‘हर्षद मेहता स्कॅम १९९२’ : या वेबसिरीजमध्ये हर्षद स्वत:ला ‘मार्केटचा अमिताभ बच्चन’ म्हणवतो! तो होताच!! त्याचा प्रभाव जबरदस्त होता...
दिवाळी २०२० - लेख
विजय तांबे
  • ‘स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसिरीजची पोस्टर्स
  • Tue , 17 November 2020
  • दिवाळी २०२० लेख स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी Scam 1992 : The Harshad Mehta Story हर्षद मेहता Harshad Mehta

‘लोचा लफडा, जिलेबी फाफडा’

‘मार्केट में मेहता है, तो मजा है’

‘भरोसा नाही, तो बिझिनेस नहीं’

‘प्रॉफीट दिखता है, तो कोई भी झुकता है’

‘टाईम को जादा भाव दिया, तो मेरा भाव गिरता है’

‘जेब में मनी होगा, तो कुंडली में शनी होने से कुछ फरक नहीं पडता’

‘हर्षदभाईना राजमा, मार्केट मज्जामा’

‘धर्मात्मा बन के धंदा नहीं करना’

‘जहाँ फायदे की बात होती है, वहाँ फेअर-अनफेअर नहीं रहता’

आणि सध्या फेमस झालेला ‘रिस्क है तो इश्क है’ डायलॉग .

अशा चटकदार आणि चटपटीत वाक्यातून शेयर बाजाराचं तत्त्वज्ञान मांडणारी ‘हर्षद मेहता स्कॅम १९९२’ ही वेबसिरिज सुचेता दलाल आणि देवशिष बॅनर्जी यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन बनवलेली आहे. ‘राईझ अँड फॉल ऑफ कोणीतरी’ अशा पद्धतीची मालिकेची रचना आहे. सचोटीने वागून धंदा न जमलेला बाप घरी बसला आहे. मुलगा हर्षद शांतीलाल मेहता अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या आणि धंदे करून घर चालवतोय. हर्षदला झटपट श्रीमंत व्हायचंय. त्यासाठी अमाप कष्ट करायची त्याची तयारी आहे. हर्षद चाणाक्ष आणि बुद्धिमान आहे.

समाजात जे सर्रास पैसे खातात त्यांना बुद्धिमान असण्याची गरज नसते. त्याला आपल्या अधिकारातून किती गळचेपी करता येते एवढं कळलं की, त्या प्रमाणात तो पैसे खातो. पण घोटाळे करणारा बुद्धिमानच लागतो. व्यवस्थेतल्या नेमक्या रिकाम्या जागा तो हेरतो. वाळवीसारखा ती व्यवस्थाच पोखरून टाकतो. हर्षद अशा प्रकारचा बुद्धिमान आहे. जेव्हा इमारतीतून भुळूभुळू माती गळू लागते, तेव्हा व्यवस्थेला जाग येते आणि घोटाळे उघडकीस येण्याची प्रक्रिया सुरू होते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

सर्वसाधारण घोटाळ्यांचा असा  आलेख असतो. या वेबसिरिजमध्ये शेअर मार्केट कसं चालतं, भाव खाली-वर होतात म्हणजे काय, बुल आणि बेअर हे काय प्रकरण आहे, शेयर मार्केट, मनी मार्केट यांचे नियम, खाचाखोचा हे सगळं वेगवेगळ्या संवादातून प्रेक्षकांपर्यंत नीट पोचतं, तरीही रंजकतेला बाधा येत नाही, कारण हर्षद मेहताचा चढत जाणारा प्रगतीचा आलेख आणि त्याची अतृप्त महत्त्वाकांक्षा मालिकेत रस निर्माण करते.

हर्षद मेहताचा काळ म्हणजे कोणता काळ होता? बँका, शेअर मार्केट यांचं संगणकीकरण झालेलं नव्हतं. टेलिफोन कंपनीकडे नवीन टेलिफोन बुक केला की, घरात नवीन टेलिफोन यायला काही वर्षं जात होती. बाजारात फक्त लँम्ब्रेटा आणि बजाज या स्कूटर होत्या. फक्त बुलेट, जावा, यझ्दी आणि राजदूत या मोटरसायकल होत्या. प्रीमियर पद्मिनी आणि अँबेसिडर या दोनच चारचाकी होत्या. सरकारी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर मनोरंजन म्हणून ‘हम लोग’ सिरिअल चालू होती. खाजगी चॅनेलचा मागमूस नव्हता.

राजीव गांधी नुकतेच पंतप्रधान झाले होते. अर्थव्यवस्थेची दारं किलकिली करायला त्यांनी सुरुवात केली होती. लायसन्स राज कमी करून व्यापार उद्योगांना प्रोत्साहन मिळू लागलं होतं. तेव्हा मोबाईल नव्हतेच. पटापट संपर्क करणं कटकटीचं आणि दुरापास्त होतं. घरातील फोन वरून बाहेर गावचा फोन लगेच मिळाला तर ईश्वर दर्शनाचा आनंद मिळाल्याचे दिवस होते ते! त्या वेळी राजीव गांधींनी तंत्रज्ञानाची मदत घेऊन नुकतेच गावोगावी, गल्लोगल्ली पीसीओ सुरू केले. एकमेकांशी संपर्क करणं त्यातल्या त्यात सुलभ झालं. आताच्या संदर्भात जीवन सुशेगात होते.

..................................................................................................................................................................

गेल्या आठ महिन्यांत जसा करोनाचा विषाणू जगभर पसरला, तशीच त्या वेळी झटपट पैसे मिळवायची लाट पसरली होती. सतत नवनवीन आयपीओ येत होते. लोकं नवीन शेअर्ससाठी फॉर्म भरत होते. त्याच वेळी खऱ्याखोट्या नावाने होलसेलमध्ये फॉर्म भरणे, रिफंड ओर्डर्स पोस्टातून चोरणे, ते कुठल्यातरी खात्यात भरून ते पैसे परत शेअर बाजारात फिरवणे असे अनेक बेकायदेशीर छोटेमोठे उद्योग सुरू झाले होते. शेअर बाजारात सबब्रोकर बनण्याचा धंदा तेजीत आला. जॉबर आणि सबब्रोकरमधून बातमी पसरवण्याची नेटवर्क उभी राह्यली. जनतेला झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग सापडला.

..................................................................................................................................................................

त्या वेळी हर्षद अवतरला. त्याने पैशातून पैसा मिळवायला सुरुवात केली. हर्षद सोडून शेअर बाजारातले इतर ब्रोकर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते का? ते कसे होते ते वेबसिरिजमध्ये दाखवलं आहे. शेअर बाजारात ठरलेले खेळाडू होते. ते आपापसात खेळत असत. हर्षद हा नवीन घुसलेला महत्त्वाकांक्षी सांड होता. त्याच्या तहान-भुकेला आणि ईर्ष्येला सीमा नव्हती. इतर ब्रोकरही बँकांकडून चेक स्व:तच्या नावावर घेत. काही दिवसांसाठी बँकेचा पैसा शेअर बाजारात वापरत. आपला फायदा काढून घेउन बँकेचे पैसे परत करत असत. वेबसिरिजमध्ये सुचेताचा सोर्स असलेला दलाल आम्हीपण हेच करतो असे सांगतो. याच व्यवहारात हर्षदला फट दिसते आणि तो तिथे भगदाड पाडतो. त्यासाठी तो सर्व मार्ग वापरतो. याचे तपशील वेबसिरिजमध्ये दिले आहेत.

तरीही हर्षद मेहता इतर घोटाळेबाजांपेक्षा वेगळा आहे. म्हणूनच तो शेअर बाजारातील धनदौलतीची दंतकथा बनला. त्याने बाजारात नव्या खेळी खेळायला सुरुवात केली. शेअर बाजार दररोज चढता ठेवायला तो नव्या युक्त्या वापरू लागला. चिल्लर कंपन्यांचे शेअर्सचे भाव वाढवत न्यायला सुरुवात केली. सर्वसामान्य माणूस शेअर बाजारात उतरला. खरेदी-विक्री करू लागला. नाक्यानाक्यावर पेपरच्या स्टॉलवर भावपट्टी मिळू लागली. एकवेळ पेपर संपणार नाहीत, पण संध्याकाळी भावपट्टीसाठी लोकं आसुसलेले असत. शेअर बाजारात सबब्रोकर बनण्याचा धंदा तेजीत आला. जॉबर आणि सबब्रोकरमधून बातमी पसरवण्याची नेटवर्क उभी राह्यली. जनतेला झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग सापडला. हर्षदभाईच्या कंपनीने कोणते शेअर्स विकत घेतले याच्या बातम्या पसरू लागत आणि त्या कंपन्यांचे भाव वाढायला हळूहळू सुरुवात होई. साधी साधी माणसं अगदी पानटपरीवालेसुद्धा दररोज खरेदी-विक्री करून दोनपाचशे रुपये मिळवू लागले होते.

गेल्या आठ महिन्यांत जसा करोनाचा विषाणू जगभर पसरला, तशीच त्या वेळी झटपट पैसे मिळवायची लाट पसरली होती. सतत नवनवीन आयपीओ येत होते. लोकं नवीन शेअर्ससाठी फॉर्म भरत होते. त्याच वेळी खऱ्याखोट्या नावाने होलसेलमध्ये फॉर्म भरणे, रिफंड ओर्डर्स पोस्टातून चोरणे, ते कुठल्यातरी खात्यात भरून ते पैसे परत शेअर बाजारात फिरवणे असे अनेक बेकायदेशीर छोटेमोठे उद्योग सुरू झाले होते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

हे उद्योग करणारी टोळकी म्हणजे कुठलाही विधिनिषेध नसलेली झटपट श्रीमंत होण्याची आस लागलेली जेमतेम शिकलेली तरुण मुलं होती. बँका शेअर्सच्या तारणाच्या बदल्यात ओव्हरड्राफ्ट देत होत्या. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याकडील शेअर्स बँकेत जमा करून शेअर बाजारात खेळायला ओव्हरड्राफ्टच्या रूपानं भांडवल मिळवलं. घाबरत बिचकत शेअर बाजारात खेळायला सुरुवात होई. पैसे मिळायला लागले की, आत्मविश्वास निर्माण होई.

दररोज भावपट्टीचं वाचन. सकाळी ऑफिसात आल्यावर वेगवेगळ्या सबब्रोकरकडून आलेल्या बातम्यांवर चर्चा. बाजाराचा अंदाज घेउन आजच्या खरेदी-विक्रीवर निर्णय. सेटलमेंटचा कालावधी चौदा दिवसांचा असल्याने कुठलेही पैसे न गुंतवता दिवसाला शेपाचशे मिळू लागल्यावर बाजाराची चटक लागे. “काही वेळा हरतो. ठीक आहे. पण बाकीच्या वेळेला मिळतात ना. सकारात्मक बघ की,” असं खेळणारा स्वत:लाच समजावून बाजारात परत उतरे. आज आपल्या नावावर किती आणि कोणाचे शेअर्स आहेत. त्याला आजच्या  बाजारभावाने गुणून स्वत:ची रोजची श्रीमंती मोजायची. उद्या अधिक श्रीमंत कसे बनू याचा विचार करायचा. थोडक्यात आपली श्रीमंतीची स्वप्नं वास्तवात येऊ शकतात असं सर्वसामान्यांना वाटू लागलं याचं सर्व श्रेय हर्षदला आहे.

जो फक्त भुरळ पाडून आपलं काम करून घेतो, त्याला त्या काळात नाक्यावरची मुलं ‘बोलबच्चन अमिताभ बच्चन’ म्हणत! या वेबसिरीजमध्ये हर्षद स्वत:ला मार्केटचा अमिताभ बच्चन म्हणवतो. तो होताच! त्याचा प्रभाव जबरदस्त होता. प्रत्येकाला हर्षदचे आकर्षण होते. प्रत्येकाला ‘हर्षदभाई’ व्हायचे होते. प्रत्येकाला झटपट श्रीमंत व्हायचे होते. पैशातून पैसा निर्माण करायचा होता.

त्या वेळी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पेन्शन योजना नव्हती. मात्र युनियनने लढाई करून पेन्शन योजना मंजूर करून घेतली. प्रत्येक कर्मचाऱ्याला पेन्शन हवे की नको, असा पर्याय देण्यात आला. युनियनचे अध्यक्ष तारकेश्वर चक्रवर्ती पेन्शन घ्या म्हणून कर्मचाऱ्यांची मनधरणी करत होते. त्यांच्या विरोधी युनियन्सनी विरोध करताना असं मत मांडलं की, निवृत्तीनंतर मिळणारे पैसे शेयर बाजारात गुंतवले तर काही वर्षातच त्याचे काही कोटी होतील. निवृत्तीनंतर तुम्हाला मिळणारे पैसे, शेअर बाजाराचा चढता आलेख याचा अभ्यास करून तुमची रक्कम किती दिवसात किती पट होईल असे आश्वासक तक्ते अधिकाऱ्यांच्या संघटनेने विकले. त्यांच्या सभासदांनी ते विकत घेउन पेन्शनला नकार दिला. पेन्शन नको सांगणारी अधिकारी मंडळी होती. अर्थशास्त्र आणि बँकिंगचं ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांना कोट्यधीश बनता येईल, असं खरंच वाटू लागलं होतं.

सर्वांनाच वाहत्या गंगेत हात धुता येतील का? सर्वजण एकाच वेळी श्रीमंत होऊ शकतील का? असे साधे साधे प्रश्न कोणालाच पडले नाहीत. हर्षद बँकांचे पैसे बाजारात फिरवत आहे, ही बातमी सर्वत्र होती. हे किती काळ चालेल? त्याचे पुढे काय होईल? याचा नीट विचार करण्यापेक्षा आज मिळतंय तर हडपून घेऊ ही वृत्ती पुराच्या पाण्यासारखी पसरली. आणि व्हायचा तोच शेवट झाला.

..................................................................................................................................................................

१९९३ साली कथाकार सतीश तांबे यांच्या ‘दाउद संताजी हर्षद धनाजी’ या कथेत हर्षद मेहताच्या गारुडाचे वर्णन करून ते लिहितात- ‘तत्त्वहीन प्रजा असल्यावर हर्षद मेहताच हिरो व्हायचे की!’ कुठल्याही कारणाने झटपट पैसा मिळवण्यात गैर नाही. त्यातूनच सर्वांची प्रगती होते. सर्वजण श्रीमंत होऊ शकतात. या त्याच्या मांडण्याला लोकं भुलले असं म्हणणं चुकीचं आहे. याचं कारण ते विचार लोकांच्या आत होतेच. फक्त हर्षदने ते उघडपणे बोलून लोकांच्या लालसा आणि वासनांना प्रतिष्ठा मिळवून दिली. मी भरपूर श्रीमंत होण्यासाठी माझ्याकडील बचतीसह सर्व पैशानिशी मी शेअर बाजारात उतरलो तर मी चलाख, चतूर, लबाड, धूर्त किंवा अगदी मूर्ख असू शकतो, पण भाबडा नसतो.

..................................................................................................................................................................

बाजार कोसळायच्या आधी ज्यांनी पैसे काढून घेतले ते चतूर ठरले. ज्यांचे काढायचे राहिले ते सपशेल बुडाले. अनेकांनी आत्महत्या केल्या. अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. घोटाळा उघडकीस आला तेव्हा डॉ मनमोहनसिंग अर्थमंत्री होते. जागतिकीकरणासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करण्यात आले होते. राष्ट्रीयकृत बँकांची फेररचना करण्याची योजना तयार झाली होती. मात्र घोटाळ्याने ती योजना बासनात गुंडाळून ठेवण्यात आली.

कुठलाही घोटाळा एकटा माणूस करत नाही. तो व्यवस्थेतली काही माणसं फोडतो, त्यांना हाताशी धरतो. पण घोटाळा करणारा कधी पब्लिक फिगर बनत नाही. हर्षद ‘पब्लिक फिगर’ बनला होता.

१९९३ साली कथाकार सतीश तांबे यांच्या ‘दाउद संताजी हर्षद धनाजी’ या कथेत हर्षद मेहताच्या गारुडाचे वर्णन करून ते लिहितात- ‘तत्त्वहीन प्रजा असल्यावर हर्षद मेहताच हिरो व्हायचे की!’ कुठल्याही कारणाने झटपट पैसा मिळवण्यात गैर नाही. त्यातूनच सर्वांची प्रगती होते. सर्वजण श्रीमंत होऊ शकतात. या त्याच्या मांडण्याला लोकं भुलले असं म्हणणं चुकीचं आहे. याचं कारण ते विचार लोकांच्या आत होतेच. फक्त हर्षदने ते उघडपणे बोलून लोकांच्या लालसा आणि वासनांना प्रतिष्ठा मिळवून दिली. मी भरपूर श्रीमंत होण्यासाठी माझ्याकडील बचतीसह सर्व पैशानिशी मी शेअर बाजारात उतरलो तर मी चलाख, चतूर, लबाड, धूर्त किंवा अगदी मूर्ख असू शकतो, पण भाबडा नसतो.

हर्षदने आपल्या मतलबाबरोबर जनतेच्या मतलबाशी ट्युनिंग करून घेतले. घोटाळा उघडकीस येत नव्हता, तोपर्यंत सगळे व्यवहार बाजाराच्या नियमांप्रमाणेच चालले असल्यानं त्याच्या विचारांना वैधताच प्राप्त झाली होती. घोटाळा उघडकीस आला. मार्केट पडलं. हर्षद जेलमध्ये गेला. हर्षद मेहता घोटाळ्याच्या काळात जागतिकीकरणाची सुरुवात झाली, बाबरी मशीद पाडली गेली, मुंबईत दंगल झाली, बॉम्बस्फोट झाले.

‘बिग बुल’ हर्षदने आपल्या काळात तीन प्रधानमंत्री पाहिले. राजीव गांधी, पी व्ही नरसिंहराव आणि अटलबिहारी वाजपेयी. वेबसिरिजमध्ये हर्षदच्या राजकीय लागेबांध्याचा उल्लेख येतो. जेठमलानी आरोप करतात की, पंतप्रधानांना हर्षदने एक कोटी रुपये दिले. हा हर्षद स्कॅम नसून नरसिंहराव स्कॅम आहे. हर्षदचा केंद्र सरकारच्या संदर्भातला मध्यस्थी एका स्वामी दाखवण्यात  आला आहे. नरसिंहराव यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप हर्षदला सिद्ध करता आला नाही. त्याबद्दल त्यानेच नंतर परस्परविरोधी विधाने केली. १९९६मध्ये वाजपेयी सरकार आले. हर्षदला सरकारने शत्रू मानले नाही. त्याला काही केसेसमध्ये सूट मिळाली असं वेबसिरिजमध्ये मांडलं आहे.

जेव्हा आपण सारासार विवेक आणि विचार विसरतो, भूलवणाऱ्याला प्रेषित मानू लागतो, त्या वेळी हिटलरचा जन्म होतो. जर्मनीच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर एकच उत्तर म्हणजे हिटलर. तो म्हणतो तेच खरं. असा जनतेचा अंधविश्वास बसला. सर्वसामान्य जनता ज्यूंच्या घरावर अभिमानाने दगडफेक करू लागली.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हर्षदला जनतेनं प्रेषिताचाच दर्जा दिलेला होता. जनतेनं सारासार विचार करणं थांबवलं होतं. लालसेचा रोग सर्वत्र फैलावला होता. द्वेष, हिंसा आणि लालसा ही जनतेची विचार करायचं यंत्र बंद पाडणारी बटणं आहेत.

आपण आजच्या काळात डोकावलो तर गुजरातच्या दंगलीपासून कालपरवाच्या दिल्ली दंगलीपर्यंत द्वेषाचा चढता आलेख भयप्रद  आहे. हर्षदच्या काळात संगणक, इंटरनेट, मोबाईल, समाजमाध्यमे असं काहीच नव्हतं. तरीही देशभर संपत्तीच्या लालसेची लाट आणण्यात तो यशस्वी झाला.

हिटलर असो नाहीतर हर्षद. ते एका व्यक्ती न राहता संकल्पना बनतात. या संकल्पनेत माणसांतील विकारांना पेटवून सारासार विचाराला दूर केला जातो. उथळ, सवंग, झटपट उत्तरांची सवय लागते. सुखाच्या कल्पना बदलू लागतात. आनंदाचा पाया द्वेष आणि हिंसा बनतो. ही या चौकटीची काही लक्षणं आहेत. आज द्वेषाच्या जोडीला मजबूत संघटना आणि प्रभावी समाजमाध्यमे असल्याने सत्तेवर असलेल्या हर्षद संकल्पनेच्या गारुडापासून जनतेला कसं वाचवायचं, हा काळातला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे.

..................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......