अजूनकाही
मराठी विज्ञान परिषदेचे पंचावन्नावे अ.भा. मराठी विज्ञान अधिवेशन (ऑनलाईन) १३ डिसेंबर २०२० रोजी पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉ. शेखर मांडे (महासंचालक, सीएसआयआर, नवी दिल्ली) यांनी भूषवले. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
लस आपण रोग व्हायच्या आधी, रोग होऊ नये म्हणून घेतो. लस दिल्यामुळे त्या व्यक्तीला हा रोग होण्याची शक्यता खूप कमी होते, कारण त्यामुळे शरीरात त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिक्षमता निर्माण होते. रोग झाल्यावर तो बरा व्हावा, त्यावर उपचार म्हणून जे आपण घेतो, त्याला आपण ‘औषध’ म्हणतो. सध्या आपण विश्वास ठेवून आहोत की, लस आली तर आपण ‘कोविड-१९’वर मात करू, आणि मग आपल्याला पूर्णपणे समाधान मिळेल. पण, प्रत्यक्षात कोणत्याही औषधाने रोगावर सर्वकाळ आणि पूर्णपणे मात केली असे कधीच होत नाही.
त्यामुळे आपल्याला नेहमीच सावध रहावे लागणार आहे, कारण लस किेंवा औषध १०० टक्के लोकसंख्येवर काम करतेच असेही नाही. जेव्हा आपण लस तयार करतो, तेव्हा असे मानले जाते की, ५०-६० टक्के लोकांवर जर त्याचा चांगला परिणाम होत असेल तर तिला यशस्वी लस म्हणता येईल. याचा अर्थ असा की, ३०-४० टक्के जनतेला लसीद्वारे संरक्षण मिळणार नाही. प्लाज्मा ही लस नसून एक वेगळ्या प्रकारची उपचारपद्धती आहे; कारण प्लाज्मा ज्या लोकांकडून घेतो, त्यांच्या प्लाज्मामध्ये प्रतिपिंडे/प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) असतात, ज्या विषाणूंवर हल्ला करू शकतात. जो माणूस करोनापासून मुक्त झाला आहे, त्याच्या शरीरात अँटीबॉडीज असतात; आणि या अँटीबॉडीज करोना रुग्णाच्या शरीरात सोडल्या तर तो रुग्ण करोनावर मात करू शकेल, अशी अपेक्षा असते.
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
एखाद्या रोगावर लस तयार करायची तर पुढीलप्रमाणे टप्पे असतात -
१. संशोधन : या प्रथम टप्प्यात नैसर्गिक किंवा संश्लेषित प्रतिजनाचा शोध घेणे, जो मारक/प्रभावी प्रतिद्रव्य निर्मितीला चालना देईल; जेणेकरून रोगकारकाला प्रतिबंध घालू शकेल किंवा त्याचा प्रभाव कमी करू शकेल.
२. चिकित्सापूर्व (प्रि-क्लिनिकल) स्थिती : हा पुढील टप्पा आहे. या टप्प्यात ऊती-संवर्धन किंवा पेशी-संवर्धन पद्धतीने प्रतिजन मोठ्या प्रमाणावर वाढवले जाते. अशा संवर्धित पेशी किंवा ऊतींचा प्रयोग प्रथम प्राण्यांवर करतात; त्या पेशी प्राण्यात संबंधित रोगाविरुद्ध प्रतिक्षमता निर्माण करू शकतात किंवा नाही हे पाहिले जाते. बहुतेक वेळा लशीसाठी निवडलेले अनेक प्रतिजन-उमेदवार पहिल्याच वेळी अयशस्वी ठरतात; कारण ते रोगाविरुद्ध प्रतिक्षमता निर्माण करू शकत नाहीतच, उलट रुग्णाला हानी पोहोचवण्याचे काम करतात. अशा वेळी दुसऱ्या प्रतिजन-उमेदवाराचा शोध घेतला जातो. त्यात यश मिळाल्यानंतर पुढील वाटचाल सुरू होते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
३. चिकित्सालयीन (क्लिनिकल) टप्पा : या टप्प्यात संशोधन-संस्था, अन्न आणि औषध महामंडळ (एफडीए) यांच्याकडे नवीन लसनिर्मितीसाठी अर्ज करतात. आणि या अर्जात नवीन औषधी द्रव्याच्या चाचण्या ते कशा प्रकारे घेऊ इच्छितात, हे नमूद केले जाते. त्यानंतर ती संशोधन संस्था समीक्षकांची एक बैठक बोलावते; त्यांच्याकडून मान्यता मिळवते. एफडीएला अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत मान्यता/नकार द्यावा लागतो. एफडीएची मान्यता मिळाल्यावर मानवी चाचण्यांचे तीन टप्पे पार पाडावे लागतात.
४. नियामक मंडळ निरीक्षण व मान्यता (रेग्युलेटरी रिव्ह्यू आणि अॅप्रूव्हल) : तीन मानवी चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर ती संस्था एफडीएकडे बीएलए म्हणजे बायोलॉजिक्स लायसेंस अॅप्लिकेशन म्हणजेच परवान्यासाठी अर्ज करते.
५. उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) : परवाना मिळाला की, मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची प्रक्रिया सुरू होते.
६. दर्जा नियंत्रण (क्वालिटी कंट्रोल) : परवाना, उत्पादन आणि वितरण झाले म्हणजे संस्थेचे काम संपले असे नाही. लस कशी कार्य करते, तिचे परिणाम/ दुष्परिणाम, लशीचा दर्जा हेही पाहणे संस्थेची जबाबदारी आहे. लशीची कार्यप्रवणता व सुरक्षितता व्यवस्थित राखली जाईल, याची काळजी संस्थेलाच घ्यावी लागते.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सध्या करोना संसर्गाचा प्रादुर्भाव भारतात कमी झाल्यासारखा वाटत असला तरी तो संपलेला नाही आणि परत येईल का याची भीती आहेच. त्यावर लस शोधण्यासाठी अनेक राष्ट्रांत चढाओढ आणि प्रयत्न चालू आहेत. चढाओढीतील प्रत्येक स्पर्धकाला वाटते की, आपली लस प्रथम बाजारात यावी आणि श्रेय प्रथम आपल्याला मिळावे.
रशियाने आपली लस बाजारात प्रथम आणली, परंतु सध्या तरी ती रशियापुरतीच मर्यादित आहे. नुकताच रशियाने भारतातील रेड्डीज लॅबोरटरीशी ‘स्पुटनिक-५’ या लशीच्या १० कोटी मात्रा (डोस) पुरवण्याचा करार केला आहे.
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोधलेल्या लसीच्या मानवी चाचण्या चालू आहेत. या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारतातील सिरम इन्स्टिट्यूट करणार असून, पुढील तीन-चार महिन्यांत ही लस बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जातेय. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीच्या लशीच्या मानवी चाचण्या चालू असल्याचे वाचनात आले. भारतीय लस ‘कोवॅक्सीन’ हीसुद्धा प्रगतिपथावर आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment