‘परिवर्तनाचा वाटसरू’ : ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ची मूलभूत, सविस्तर आणि व्यापक परिप्रेक्ष्यात चर्चा करणारा दिवाळी अंक
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • ‘परिवर्तनाचा वाटसरू’ दिवाळी २०२०चं मुखपृष्ठ
  • Fri , 27 November 2020
  • पडघम साहित्यिक दिवाळी अंक Diwali Ank परिवर्तनाचा वाटसरू Parivartnacha Vatsaru अभय कांता Abhay Kanta

‘साप्ताहिक सकाळ’, ‘चित्रलेखा’, ‘लोकप्रभा’, ‘साधना’ ही मराठीतली चार प्रमुख साप्ताहिकं. पण चौघांची तऱ्हा वेगवेगळी. या उलट पाक्षिकांचं. मराठीमध्ये जवळपास पाक्षिकं नाहीतच. त्याचं कारण महाराष्ट्रात पाक्षिक हा प्रकार चालत नाही, असा इतिहास आहे. पण या गोडगैरसमजाला एक सणसणीत अपवाद आहे. तो म्हणजे ‘परिवर्तनाचा वाटसरू’. गेली २१ वर्षं हे पाक्षिक नियमितपणे प्रकाशित होत आहे, हे एक आश्चर्यच आहे. अर्थात त्याचं संपूर्ण श्रेय अभय कांता यांना द्यायला हवं. त्यांनी अतिशय नेटानं हे पाक्षिक चालवलं आहे.

या मराठीतल्या उल्लेखनीय अशा पाक्षिकाचा दिवाळी अंकही उल्लेखनीय असतो. या अंकात वैचारिक आणि ललित या दोन्ही प्रकारच्या साहित्याचा समावेश असतो. या वर्षीचा २३वा दिवाळी अंकही त्याला अपवाद नाही.

या अंकात ‘इस्पिकची राणी’ (अलेक्झांडर पुश्किन, अनु. सोनिया वीरकर), ‘मोईरोमला काय माहीत बलात्कार म्हणजे काय!’ (सेलिना हुसेन, अनु. स्वातीजा मनोरमा), ‘आईशप्पथ खरं सांगेन…’ (शिल्पा कांबळे), ‘लाकडाची देवी’ (सारिका उबाळे), ‘चाकं’ (माधव जाधव), ‘फिटर’ (राजेंद्र खैरनार), ‘कथा आणि टायपिस्ट’ (साधना गोरे), ‘रूस्तूमा’ (सत्य कुटे) या आठ कथा, २१ कविता आणि ‘द्रौपदी हसिमुद्दिन शेख’ हा छाया कोरेगावकर यांचा ललित लेख, या ललितसाहित्याचा समावेश आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

यातली अलेक्झांडर पुश्किन यांची ‘इस्पिकची राणी’ ही कथा चांगली आहे आणि तिचा अनुवादही. पण उत्तम म्हणाव्या अशा कथा आहेत ‘मोईरोमला काय माहीत बलात्कार म्हणजे काय!’ (सेलिना हुसेन) आणि ‘आईशप्पथ खरं सांगेन…’ (शिल्पा कांबळे). हुसेन या बंगाली लेखिकेचीही कथा व्हाया इंग्रजी मराठीत आली आहे. पण तरीही तिच्यातली दाहकता आणि भेदकता जबरदस्त आहे. तिचा अनुवादही चांगला आहे. अशी कथा मराठीमध्ये तरी आजवर वाचनात आलेली नाही. वाचणाऱ्याचा गळा अशा मजबूत पकडीत ही कथा धरते की, शेवटपर्यंत सोडत नाही.

त्याच काहीशा वळणाची ‘आईशप्पथ खरं सांगेन…’ ही शिल्पा कांबळे यांची कथा आहे. पण… हा पण ती वाचताना थोडासा आड येतो. या कथेची नायिका मोईरोमइतकी वास्तव वाटत नाही. अर्थात अशी तुलना करणं चुकीचं आहे. पण ही कथा पण उत्तम आहे.

या तीनच कथा इतक्या जबरदस्त आहेत की, त्यानंतरच्या कथा त्याच दमात वाचून काढणं जमत नाही. त्यामुळे त्या वाचकांनी प्रत्यक्षच वाचाव्यात असं नम्रपणे सुचवावंसं वाटतं.

या अंकातल्या २१ कवितांपैकी विजय चोरमारे यांची कविता चांगली आहे, बाकीच्या कविता मात्र ‘बऱ्या’ म्हणाव्या अशाच आहेत.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘पुरुषस्पंदनं’ : ‘विषारी मर्दानगी आणि मानवी नातेसंबंध’ यांचा आढावा घेणारा रौप्यमहोत्सवी वर्षातला नावीन्यपूर्ण दिवाळी अंक

..................................................................................................................................................................

या अंकाचं सर्वांत प्रमुख वैशिष्ट्य आहे – ‘शिक्षणाची कसोटी (राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०चे मूल्यमापन)’ हा परिसंवाद. जुलै २०२०मध्ये म्हणजे ऐन करोनाकाळात केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ धोरण जाहीर केलं. त्याचा केंद्र सरकारपासून ‘गोदी मीडिया’पर्यंत बराच डिंडिमही वाजवला गेला. पण शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक-प्राध्यापक आणि विचारवंत यांनी मात्र या धोरणांतली विसंगती, त्यातील त्रुटी आणि त्यातील गफलती यांवर बोटं ठेवलं आहे.

या परिसंवादातले ‘फारकतीचं धोरण’ (अनिता रामपाल, मुलाखतकार श्रेया खैतान), ‘भाषा हाच संदेश’ (माधुरी दीक्षित), ‘काही डाव, काही पेच’ (अर्चना मेहेंदळे), ‘परिघी जनसमूहांच्या शिक्षणाची पाने कोरीच’ (श्रीकांत काळोखे), ‘शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे अधांतरी भवितव्य’ (मालविका झा), ‘शाळासंकुलाच्या आड विलिनीकरणाचा डाव’ (भाऊसाहेब चासकर), ‘बालशिक्षण आणि आरंभिक साक्षरता’ (नीलेश निमकर), ‘भेदभावाचं गणित आणि विज्ञान’ (आर. रामानुजम), ‘केंद्रीकरणवादी माहिती-संप्रेषण तत्त्वज्ञान’ (गुरुमूर्ती काशीनाथन) हे नऊ लेख आणि या परिसंवादाचे संपादक किशोर दरक यांचं संपादकीय हा सर्वच मजकूर आवर्जून वाचावा असा आहे. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ची इतकी मूलभूत, सविस्तर आणि व्यापक परिप्रेक्ष्यात केलेली चर्चा यंदाच्या इतर कुठल्याही दिवाळी अंकात वाचायला मिळणार नाही.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘ऋतुरंग’ : करोनाकाळात आणि करोनोत्तर काळातही लढण्याचं बळ देणारा, जगण्याची प्रेरणा देणारा आणि आपल्यातलं स्फूल्लिंग जाग‌वणारा दिवाळी अंक

..................................................................................................................................................................

अनिता रामपाल यांच्या मुलाखतीमधून या धोरणातील शालेय शिक्षणाचा सविस्तर आढावा घेतला गेला आहे. माधुरी दीक्षित यांनी भाषेच्या राजकारणातून राज्यकर्ते कुठले हेतू साध्य करू पाहताहेत, याचा मागोवा घेतला आहे. अर्चना मेहेंदळे यांनी शिक्षण हक्क धोरणाला या नव्या धोरणामुळे कसा धक्का पोहोचतो, याचा धांडोळा घेतला आहे. श्रीकांत काळोखे यांनी परिघावरील जनसमूहातल्या मुलांच्या शिक्षणाबाबतच्या पक्षपाती राजकारणाचा वेध घेतला आहे. ‘शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे अधांतरी भवितव्य’ (मालविका झा), ‘शाळासंकुलाच्या आड विलिनीकरणाचा डाव’ (भाऊसाहेब चासकर), ‘बालशिक्षण आणि आरंभिक साक्षरता’ (नीलेश निमकर), हे तीन लेख या धोरणातील अभ्यासक्रमाची विविधांगी चर्चा करतात. आर. रामानुजम यांनी गणित आणि विज्ञान या विषयांचा शिक्षणाच्या पातळीवर कशा प्रकारे पक्षपाती विचार केला जातो हे दाखवून देतो, तर गुरुमूर्ती काशीनाथन यांचा लेख शिक्षकांचं अक्षमीकरण आणि आयसीटी (माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान)चा वापर याविषयी सांगतो.

थोडक्यात या संपूर्ण परिसंवादातून ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ची अतिशय गांभीर्यानं चर्चा केली आहे. आज-उद्या पिढ्यांसाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जागरूक असणाऱ्या प्रत्येक पालकाने हा परिसंवाद वाचायलाच हवा.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अर्थात यातले बरेचसे लेख हे प्राध्यापकी परिभाषेतले आहेत. आणि दोन-तीनच मुद्दे तपशीलवार, संदर्भांसह आणि सुयोग्य उदाहरणं-स्पष्टीकरणांसह मांडण्याऐवजी आपल्याला वाटतात, ते सगळेच मुद्दे सांगून टाकण्याचा मोह बहुतांश लेखकांना आवरता आलेला नाही. तरीही या परिसंवादाचं महत्त्व अजिबात कमी होत नाही. इतका गंभीर आणि सविस्तर परिसंवाद इतर कुठेही वाचायला मिळण्याची शक्यता कमी आहे.

या अंकाचा शेवट होतो तो कवी आणि रोमन कॅथॉलिक धर्मगुरू अर्नेस्टो कार्देनाल यांच्या मुलाखतीने. निकाराग्वा देश आणि दक्षिण अमेरिकेतील काव्यविश्वात क्रांतीकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्देनाल यांचं १ मार्च २०२० रोजी वयाच्या ९५व्या वर्षी निधन झालं.  त्यानिमित्तानं त्यांची ही १९८६ सालची मूळ मुलाखत आहे. ‘मुक्तिवादी धर्मशास्त्र मार्क्सवादी आहे?’ असं या मुलाखतीचं शीर्षक आहे आणि शैलेश जोशी यांनी मूळ इंग्रजी मुलाखतीचा मराठी अनुवाद केला आहे. धर्मगुरू, राजकीय नेता आणि कवी अशी ओळख असलेल्या कार्देनाल यांचे एकंदरच धर्माबाबतचे, त्यातही ख्रिश्चन धर्माबाबतचे पुरोगामीविचार आजही १९८६ सालाइतकेच क्रांतिकारी आणि अनुकरणीय आहेत. ‘मी येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीला अनुसरून जगणे निषेधार्ह मानतो’ अशी सडेतोड आणि खमकी भूमिका घेणाऱ्या या धर्मगुरू, राजकीय नेता आणि कवीला जाणून घेण्यासाठी ही मुलाखतच वाचायला हवी.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......