‘उद्याचा मराठवाडा’ : दिवाळी अंक नव्हे एक मौलिक संदर्भग्रंथ
पडघम - साहित्यिक
शंकर विभुते
  • ‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी २०२०चे मुखपृष्ठ
  • Wed , 16 December 2020
  • पडघम साहित्यिक उद्याचा मराठवाडा Udyacha Marathwada दिवाळी अंक Diwali Ank

‘आजचे वृत्तपत्र उद्याची रद्दी’ असे म्हटले जाते. हाच नियम दिवाळी अंकांनासुद्धा लागू होतो. कारण दिवाळी अंक चार-सहा महिन्यांनी रद्दीच्या दुकानाचा सापडतात. त्यापाठीमागे कारणही तसंच आहे. जेव्हा वृत्तपत्रातील अग्रलेख किंवा दिवाळी अंकांतील मजकूर स्थानिक व तात्कालिक प्रश्नाभोवती फिरत राहतात, तेव्हा त्यांची मूल्ये तात्पुरत्या स्वरूपाची असतात. पण काही दिवाळी अंक यास अपवाद असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘उद्याचा मराठवाडा’.

यंदाचा हा दिवाळी अंक संदर्भग्रंथ म्हणून ठेवण्याजोगा आहे. उदा. ‘उद्याचा मराठवाडा’चा २०१८चा दिवाळी अंक शिक्षणव्यवस्थेवर गंभीर चिंतन करणारा होता. त्यामध्ये यंदा ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित झालेल्या रणजीतसिंह डिसले यांच्या कार्याचा सर्वप्रथम परिचय करून देण्यात आला होता. २०१९चा दिवाळी अंक ‘जुने प्रश्न नवी उमेद’ या विषयावर होता.

या अंकांतून लिहिणारे लेखक, विचारवंत, कवी हे सगळेच फक्त मोठे साहित्यिक आहेत, असे नाही, तर नवोदितांच्या प्रतिभेचाही त्यांनी शोध घेतलेला दिसून येतो. या सर्वांच्या प्रतिभेतून निर्माण झालेले लेखन अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

.................................................................................................................................................................

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

असेच संदर्भमूल्य राखण्याची परंपरा २०२०च्या दिवाळी अंकातही दिसून येते. हा दिवाळी अंक ‘करोना’ या जागतिक समस्येला केंद्रस्थानी ठेवून त्याचे विविध कंगोरे वाचकांसमोर उघडे करण्याचे काम करतो.

हा अंक ‘पुनर्निर्माण पर्व’ या नावाने जागतिक प्रश्नाला भिडलेला आहे. आज संपूर्ण जग करोना महामारीशी दोन हात करत आहे. त्या समस्येचे विविध स्तर व चिंतन वाचकांना सुन्न करून टाकतात. वैचारिक व वैज्ञानिक लेखन वाचकांना वस्तुनिष्ठ माहिती पुरवते, तर ललितलेखन वाचकांच्या मेंदूला विचार करायला भाग पाडते.

या दिवाळी अंकाच्या प्रास्ताविकात संपादक राम शिवडीकर म्हणतात, “वादळ थांबवणं जरी आपल्या हाती नसलं तरी दिवा प्रज्वलित करणं मात्र आपल्या हाती नक्कीच आहे.”

या दिवाळी अंकातील पहिल्याच लेखात दैनिक ‘सकाळ’चे ज्येष्ठ संपादक प्रकाश अकोलकर करोनाचं गंभीर स्वरूप वाचकांसमोर ठेवून म्हणतात, “आपल्या समाजाची वाटचाल पुन्हा अस्पृश्यतेच्या दिशेने सुरू झाली नाही ना?” तेव्हा वाचकांना अमिताभ बच्चनचा सध्याचा लोकप्रिय संवाद डोळ्यासमोर येतो- ‘दो गज दुरी, मास्क है जरुरी’. पर्यावरणवादी कार्यकर्ते व लेखक अतुल देऊळगावकर यांच्या लेखाचे नावच ‘व्हशील मानूस?’. या लेखात ते म्हणतात, “मानवजातीचे शारीरिक वय वाढताना मानसिक वय काही वाढत नाही, याची जाणीव असंख्य वर्षांपासून विचार करणाऱ्यांना आहे. मानसिकदृष्ट्या उत्क्रांत न झालेल्या मानवामुळे संस्कृती व संसृतीच नव्हे, तर उत्क्रांती धोक्यात आली आहे.” पुढे याच लेखात ते म्हणतात, “माणूसप्राणी हा स्वतःला या जगातील सर्वात श्रेष्ठ समजतो, परंतु सार्स व कोविड-१९ने मानवजात हेच मोठं भक्ष्य होणं शक्य असल्याचं दाखवून दिलं आहे.” हा विचार वाचकांना आपल्या चुकांची आठवण करून देतो. याच लेखातील अमेरिकन रोग पर्यावरणतज्ज्ञ एस्कोबार यांचे विचार तर मुळातून वाचण्यासारखे आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

करोना महामारीने जसे व्यापार, उद्योग, व्यवसाय यांचे कंबरडे मोडले, तसे परंपरागत शिक्षण पद्धतीलाही लॉक करून टाकले. ‘परीक्षा, कोरोना आणि राजकारण’ या लेखात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर लिहितात, “परीक्षा, कोरोना आणि राजकारण यांचे उच्चशिक्षणावर दूरगामी परिणाम होणार का, हा खरा प्रश्न आहे. ज्या घटना घडल्या त्यावरून विद्यापीठांची स्वायत्तता संकुचित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे म्हणायला भरपूर वाव आहे.” हे चित्र भयावह आहे. हा देश भविष्यात ज्यांच्या हातात जाणार आहे त्यांचे शिक्षण कसे चालू आहे, हा चिंतेचा विषय आहे.

पत्रकार द्वारकानाथ संझगिरी आपल्या लेखात लोकांना कळकळीची विनंती करतात- “यापुढे दहा वर्षे एकही नवा पुतळा उभा नाही राहिला तरी चालेल. एकही मंदिर चर्च, मशीद आणि गुरुद्वारा उभा राहिलं नाही तरी चालेल. मेळे आणि हज यात्रा यावर सरकारने पैसे नाही खर्च केले तरी चालेल. हॉस्पिटल हेच मंदिर-चर्च-मशीद–गुरुद्वारा माना. ज्यांची प्रार्थनास्थळं, पुतळे उभारणं तुमच्या मनात आहे, त्यांची नावं हवं तर या वैद्यकीय मंदिरांना द्या.” हा विचार फक्त करोना महामारीकरता उपयोगी आहे असे नाही, तर कोणत्याही आजारासाठी महत्त्वाचा आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून इमरान खान आपल्याला आवडत नसेल, पण त्याने क्रिकेटपटू म्हणून पाकिस्तानमध्ये जे पहिले कॅन्सर हॉस्पिटल केले, त्याचे अनुकरण आपण करायला हवे, हे त्यांचे म्हणणे गंभीरपणे घेण्यासारखे आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : दिवाळी २०२० : मराठी विज्ञानकथा अजून ठराविक साच्यातून बाहेर का पडत नाही?

..................................................................................................................................................................

करोनाने संपूर्ण जगाला लॉकडाऊन केले. बाहेर पडणे शक्य झाले नाही, तेव्हा घरी बसलेल्या प्रत्येकाचे डोळे व कान प्रसारमाध्यमे कोणती माहिती देतात याकडे होते. पण आजची माध्यमे ‘टीआरपी’च्या नावाखाली जो गोंधळ घालत आहेत ते थक्क करण्यासारखे आहे. अशा माध्यमांना पत्रकार संजय आवटे यांनी आपल्या लेखात ‘मदारी’ असं समर्पक नाव दिले आहे. माध्यमांनी मदाऱ्यासारखे लोकांना असे खेळवले की, त्यांची विवेकबुद्धी नष्ट झाली. ‘तबलीगी’ प्रकरणाला जो रंग दिला गेला, तो अतिशय भयावह होता. आता पुढचा काळ कसा असेल आणि त्यातील सगळ्यात मोठ्या कंपन्या कोणत्या, याविषयी ते म्हणतात, “सध्याही जगात सर्वाधिक मोठ्या कंपन्या कोणत्या आहेत? गुगल, फेसबुक, अलीबाबा, अॅपल! या सर्व टेक-कंपन्या आहेत. ‘डेटा’ हे आता नवे इंधन झाले आहे.” हा बदलता काळ आपल्याला समजून घ्यावा लागेल.

एकीकडे ‘तबलीगी’ प्रकरणातून ‘मदारी मीडिया’ लोकांची मने कलुषित करत असताना दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सय्यद रिजवान व अल्ताफ कुरेशी या दोन योद्ध्यांनी जी कामगिरी केली, ती तोंडांत बोटे घालण्यासारखी आहे. त्यांची ओळख पत्रकार संदीप काळे यांनी करून दिली आहे. करोनामुळे मृत्यू पावलेल्या विविध धर्मातील व्यक्तींची कबरस्थानमध्ये जेव्हा हे दोघं त्यांच्या त्यांच्या रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करत होते. ते लिहितात, “कुणीतरी आपल्या मृत नातलगांना शेवटचं पाहायला येईल आणि अंत्यसंस्कार होऊन गेल्याचं कळल्यावर अंत्यदर्शन झालं नाही म्हणून निराश होईल, असा विचार करून मृतांच्या चेहऱ्याचे फोटोही ते काढून ठेवतात.”

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एकीकडे आपणास वरील माणुसकी दिसते, तर दुसरीकडे परंपरागत संकुचित मनोवृत्ती पाहावयास मिळते. विज्ञान-तंत्रज्ञानमुळे नवे शोध लागत असताना आपण मात्र त्याचा वापर अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासाठी व त्या घट्ट रुजवण्यासाठी करत आहोत, ही खंत पत्रकार प्रसन्न जोशी आपल्या लेखात केली आहे. ते म्हणतात, “…नवल याचं वाटतं की नवतंत्रज्ञानानं प्रत्येकाच्या हातात तंत्राची आधुनिकता आणली. मात्र हे तंत्रज्ञान ज्या विज्ञानाची उत्पत्ती आहे, तो वैज्ञानिक दृष्टिकोन हे तंत्रज्ञान ज्या तंत्रप्रधान लोकशाही आणि उदारमतवादी देशांमधून आलंय, त्या देशांतलं आधुनिक विचारांचं मूल्य मात्र आपल्या ‘डोक्यात’ आलं नाही.”

लेखासोबतच अविनाश धर्माधिकारी, सुरेश वांदिले, अभिजित जोग, पार्थ मीना निखिल, अलका धुपकर, देवदत्त कशाळीकर, डॉ. संजय मुखर्जी यांचे लेखही लेखही वाचकांना विचारप्रवर्तक करतात.

या अंकात मान्यवरांच्या कविता व मराठी संगीत विभागाचा प्रवास ही वाचकांची अभिरुची वाढवतात. थोडक्यात हा दिवाळी अंक संदर्भ आहे.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......