मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र...
पडघम - राज्यकारण
उद्धव ठाकरे
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
  • Tue , 13 October 2020
  • पडघम राज्यकारण उद्धव ठाकरे भगतसिंग कोश्यारी हिंदुत्व करोना लॉकडाऊन प्रार्थनास्थळे

१३ ऑक्टोबर २०२०

माननीय राज्यपालमहोदय,

महाराष्ट्र राज्य यांसी

जय महाराष्ट्र.

महोदय,

आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे, हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे, तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे, हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

महोदय, आपण या पत्रात माझ्या ‘हिंदुत्वा’चा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या ‘हिंदुत्वा’ला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या ‘हिंदुत्वा’त बसत नाही.

‘Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated?’ असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे ‘हिंदुत्व’ आणि न उघडणे म्हणजे ‘Secular’ असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का?

मला या संकटाशी लढताना काही ‘divine premonition’ येतात का, असाही प्रश्न आपणांस पडला आहे. आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल, मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे-वाईट काय घडते आहे, ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल, ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आपण म्हणता गेल्या तीन महिन्यांत काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली. त्यातील तीन पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तीनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो. आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून, सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल, ही खात्री मी आपल्याला देतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र!

आपला नम्र,

उद्धव ठाकरे,

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 25 October 2020

माननीय उद्धव ठाकरे,

राज्यपालांना धर्मनिरपेक्षतेची आठवण करवून केल्याबद्दल कर्मकांड न मानणाऱ्या २००० ( अक्षरी दोन हजार) मान्यवरांनी तुम्हांस कौतुकपत्रं पाठवलंय. बातमी : https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2310219/maharashtra-cm-uddhav-thackeray-letter-war-governor-bhagat-singh-koshyari-writers-activists-write-to-thackeray-bmh-90/
मात्रं राज्यपालांना प्रत्युत्तर दिलंय त्यानुसार देवळं बंद ठेवण्याची तुमची भूमिका कधीच नव्हती. महाराष्ट्र शासन देवळं खुली करायच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करीत आहे. हा मुद्दा तुम्ही कृपया उपरोक्त नामवंतांना ठळकपणे नजरेस आणून द्यावा. सदर कौतुकपत्रात सेक्युल्यारिझमच्या नावाखाली निरर्थक बंडलबाजी चालू लावली आहे. त्यांच्या मते : 'सेक्युलॅरिझमचे तत्व असं की, लोकांच्या ऐहिक हिताच्या आड त्यांच्या श्रद्धा येत असतील, तर शासनानं ठामपणे सेक्युलॅरिझमच्या बाजूनं उभं राहावं'.
परंतु खरंतर सेक्युल्यारिझमचा अर्थ शासनाने धार्मिक समजुतीच्या आधारे भेदभाव करू नये इतकाच मर्यादित आहे. त्याचा देवळं उघडण्याशी सुतराम संबंध नाही.

तरी उपरोक्त नामवंत कर्मकांड न मानणारे असल्याने त्यांच्या कौतुकाकडे दुर्लक्ष करून देवळं सत्वर उघडावीत ही विनंती.

आपला नम्र,
-गामा पैलवान


Gamma Pailvan

Mon , 19 October 2020

माननीय उद्धव ठाकरे,

तुमच्या उत्तरातली भाषा संयत आहे. फक्त एक कराच. ते म्हणजे देवळं लवकरात लवकर खुली करा. करोनाचं निरर्थक थोतांड माजवलं जातंय. करोना हा फ्ल्यूच्या जातीचा विषाणू असून फ्ल्यूपेक्षा जरा जास्त घातक आहे इतकंच. ज्यांना त्रास होत नाही अशांवर विलगीकरण वगैरे निरर्थक उपाय करायची आजीबात आवश्यकता नाही. लोकांची गर्दी वाढून त्यांच्यात समूह प्रतिकारशक्ती ( = herd immunity ) विकसित झाली पाहिजे. तोंडावर पट्ट्या बांधून कुठलाही रोग वा लागण आजवर आटोक्यात आलेली नाहीये. तेव्हा मुखपट्टी, साबण वगैरे च्या मागे लागून देवळे बंद ठेवू नका. कृपया विजया दशमीच्या सुमूहर्तावर देवळं खुली करून देवीचा आशीर्वाद आणि भक्तांच्या सदिच्छा भरभरून घ्या.

बाकी, आपण सुज्ञ आहात.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

डॉ. आ. ह. साळुंखे : विद्वत्ता व ऋजुता यांचा अनोखा संगम असलेले आणि विद्वत्तेला मानुषतेची व तर्ककठोर चिकित्सेला सहृदयतेची जोड देणारे विचारवंत!

गेली पन्नास वर्षे तात्यांनी निर्मळ मनाने मानवतेचे अवकाश निर्माण करण्यासाठी अहोरात्र आपली लेखणी आणि वाणी वापरत अविश्रांत परिश्रम घेतले आहेत. तात्यांनी फुले- शाहू- आंबेडकर यांच्यानंतर आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाट विकसित केली आहे. त्यांनी धर्मचिकित्सेचे अत्यंत गुंतागुंतीचे आणि जोखमीचे कार्य करत सांस्कृतिक गुलामगिरीची खोलवर गेलेली पाळेमुळे उघडी केली, गंभीर वैचारिक लेखनाबरोबर ललितलेखनही केले.......

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......