अजूनकाही
‘अ बर्निंग’ ही मेघा मुजुमदार यांची पहिलीवहिली कादंबरी २ जून २०२० रोजी पेंग्विन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. अमिताव घोष, या ग्यासी, टॉमी ऑरेंज या मान्यवरांनी ‘अ बर्निंग’चे कौतुक केल्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. या कादंबरीविषयी...
..................................................................................................................................................................
फेसबुकचा भाजपने कसा वापर केला, त्याच्या बातमीने या कंपनीला आता आपला ‘फेस’ मास्कमध्ये लपवावा लागतोय. कितीही खुलासे केले तरी केलेले गैरकृत्य सार्थ ठरवता येईनासे झालेय. भाजपच्या नादी जो जो लागला, त्याचा कारभार आटोपलाय. कोणी खालसा झाले, तर कोणी बेइज्जत! पण फेसबुकवरची एक पोस्ट थेट फासावर नेऊन जीव घेते, ती कहाणी त्या बातमीच्या आशयाची जवळपास पुष्टी करते. म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष व संघटना फेसबुकवरच्या एका बेसावध अजाणत्या प्रतिक्रियेचा वापर करून कसा डाव साधतात, त्याची ही कहाणी आहे.
‘अ बर्निंग’ ही कादंबरी मूळची कोलकात्याची व आता अमेरिकेत राहणारी मेघा मुजुमदार हिने लिहिलेली. पहिल्याच कादंबरीत गोध्राच्या रेल्वे जळिताची पार्श्वभूमी घेऊन मेघा केवळ तीन पात्रांतून सध्या भारतात काय चाललंय ते सांगते. वाचक सारे काही जाणतोय असे गृहित धरून लेखिका पक्ष, संघटना, धर्म असे कोणालाही थेट समोर आणत नाही. पण वाचक समजतो. मुस्लीम नागरिक किती असहाय व उपेक्षित होऊन गेलाय हे मात्र लेखिका जाणीवपूर्वक ठसवते.
जीवन असे त्या तरुणीचे नाव. एका दुकानात काम करत तिने एक चांगला सेलफोन घेतलाय. फेसबुक वाचते अन तिथे लिहितेही. रेल्वे स्थानकावर बाहेरून बंद जळालेले डबे पाहते. शंभरावर लोक मेलेत. घरी आल्यावर त्या घटनेचे चित्रण पाहत बसते. मुख्यमंत्री घटनेची चौकशी करण्याची घोषणा पत्रकारांपुढे करताना कोणीतरी डोकी खाजवणाऱ्या पोलिसांच्या एका व्हिडिओशी ती जोडून टाकलीय. ती हसते. “फेसबुकवरच्या या अज्ञातांचे मला भारी कौतुक वाटते. ते त्यांना जे वाटेल ते म्हणतात. विनोद करायला भीत नाहीत ते. पोलीस असोत की मंत्री, ते सर्वांची टिंगल उडवतात. हेच स्वातंत्र्य नाही का? पँटालून्समध्ये मी सिनिअर सेल्स क्लर्क होऊन आणखी थोडा पगार कमावला की, तशीच स्वतंत्र होईन ना…”
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
मग एक व्हिडिओ जीवन पाहते. एक बाई त्वेषात सांगतेय की, ‘रेल्वे स्थानकापाशीच एक जीपभर पोलीस होते. जा, त्यांना विचारा की माझा नवरा जळत असताना ते तसेच उभे का होते. तो डब्याचे दार उघडू पाहत होता. आमची मुलगी वाचू पाहता होता. तो खूप झटला.’
जीवन हा व्हिडिओ जोडते अन लिहिते- ‘सरकारी पगार घेणारे पोलीस बघे बनले. त्यांनी काहीच केले नाही. या निरपराध बाईने मात्र सारे गमावले.’
मग फेसबुकवरचा खेळ सुरू होतो. जीवनला दोनच लाईन्स येतात. एक बाई लिहिते – ही व्यक्ती बनाव रचतीय की नाही तुला काय माहीत? कदाचित ती आपल्याकडे लक्ष वेधत असेल!
“मी उठून बसते. ही बाई माझी फ्रेंड असेल का? तिच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये ती एका बाथरूममध्ये पोझ देताना दिसतीय. मी लिहिले, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तरी का? माझ्या डोक्यात त्या निर्दयी बाईचे शब्द घुमू लागले. मला त्या बाईने रागच आणला…. माझ्या अंगठ्याखाली मी रेल्वेवरच्या हल्ल्यावर ५० लाईक्स पाहिल्या. मग शंभर लाइक्स, तीनशे लाइक्स. माझे उत्तर कोणालाच आवडले नाही. मग मी त्या छोट्या चमकदार काचेवर एक मूर्खपणा केला. मी एक धोकादायक गोष्ट, लिहायची सोडा, साधी विचारात आणणे कोणी केले नसेल अशी केली. ‘आई मला माफ कर : तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पोलीस मदत करणार नसतील, समोर माणसे मरताना पोलीस केवळ पाहत बसतील याचा अर्थ सरकारसुद्धा एक दहशतवादी नसावे काय?’ ”
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘द हीट ऑफ विंटर’ : पं. नेहरूंच्या हत्येची काल्पनिक गोष्ट
..................................................................................................................................................................
पहिल्या साडेतीन पानांत मेघा हे सारे इतक्या भेदक भाषेत सांगते की, त्यात कादंबरीचे शीर्षक आणि आशय सारे ओतते. छोटी वाक्ये, चित्रमय अन धावती मांडणी वाचकाला कादंबरीच्या शेवटापर्यंत ओढतच नेते.
लव्हली हे एक तृतीयपंथी पात्र, पीटी सर हे जीवनच्या शालेय शिक्षकाचे आणि स्वत: जीवनचे, अशा तीन पात्रांच्या आलटूनपालटून अनुभवांमधून कथानक उलगडले जाते. लव्हलीला झोपडपट्टीत इंग्रजी शिकवायला जीवन जात असते, तर पीटीसरांना तिचा कबड्डीचा आक्रमक खेळ इतका आवडलेला असतो की, तिला ते त्यातच गुंतवू पाहतात. पण गरिबीमुळे जीवनशाळा सोडते, इंग्रजी शिकवणे थांबवते अन काम करू लागते.
दोन्ही व्यक्ती जीवन फार चांगलीय आणि दहशतवादाशी काहीही तिचा संबंध नसल्याचे मानतात. खटल्यात तिच्या बाजूने साक्ष देण्याचे ठरवतात अन मग सुरू होतो फेसबुकच्या निमित्ताने उसळलेला सत्य आणि खोटेपणा यांचा ‘अ बर्निंग’मधला संघर्ष. लेखिकेने हिंदुत्ववादी पक्ष व समर्थक असत्याचा कसा वापर करतात, त्यासाठी कसकसा दबाव आणतात, याचे फार रेखीव संदेशन केलेय. माणसाचा स्वार्थ कसा सत्याची चाड विसरायला लावतो, हे या कादंबरीचे मर्म. त्यात गरीब मुस्लीम पार भरडले जातात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
लव्हलीला पडद्यावर झळकायचेय. अभिनयाचा वर्ग ती करतीय. तिच्या पहिल्या साक्षीने ती विख्यात झालीय. तसेच पीटीसर. एका हिंदुत्ववादी पक्षाच्या व त्याच्या महिला नेत्याच्या जवळ जाताच त्यांच्यावर न्यायालयात खोट्या साक्षी देण्याचे काम सोपवले जाते. त्यांच्या अशा साक्षीने मुसलमान शिक्षा भोगतात. जीवनबाबत ते द्रवतात. पण तिने राष्ट्रपतींकडे पाठवण्यासाठी केलेला अर्ज त्यांच्या पक्षाला सत्ता मिळताच ताब्यात घेऊन तिला फाशी देण्याची सरकारी व्यवस्था करतात. मोठ्या चित्रपटात काम मिळाले म्हणून लव्हलीवर दबाव टाकला जातो की, आता एका दहशतवादी तरुणीची साथ केल्यास तिचीच बदनामी होईल.
असहाय, निरपराध, गरीब, स्वातंत्र्याची आस धरण्यासाठी पैसा कमवू पाहणारी मुसलमान जीवन फासावर चढवली जाते. तिची ही अतिशय करुण, टोकदार शोकांतिका आपल्याला चटका लावून समाप्त होते.
..................................................................................................................................................................
‘अ बर्निंग’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment