गीतांजलीच्या कविता अगदी साध्या आहेत. कल्पनारम्य विलास नाही. अभासी जीवनाचा स्पर्श नाही. म्हणून ही खरी कविता आहे.
ग्रंथनामा - झलक
फादर जो. मा. पिठेकर
  • ‘गीतांजलीच्या कविता’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 August 2020
  • ग्रंथनामा झलक गीतांजलीच्या कविता Gitanjalichya Kavita गीतांजली घै Gitanjali Ghai

गीतांजली घै या १६व्या वर्षी कॅन्सरने मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कविता काही वर्षांपूर्वी इंग्रजीमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. त्याचा नुकताच ‘गीतांजलीच्या कविता’ या नावाने मराठी अनुवाद करण्यात आला आहे. रांची येथील ‘झेवियर पब्लिकेशन’ यांनी प्रकाशित केलेल्या आणि फादर अशोक ओहोळ यांनी भावानुवाद केलेल्या या संग्रहाला फादर जो. मा. पिठेकर (एस. जे. मणिकपूर, वसई) यांनी प्रस्तावना लिहिली आहे. ती ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी...

..................................................................................................................................................................

गीतांजलीच्या कविता मी प्रथम १९८०च्या सुमारास इंग्रजीतून वाचल्या. एक शाळकरी मुलगी एवढ्या अर्थपूर्ण कविता लिहू शकते, यावर माझा विश्वासच बसेना. मी त्या कविता सिस्टर लोकांना (ख्रिस्ती साध्वी) रीट्रीट (साधारण एक आठवड्याचे आध्यात्मिक सत्र) देताना वापरू लागलो.

गीतांजलीचे नाव टागोरांच्या ‘गीतांजली’ या नोबेल पारितोषिक विजेत्या पुस्तकावरून दिले होते. त्या नावास मी सार्थ ठरेन का, अशी तिच्या मनात शंका होती. पण सर्व कविता वाचल्यावर आपल्या मनात ती शंका मुळीच राहत नाही. त्यासाठी तिने केलेली प्रार्थना देवाने ऐकली. इंग्रजीतील प्रसिद्ध कवी, पत्रकार प्रीतीश नंदी यांनी म्हटलंय की, ‘कठीण प्रसंगांना, आजारांना तोंड देताना लहान मुलांना ती धीटपणा देऊन तिच्या कवितांतून त्यांना सूक्ष्म दृष्टी देऊ करील.’ (गीतांजली भाषांतर, सुनील शामसुंदर आढाव, सिग्नेट पब्लिकेशन, पुणे, २०१४).

गीतांजलीच्या कविता पहिल्यांदा कविता वाचल्या, तेव्हा तिचे दु:ख जाणवले. पण त्या दु:खामागची सखोलता, तिची देवावरील श्रद्धा, जीवनाविषयीची विशेष आस्था, माणसांविषयीची कळकळ या सखोल भावना मला जाणवल्या नाहीत. आपल्या दु:खामध्येही तिचा आत्मा देवाच्या इतका जवळ होता की, त्याची कल्पना तिच्या शब्दांद्वारे होऊ शकत नाही.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

फक्त १६ वर्षाची मुलगी, शाळेत शिकणारी. कॅन्सरने आजारी. दु:ख सहन होत नाही आणि बरे होण्याची शक्यता तर मुळीच नाही. तीच म्हणते-

‘एक तर शेवट कर माझा

या मेणबत्तीच्या वातीचा

किंवा प्रकाशू दे तिला

आणखी काही वर्षे’

(‘त्यांच्या डोळ्यात खात्री नव्हती’)

ती पुढे म्हणते, ‘काय केलंय मी हे भोग माझ्या वाट्याला आले’ (इवलीशी प्रेमपत्रं’), तरीपण ती खचलेली नाही, ‘तरीही खंबीर आहे मी मृत्युला सामोरे जायला (‘माझी प्रार्थना’).

गीतांजलीला आपल्या मानसिक व शारिरीक दु:खांची जाणीव आहे. आपले दु:ख, वेदना ती आपल्या आईला किंवा इतरांना दाखवू इच्छित नाही. ‘कारण मी खूप ग्रासलेय वेदनांनी’ (‘माझ्या भेटीला ये), ‘अशक्य होतंय आता लपवणं दु:ख माझं’ (‘निरव शांततेत), ‘खोल तीव्र वेदना अन् व्याकूळ करणाऱ्या यातना अनुभवल्यात मी’ (‘आठवणीच तेवढ्या उरल्यात’), ‘माझ्या हृदयाच्या तळाशी खोल लाटा दु:खाच्या’ (‘खोल लाटा दु:खाच्या’)…

हे सर्व वाचताना मन जड व्हायचे. पुढे जाणे कठीण व्हायचे. माझ्या मनाला जाणवायचे की, ही मुलगी कोवळी आहे. तिने अजून जग पाहिले नाही. उलट ती आपल्यालाच धीर देते. ‘वेदनांतही मी हसमुख असण्याचा सर्वतोपरी प्रयास करते’ (‘वेदनातही हसतमुख’) म्हणून तिची देवाकडे प्रार्थना आहे, ‘वाहून जाऊ देऊ नकोस मला आत्मदयेच्या महापुरात’ (‘सहनशीलता’).

वेदना असह्य आहेत, मरण अटळ आहे तरी तिचा देवावर अमाप, अढळ विश्वास आहे. असह्य दु:खामुळे आईच्या मनात अस्वस्थता आहे. तिचेही मन अस्थिर आहे. अशा परिस्थितीत ती म्हणते, ‘देवाची कुजबुज मला ऐकू द्या’ (नि:श्वास). जणू ती आपल्याला प्रश्न विचारते- ‘का थांबावं गायचं मी केवळ बरी नाही म्हणून?’ (‘पक्षीगाणं). ‘नका, नका, नका अश्रू ढाळू नका ते नकोत मला केवळ तुमची स्मितहास्ये हवीत (येते मित्रांनो’)…

ती आपल्याला अमर सत्याची ओळख करून देते. दु:ख, वेदना यातून शिकण्यासारखे खूप आहे. ‘दु:खामुळे घडतं दर्शन सत्याचं’ (दर्शन सत्याचं).

..................................................................................................................................................................

हेही वाचा : मुरलीधर शिंगोटे : ‘मुंबई नावाच्या विद्यापीठा’त शिकलेला मातब्बर संपादक-मालक

..................................................................................................................................................................

गीतांजलीच्या वेदना केवळ शारिरीक नाहीत. आपले कोवळे जीवन मरणाने नष्ट होणार आहे, याविषयी तिच्या मनात तिळमात्र शंका नाही. तिचे वडील जवळ नाहीत. ‘प्रिय पपा मला भेटायला या’ (‘नको उशीर एवढा’) ही तिची आर्त मुकी आरोळी आहे. आपल्याला त्या मूक आरोळीची कल्पना करवणार नाही. कारण त्याच कवितेत ती पुढे प्रेतयात्रेविषयी म्हणते, ‘त्यांच्यात तुम्हीही माझ्या मागे चालाल याची मला शंका वाटते’. पण मरणापूर्वी वडील तिला भेटतात. दिवस-रात्र आईच तिच्यासोबत असते. आईच्या हृदयाची कालवाकालव तिला जाणवते. आईचा रात्रंदिवस पहारा आहे, जागरण आहे. 

बरं होऊन जीवन मनासारखं जगण्याची तिची इच्छा आहे. तिचं भव्य स्वप्न असं आहे. ‘माझ्या हाताने दुबळ्या-गरिबांना भरवणं, त्यांचे अश्रू पुसणं, त्यांना आनंदी उत्साही पाहणं’ (‘मोजलेले दिवस’). पण हे स्वप्न तिला जगता येणं शक्य नाही. या अतिव निराशेत तिच्या आईचा सहभाग आहे. याविषयी ती अतिसंवेदनशील आहे. ती स्वत:च्या दु:खातच बुडालेली नाही. ‘उज्ज्वल आशेची.... स्वप्नं आता अंधुक झालीत’ (‘आशा). तीच आपल्या मनात शंका निर्माण करते. ते वाचून आपलंही हृदय खचतं. ‘होतील का माझी स्वप्नं खरी जगेल का मी ती उमलताना पहायला’ (‘स्वप्न मरणासन्न हृदयाची’).

नियती किती निष्ठूर आहे असे आपल्या हृदयाला जाणवतं. या सर्व भग्न स्वप्नात तिची आई, खुशी बद्रुद्दीन, सहभागी आहे. ‘ते डोळे प्रेमाच्या प्रतिमा परावर्तीत करतात, अनेक वर्षांच्या दु:खाने कोमेजलेल्या हृदयातले’ (‘माझी आई’). आईचं दु:ख तिला पहावत नाही. ‘न ढाळलेले अश्रू औषधांनी सुजलेल्या डोळ्यात जड होतात, त्यामागच्या वेदनांसह आवर घालते मी त्यांना तुला आणखी यातनातून वाचवण्यासाठी’ (‘क्षमा कर मला’).

आईसाठी ती प्रार्थना करते. ‘दया कर देवा झोप दे तिला आज रात्री’ (‘आठव’). आईबद्दल तिच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. ‘सर्वांशी समरस होणारी तुझ्यासारखी आई लाभणं हे वरदान आहे. (‘तुझ्यावर प्रेम करते’). तीच आपल्या आईला आधार देते. ‘तुम्ही वर पहाल तर इंद्रधनुष्य दिसेल मी ढाळलेल्या आश्रूंचं (‘मित्रांनो’), म्हणून आई गीतांजलीच्या शब्दांत शेवटचा निरोप देते - 

‘जा, माझ्या जीवलग मुली, जा....

दु:खी झाले एकाकी झाले तुझ्यावीन

पण त्या दयाघनाचीच ऋणी व आभारी आहे,

अखेरीस तू माझ्या बाळा विसावलीस’ (‘सत्याचे क्षण’).

शालेय वयात कॅन्सरसारखा असाध्य आजार स्वीकारणे सहजसोपे नाही. गीतांजलीच्या मनात रागाची फार मोठी लाट आली असेल. कदाचित आपल्याला बरा न होणारा आजार झाला आहे, हे तिने सुरुवातीला नाकारलेलंही असेल. सर्व स्वप्ने धुळीला मिळणार, हा विचार वारंवार येत असावाच. कालांतराने ती या आजाराला शरण जाते. ‘स्वप्नं मरणासन्न हृदयाची’ याची तिला आतून जाणीव झालेली आहे. ती बेजार झाली आहे. ती म्हणते, ‘निद्रा, आपली कधी भेट झाली तू अन् मी’ (‘निद्रा’)

झोप नाही. विश्रांती नाही. म्हणून ती वैतागाने म्हणते, ‘सौंदर्य झडून गेलेली गीतांजली’ (‘जबरदस्त धक्का’). देवाकडे प्रार्थना करते, ‘मला झोपू दे कायमची’ (‘करुणा कर हे देवा’)... ‘देवा कृपा कर आणि मला एक शांत रात्र दे’ (‘एक शांत रात्र’)… ‘जीवनाच्या काळोख्या मार्गावर मी प्रवास करते’ (शुभेच्छा’). 

आता तिचा आजाराचा शेवटचा टप्पा येतो. ती आजार स्वीकारते. मरणही स्वीकारते. हा तिचा मरणावर विजय आहे. ‘कधी तुझी भयंकर भीती वाटते तर कधी वाट पहाते मी तुझी’ (‘मृत्यू जरा हळूच’)… ‘केवळ वाट पहाते मरण दंशाची’ (‘निरव शांततेत’). शेवटी ती म्हणते, ‘मी मृत्यूला सोबत ठेवून घेतलंय’ (‘मृत्यू अन् मी’). केवढे हे धैर्य आणि परलोक जीवनावरील श्रद्धा!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गीतांजलीचा जन्म १२ जून १९६१ रोजी झाला. ती कॅन्सरने मुंबईत १२ ऑगस्ट १९७७ रोजी देवाघरी गेली. या निरागस बालिकेच्या कविता अगदी साध्या आहेत. शब्दांची अडचण कुठेही जाणवत नाही. कल्पनारम्य विलास नाही. अभासी जीवनाचा स्पर्श नाही. पण भावना वारंवार जाणवतात. म्हणून ही खरी कविता आहे. त्या कुणीही वाचाव्यात, डोळ्यात अश्रू यावेत, गळा दाटून यावा. हीच तुमची गीतांजलीला श्रद्धांजली!

या सुंदर कवितांचा मनाला भावणारा भावानुवाद केल्याबद्दल फादर अशोक ओहोळ यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. त्यांना त्यांच्या पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा.

..................................................................................................................................................................

गीतांजलीच्या कविता - गीतांजली घै,

भावानुवाद - डॉ. अशोक ओहोळ,

झेवियर पब्लिकेशन, रांची,

मूल्य - ५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 14 August 2020

काय बोलणार यावर. तिच्या वेदना संपून ती पुढील मार्गाला लागावी. यापलीकडे काही बोलणं शक्य नाही. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा!
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......