईंशी गप्पा मारणं हा एक भारावलेला अनुभव असतो. त्यांच्या बोलण्यात आर्थिक विचार, चळवळींपुढचे प्रश्न, शहरांचे प्रश्न, खेड्यांचे प्रश्न, परिसर विकासाचे प्रश्न एकमेकांत गुंफत येत जातात. ते बोलत असताना जाणवतं की, बदलणाऱ्या जगाबद्दल या माणसाला खूप कुतूहल आहे. ते समजून घेण्याचा अट्टहास त्यांच्याजवळ आहे. त्यांचे विचार ऐकताना जाणवतं की, हा माणूस ठोकळेबाज नाही. ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करणारा आहे. हे आहे म्हणूनच खातूभाई वेगळे आणि सतत नवनवे वाटत राहतात. त्यांच्या प्रयोगात नावीन्य येत गेलं ते त्यामुळेच.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अच्युत गोडबोले सोहळ्यात बोलताना म्हणाले, “मी तंत्रज्ञान, अर्थकारण या विषयांकडे वेगळ्या दृष्टीने कसं पाहावं हे खातूभाईंकडून शिकलो.” त्यांनी पुढे सांगितलं की, “तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भविष्यात सर्व कामं यंत्रमानव करतील. ड्रायव्हर, शिक्षक, वेटर, रिसेप्शनिस्ट, कामगार, सफाई कर्मचारी यंत्रमानव असतील. त्यामुळे अनेकांचा रोजगार जाईल. पुढे पुढे तर ऑफिस ही संकल्पनाच बाद होईल. सर्व कामं कर्मचारी आपल्या मोबाइलवरून करतील. मोबाईल हेच ऑफिस होईल. ऑफिसला प्रवास करून जाणंयेणं वाचेल. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान पुढारलेलं झाल्याने माणसाचं आयुष्य वाढेल. ते २०० वर्षे सहज होईल. पुढे हजारो वर्षे माणूस जगू शकेल. त्यात अतिशयोक्ती काही नाही.”

प्रकाश आंबेडकर यांनी ‘धर्म आणि जात यामुळे उभे राहिलेले प्रश्न देशाच्या एकतेला मारक कसे आहेत. समाजात एकोपा निर्माण व्हायला, आणि प्रगती करायला अडथळे आहेत. आपण त्याला सामोरं कसं जायचं. त्यावर मात कशी करायची हे शोधून काढू शकलो नाही.’ याबद्दल खंत व्यक्त केली. मकरंद साठे यांनी कला, साहित्य या क्षेत्रात निर्माण झालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि सांस्कृतिक आक्रमणाचे पेच मांडले. तीनही वक्ते खातूभाईंच्या चिंतनाचा विषय असलेल्या विषयांवर बोलले.

बाबा आढावांनी ‘मूल्य पेरणारा माणूस, विधायक संघर्ष करत रचनात्मक कामांचा डोंगर उभा करणारा खातूभाईंचा स्वभाव’ कसा आहे, हे या वेळी सांगितलं. मेधा पाटकरांनी सर्वच चळवळींचे मार्गदर्शक म्हणून खातूभाईंचं अभ्यासू व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवलं.

खातूभाईंनी संस्था उभ्या केल्या, पण त्या ताब्यात ठेवण्यासाठी कधी आटापिटा केला नाही. उलट माणगावच्या साने गुरुजी स्मारकाची घटना त्यांनी अशी बनवली की, कुणीही कायम विश्वस्त वा पदाधिकारी राहणार नाही. खातूभाईंनी स्मारक उभं केलं आणि ते त्यातून बाजूला झाले. सल्लागाराच्या भूमिकेत गेले. या तटस्थपणाबद्दल खातूभाई म्हणतात, “संस्थेची अशी रचना ठेवल्याने घराणेशाहीला जागा नसते. चुकीची माणसं आपोआप बाहेर जातात. भ्रष्ट माणसं संस्थेच्या कामात मारक ठरत नाहीत. सतत नवेनवे लोक येतात. नव्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. संस्थेचे डबके होणे टळते. नवे काही सतत घडत राहते. संस्था नवी, ताजी राहते. तेच आपलं उद्दिष्ट आहे. माणसं येतील जातील, संस्था स्वच्छ आणि गतिमान असल्या पाहिजेत.”

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

खातूभाई म्हणजे काय? तर सतत नवं राहणं, ताजं राहणं. त्यांचे खादीचे झब्बे, त्यांचे रंग न्याहाळले तर आपण काही एक नवं बघतोय हे जाणवतं. आपण एका उत्सवाच्या आसपास फिरतोय आणि या उत्सवाचाच एक भाग बनतो.

खातूभाईंना हे कसं जमत असावं? त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघितलं की, जाणवतं, हा माणूस प्रचंड वाचतो. आवडलेल्या विषयांची वर्तमान पत्रांची कात्रणं दाखवत ते आपल्याशी नव्या नव्या विषयांवर बोलत राहतात. नवी पुस्तकं, नवं काही मांडणारी माणसं याबद्दल ते खूप जागरूक असतात. नवी भेटणारी माणसं, तरुण पोरं, कार्यकर्ते यांच्याशी ते सतत संवाद साधतात. त्यांचं नवं वेगळं काय चाललंय, हे जाणून घेण्याचा खातूभाईंना भारी नाद असावा. नवख्या प्रयोगशील तरुणांचं ते कौतुक करून सतत शाबासकी देताना दिसतात. आणखी त्याला हे करून बघ. यावर लिहिता आलं तर बघ. हे पुस्तक वाच. अशा काही मौलिक सूचना इतक्या सहज करतात की, त्यामुळे खूप मोलाचा ठेवा त्या तरुणाला मिळून जातो.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

खातूभाईंच्या सहवासात राहणाऱ्याला सहज जाणवतं की, हा माणूस जाम आशावादी आहे. व्यक्ती, संस्था, प्रक्रिया याकडे निराशेने, नकारात्मकतेने बघायचं नाही, हा जणू त्यांनी निर्णय घेतलाय की, काय इतके ते स्वगतशील असतात. पण निराशावादी नसणं ही त्यांची स्ट्रॅटेजी नाही. ते जीवनमूल्य म्हणून त्यांनी स्वीकारलंय. राष्ट्र सेवा दलाचं अध्यक्ष होणं टळलं तरी खातूभाई सेवादलाच्या नावानं बोटं मोडताना दिसले नाहीत. आम आदमी पक्षात जाऊन काही वेगळं करता आलं नाही, तरी तो एक वेगळा अनुभव होता, असं या घटनेला ते हसण्यावारी नेऊ शकतात. हा आशावाद खातूभाईंचं जगणं समृद्ध असल्यामुळे आलाय. ते कुटुंबवत्सल आहेत. घरात जसे समरसून जगतात तसेच चळवळीत, शिबिरात वागतात. समृद्ध जगण्यातून भरलेपण येतं. रितेपण जातं. रितेपणा नाही तिथं निराशावाद कसा असेल?

पंचाहत्तरीच्या सोहळ्यात उत्तर देताना खातूभाई म्हणाले, “मी चळवळीत राहिलो म्हणूनच समृद्ध झालो. मोठ्या परिवाराचा घटक होऊन मला विविधांगी जगता आलं.” खातूभाईंचं हे जगणं आणखी समृद्ध होत जावं, अशी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची भावना आहे.

..................................................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर मुक्त पत्रकार आहेत.

rajak2008@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......