वाचन जागर अभियान : २५० पुस्तके २५ टक्के सवलत : प्रकाशकांचे एक पाऊल पुढे, आता वाचकांनी दोन पावलं पुढे यावे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • वाचन जागर अभियान
  • Fri , 06 November 2020
  • ग्रंथनामा शिफारस वाचन जागर अभियान Vachan Jagar Abhiyan

मार्चपासून सुरू झालेला करोनाकाळ अजूनही पूर्णपणे हटलेला नाही. लॉकडाउन हळूहळू शिथिल होत आता जवळपास नगण्य पातळीवर आला आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरळीत होत आहेत. छोटे-मोठे व्यवसाय टप्प्याटप्प्याने चालू होत आहेत. पुस्तकांची दुकाने सुरू झाली आहेत, नुकतीच वाचनालयेही चालू झाली आहेत.

त्यात पावसाळा संपून हिवाळा वातावरणात भरू लागला आहे. त्यामुळे दिवाळीची मौज सुरू होतेय. मास्क, सुरक्षित अंतर पाळत लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करू लागले आहेत. पण आकाशकंदिल, फराळ, सजावटीचे इतर साहित्य यांची खरेदी चालू झालेली आहे.

महाराष्ट्रात दिवाळीचे एक महत्त्वाचे आकर्षण असते, ते म्हणजे दिवाळी अंक. पण तूर्त तरी खूपच कमी अंक बाजारात आलेले आहेत. पुस्तक दुकानदारांच्या म्हणण्यानुसार रविवारपर्यंत अजून काही दिवाळी अंक विक्रीसाठी उपलब्ध होतील. पण करोनामुळे यंदा दिवाळी अंकांची लगबग बरीच कमी झाली आहे. अनेक अंक यंदा निघणार नाहीत. जे निघताहेत त्यांची पाने बरीच कमी झाली आहेत. त्यामुळे वाचकप्रेमी मराठी माणसांची यंदाची दिवाळी थोडीशी सुनी सुनी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र नेमक्या याच काळात मराठी प्रकाशन व्यवसायात नवनवीन घडामोडी घडत आहेत. राजहंस प्रकाशनाने नुकतेच स्वतंत्र अॅप बाजारात आणले आहे. तर साधना, मेहता, मॅजेस्टिक, मनोविकास, डायमंड, ज्योत्स्ना, पद्मगंधा, रोहन, राजहंस आणि साकेत या मराठीतील १० आघाडीच्या प्रकाशनसंस्थांनी एकत्र येऊन ‘वाचन जागर महोत्सव’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा उपक्रम २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमात या दहा प्रकाशनसंस्थांची प्रत्येकी २५ पुस्तकं २५ टक्के सवलतीत वाचकांना विकत घेता येणार आहेत. म्हणजे तब्बल २५० पुस्तकांवर २५ टक्के सवलत वाचकांना मिळणार आहे. ही पुस्तके वाचकांना त्यांच्या शहरातल्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी कुठलेही जास्तीचे दर आकारले जाणार नाहीत.

थोडक्यात मराठीतल्या आघाडीच्या १० प्रकाशनसंस्थांनी वाचकप्रेमींसाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे.

ही पुस्तके कुठे मिळतील? ही पुस्तके राज्यातल्या २३ शहरांमधल्या ३४ पुस्तकांच्या दुकानांमध्ये मिळणार आहेत.

या योजनेतील पुस्तकांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा –

थोडक्यात, वाचकप्रेमींसाठी मराठी प्रकाशकांनी एक खास योजना आणली आहे, खास दिवाळीनिमित्त. त्याचा वाचकांनी लाभ घ्यावा. वाचनवृद्धीसाठी प्रकाशकांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याला वाचकांनी दोन पावले पुढे टाकून प्रतिसाद द्यायला हवा.

सफ़दर हाश्मी यांची ‘किताबें कुछ कहना चाहती हैं’ या नावाची एक सुंदर कविता आहे –

किताबें करती हैं बातें

बीते ज़मानों की

दुनिया की, इंसानों की

आज की, कल की

एक-एक पल की

ख़ुशियों की, ग़मों की

फूलों की, बमों की

जीत की, हार की

प्यार की, मार की

क्या तुम नहीं सुनोगे

इन किताबों की बातें?

किताबें कुछ कहना चाहती हैं।

तुम्हारे पास रहना चाहती हैं॥

 

किताबों में चिड़िया चहचहाती हैं

किताबों में खेतियाँ लहलहाती हैं

किताबों में झरने गुनगुनाते हैं

परियों के किस्से सुनाते हैं

 

किताबों में राकेट का राज़ है

किताबों में साइंस की आवाज़ है

किताबों में कितना बड़ा संसार है

किताबों में ज्ञान की भरमार है

क्या तुम इस संसार में

नहीं जाना चाहोगे?

 

किताबें कुछ कहना चाहती हैं।

तुम्हारे पास रहना चाहती हैं॥

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Nikkhiel paropate

Sat , 07 November 2020

पुस्तकांची यादी (पुस्तकांची नावे ) कळली तर अधिक मदत होईल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......