‘नकारात्मक’ विचाराकडून ‘सकारात्मक’ विचाराकडे जाण्याचा एक प्रयोग… करून तर पहा!
पडघम - विज्ञाननामा
जगदीश काबरे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 05 September 2020
  • पडघम विज्ञाननामा सकारात्मक विचार Positive thinking नकारात्मक विचार Negative thinking

आपण एकटे असताना विविध प्रकारचे विचार करत असतो. या विचारांची वर्गवारी केली तर आपल्या लक्षात येईल की, आपण सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार जास्त करतो. म्हणजे असे की, कोणी प्रेमात असेल, आनंदात असेल तर आपल्याला असे वाटते की, हे सगळे वरवरचे आहे... तो खरा मनातून दु:खी असला पाहिजे. कारण आपण आयुष्यात नेहमी दुःखाला कुरवाळायला शिकलेलो असतो. आपल्या अनेक चित्रपटांमध्येसुद्धा नकारात्मकतेचे उदात्तीकरण असते आणि सत्याचा फक्त शेवटी अचानक विजय झालेला दाखवला जातो!

प्रत्यक्ष जगत असतानाही आपल्याला अनेकांकडून वाईट अनुभव आलेले असतात. तेव्हा त्याच गोष्टी आपल्या डोक्यात जास्त ठळकपणे लक्षात राहतात; पण कोणीही आपल्यासाठी काही चांगले केले असेल तर ते मात्र क्वचितच लक्षात राहते. त्यातही गंमत अशी आहे की, एखाद्या माणसाने आपल्याला खूपदा मदत केली असेल आणि एका वेळेला त्याच्या काही अडचणीमुळे जर त्याने मदत केली नाही, तर मात्र तो माणूस आपल्या मनातून उतरतो. म्हणजे त्याने एवढ्या वेळा आपली मदत केली, ते आपण लक्षात न घेता, त्याने एखाद वेळेस आपल्याला मदत केली नाही म्हणून आपण त्याला लगेच ‘अप्पलपोटा’ समजायला लागतो. यालाच नकारात्मक विचार करणे म्हणतात.

अशी नकारात्मकता जगत राहिल्यामुळे आपल्या डोक्यात सतत नकारात्मक विचार येतात. नकारात्मक विचार याचा अर्थ रीतीभातींची, प्रथा-परंपरांची चिकित्सा करणे असा होत नाही किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टींवर टीका करणे म्हणजे नकारात्मक विचार असेही नाही. एखाद्या धर्मातील अंधश्रद्धांवर कठोर शब्दात प्रहार करणे म्हणजे त्या धर्माचा द्वेष करणे असेही नाही; तर नकारात्मक विचार म्हणजे एखाद्या घटनेविषयी, एखाद्या रीतीविषयी चुकीच्या पद्धतीने विचार करणे. 

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

खरे तर कोणत्याही गोष्टीतील वा घटनेतील दोषदिग्दर्शन करणे म्हणजे सकारात्मकतेकडे पाऊल टाकणे होय. कारण त्या दोषांचे जेव्हा ज्ञान होते, तेव्हा आपण परखड आत्मपरीक्षण करायला लागतो. त्यातून आपल्याला ते दोष नेमके काय आहेत, हे कळायला लागते. मगच आपण त्यांचे निराकरण करायला लागतो. असे करणे हे सकारात्मकच नाही काय? 

नकारात्मक विचार करणे हे एकवेळ सोपे आहे, पण सकारात्मक विचार करण्यासाठी मात्र आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्याला स्वतःची एकटे असताना विचारांची काही दिशा ठरवावी लागते. असे सकारात्मक विचार नुसती पुस्तके वाचून येतील असे समजणे धारिष्ट्याचे ठरेल. कारण त्यासाठी आपल्यालाच काही प्रयत्न करावे लागतात. वाचनामुळे एक वेळ दिशा कळेल, पण प्रयत्न करणे मात्र आपल्याच हातात असते. ते प्रयत्न कसे करावेत यासाठी अनेक विचारवंतांनी वेगवेगळे विचार मांडले आहेत. या बाबतीत माझ्यासारख्या सामान्य माणसाने स्वअनुभवातून एक पद्धत तयार केली आहे. ती वरवर पाहता सोपी वाटली तरी आपण जेव्हा प्रत्यक्ष करायला लागू, तेव्हा आपल्याला तेवढे सोपे नाही, हे कळू लागेल. 

..................................................................................................................................................................

हेही वाचा : पत्रकार पांडुरंग रायकरच्या मृत्युच्या निमित्ताने काही प्रश्न…

..................................................................................................................................................................

आपण एवढेच करायचे की, दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका डायरीत किंवा फोन डायरीमध्ये दिवसभरातील पाच गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. मग त्या किती का साध्या असेनात. याचा अर्थ तुमच्या मनात येणारे सकारात्मक विचार लिहून काढायचे. जसे की, मी आज दिवसभरात कोणाशीही तुच्छतेने बोललो नाही म्हणून मी स्वतःशीच कृतज्ञ आहे. अगदी तात्कालिक विचार करायचा झाला तर, मी अजूनही करोनामुक्त आहे म्हणून मी माझ्या प्रतिकारशक्तीशी कृतज्ञ आहे इत्यादी.

अशा प्रकारे दररोज पाच गोष्टी लिहून त्याच विचाराने झोपल्यामुळे आपल्याला शांत झोप लागते आणि मेंदू सकारात्मक पद्धतीने विचार करू लागतो. ‘Thought is thing’ या पद्धतीने आपण कृती करू लागतो. आपल्या विचारांचा परिणाम म्हणजे ही कृती असते. आपण सकारात्मक विचार केल्यावर आपली ऊर्जाही चांगल्या कामासाठी वापरली जाते.

येथे आपण हे लक्षात ठेवायला हवे की, वैज्ञानिकदृष्ट्या ऊर्जा कधीही सकारात्मक आणि नकारात्मक नसते. कारण ती एक भौतिक गुणधर्मयुक्त राशी आहे. विचार भावनांशी निगडित असल्यामुळे ते मात्र सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. त्यामुळे आपण त्या दिशेने आपली ऊर्जा वापरत असतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अशा प्रकारे सकारात्मक विचार करायची सवय लागल्यामुळे आपल्या लक्षात येते की, आपल्याला जीवनाने भरपूर दिले आहे, ते कसे जगायचे हे आपण विसरून गेलो होतो. हे लक्षात आल्यावर आपणच आपल्याला पुन्हा नव्याने गवसू लागतो.

पण पाच कृतज्ञतापूर्ण गोष्टी लिहिताना सुरुवातीलाच आपल्या लक्षात येते की, आपल्या डोक्यात नकारात्मक गोष्टीच जास्त येत आहेत. त्यामुळे सकारात्मक पाच गोष्टी मिळणे कठीण होत आहे. म्हणजे असे की, माझ्या डोक्यात लोकांबद्दल तक्रारीच जास्त येतात किंवा मला आयुष्यात माझ्या लायकीप्रमाणे मिळाले नाही असे वाटून मी अनेक लोकांना दोष देत असतो. खरे म्हणजे आपल्याला आपल्या लायकीप्रमाणे आयुष्यात मिळालेलेच असते, पण ते मात्र आपण ते एवढे गृहीत धरलेले असते की, त्यापायी इतरांशी तुलना करून आपण दुःखी होत असतो.

आणि आपल्या आवाक्याबाहेरचे आहे, ते आपल्याला मिळाले नाही मिळाले नाही, म्हणूनही आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. यावर मात करण्यासाठी दररोज पाच कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या गोष्टी लिहिल्यामुळे ही नकारात्मकता नंतर हळूहळू कमी होत जाते आणि आपले मन सकारात्मक विचाराने भरत जाते. हळूहळू आपण आनंदाने जगायला शिकू लागतो. जीवन हे दुःखाचा सागर नसून आनंदाचा सागर आहे, असे आपल्याला जाणवायला लागते. आपल्या वागण्या-बोलण्यात बदल होऊ लागतो. करून तर पहा...

..................................................................................................................................................................

जगदीश काबरे

jetjagdish@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......