राबलेला राग का येतो? त्याला राग येतो, कारण काही लोक हसत नाहीत. पण यात राग येण्यासारखे काय आहे?
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • डावीकडून जॉर्ज मेरेडिथ, ‘मायापूरचे रंगेल राक्षस’ व ‘The Life of Gargantua and of Pantagruel’ची मुखपृष्ठे, फ्रांस्वां राबले आणि त्याचा नायक ‘Gargantua’
  • Mon , 05 October 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध

शब्दांचे वेध : पुष्प अकरावे

राबलेला राग का येतो? मागे एकदा आपण शेक्सपिअरला राग का येतो, ते बघितले होते. ‘अल्बर्ट पिंटो कों गुस्सा क्यूं आता है’ हा सिनेमाही आपल्याला माहीत आहे. आज आपण जाणून घेऊ, राबलेला राग का येतो याबद्दल. त्याला राग येतो कारण काही लोक हसत नाहीत म्हणून. पण यात राग येण्यासारखे काय आहे?

हे जाणण्यासाठी आधी राबले कोण हे सांगावे लागेल. माझी त्याची पहिली भेट खूप खूप वर्षांपूर्वी झाली होती. मी लहान असताना मला खूप चांगली चांगली पुस्तके वाचायला मिळाली होती, हे मी माझे भाग्य समजतो. यातली तीन बाल पुस्तके तर आज माझी साठी उलटून गेल्यावरही कधी कधी माझ्या स्वप्नांत येतात. ही सगळी रूपांतरे/अनुवाद होते. एक होते पुरुषोत्तम दारव्हेकरांचे नाटक ‘उपाशी राक्षस’ (‘The Hungry Ogre’वर बेतलेले). एक पुस्तक रेव्ह. टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांचे सुपुत्र देवदत्त टिळक यांनी लिहिले होते. हा ‘Alice in Wonderlad’ या पुस्तकाचा मराठी अवतार होता ‘वेणु वेडगावात’ या नावाचा. आणि तिसरे पुस्तक होते भा. रा. भागवतांचे ‘मायापूरचे रंगेल राक्षस’. राबले या फ्रेंच लेखकाच्या ‘Gargantua and Pantagruel’ या प्रौढांसाठी असलेल्या ग्रंथाचे खास मराठी मुलांना समजेल, रुचेल, पचेल असे त्यांनी केलेले हे भावरूपांतर.

पुढे मी ज्या मूळ इंग्रजी पुस्तकांचे हे सगळे मराठी अनुवाद होते, ती वाचून त्यांच्याही प्रेमात पडलो. बाकीच्यांचा प्रश्न नव्हता, पण राबलेच्या बाबतीत मात्र मला त्याच्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादावरच समाधान मानावे लागले. मला फ्रेंच भाषा येते, पण राबलेचे जुन्या पद्धतीचे आणि क्लिष्ट फ्रेंच समजण्याइतपत माझी तयारी झाली नव्हती.

या पुस्तकाच्या निमित्ताने मला राबलेबद्दलही खूप वाचायला मिळाले आणि तत्कालीन युरोपीयन धर्मकारण आणि राजकारणावरही. या लेखाच्या संदर्भात ते महत्त्वाचे नाही. यातून राबलेला राग का येतो, हे मला कळले हे महत्त्वाचे आहे.

फ्रांस्वां राबले (François Rabelais - १४८३/९४-१५५३) हा एक प्रसिद्ध फ्रेंच लेखक, विनोदकार, वैद्य, समाजसेवी धर्मगुरू आणि ग्रीक भाषा तज्ज्ञ होता. त्याचा विनोद अस्सल रांगडा, तजेलदार, दणकट, श्लील-अश्लील या भेदांना न मानणारा होता. Alcofribas Nasier या टोपण नावाने त्याने ‘The Life of Gargantua and of Pantagruel’ (मूळ फ्रेंच नाव : La vie de Gargantua et de Pantagruel) या नावाचा एक पाच-खंडी ग्रंथ लिहिला. (यातला पहिला खंड सन १५३२ मध्ये प्रकाशित झाला.) वरवर विनोदी वाटणारा आणि अद्भुत कथांनी भरलेला हा ग्रंथ खरे तर एक सटायर आहे. हे एक औपरोधिक, व्यंगात्मक लेखन आहे. या खोडसाळ रूपकातून (allegory) त्याने काहीश्या गूढ अशा शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले आहे. खऱ्या आशयाला त्याने विनोदाचा, पांचटपणाचा मुलामा चढवला आणि त्याआडून त्याने तत्कालीन राजसत्तेवर आणि धर्मसत्तेवर शाब्दिक प्रहार केले.

ही पार्श्वभूमी माहीत नसेल तर ‘Gargantua and Pantagruel’ वाचणाऱ्याला राबले हा एक चावट, बालीश, अश्लील, असभ्य लेखक आहे, असे वाटू शकते. इंग्रजीत ज्याला ‘scatological humour’ म्हणतात असे ‘शी-सू’शी संबंधित विनोद किंवा द्व्यर्थी विनोद, अश्लील विनोद, टवाळ विनोद असे अनेक प्रकारचे विनोद त्या ग्रंथात आहेत. ते वाचून मी पोट धरधरून हसलो आहे. बद्धकोष्ठ झालेल्या एका इंग्रज राजाच्या शौच्याची कहाणी तर सुरस आणि चमत्कारिक अरबी गोष्टींसारखी अद्भुत आहे. टेरी मॉर्ड्यू म्हणतो की, ‘Gargantua and Pantagruel are two larger-than-life characters who revel exuberantly and excessively in the joys of the physical aspects of life (drink, food, sex and bodily functions).’

पण हा सारा दिखावा होता. राबलेचा मूळ उद्देश आणि संदेश काही वेगळाच होता. तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावा आणि भावी पिढ्यांनाही तो वाचता यावा यासाठी त्याने ही काळजी घेतली होती. अन्यथा राजाची वा चर्चची अवकृपा होऊन त्याच्या ग्रंथांवर बंदी आली असती आणि कदाचित त्याला प्राणही गमवावे लागले असते.

राबले एक कसलेला ह्युमरिस्ट होता. विनोदकार. एखाद्या सिद्धहस्त लेखकाप्रमाणे त्याची लेखणी चाले. तो शब्दप्रभू होता. त्याने अनेक नवीन शब्दांची भर फ्रेंच भाषेत टाकली. त्याच्या लेखनासारख्याच बेधडक, बेफिकीर, बिनधास्त, रग्गेल, रंगेल, रांगड्या लेखनाला इंग्रजीत ‘Rabelaisian’ असे विशेषण लावले जाते. आणखी एक इंग्रजी शब्द आहे- ‘gargantuan’. म्हणजे भव्य, आकाराने अती प्रचंड. ‘Gargantua and Pantagruel’मधल्या ‘Gargantua’ या नायकाच्या अती प्रचंड देहावरून हे विशेषण तयार झाले आहे.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

आणखी एका उत्तम शब्दाच्या निर्मितीचे श्रेय राबलेकडे जाते. हा शब्द आहे ‘Agelast’. या शब्दाला इंग्रजीत प्रतिशब्द नव्हता, म्हणून इंग्रजांनी तो तसाच पण स्पेलिंग बदलून आयात केला. मराठीतही त्याला काहीच तंतोतंत प्रतिशब्द नाही. मात्र आज हा इंग्रजी शब्द क्वचितच वापरला जातो. बऱ्यापैकी विस्मृतीत गेलेला हा शब्द आहे. राबलेने हा शब्द का तयार केला? कारण त्याला राग येतो म्हणून. आणि राबलेला राग का येतो? लोक हसत नाहीत म्हणून. ज्या लोकांना विनोदाचे वावडे आहे, ज्यांना हसणे आवडत नाही, ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी गंभीर किंवा सुतकी भाव असतात, हास्य विनोद करणे जे कमीपणाचे मानतात, ज्यांना हसणे म्हणजे टवाळखोरीचे लक्षण वाटते, असे लोक राबलेला आवडत नाहीत.

असे म्हणतात की, ‘Agelasts are often considered to be repulsive. They see fault in everything and are overly critical of things which are ideally to be taken in lighter vein. They end up taking japes offensively rather than finding them playful. Even a smirk is hard to spot on their faces. It is better to laugh and enjoy life rather than be perennially dismal.’

तसे पाहिले तर कधीच हास्य विनोद न करणारे लोक आपल्याकडेही आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या ‘टवाळा आवडे विनोद’ या उक्तीचा सपशेल चुकीचा अर्थ लावून हास्यरसाला जीवनातून हद्दपार करणारे अनेक महाभाग आहेत. ‘टवाळा आवडे विनोद’ याचा अर्थ रामदासांना विनोद अप्रिय होता, निषिद्ध होता असे मानणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. याबद्दल हे एक फार चांगले स्पष्टीकरण वाचा -

“विनोद निंद्य आहे किंवा विनोद करणे वाईट आहे, असे समर्थांनी कुठेही म्हटलेले नाही. उन्मत्त माणसाला छंद आवडतात. तामसी माणसाला स्वस्थ बसवत नाही. तो सतत कुलंगड्या करीत असतो. त्याप्रमाणे टवाळ माणसाला येता जाता पांचट विनोद करणे आवडते, हे समर्थांना सांगायचे आहे. जो येता जाता पोरकट, पांचट, पाचकळ विनोद करतो आणि टिंगल टवाळी करून हीन दर्जाचा आनंद मिळवतो, तसेच तो विकृत आनंद इतरांनाही देत असतो, अशा माणसाला ‘टवाळ’ म्हणता येईल. वरील विधान ज्या ओळीत आले आहे, ती दासबोधातील ओवी अशी आहे - टवाळा आवडे विनोद । उन्मत्तास नाना छंद । तामसास अप्रमाद । गोड वाटे ॥ (दा. 7.9.51)” (समर्थ रामदास आणि विनोद)

पांचट, अप्रासंगिक, अश्लाघ्य, आणि हीन विनोदांना ते दर्जेदार विनोदाच्या तुलनेत कमी लेखतात आणि याच प्रकारच्या विनोदात ज्यांना आनंद मिळतो त्यांना ते टवाळ म्हणतात, एवढाच याचा अर्थ आहे. “रामदासांनी विनोद करूच नका असे सांगितले आहे” असे समजणे किंवा तसा प्रचार करणे ही घोडचूक आहे.

अर्थात उच्च दर्जाचे विनोद सगळ्यांनाच करता येत नाहीत - आणि सर्वांनाच ते कळतील असेही नाही. उदाहरण म्हणून हा एक जोक वाचा -

A priest, a rabbit, and a minister walk into a bar. The bartender asks the rabbit, “What’ll ya have?”

The rabbit says, “I dunno. I’m only here because of Autocorrect.”

किंवा वुडहाऊसने केलेली ही एक कोटी वाचा.

“My dear wife, I am glad to say, continues to be in the pink. I’ve just been seeing her off on the boat at Southampton. She is taking a trip to the West Indies.”

“Jamaica?”

“No, she went of her own free will ”

(‘Uncle Dynamite’)

हे दोन्ही अतिशय चांगले आणि दर्जेदार विनोद आहेत. पण त्यांना तसेच्या तसे परभाषेत आणणे अशक्य आहे. ‘Jamaica’वरची ही पन (pun) तर इंग्रज लोकांच्या बोलण्याची पद्धत ज्यांना माहीत नाही, त्यांना सहजासहजी कळणे कठीण आहे.

म्हणून मग काय सर्व साधारण लोकांनी विनोद वाचू किंवा करूच नयेत का? असे अजिबात नाही. उलट आज तर अशी परिस्थिती आहे की, ज्या कशामुळे तुम्हाला आनंद होईल तो विनोद वाचा, पण हसा. जीवनातले हास्य मावळू देऊ नका. तुम्हाला दादा कोंडकेंचे चावट द्व्यर्थी विनोद आवडतात का? नो प्रॉब्लेम. नवज्योतसिंग सिद्धूचे पीजे आवडत असतील तरीही चालेल, पण हसा.

राबलेने हाच फॉर्म्युला वापरला. आपला संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवायचा असेल तर आपण तो त्यांना अवगत असलेल्या, त्यांना रुचेल अशाच बोलीभाषेत, रांगड्या शब्दांत आणि शैलीत सांगितला पाहिजे, हे त्याला माहीत होते. म्हणून त्याने त्या तथाकथित असभ्य शब्दांचा वापर करीत आपला ग्रंथ लिहिला. हे वाचल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर हसू येईल, हे तो जाणत होता.

अर्थात राबलेच्या आणि आपल्या काळात खूप फरक आहे. तेव्हा हे सगळे चालून जात होते. आज अशा प्रकारचे शिवराळ किंवा असभ्य लेखन शिष्टसंमत मानले जात नाही. लिखाणात किंवा टीव्ही-सिनेमा-नाटक यांसारख्या दृकश्राव्य माध्यमांतून सादर होणाऱ्या कार्यक्रमांत विनोदाच्या नावाखाली थोडेफार स्वातंत्र्य घेतले जातेही, पण तरी सार्वजनिकरीत्या तरी आपण आपली पातळी घसरू देत नाही, सभ्य संकेतांचे पालन करतो. पण सभ्यपणे हसायला तर मनाई किंवा हरकत नाही आहे ना?

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

काही लोक मात्र घरीदारी सर्वत्र सदैव कडू तोंड करून बसले असतात. यांना हसण्याची अ‌ॅलर्जी असते. रुक्ष, गंभीर, solemn, कोरडे भाव यांच्या चेहऱ्यावर असतात. वृत्तीनेही ते तसेच असतात. पाडगावकरांची ती कविता आहे ना ‘यांचे असे का होते’, ती याच लोकांना उद्देशून लिहिलेली असावी. मला या प्रकारात मोडणारे बरेच लोक माहीत आहेत. त्यात महात्मा गांधींचे नाव जपणारे पण गांधी न कळलेले काही प्रसिद्ध नेते, काही धार्मिक नेते आणि काही न्यायाधीशांचा समावेश होतो. न्यायाधीशाने सदैव सावध आणि sober असलेच पाहिजे. पण म्हणून त्याने सदैव कटकटच केली पाहिजे असे नाही. घिणघिणे, चिडचिडे, कटकटे न्यायाधीश समोर असले की, वकिलांचाही युक्तिवाद यांत्रिक बनतो. अशा प्रकारच्या न-हसऱ्या न्यायाधीशाचे काल्पनिक पण वास्तवाशी अगदी मिळतेजुळते चित्रण जॉन मॉर्टिमरच्या प्रख्यात रंपोल कथांमध्ये आढळते. जस्टिस ग्रेव्ज नावाचा एक जज इतका जास्त गंभीर आणि तुसडा असतो की, बॅरिस्टर रंपोल त्याला खासगीत ‘Mr. Justice Gravestone’ म्हणतो. एकदा तर त्याने त्याला ‘Mr. Injustice Death's Head’ असेही म्हटले होते.

ही माणसे हसत का नाहीत? यामागे काही शास्त्रीय, मानसशास्त्रीय कारणे असू शकतात का? खोटे खोटे, औपचारिक स्मितहास्य वेगळे आणि मनापासून आलेले, खरे हसू वेगळे. ज्यांना मनापासून कधीच हसावेसे वाटत नाही, जे आपले हसू दाबून टाकतात, जे हास्याला कमीपणाचे मानतात त्यांच्याबद्दल Why Do Some People Prefer Not to Smile? या लेखात चांगली माहिती दिलेली आहे.

जीवनाच्या गहन, गंभीर समस्यांवर विचार करणारे आणि मौलिक तत्त्वचिंतन करणारे तत्त्वज्ञसुद्धा हसतात हो! (एखाद दुसरा अपवाद सोडून द्या.) फिलॉसॉफरने २४X७ गंभीर असलेच पाहिजे असे काही नाही. ‘Philosopher’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘ज्ञानप्रेमी’ असा आहे. कोणताही प्रेमी रुक्ष असू शकतच नाही. किती तरी नामवंत फिलॉसॉफर पी. जी. वुडहाऊसच्या विनोदाचा आस्वाद घेत होते. धर्मशास्त्र शिकविणारे कित्येक ख्रिस्ती धर्मगुरूसुद्धा वुडहाऊस वाचतात.

अर्थात वुडहाऊसचा विनोद सभ्य, निर्विष, सहज होता. याउलट काही विनोद असभ्य किंवा आक्षेपार्ह असू शकतात. त्यांचा चाहताही वेगळा असतो. विनोदाचे खूप प्रकार आहेत. या विषयावर खूप काही लिहिता येईल. आणि खूप लिहिले गेलेही आहे. अगदी प्रबंध आणि पुस्तकेदेखील. पण तो या लेखाचा उद्देश नाही त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर हास्य ज्यातून उत्पन्न होते तो विनोद. सभ्य - असभ्य, श्रेष्ठ - कनिष्ठ, शाब्दिक - कृतीजन्य, कशीही वर्गवारी करा, विनोद हा विनोद आहे. कोणाला कशामुळे हसू येईल, हे सांगता येत नाही. एखाद्याला ज्या प्रकारचा विनोद आवडतो त्यातून त्याच्या सद‌्भिरुचीचे किंवा हीन अभिरुचीचे दर्शन होते, असे निष्कर्ष काढण्याचे काम पंडित लोकांचे आहे. माझ्या पुरतेच सांगायचे तर मला कशानेही हसू येते. मला वुडहाऊसचा उच्च दर्जाचा शब्दिक विनोद जितका आवडतो तितकीच सर्कशीतल्या जोकरची मस्करी पण आवडते. मला चावट लिमरिक्स (वात्रटिका) आवडतात, मला अ‌ॅरिस्टोफेनिसची ‘Lysistrata’ ही ग्रीक कॉमेडी अवडते, मला टेड मार्क आवडतो, मला पु. ल. आणि चिं. वि. जोशी आवडतात,  मला गोविंदा आणि जॉनी लिव्हर आवडतो, मला बीबीसी टेलिव्हिजनवरचे ‘Are you being served’ सारखे द्व्यर्थी आणि ‘Yes, Minister’सारखे बौद्धिक कॉमेडी शो आवडतात, आणि मला चार्ली चॅप्लिन एवढेच वुडी अ‌ॅलनचे सिनेमेही आवडतात. या बाबतीत माझे गुरू आहेत सरदार खुशवंत सिंग. एकीकडे शिखांचा इतिहास, महाराज रणजीत सिंगचे चरित्र, ट्रेन टू पाकिस्तान, अशी सरस आणि मौलिक पुस्तके लिहिणारा हा थोर विचारवंत दुसऱ्या क्षणी अत्यंत फालतू, पाचकळ, आणि वाह्यात विनोदांचाही आस्वाद घायचा. त्यांची ‘Jokebooks’सुद्धा तेवढीच प्रसिद्ध आहेत.

खळखळून हसणे, जोरजोरात हसणे, ठसका लागेपर्यंत हसणे, पोट दुखेपर्यंत हसणे, हसून हसून जमिनीवर गडाबडा लोळणे, याला इंग्रजीत ‘होमेरिक लाफ्टर’ (Homeric laughter) म्हणतात. प्रख्यात ग्रीक महाकवी होमर याने आपल्या ‘इलियड’ आणि ‘ओडेसी’ या आपल्या दोन्ही महाकाव्यांमध्ये ग्रीक देवीदेवतांना अशा प्रकारे हसताना दाखवले होते, त्यावरून हा शब्द बनला. म्हणजे हसण्याला अगदी देवांचीसुद्धा संमती आहे. ग्रीक पुराणांमध्ये कलांच्या अधिष्ठात्री असलेल्या ज्या नऊ देवता आहेत (म्यूज्), त्यातली थेलिया (Thalia) नावाची देवी हास्यरसाची अधिष्ठात्री मानली जाते.

भारतीय परंपरेनुसार नवरसांतला एक रस म्हणजे हास्यरस. हास्याचा मूळ भाव शृंगार रस आहे, असे मानतात. Susan L. Schwartz ने ‘Rasa : Performing the Divine in India’ (२००४) या पुस्तकात हास्याचा अधिष्ठाता देव प्रमथ असून त्याचा रंग पांढरा आहे, असे सांगितले आहे. (विकीपिडीया.)

हास्याला इंग्रजीत ‘लाफ्टर’ (laughter) असे म्हणतात. या शब्दाची व्युत्पत्ती प्रोटो-इंडो-युरोपियन भाषेतल्या *klek-, *kleg- (“to shout/ओरडणे”) या शब्दापासून झाली असे मानतात. तिथून तो प्रोटो-जर्‌मॅनिकमध्ये hlahtraz (“laughter”) बनला. पुढे त्याचे रूपांतर जुन्या इंग्रजीत hleahtor (“laughter, jubilation, derision”) असे झाले. मध्य इंग्रजीत त्याचे laughter, laghter, laȝter झाले आणि आधुनिक इंग्रजीत तो आता ‘लाफ्टर’ बनला आहे. (Laughterच्या आधी S लावला तर होणाऱ्या शब्दाचा उच्चार ‘स्लॉटर’ असा का करतात, ‘स्लाफ्टर’ असा का नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो.)

हे सगळे ठीक आहे. पण ज्यांना हसणे आवडत नाही किंवा येत नाही, त्यांचे काय?

हास्याचा ‘दुस्वास’ करणाऱ्यांचे तीन प्रकार आहेत. Hypergelast, Agelast, and Misogelastic. पहिल्या प्रकारचे लोक कशालाही हसतात. यांना कशानेही हसू येते. अगदी फुसक्या कारणांमुळेसुद्धा किंवा विनाकारणही ते हसतात आणि हसतच राहतात. कवी जॉर्ज मेरेडिथ अशा लोकांना ‘हास्याचा दुश्मन’ मानतो. कारण ते खऱ्या आणि खोट्या हास्यात फरक करत नाहीत. Misogelast प्रकारची माणसे हसत तर नाहीतच, पण ते हसण्याचा, हास्याचा राग, द्वेष करतात. १६४२ साली इंग्लंडमध्ये कर्मठ, प्युरिटन लोकांची सत्ता आली. यांना मौज, विलास, चैन, आनंद, हास्य अशा गोष्टी धर्मविरोधी वाटत होत्या. म्हणून त्यांनी लंडनमधली नाट्यगृहे बंद करवली. “Spectacles of Pleasure, too commonly expressing lascivious Mirth and Levity” त्यांना नको होती. हे लोक misogelast, Laughter-haters होते.

आणि आता राबलेला ज्यांचा राग येतो ती माणसे. यांना हसू येत नाही. ते हसण्याचा राग किंवा तिटकारा करत नाहीत, पण त्यांच्यात हास्याची इच्छाच नसते. मेरेडिथ यांना ‘agelast’ म्हणतो. अर्थात मेरेडिथ इंग्रजीत बोलत होता. त्याने हा शब्द इंग्रजीत राबलेच्या पुस्तकातून उचलून आणला होता. म्हणजे हा शब्द तयार करायचे मूळ श्रेय राबलेकडे जाते. ‘Agelast’चा उच्चार ‘एजलास्ट’ असा होतो (एज-लास्ट असा पण करतात). प्राचीन ग्रीकमधील ἀγέλαστος (agélastos, “not laughing”) यापासून हा शब्द राबलेनी बनवला. (ग्रीकमध्ये γελάω geláō, “to laugh”). याचा अर्थ कधी न हसणारा, विनोदाला दाद न देणारा, हास्यभाव नसलेला माणूस. राबले फ्रेंच असल्याने त्याने अर्थातच ‘agelast’चे स्पेलिंग ‘agélaste’ असे केले. १८७७मध्ये जेव्हा तो पहिल्यांदा इंग्रजीत वापरला गेला तेव्हा त्याच्यातला तो शेवटचा ‘E’ नाहीसा झाला. George Meredithला याचे श्रेय दिले जाते.

Jeffrey Aronson म्हणतो - “An agelast is a person who never laughs or has no sense of humour. Meredith described such people as “non-laughers—men who are in that respect as dead bodies, which, if you prick them, do not bleed.” He coined the word from the French word agélaste, one of the words that Rabelais had introduced in his novel. Rabelais took it from the Greek word ἀγέλαστος, grave or gloomy.

Its Latin equivalent, agelastus, was used to describe the orator Marcus Licinius Crassus, as attested by Pliny the Elder in his Naturalis Historia (Book 7, Chapter 19): “…ferunt Crassum, avum Crassi in Parthis interempti, numquam risisse, ob id Agelastum vocatum” (Crassus, the grandfather of [the triumvir Marcus Licinius] Crassus, who fell in Parthia, never laughed, and was therefore called Agelastus [by the satirist Gaius Licilius]). Heraclitus used the word to describe the Apollonian Sybil and it was also the name given to a stone at Eleusis, ἡ πέτρα ἀγέλαστα, on which the goddess Demeter supposedly sat.

Rabelais hated agelasts, who reacted adversely to his brand of satirical humour, accusing him of heresy and impiety : “la calumnie de certains canibales, misanthropes, agélastes, avoyt tant contre moy esté atroce et desraisonnée, quelle avoyt vaincu ma patience: et plus n’estoys deliberé en escripre une iota” (the calumny of certain cannibals, misanthropists, and agelasts had been so atrocious and unreasonable that it destroyed my patience and I decided not to write another jot). Elsewhere he described them as “mangeurs de serpents”, snake eaters.

Rabelais is remembered and his works have survived; his critics are long forgotten. It is a mistake to give in to the intemperate demands of the agelasts and misogelasts.” (https://blogs.bmj.com)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘एजलास्ट’ आणि राबलेचे नाते मीलान कुंडेराने (Milan Kundera) पण खूप छान समजावून सांगितले आहे - “The affectation of gravity" is all around him, but Parson Yorick, a character in Lawrence Sterne's 1760 novel Tristram Shandy, sees it as just a cloak for ignorance or for folly. Whenever possible, he badgers it by humour of expression. This habit of unwary pleasantry becomes dangerous; "every ten jokes got him a hundred enemies", so that, worn out at length by the vengeance of the agelasts, he threw down the sword and died broken-hearted. Yes, he uses the term agelasts, which is a neologism Rabelais coined from Greek to describe people incapable of laughing. Rabelais detested agelasts, because of whom he came close to never writing another jot. Yorick's story is Sterne's salute to his master Rabelais.” (https://www.theguardian.com)

याच संदर्भात आणखी दोन चांगले लेख आहेत :

Laughter and the Agelasts in Rabelais

आणि

agelast

राबलेला राग का येतो हे कळले ना आता? म्हणून हसा, हसत रहा, हसवत रहा. लाफ्टर क्लबांत जाणारे लोक एक वेळ ‘hypergelast’ असू शकतील, पण ते ‘agelast’ आणि ‘misogelast’ नक्कीच नाहीत. तुम्ही कोण आहात?

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......