अजूनकाही
संजय कुंदन हे गाजियाबादमध्ये राहणारे हिंदी कवी आहेत. त्यांचे आजवर ‘कागज के प्रदेश में’, ‘चुप्पी का शोर’ हे दोन कवितासंग्रह, ‘बॉस की पार्टी’ हा कथासंग्रह आणि ‘टूटने के बाद’ ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. ४९ वर्षांच्या या साहित्यिकाला ‘भारत भूषण अग्रवाल’, ‘हेमंत स्मृति कवी सन्मान’, ‘विद्यापति पुरस्कार’ अशा विविध सन्मानांनी सन्मानित करण्यात आलंय. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयीची ही त्यांची ताजी कविता… आधी तिचा मराठी अनुवाद आणि नंतर मूळ हिंदी कविता...
..................................................................................................................................................................
मराठी अनुवाद
सवाल आहे की
राजधानीमध्ये सवाल केला जातोय
की, शेतकऱ्यांनी मळकट-कळकट धोतर
का नाही नेसलंय,
त्यांचा गमजा का विरलेला नाहीये
जसा दिसतो पुस्तकांत?
सवाल हा आहे की
त्यांच्या हातात काठी का नाहीये
आणि खांद्यावर गाठोडं
जसं दिसतं पुस्तकांत?
ते का आले नाहीयेत इथवर
याचकांसारखे
जसे सिनेमांत जातात
सावकाराकडे
बिचकत-घाबरत?
एका कागदावर अंगठा लावल्यानंतर
ते जसे उपकृत होतात दात्याप्रति
तसे ते का नाही झालेत उपकृत,
त्यांना राजधानीच्या रस्त्यांवर चालू दिल्याबद्दल
इथलं पाणी पिऊ दिल्याबद्दल
इथल्या हवेत श्वास घेऊ दिल्याबद्दल?
का नाही त्यांनी घाबरत-घाबरत गगनचुंबी इमारतींकडे पाहिलं
आणि कापरं भरल्यागत रस्ते ओलांडले?
जसं सिनेमांत करताना दिसतात शेतकरी
गावातून शहरात आल्यानंतर?
सवाल हा आहे की, हे कसले शेतकरी आहेत,
जे छाती ठोकून उभे आहेत,
प्रत्येकाच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलत आहेत?
हे कसले शेतकरी आहेत?
हे शेतकरी तरी आहेत, की नाही?
मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा
..................................................................................................................................................................
मूळ हिंदी कविता
सवाल है कि
राजधानी में सवाल उठ रहा है
कि किसानों ने धोती
क्यों नहीं पहन रखी है मैली-कुचैली,
क्यों नहीं है उनका गमछा तार-तार,
जैसा दिखता है किताबों में?
सवाल है कि
उनके हाथ में लाठी क्यों नहीं है
और कंधे पर गठरी,
जैसी दिखती है किताबों में?
क्यों नहीं वे पहुंचे यहां
याचक की तरह
जैसे फिल्मों में पहुंचते हैं
एक साहूकार के पास
सकुचाते-सहमते?
एक कागज पर अंगूठा लगा देने के बाद
जैसे वे होते हैं कृतज्ञ एक महाजन के प्रति
वैसे क्यों नहीं हुए अहसानमंद
कि उन्हें राजधानी की सड़कों पर चलने दिया गया
पीने दिया गया यहां का पानी
यहां की हवा में सांस लेने दिया गया
क्यों नहीं उन्होंने डर-डर कर बहुमंजिली इमारतों को देखा
और थरथराते हुए सड़कें पार कीं
जैसे फिल्मों में करता है एक किसान
गांव से शहर आकर?
सवाल है कि ये किस तरह के किसान हैं
जो सीधा तनकर खड़े होते हैं,
हर किसी से आंखों में आंखें डालकर बात करते हैं?
ये किस तरह के किसान हैं
ये किसान हैं भी या नहीं?
..................................................................................................................................................................
संजय कुंदन
sanjaykundan2@gmail.com
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment