१.
भारतीय संस्कृती किंवा उज्ज्वल परंपरा वगैरे हा अनेक भारतीय पुरुषांच्या अभिमानाचा विषय असतो. त्यातही स्वत:ला कुटुंबाचा ‘संरक्षक’ आणि देशाचा ‘रक्षक’ मानणाऱ्या आणि राष्ट्रवादाचा ‘फोबिया’ झालेल्या पुरुषांच्या तर खूपच.
हा पुरुष आईचा आज्ञाधारक मुलगा असतो, तिला आदरानं वागवण्यासाठी प्रयत्नशील असतो. बापाबद्दल मात्र त्याच्या भावना संमिश्र असतात. त्या धाक, दरारा, जरब या प्रकारच्या असल्यानं त्याचं बापासोबतचं नातं धड संवादीही नसतं अन् धड मित्रत्वाचंही नसतं. बायकोशी मात्र त्याचं नातं ‘मालकीचं’ किंवा ‘वर्चस्वाचं’ असतं.
या भारतीय पुरुषाचं आपल्या बापाशी जसं नातं असतं, तसंच त्याचं त्याच्या लेकाशीही असतं. लेकीशी असलेलं नातं मात्र ती लहान असते, तोवर प्रेमाचं असतं. पण ‘हा आमचा मुलगाच कसा आहे’, अशा बढाया मारून तो स्वत:च्या पुरुषीपणाचं ‘ग्लोरिफिकेशन’ करत राहतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या राकट, रासवट आणि काहीशा जंगली भारतीय पुरुषाला लेक ही कुटुंबातली एकमेव व्यक्ती संवेदनशीलता, हळवेपणा, कातरता, भावविवशता शिकवते. पण तोवर या भावना त्याच्यात कुणी धड रुजवलेल्या नसतात. त्यामुळे त्याची तगमग होते. त्याला यातली कुठलीच भावना नीट व्यक्त करता येत नाही. तो बऱ्याचदा प्रयत्न करतो, नाही असं नाही, पण शेवटी भारतीय कुटुंब परंपरेत पुरुष हा एकमेव प्राणी असा असतो की, त्याचं ‘सिव्हिलायजेझन’ कधीच धडपणे होत नाही. त्यात त्याचा पुरुषी आडमुठेपणा सतत डोकं वर काढत असतो. तो इतक्या वर्षांचा डीएनएमधला ‘लोच्या’ काही केल्या त्याला निस्तरता येत नाही.
त्यामुळे लेक वयात आली की, ती त्याच्या दृष्टीनं ‘बाई’ होते. मग तो तिलाही बायकोइतकं नाही, पण सौम्यपणे का होईना आपल्या ‘मालकी’च्या सावलीखाली घेतो. मग शील, पावित्र्य, खानदान, परंपरा वगैरे गोष्टींची अस्त्रं तो बाहेर काढतो. तो वेळप्रसंगी आईला धुडकावून लावतो, बायकोला दाबतो आणि लेकीला धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याच्या दृष्टीनं शील, पावित्र्य, खानदान, परंपरा या गोष्टी इतर कशाहीपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात.
बाई, मग ती आई असो, बायको असो, बहीण असो किंवा लेक असो, ती भारतीय पुरुषाची ‘मालमत्ता’च असते. भारतीय पुरुषसत्ताक कुटुंब परंपरेनं दिलेला हा वारसा भारतीय पुरुष अभिमानानं वागवत असतात. एरवी स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीहक्क, स्त्रीसन्मान यांविषयी तावातावानं बोलणारेही प्रसंगी बाईला कसं धाकात ठेवलं पाहिजे, हेच आपल्या कृतीतून, विचारातून दाखवून देत असतात. आठवून पहा, लॉकडाउन सुरू झाल्यावर, ‘वर्क फ्रॉम होम’ला सुरुवात झाल्यानंतरचे सोशल मीडियावरील विनोद, मीम्स. त्यातले बहुतांशी बायकांची टिंगलटवाळी करणारेच होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
विनोदनिर्मिती ही पूर्वग्रहातून होत असते. भारतीय पुरुषांचे बायकांबाबतचे पूर्वग्रह असे सतत दिसत राहतात. ‘हा अवघा डोंगर पोकळ असे’ अशीच त्यांची बाईबद्दलची भावना असते. दोन पुरुष भेटतात आणि ते बायकांबद्दल बोलतात, तेव्हा ते काय बोलतात, याचा कानोसा कधीतरी घेऊन पहा. पुरुष आपल्या मित्रमंडळींसोबत जेव्हा गप्पा मारत असतात, तेव्हा बाई, तिचं शरीर, तिचे लैंगिक अवयव यांबद्दल किती बोलतात, ते कधी तरी जाणून घ्या, कुठलीही सुंदर बाई पाहिल्यावर भारतीय पुरुषाच्या मनात कुठल्या भावना उमटतात, ते पहा…
भारतीय पुरुष बाईबद्दल त्याच्या मनात सतत कशाचा विचार करत असतो, तर तो तिला कमरेखाली घेण्याचाच. मामली राजीखुशीचा असो की बळजबरीचा… बाईला कमरेखाली घेण्यात भारतीय पुरुषाला जो ‘पराक्रम’ वाटतो, तो त्याच्या दृष्टीनं ‘भीमपराक्रम’च असतो! जात, संपत्ती आणि सत्ता हाताशी असेल तर मग बघायलाच नको. या ‘भीमपराक्रमा’तच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे, अशीच त्याची समजूत होऊन बसते.
२.
आता गंमत अशी आहे की, जी कुटुंबव्यवस्था बाईला पुरुषाची ‘मालमत्ता’ मानते, तीच मूल्यव्यवस्था पुरुषाला मात्र बाईप्रती कुठलंही उत्तरदायित्व दाखवण्याचा वारसा सोपवत नाही. उलट त्याला सर्व बंधनांपासून वळूसारखं हवं तसं उधळायला मोकळं सोडून दिलेलं असतं. त्याच्या बायकोनं साधं परपुरुषांशी बोललेलं त्याला चालत नाही. हल्ली बदलांच्या रेट्यामुळे तो ते बोलून दाखवत नाही. पण बायको परपुरुषाशी मोकळेपणानं बोलत असेल तर त्याच्या मनात अनेक शंका उमटत राहतात. तसंच वयात आलेल्या लेकीच्या मित्रांबाबतही त्याचं होतं. त्या काळातले बाप नावाचे पुरुष मोठ्या विचित्र कोंडीत सापडलेले असतात. त्यांच्या डोळ्यांना लेकीचं तारुण्य साहवत नाही आणि लेकीवर सतत संशयही घेता येत नाही. त्यामुळे लेकीचं लग्न होईपर्यंत असे बाप-पुरुष कुचंबणेत जगावं तसं जगत राहतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
बाईला भारतीय संस्कृतीत कितीही मानाचं मानलं जात असलं, तिचा आदर केला जात असला तरी तिच्याबाबतीत न्यायदान करण्याचं काम कुटुंबप्रमुख म्हणून आणि समाजप्रमुख म्हणून बऱ्याचदा पुरुषालाच करावं लागतं. आता ज्याने स्वत:हून न्यायनिवाड्याची जबाबदारी स्वीकारलेली असते, जो ‘मालका’च्या भूमिकेत सतत राहणंच पसंत करतो आणि स्वत:साठी जो जास्तीचं स्वातंत्र्य मागून घेतो, तो बाईला न्याय कसा मिळवून देणार?
स्वत: स्वैर, मुक्त राहू इच्छिणारे भारतीय पुरुष आपल्या मालकीच्या स्त्रियांना मात्र त्या गोष्टी नाकारत असतात. आई ही अशा पुरुषांच्या दृष्टीनं आदर्श असते, पण बायको, बहीण वा लेक आदर्श असतेच असं नाही. जी बाई पुरुषपणाचे सगळे काच सहन करून आयुष्यभर जगते, तीच भारतीय पुरुषाच्या दृष्टीकोनातून आदर्शत्वाला जाते. म्हणून तो आईच्या साच्यात बायकोला, बहिणीला वा लेकीला बसवण्याचा सतत प्रयत्न करत राहतो.
हा भारतीय पुरुष वयात येतो, तेव्हा तो सगळ्यात बंडखोर असतो. जगाचे सगळे नीतीनियम भिरकावून द्यावे, असं त्याला वाटत असतं. पण एकदा का लग्न झालं, मुलं झाली की, तो भारतीय कुटुंब परंपरेचा सनातन पाईक होऊन जातो. जीवनाची इतिकर्तव्यता कुटुंबाला धाकात ठेवण्यातच आहे, याचा त्याला साक्षात्कार होतो!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
३.
भारतीय पुरुष हा कितीही सुशिक्षित, उच्चशिक्षित, उच्चपदस्थ असला तरी त्याचं मन आणि त्याची विचारप्रक्रिया, विशेषत: लैंगिक विचारप्रक्रिया ही ‘अनसिव्हिलाइज्ड’च असते. कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्ही पहा, तिथल्या बॉसच्या बहुतेक वेळा नसलेल्या लफड्याबद्दल त्या ऑफिसमधले पुरुष व महिला सहकारी चवीचवीनं बोलत असतात. पुरुष बॉसची सेक्रेटरी बाई असते, तेव्हा तर ती हमखास त्याला ‘लागू’ असते, याबद्दल त्या ऑफिसमधल्या पुरुष, महिला सहकाऱ्यांची खात्रीच असते आणि त्या ऑफिसबाहेरच्या पुरुषांचीही. टेलिफोन ऑपरेटर, रिशेप्सनिष्ट, सेक्रेटरी, पी.ए. या पदांवर बाई असते, तेव्हा ती त्या ऑफिसमधल्या बॉसला किंवा इतर कुणा वरिष्ठ पदाधिकाऱ्याला ‘लागू’ असते, अशी बहुतेक पुरुषांची खात्रीच असते. किंवा ती आपल्याला तरी ‘लागू’ व्हावी, यासाठी कितीतरी पुरुष सहकारी मनातल्या मनात मांडे खात असतात.
यामागचं कारण काय? तर बहुतेक भारतीय पुरुष हे मानसिक पातळीवर व्यभिचारीच असतात. हा मानसिक व्यभिचार काहींना कृतीच्या पातळीवर उतरवण्याची संधी मिळते, काही ती संधी बळजबरीनं मिळवतात. याचा दुसरा अर्थ बहुतेक भारतीय पुरुष हे संधीअभावी चारित्र्यवान असतात. ज्यांना संधी मिळते, ते ती सहसा सोडत नाहीत. (ज्यांना अशी संधी मिळत नाही, ते तिचा लाभ मानसिक पातळीवर घेतात. सिनेमा (हिंदी किंवा इंग्रजी, हा जसा लाखो भारतीय पुरुषांच्या मनोरंजनाचा विषय असतो, तसाच तो हजारो भारतीय पुरुषांच्या लैंगिक कॅथार्सिसचाही विषय असतो!) बहुतेकांना त्यांची बायको आवडत असली तरी ‘लैंगिक पार्टनर’ म्हणून त्यांच्या डोक्यात भलतीच बाई असते. त्यामुळे शरीरानं ते बायकोशी रत होत असले तरी कल्पनेनं ‘त्या’ स्वप्नातल्या बाईशीच रत होत असतात. हिंदी-इंग्रजी सिनेमातल्या हिरॉइन्स, मॉडेल्स या त्यांच्या खास स्वप्नपऱ्या असतात. त्यांचे चेहरे लावलेल्या पॉर्न क्लिप भारतीय पुरुष आवडीनं पाहतात ते त्यामुळेच.
भारतीय पुरुष लैंगिकबाबतीत हा कायमच बुभूक्षित, हपापलेला आणि अतृप्त असतो. कारण तो लैंगिक बाबतीत कायम फँटसीमय जगात वावरत असतो. जन्मल्यापासून मान, मर्यादा, कुळशील, परंपरा, अशा हजारो प्रकारे ‘कंडिशनिंग’ होत आलेल्या एखाद्या भारतीय बाईशी त्याचं लग्न होतं. त्यामुळे भारतीय पुरुषाच्या फँटसीला खीळ बसते. त्याला आपल्या बायकोला कधीही प्रणय किंवा सेक्स याबाबतीत ‘प्रवीण’ करता येत नाही. तसा तर तो स्वत:ही सहसा नसतोच. पण तो पुरुष असल्याने आणि त्याच्याकडे पुरुषत्वाचा आविष्कार असलेला लैंगिक अवयव असल्यामुळे त्याला त्याची पर्वाही नसते. तो अवयव ‘शस्त्र’ म्हणून वापरणं हेच त्याचं ‘Politics of Sex’ असतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
भारतीय पुरुष ‘पुरुष’ असतोच, पण त्याला एका बाईचा मुलगा, एका बाईचा नवरा, एका बाईचा भाऊ आणि एका बाईचा बाप, अशा अनेक भूमिका कमी-अधिक फरकानं निभवाव्या लागतात. एकाच व्यक्तीची इतकी वेगवेगळी रूपं समजावून घेताना त्याची दमछाक होते. तो सैरभैर होतो. दांभिकता ही तर मुळातच भारतीय पुरुषात ठासून भरलेली असते. त्यात त्याची जात उच्च वगैरे असेल तर मग बघायलाच नको!
४.
भारतीय पुरुष त्याचा लैंगिक अवयव नेहमीच ‘शस्त्रा’सारखा वापरतो. त्याला राजकारणाची जोड मिळाली की, त्याचा तो ‘दांडपट्टा’ करतो. ‘लैंगिक बाबतीत स्वच्छ चारित्र्य असलेले राजकारणी’ ही भारतीय राजकारणात तशी अल्पसंख्य प्रजाती आहे. कारण पैसा, सत्ता यांच्या जोरावर सेक्सच्या बाबतीत भरपूर मौज अनुभवता येते, याचा शोध भारतीय पुरुष राजकारण्यांनी फार आधीच लावलेला आहे. त्यासाठी सत्ताधारीच असायला पाहिजे असंही नाही. फक्त राजकारणी असायला पाहिजे एवढीच अट असते. तेवढं असलं तरी तुमचं ‘Sex of Politics’ आपोआप आकार घेतं. तुम्ही कुठल्याही राज्यातल्या मंत्रालय कव्हर करणाऱ्या पत्रकारांना खासगीत विचारा राजकारण्यांच्या भानगडींबद्दल… लैंगिक भानगडबाज नसलेले राजकारणी तुम्हाला देशभर सगळीकडेच दुर्मीळ प्रजाती असल्याचं लक्षात येईल. शिवाय हे पत्रकार त्यांना माहीत असलेले, पण कधीही त्याची बातमी न केलेले ‘आमदार निवासा’तले लैंगिक भानगडीचे इतके किस्से तुम्हाला सांगतील की, बस्स!
आता राजकारणी जर लैंगिकबाबतीत इतके बेबंद असतील, तर तसेच बेबंद असलेले भारतीय पुरुष उद्योजक, समर्थक, पुढारी, शासकीय अधिकारी, चेले-चमचे या राजकारण्यांच्या आश्रयाला येणारच की! त्यात जात, मतदारसंघ, निष्ठा या गोष्टीनुसार वर्गवारी होऊन या बेबंद भारतीय पुरुषांना बेबंद राजकारण्यांकडून अभय मिळतं. आठवून पहा, कठुआच्या अमानुष बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ निघालेले मोर्चे, उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ निघालेले मोर्चे आणि सध्या हाथरस प्रकरणात आरोपींच्या समर्थनार्थ सत्ताधारी पक्षाचे आमदार-खासदार-नेते करत असलेले दावे. कुटुंबीयांना डांबून ठेवून बलात्कार पीडितेचे मध्यरात्री स्मशान नसलेल्या जागी अंत्यसंस्कार करण्याबाबत सरकार करत असलेले खुलासे… या तीन उदाहरणांतून तुम्हाला जात, मतदारसंघ, विचारधारा आणि निष्ठा यांसाठी भारतीय राजकारणातले पुरुष राजकारणी अमानुषतेच्या कुठल्या पायरीपर्यंत खाली उतरतात, हे सहजपणे दिसून येतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आणि अशी उदाहरणं भारतात हजारोंनी सापडतात. भंवरीदेवीपासून खैरलांजीपर्यंत आणि कठुआपासून हाथरसपर्यंत कितीतरी… बायकांवरील लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांचा देशात पहिला व दुसरा नंबर लागतो. कारण या दोन्ही राज्यांत बाई, बाटली, सेक्स, जात ही यशस्वी राजकारणाची चौसूत्री झालेली आहे. तशा या चारी गोष्टी देशात सर्वत्रच पाहायला मिळतात. त्यामुळे कमी-अधिक फरकानं ते देशभर सर्वत्रच दिसतं. म्हणूनच तर भारतात एका दिवसात जवळपास ९० बलात्कार होतात.
थोडक्यात भारतीय पुरुष आपला लैंगिक अवयव एखाद्या ‘शस्त्रा’सारखा सतत वापरतच असतो. पण त्याला जातीय श्रेष्ठत्व, सत्तेचं राजकारण यांची जोड मिळाली की, ते शस्त्र अजूनच ‘धारदार’ होतं. त्यातून बलात्काराआधी किंवा नंतर बलात्कारित बाईची जीभ कापणं, शारिरीक दुखापत करणं, बांधून ठेवणं, गुंगीचं औषध देणं, विष पाजणं किंवा ठार मारणं असे अनेक प्रकार होतात. ठार करण्यासाठी हातानं किंवा साखळीनं गळा दाबणं, कापडानं नाक-तोंड दाबणं, गंभीर शारिरीक दुखापती करणं, हातपाय तोडणं, गोळी घालणं असे विविध प्रकार पाहायला मिळतात.
या प्रकारामुळे आपल्यापैकी काहींना भारतीय पुरुषांची गिधाडे किंवा जंगली जनावरे यांच्याशी तुलना करण्याचा मोह होतो. आपल्यापैकी अनेक जण तशी तुलना करतातही. पण आमचे काही मित्र म्हणतात की, या विकृत भारतीय पुरुषांची तुलना गिधाडे किंवा जंगली प्राण्यांशी करणं, हा त्या पक्ष्याचा व प्राण्यांचा अपमान आहे. गिधाडे किंवा कुठलाही जंगली प्राणी सेक्ससाठी इतक्या नीचतम स्तरावर कधीही घसरत नाही!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
५.
कुठल्याही बलात्कारानंतर ‘बलात्काराचं राजकारण करू नका’ असे म्हणणारे पुरुष कोण असतात, हे नीटपणे पाहिलं की लक्षात येतं, ते आरोपी पुरुषांचे समर्थक असतात. भारतीय पुरुषांना बलात्कारी आरोपींच्या समर्थनासाठी तो आपला नातेवाईकच असावा लागतो, असं नाही. तो आपल्या पक्षाचा, आपल्या मतदारसंघातला, आपल्या जातीचा, आपल्या विचारधारेचा असला तरी चालतो. आपला लैंगिक अवयव धारदार शस्त्रासारखा वापरणारे भारतीय बलात्कारी पुरुष हे इतर संधीअभावी चारित्र्यवान राहिलेल्या किंवा मानसिक (किंवा विचाराच्या) पातळीवर बलात्कारी असलेल्या पुरुषांच्या आदराला प्राप्त होताना दिसतात.
बलात्काराच्या घटनेबद्दल तुम्ही सत्ताधाऱ्यांना किंवा सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी वर्तनाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करायला लागलात की, त्यांचे समर्थक ‘ही घटना निंद्यच आहे, पण अशा घटना याआधीच्या सरकारच्या काळातही घडलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही इतकी तत्परता दाखवली नाहीत’ असा पवित्रा घेतात.
ही विद्यमान भारतातली सर्वांत नीच वृत्तीची पुरुषी मानसिकता झालेली आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
NAMDEV RAMA
Wed , 07 October 2020
वास्तविक विश्लेषण